ram gagare

Romance Fantasy

3  

ram gagare

Romance Fantasy

विश्वप्रिया - भाग 1

विश्वप्रिया - भाग 1

2 mins
239


विश्वप्रिया आणि शाम दहावीला एकाच वर्गात होते.दोघांची चांगली मैत्री होती,विश्वप्रिया सायन्स विषयात थोडी कच्ची होती त्यामुळे शाम तिला सायन्स शिकवायला तिच्या घरी जात असे.विश्वप्रियाचे घरचे शामला चांगले ओळखत होते,विश्वप्रिया आणि शाम तसे एकमेकांचे पाहुणेच होते.

बारावी पर्यंत दोघेही एकाच कला्स मधे होते.बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी विश्वप्रिया बाहेर शिकायला गेलेली,त्यानंतर शाम आणि तिचा तीन वर्षे काहीच कॉन्टॅक्ट नव्हता.शाम पण तिला विसरला होता.तीन वर्षानंतर शाम इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता;एकेदिवशी शामच्या मित्राने

दहावीचा एक व्हाट्सएपचा ग्रुप काढला होता,त्यात दहावीचे सर्व मुलं मुली ऍड केले होते.विश्वप्रिया सुद्धा त्या ग्रुप मध्ये होती,हे शाम ला माहीत होते पण त्याने कधी तिला कधी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही.सर्व ठीक चालु होते,एकदिवस मोबाईल पाहता पाहता शामच्या डोक्यात विचार आला विश्वप्रियाला मेसेज करून पाहु,ओळखते का नाही ती मला हे पाहायचे होते शाम ला.शामने तिला व्हाट्सएप वर मेसेज केला..


हाय!! How are u??

तिचा लगेच message आला नाही,संध्याकाळी तिचा मेसेज आला..

हाय!! Im fine..

तु ओळखले का मला ?शामने विश्वप्रियाला विचारले..

हो,मग का नाही ओळखणार तुला.तुच विसरलास मला नंबर सेव असुनही तु मला एकपण मेसेज नाही केला.विश्वप्रिया म्हटली..


विश्वप्रियाने आपल्याला ओळखले हे ऐकुन शामला आनंद झाला होता.दोघेही बाकी नॉर्मल गप्पा मारत होते,बोलता बोलता शामला कळाले की विश्वप्रिया त्यांच्या जवळच्याच शहरातील एका बँकेत कॅशिअर म्हणुन जॉबला होती.दिवसामागुन दिवस जात होते


शाम आणि विश्वप्रिया दोघेही रोज जसा वेळ मिळेल तसे बोलत होते,दोघेही आता चांगले बेस्ट फ्रेंड झाले होते.एकमेकांच्या आवडी निवडी पुर्णपणे माहीत झाल्या होत्या,विश्वप्रिया रोज काय घडले काय नाही असे छोटे मोठे किस्से रोज शामला सांगायची शाम सुद्धा मन लावुन ते ऐकत असायचा.दोघेही अजुन एकमेकांना भेटले नव्हते,त्यामुळे विश्वप्रिया आता कशी दिसते हे जाणुन घेण्याची शामला खुप उत्सुकता होती.


एक दिवस दोघांनीही भेटायचे ठरवले,विश्वप्रियाने ती जिथे जॉबला होती तिथल्याच एका हॉटेल मध्ये भेटायचे ठरवले.शामला ते हॉटेल माहीत होते,विश्वप्रियाला भेटायचे आहे त्यामुळे शाम तिने सांगितलेल्या वेळेच्या आधीच येऊन तिची वाट बघत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance