विश्वप्रिया..भाग5(शेवटचा भाग)
विश्वप्रिया..भाग5(शेवटचा भाग)
पुढे दोन,तीन वर्षानंतर एका कॉमन फ्रेंड्सच्या लग्नात विश्वप्रिया अन शामची भेट झाली पण दोघे लांबुनच एकमेकांना पाहत होते.तितक्या शामच्या खांद्यांवर कोणीतरी हात ठेवला त्याने मागे वळुन स्माईल दिली.एका स्त्रीने त्याच्या हातात एक वर्षाचा मुलगा दिला;ती शामची पत्नी अन त्याचा एक वर्षाचा मुलगा होता.
विश्वप्रियाला पाहुन शामच्या डोळ्यात पाणी होते, त्याला त्यांची कॅफे मधली शेवटची भेट आठवली. विश्वप्रियाला आपण शामची अपराधी असल्याचं जाणवत होतं तिनेही त्याच्याकडे बघुन न पहिल्यासारखे केलं. इतक्यात तिला तिच्या नवऱ्याने आवाज दिला अन ती त्याच्यासोबत निघुन गेली.
काय हो !!काय झालं
तुमच्या डोळ्यात पाणी का बरं..शामची बायको म्हटली!! काही नाही; कचरा गेला वाटत डोळ्यात जाईल निघुन.
चल निघुयात लग्न लागेल आता..म्हणत शाम बायकोला अन त्याच्या मुलाला घेऊन निघुन गेला.

