ram gagare

Inspirational

3  

ram gagare

Inspirational

कर्म कर फल की चिंता मत कर

कर्म कर फल की चिंता मत कर

1 min
183


मी जॉब करत होतो,पण माझे त्याच्यात मन लागत नव्हते.पण कुटुंबाची जवाबदारी असल्यामुळे मला तो जॉब सोडता येत नव्हता.माझी इच्छा नसताना सुद्धा में करत होतो.सगळे ठीक चालु होत,अन अचानक मधेच कोरोना पसरला,त्यामुळे कंपनीतुन काही एम्प्लॉइसना काढून टाकले त्यात मी सुद्धा होतो.काय करावे कळत नव्हते,थोडीफार सेविंग्स होती त्यामुळे मॅनेज होऊन गेल.पण कधीतरी ते सुद्धा पैसे संपणार होते आणि तसेच झाल.माझ्याकडील सर्व पैसे संपले,काय कराव कळत नव्हते.खूप टेन्शन आले होते,घरात भगवतगीता होती,तशी मला वाचनाची आवड होती पण कधी भगवत गीता वाचली नव्हती.

भगवतगीता वाचायला घेतली,वाचनात पार गुंगून गेलो.आठ ते दहा दिवसांत कधी पूर्णपणे वाचून झाली कळालेच नाही.पण भगवतगीता वाचल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला.त्यातून मी खूप काही शिकलो.मला जीवन जगण्याची नवीन उमेद मिळाली.

मी एक छोटासा व्यवसाय चालू केला,सुरूवातीला एवढा रिस्पॉन्स भेटला नाही.पण गीतेतले एक वाक्य नेहमी माझ्या लक्षात राहिले, कर्म कर फल की चिंता मत कर.मी माझे प्रयत्न चालू ठेवले,हळूहळू कस्टमर येईला लागले.आज माझा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे.हे सगळे शक्य झाले भगवतगीते मुळे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational