विश्वप्रिया - भाग 3
विश्वप्रिया - भाग 3
सर्वकाही ठीक चालू होत,काही महिने असेच गेले,दोघे आता वेळ काढुन भेटत असे..त्यांचे भेटण्याचे ठिकाण ठरलेले होते.जेव्हा जेव्हा शाम विश्वप्रियाला भेटायचा तेव्हा त्याला ती अजुनच सुंदर दिसायची.शामला तिची कमरेपर्यंत येणारी वेणी खुप आवडायची.शामची परीक्षा झाली तो चांगल्या मार्कांने पास झाला. शाम आता इंजिनीरिंग च्या शेवटच्या वर्षाला होता.
एके दिवशी असेच एका भेटीत विश्वप्रियाने त्याला तिच्या एका नाटकाचा पास दिला होता. अन् त्याला सांगितले की शाम,मी एका नाटकामध्ये भाग घेतला आहे उद्या आहे नाटकं अन तु उद्या ते पहायला येत आहेस,हे मी तुला सांगत नाही तर ऑर्डर देत आहेस.
बर बाबा..येईल मी,ओके !!
विश्वप्रिया आपल्यावर एवढा हक्क दाखवते हे पाहुन शाम ला खुप भारी वाटत होते,पहिल्यांदा कुणीतरी असे होते की जे एवढ्या हक्काने त्याच्याशी बोलत होते.ठरल्याप्रमाणे शाम नाटक पहायला गेला,त्याला नाटकाची एवढी आवड नव्हती पण विश्वप्रियाला ते आवडते म्हणुन तो गेला. नाटक वगैरे पार पडले..नाटक संपल्यावर विंगेतून विश्वप्रियाने शामला आवाज दिला..शाम तिच्याजवळ गेला विश्वप्रियाने तिच्या नाटकातल्या सर्व मित्र मंडळींशी त्याची ओळख करून दिली.सर्व मेकअप वगैरे आवरून विश्वप्रिया नेहमीच्या वेशात येऊन शामकडे आली.
शाम ऐकना,मला तुझ्याशी जरा बोलायचे होते.
हो बोलना,शाम म्हटला..
विश्वप्रिया काय बोलणार आहे ह्याची त्याला जराशी पण कल्पना नव्हती..मला सांगायचे आहे तुला काहीतरी पण कसे सांगु काहीच कळत नाहीये.. तु कसं रिऍक्ट करशील माहीत नाही.तिच्या मनाची अगदी चलबिचल होत होती.अग एवढं काय त्यात बोलना काय बोलायचे आहे ते,आपण काय नवीन आहोत का..शाम बोलला
आय लव यु !!शाम..विश्वप्रिया म्हटली
काय..एवढाच शब्द त्याच्या तोंडुन बाहेर आला.तो आ..करून पाहत राहिला. ह्यावर काय बोलावे हे शामला कळतच नव्हते. हो...विश्वप्रिया म्हटली.
हेच सांगायचे होते तुला.आपल्याला जास्त दिवस नाही झाले भेटून..तीन वर्षांनंतर आता कुठे आपण भेटलो आहोत.तुला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा मी हा विचार पण नव्हता केला की,मी कधी तुझ्यावर प्रेम करेन. तू दहावीला जसा माझ्याशी बोलायचा त्याच पॉईंट ऑफ व्हिव ने आताही मी तुझ्याशी बोलत होते.पण जस जस आपण भेटत गेलो मी कधी तुझ्या जवळ आले माझे मलाच कळले नाही,रोज तुला भेटाव तुझा हात हातात घेऊन तुझ्याशी गप्पा माराव्या.हाच विचार मी नेहमी करत असे..पण तू सुद्धा माझ्याबद्दल असाच विचार करत असशील का नाही हे मला माहीत नव्हते. तुला, माझ्या मनातील तुझ्याबद्दल असणारे प्रेम व्यक्त करायचे ह्याच हेतूने मी तुला आज नाटक पहायला बोलावले होते.

