STORYMIRROR

ram gagare

Tragedy

3  

ram gagare

Tragedy

व्यसन..

व्यसन..

2 mins
214

प्रिय, काल तुझा अकाली मृत्यू झाला. माझ्यासाठी ही खूप धक्कादायक गोष्ट आहे.एक मैत्रीण म्हणुन नाही,तर एक बायको ह्या नात्याने तुझ्याशी बोलते. तुझ्याअसे अचानक जाण्याने आमच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला.तुला ह्याची कल्पना ही नसेल.तुझ्यासोबत असताना सुद्धा मी पतीसुखाला मुकले कारण,तु नवरा म्हणुन माझ्याशी कधी वागलाच नाही. येखांद्या गुलामा प्रमाणे वागणुक दिली मला.

     

तुझ्या ह्या दारूच्या व्यसनामुळे तुला तुझा जीव गमवावा लागेल ह्याची तु कधी कल्पना तरी केली होती का??ह्या सर्वाला कारणीभूत ठरली ती तुझी मित्र संगती. चांगल्या मित्रांचा सहवास आपल्या आयुष्यात एक चांगला बदल घडवून आणु शकतो,पण तु तुझ्या मित्र संगतीलाच चुकलास.जेव्हा तु रात्री दारु पिऊन घरी यायचास,घरात भांड्यांची आदळआपट करायचा.ह्याचा आपल्या मुलांच्या मनावर काय परिणाम होईल ह्याचा तू कधी विचारच केला नाही!


    दारूच्या नशेत तु मला मारायचा, माझ्यावर हात उगरायचा हे सर्व अत्याचार मी सहन केले,ते फक्त एका आशेवर.की कदाचित दारू पिण्याचा तुझा हा आजचा शेवटचा दिवस असेल पण माझी ही आशासुद्धा आळवावरच पाणीच निघाल, कधी ओसरून गेली काही कळलच नाही. आपल्या मुलांच्या पालक सभेला सुद्धा तु चक्क दारू पिऊन आलेलास. मला तू वचन दिले होतेस कि,पालकसभेला तू दारू पिऊन येणार नाही ह्या एका गोष्टीमुळे आपली मुले किती खुश झाली होती. मी तुला आता सांगु शकत नाही. 


पण तरीही तू त्यादिवशी त्यांच्या शाळेत दारू पिऊन आलास,तेव्हा आपल्या मुलांनी निमुटपणे आपल्या माना खाली घातल्या. मुलांचा तो हिरमुसलेला चेहरा न बोलता ही खूप काही सांगुन जात होता.माझ्या पाठीवरचे तु पट्ट्याने मारलेले व्रण कालांतराने निघुनही जातील,पण मुलांच्या आयुष्यावर झालेल्या तुझ्या दारूच्या परिणामांचा व्रण कसा निघून जाईल रे!!!


सांग ना...

    तुझ्या अश्या वागण्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा कधी वाढला कळालेच नाही.आपले नाते हे एका खोल दरीसारखे झाले होते;त्यामध्ये "समजूतदारपणा,अपेक्षा, आदर,वचन,भावना ह्यासारख्या सर्व मूल्यांची कितीही भर टाकली तरी ति दरी कधीच मिटणारी नव्हती. 

         "तु म्हणायचास,ही दारुच मला माझे सर्व दुःख ,सर्व टेन्शन विसरायला लावते. 


खरंच!!! दारू एवढी चांगली होतीस तर तू मला आणि मुलांना सुद्धा एक-एक ग्लास का दिली नाहीस. आम्ही सुद्धा आमचे टेन्शन, दुःख विसरलो असतो ना??? 

तू तुझ्या दारूच्या व्यसनामुळे तुझी नोकरी गमावलीस.


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi story from Tragedy