STORYMIRROR

ram gagare

Others

3  

ram gagare

Others

विश्वप्रिया..भाग2

विश्वप्रिया..भाग2

2 mins
180

विश्वप्रिया दिलेल्या वेळेत पोहचली होती, शाम बाईक साईडला लावुन उभा होता एवढ्यातच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला,त्याने मागे वळून पाहिले ती विश्वप्रिया होती.तिने तोंडाला व्हाईट कलरचा स्कार्फ बांधलेला होता त्यामुळे शामने तिला ओळखले नाही. तीन वर्षांनंतर आज शाम विश्वप्रियाला समोरा समोर पाहणार होता.

चल निघायचे ना..विश्वप्रिया म्हटली.

हो..म्हणत ती त्याच्या बाईकवर बसली,हॉटेल पाच मिनिटाच्या अंतरावर होते त्यामुळे ते लवकर पोहचले.हॉटेल मध्ये गेल्यावर कॉर्नरच्या एका टेबलवर दोघे बसले.विश्वप्रियाने तोंडाला बांधलेला स्कार्फ सोडला,काही वेळ शाम तिच्याकडे पाहतच राहिला;विश्वप्रिया खुप गोरीपान दिसत होती आधीपेक्षा ति खुप सुंदर दिसत होती.नाजुक ओठ अन त्यावर गुलाबी कलरची लिपस्टिक अजुन खुलून दिसत होती,पाणीदार डोळे,कंबरेपर्यंत लांब काळेभोर केस,स्काय ब्लु कलरचा ड्रेस ह्या सर्वात ती शामला जणु एक अप्सरे समान भासत होती.

काय रे काय झालं...विश्वप्रियाने विचारले.

नाही काही नाही,इतक्या दिवसांनी पाहतोयना तुला त्यामुळे बघत राहिलो.शाम म्हटला !!

हो का ? मग कशी दिसतेय मी,छान नाहीं दिसत का..

नाही..अग तसं नव्हतं म्हणायचे मला.

माहितीये मला !! मस्करी केली मी तुझी..विश्वप्रिया म्हटली.दोघेही हसले.

शाम ने दोन कॉफी ऑर्डर केली.शामच्या कल्पनेपेक्षा विश्वप्रिया खुपच सुंदर दिसत होती,तो अधुनमधुन तिच्याकडे चोरून पाहत असे.शाम आपल्याकडे चोरून पाहतोय हे विश्वप्रियाला कळाले होते पण तरीसुद्धा ती त्याला काहीच बोलत नव्हती.कदाचित तिलाही शामचे असे बघणे आवडले असावे.कॉफी पिता पिता कॉलेजच्या जुन्या आठवणींमध्ये दोघेही चांगले रंगुन गेले होते.अर्धा पाऊण तासाच्या भेटीनंतर दोघेही घरी जायला निघाले.अंधार झाला होता,विश्वप्रिया रोज बसने घरी जायची पण आज शाम आल्यामुळे ती त्याच्या बाईक वर बसुन घरी चालली होती.दोघेही एकाच शहरात पण थोडे लांब रहायला होते.बाईकवर बसल्यावर गप्पा मारताना कधी तिचा हात शामच्या खांद्यावर ठेवला गेला हे तिला कळले सुद्धा नाही.विश्वप्रियाचा हात आपल्या खांद्यावर पाहुन त्याला खुप भारी वाटत होते.अर्ध्यातासाने शामने तिला तिच्या घराच्या अलीकडे सोडले.

शाम ला बाय करून विश्वप्रिया घरी जाण्यास निघाली,जाताना मागे वळून तिने त्याला एक छोटीशी स्माईल दिली.शाम ने सुद्धा तिच्या स्माईलला प्रतिसाद दिला.

झोपायची तयारी करत असताना शाम गाणे गुणगुणत होता जणु खुप दिवसाने तो आज खुश झाला होता.दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाम कॉलेजला निघाला, दिवसभर त्याच्या डोक्यात कालच्या भेटीचाच विचार चालु होता.त्याच्याडोळ्यासमोर सारखा विश्वप्रियाचाच चेहरा येत होता.


Rate this content
Log in