ram gagare

Romance Fantasy

4  

ram gagare

Romance Fantasy

विश्वप्रिया -- भाग4

विश्वप्रिया -- भाग4

2 mins
189


ती काही बोलायच्या आत शामने तीला अनेक प्रश्न विचारले.

काय झाले तुला,तु माझ्याशी बोलत का नाहीयेस,माझ्या मेसेजचा रिप्लाय सुद्धा देत नाहीस बोलना का असे करतेस तु?

शाम अगदी व्याकुळतिने तिला विचारत होता.ती शांत बसलेली होती.

प्रश्न विचारून झाल्यावर शाम थोडा शांत झाला..

विश्वप्रियाने सांगितले,शाम माझे लग्न ठरले आहे !!

पुढच्या महिन्यात माझा साखरपुडा आहे.

हे ऐकुन शामला धक्काच बसला,त्याला काय बोलावे कळतच नव्हते.

विश्वप्रिया बोलत होती...


मला न विचारता माझ्या घरच्यांनी सर्व ठरवले आहे,मी मुलाचा फोटो सुद्धा पहिला नाही.फक्त एवढे माहीत आहे की मुलगा मुंबईला एका कंपनीत चांगल्या पोस्ट वर जॉबला आहे.मी आधी खुप वेळा नकार दिला पण घरच्यांनी माझे एक ऐकले नाही.तुझ्याबद्दल घरी सांगायची माझी हिंमत नाही झाली.तुझे कॉलेज पण पुर्ण नाही झाले,अन तु अजुन जॉबला पण नाहीयेस घरच्यांना माझ्यासाठी एक चांगला अन कमावता मुलगा हवा होता.मी अस नाही म्हणत की तु चांगला नाहीयेस पण तु अजुन स्वतःच्या पायावर उभा पण नाहीयेस.मी कोणत्या तोंडाने तुझ्याबद्दल घरी सांगणार होते.मी नाही बोलु शकले काही.हे सर्व तुला सांगायची माझी हिंमत नव्हती त्यामुळे मी तुझ्या फोन,मेसेज ला रिप्लाय देत नव्हते.

जमले तर मला माफ कर!!

आपण एक चांगले मित्र बनुन राहु शकतो..विश्वप्रिया म्हटली!!


विश्वप्रियाचे सर्व बोलणे शामने ऐकुन घेतले व कॅफेतुन उठुन बाहेर जाण्यास निघाला.बोलना रे काहीतरी असा गप्प नको ना राहुस..

प्लीज..शाम बोलणारे माझ्याशी,विश्वप्रिया त्याचा हात पकडत म्हणाली.शामने तिच्या हातातील त्याचा हात काढुन बाहेर निघुन गेला.

विश्वप्रिया एकटीच तिथे बसुन रडत होती,शामचा अबोला तिला खुप काही सांगत होता.त्याला खुप काही बोलायचे होते पण त्याला विश्वप्रियाचे मन दुखवायचे नव्हते.विश्वप्रियाला शामचा स्वभाव पुर्णपणे माहीत होता.तो मनातल्या मनात कुढत राहीन पण तिला एका शब्दाने दुखावणार नाही हे तिला चांगलेच माहीत होते.त्यामुळे विश्वप्रियाला अजुनच वाईट वाटत होते.


त्यांच्या रिलेशनशिपला आता वर्ष होत आले होते, बघता बघता शामची फायनल इयरची परीक्षा जवळ आली होती.विश्वप्रियाने शामला कॉन्टॅक्ट करण्याचा खुप प्रयत्न केला,पण शाम तिच्याशी बोलणे टाळत होता.विश्वप्रिया एकदा त्याला भेटण्यासाठी त्याच्या कॉलेजला गेली पण शाम तिला भेटलाच नाही.विश्वप्रियाचा साखरपुडा झाला लग्नाची तारीख पुढच्याच महिन्यात होती.लग्न करून विश्वप्रिया मुंबईला तिच्या नवऱ्यासोबत निघुन गेली.लग्नानंतर सासरच्या गडबडीत तिला शामशी बोलायला वेळ मिळाला नाही किंवा तिने प्रयत्नच केला नाही माहीत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance