Arun Gode

Action

3  

Arun Gode

Action

महाविद्यालीयन भेट

महाविद्यालीयन भेट

5 mins
338


एका साधारण परिवातील मुलगा एका साधारण शहरात राहत होता. त्याने आपले बारावीं पर्यंतचे शिक्षण आपल्याच गांवात पूर्ण केले होते. तो अभ्यासात सामान्य विद्यार्थीच होता. पण त्याला लहानपणा पासुन वर्तमान समाचार पत्र, विज्ञानावर आधारित मासिक, सामान्यज्ञान मिळवने आणी वाचण्याचा छंद त्याच्या वडिलांनी त्याला लावला होता.त्यामुळे त्याचे सामान्य ज्ञान इतर मुलांन पेक्षा जास्त होते. विज्ञानावर येणारे लेख माहिती तसेच सामाजिक समस्यावर येणारे बुध्दिजीवींचे लेख वैगरे तो नेहमी वाचत होता. त्यामुळे कोणत्याही वेळेस अनेक विषयावर तो चर्चा करण्यास समर्थ राहत होता. 

      बारावीं नंतर विज्ञान शाखेत स्नातकची पदवी प्राप्त करण्यासाठी त्याने जिल्हाच्या सायंस कॉलेजमधे प्रवेश घेतला होता.परिवाराची आणी आजु-बाजुच्या अनुभवी वडिलभावाच्या मित्रांची इच्छा होती कि त्याने स्थानीय कला महाविद्यालयातच आपले शिक्षण स्नातकपर्यंत पूर्ण करावे. कारण सायंस मधे खुपच परिश्रम घ्यावे लागते. आणी जाने-येने रेल्वेने करून तर ते शक्यच नाही असा त्यांचा आत्मविश्वास होता. गावांतील अयशस्वी पूर्ववत विद्यार्थी त्याचे प्रमाण होते. तरी त्याने सायंस मधेच स्नातक होण्याचा प्रण केला होत. त्याचा असा विचार होता किन न कर्त्याचा वार नेहमी शनिवार असतो. आता आपण मुसळ्यात डोके खुपसले आहेच तर परिणाम पण भोगायला तैयार असावे !.

       तो रोज कॉलेजच्या वेळा-पत्रकाप्रमाने कॉलेजला रोज रेल्वेने जाने-येने करित होता.त्यामधे त्याची शारिरीक उर्जा आणी वेळ फार व्यर्थ होत होता.त्याची त्याला सारखी जाणीव आणी खंत होत होती. पण आर्थीक बाजु कमजोर असल्यामुळे त्याच्या जवळ आलीया भोगाशी असावे सादर या शिवाय फारसा दुसरा पर्याय उरला नव्हता. कॉलेज मधे जेव्हा कधी प्राध्यापक आपल्या विषयाला धरुन पण अभ्यासक्र्माच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारत होते. तेव्हा तो एक मात्र विद्यार्थी वर्गात होता. जो प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ होता. कधी-कधी अपेक्षीत उत्तराच्या जवळ-पास तो राहत होता. त्यामुळे बहुतेक प्राध्यापकासाठी तो त्यांचा आदर्श आणी सम्मानित विद्यार्थी होता. जेव्हा कधी असे प्रसंग येत होते. तेव्हा सर्व विद्यार्थी त्याच्याकडे लक्ष्य देत होते. शेवटी प्राध्यापक त्याला त्या प्रश्नाचे उत्तर विचारत होते.असे अनेक प्रसंग त्याच्या महाविद्यालीयन जीवनात आले आणी त्याने त्याचा ढृढता दाखवुन सामना केला होता. मित्र-मंडळीत किंवा कॉलेजच्या समुहात जेव्हा कधी कोणत्या तरी विषयावर चर्चा होत होती.तेव्हा तो चर्चे मधे मुद्देसुर पणे आपली बाजु ठेवत होता. त्याच्या चांगल्या वत्त्कृत्व शैलीमुळे त्याची कॉलेजमधे चांगली प्रतिमा बनली होती.आर्थीक तंगी आणी रेल्वेने जाने-येने करावे लागत होते. त्यामुळे त्याचा बहुमुल्य वेळ विणाकारण खर्च होत होता. आणी सोबतच शारिरीक हाणी पण सारखीच होत होती. त्यामुळे त्याचा कॉलेजचा वार्षिक परिणाम त्याच्या अन्य स्पर्धांकांच्या मानाने विषेश उत्साहवर्धक राहत नव्हता. तरी त्याचे कॉलेज मधे बरेच प्रशंसक होते. तो आपल्या या विशेष असामान्य गुणामुळे मुला-मुलींनमधे फार लोकप्रिय होता. त्याच्या काही एकदम जवळच्या मैत्रीनी पण होत्या. 


       आलीया भोगाशी असावे सादर.अशा सर्व परिस्थितिला तोंड देत- देत त्याने आपली स्नातकची पदवी पटकावली होती. इकडे आड तिकडे विहीर अशा स्थिति मधे त्याने मध्यम मार्ग निवडला होता. त्याने स्नातकोत्तरसाठी नविन शहरात दाखला घेतला होता. जुण्या अनुभवाच्या आधारावर आणी असामान्य कार्य करण्याची जिद्द कायम होती. म्हणुन तो जाने-येने करुन स्नातकोत्तरचा अभ्यासक्रम पूर्ण करित होता. आनी सोबतच स्पर्धापरिक्षांची पण तैयारी करित होता.प्रयत्नांती परमेश्र्वर.त्याला स्नातकोत्तरच्या अंतिमवर्षि एका स्पर्धा परिक्षेमधे यश पदरी पडले होते. तैनाती त्याला स्थानिय मौसम विभागत नागपुरातच मिळाली होती. त्याला यामुळे अत्यानंद झाला होता. आर्थीक अडचण दूर झाल्यामुळे जीवनात काही या पेक्षा चांगले आपण करु शकु असे त्याला वाटत होते. मनी बसे तेच स्वप्नी दिसे. त्यामुळे तो मोठी-मोठी स्वप्न बघु लागला होता. इतका लांब-लचक शैक्षणिक प्रवास केल्यावर रोजच्या भाजी-भाकरीची व्यवस्था पक्की झाल्यामुळे त्याच्यात थोडीशी शिथिलता आणी जडत्व आले होते. जो थांबेल तो संपेल, असा होतकरुंचा अनुभव सांगत होता. तसेच त्याच्या सोबत घडले होते. कार्यालयाने त्याला एका विशेष प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविले होते.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच त्याची एका पर -प्रांतात खुपच दुरच्या कार्यालयात बदली करण्यात आली होती. आता तो आकाशतुन पडला आणी खजुराच्या झाडात अटकला होता. त्याच्या जवळ बदलीवर जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. नौकरी सोडुन चांगले भविष्य घडेलच याची खात्री नव्हती. कदाचित तेल गेले, तुप गेले आणी हाती धुपाटने आले अशी अवस्था झाली असती. दैव देते आणी कर्म नेते अशीच कदाचित टोमने ऐकावे लागली असती. ही परिस्थिति पाहुन त्याच्या आई-वडिलांना त्याच्यां लक्षात असणा-या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होत. आपल्या भावनांच्या आहारी न जाता त्याने तो प्रस्ताव स्वीकारला होता. आत्या नविन ठिकाणी त्याचे संपूर्ण लक्ष नौकरी आणी संसरात केंद्रीत झाले होते. त्याला दोन आपत्य पण होती. मोठी मुलगी आणी छोटा मुलगा होता. तरी काही वेगळे करण्याची आग त्याच्या मनात सारखी धक-धक करित होती.त्या आगेमुळे त्याने विभागातील समोरच्या बढतीची स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण करुन वेळेच्या खुप आधीच बढती मिळवली होती. आता त्याची बढतीवर बदली अजुन दूर ठिकाणी झाली होती. बदली होने ही त्याच्या साठी खुपच शिल्लक बाब बनली होती. शेवटी ब-याच वर्षाच्या प्रयत्ना नंतर अचानक बढतीवर त्याची बदली नागपुरला झाली होती. तो आणी त्याचा परिवार आता फार आनंदात होता. कदाचित त्यांनी बघितलेले घराचे आणी मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न साकार होणार होते.

      नागपुरला आल्यानंतर त्याची तैनाती मौसम पूर्वानुमान अनुभागात झाली होती.तीथे तो खुपच निष्ठेने आणी जवाबदारीने आपले काम करित होता. त्याचे समर्पण बघुन बॉसने त्याला एक महत्व पूर्ण सिट सरळ त्यांच्या अंतर्गत दिली होती. दोघांचे विचार एक-मेकांना पटु लागले होते. त्यामुळे त्यांच्यात चांगले समन्वय विकसित झाला होता. तो आता बॉसच्या गूड-बूक मधे होता.बॉस त्याला नेहमी अत्यंत जरुरी काम त्यालाच सोपवत होते. बॉस हा खुप मोठ्या मध्यवर्ती भारताच्या क्षेत्राचा मुख्य हवामानशास्त्री होता. बॉसचा साक्षात्कार घेण्यासाठी नेहमी टी, व्ही कर्मि कार्यालयत येत होते. आणी नंतर त्यांचा साक्षात्कार प्रसारित करण्यात येत होता. त्यांना लागनारी मौसम संबंधी सामग्रीची जुळवा-जुवळ करुण देण्याची जवाबदारी बॉसच्या गूड-बूक असणा-या अधिका-याची होती.त्यामुळे सर्वच मीडिया सहकर्मि त्याला ओळखत होते.बाईट चालु असतांना तो त्यांच्या सोबतच राहत होता.त्याच्या फायदा त्याला साक्षात्काराचे गुर शिकण्यात होत होता. तो शेवटी त्याच अनुभागात हवामानशात्री म्हणुन सेवानिवृत्त झाला होता. आपली सेवा देतांना त्याचा संपर्क अनेक मीडिया कर्मि, समाचार पत्राचे रीपोर्टर, शेतकरी आणी कृषि वैज्ञानिकांशी येत होता. त्यामुळे त्यांना येणा-या अडचणीची जाणिव त्याला झाली होती. जिवणात काही तरी केले पाहिजे म्हणुन हवामान अंदाजा संबंधी सविस्तर माहिती, हवामानाच्या अंदाजाची शब्दावलीचा नक्की उलघडा झाला पाहिजे म्हणुन त्याने एक पुस्तक लिहले होते. पुस्तकाचे नांव “वर्षा “ हवामानावर लेख असे होते. त्याची एक प्रति ज्या महाविद्यालयात तो सायंस शिकला होता. तीथल्या विद्यार्थांना त्याचा लाभ व्हावा. आणी कॉलेजला पण माहित व्हावे कि जे विद्यार्थी तीथे घडले होते. ते अजुनही कॉलेजचे नांव प्रकाशमान करित होते.

     ते पुस्तक कॉलेजला भेट करण्यासाठी तो निघाला होता. त्याच्या सोबत त्याचे दोन वर्ग मित्र पण होते. वाटेत प्रवासा करतांना जुण्या सर्व आठवणी एक-मागे एक करुन त्याच्या नजरे समोरुन जावु लागले होते.तो तेव्हा बराच भाऊक झाला होता.डोळ्यात आनंदाचे अश्रुपण होते. तीतक्यातच आम्ही कॉलेजच्या पटांगनात प्रवेश केला होता.मागिल चाळीस वर्षात कॉलेज आणी आजु-बाजुच्या परिसरात बराच फेर-बदल झाला होता. जुने दिवस आठवले होते. पण ते मित्र-मैत्रीनी तीथे कोणीच आमच्या स्वागतासाठी नव्हते. फक्त त्या आठवणीमुळे त्यांचे आभासी चित्र दिसत होते. आपल्या भावनांना लगाम देवुन तो ज्या कार्यासाठी गेलो होता. ते कार्य पूर्ण करावयाचे होते.प्राचार्याना तशी लिखित नोट पाठविली होती.नोट बघताच त्यांनी आम्हाला बोलवने पाठविले होते. त्यांच्या सोबत विस्तृत चर्चा झाली होती. त्याने लिहलेले पुस्तक प्राचर्यांना सुपुर्द केली होते. त्यानी आपल्या कॉलेजच्या माजी विद्यार्थांनी केलेल्या कार्याचे मनपासुन तोंड भरुन प्रशंसा केली होती. शेवटी त्यांच्या सोबत एक सामुहिक फोटो पण घेतला होता. आपन आपल्या जिवनात काही तरी केले पाहिजे अशी त्याची नेहमीच इच्छा होती. व ती आज पूर्ण झाली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action