मध्यान्य ...आत्मचरित्र.
मध्यान्य ...आत्मचरित्र.
काकु अप्पा गेले, मागाहुन मिंलीद गेला. कदाचित्, काकु अप्पा जन्म दाते आईबाप गेल्यावर इतके विचार मनात आले नाहीत जितके या मुलांच्या जाण्या नंतर रात्र दिवस सतावू लागले.आधी दोघेच घरात ऊरलो होतो सहा महिन्यांपूर्वी लग्न करून तो ही वेगळा राहू लागला. पंरतु, तो आहे सोबत हेच फार होत आता मात्र मी ख-या अर्थाने एकटी पडले होते. माझा आधारच हरवला होता हि एकाकी पणाची जाणिव खायला ऊठत होती रात्र रात्र मी जागुन काढू लागले मनातल्या विचारांचे काहूर मेदूत झिणझिणया आणित.डोळयाला डोळा लागत नव्हता कितीदा तरी जरा डोळा लागला की दचकून ऊठायचे त्याचा चेहेरा समोर यायचा आठवणी हुरहुर, भरून येणारे डोळे पुन्हा पुन्हा हृदयात कालवाकालव का?का गेला हा असा पत्नीची,जन्माला ही न आलेलया बाळाची तरी फिकीर करायची मी एकटी ना नवरा मुल ना संसार ना जन्म दाते आईबाप मग मी का आहे जिवंत कोणासाठी हे जगण का मला आले नाही ते मरण माझे इथ काय काम का कशासाठी कोणासाठी मी जगाव तो का गेला त्याच्या ऐवजी मी का नाही त्याच्या बदल्यात मी मरायला हवे होते जो कोणि या जन्म मरणाचा शास्वत निर्माता आहे असेल त्यान आताच्या आता माझा भाऊ परत पाठवावा व मला घेऊन जावे मी इथ का आहे आणि माझा भाऊ इथ का नाही या भग्न भींती गळके छप्पर या पडकया घरासारखे माझे आयुष्य ही चिंधड्या झालेल जिवंत आहे परंतु निर्जिव भग्न झालेल ह्रदय रात्री अपरात्री असे भास व्हायचे झोप लागायची नाही चुकुन झोपी गेलेच तर झोपेत बडबडत असे स्वपन पडत मीच मरायला पाहिजे मी मेले तर कोणाला काहीही फरक पडले नसता ऊनिव भासली नसती पोकळी निर्मान झाली नसती कधीही भरून न येणारी जी त्याच्या न जन्मलेला लेकराच्या अन पत्नी च्या आयुष्यात झाली.अनोप लहान भाऊ त्याच्या आधार गेला आम्ही तिघी बहीणींचा तोच सहारा काकू अप्पा गेल्यावर तो खंबीर झाले आम्हाला घराला सावरलं.
त्याच्या पत्नी व पोटातल्या बाळासाठी जितका कठीण काळ होता तितकाच आम्हा उरलेल्या चौघासाठी होता बहिणी, अनोप आणि मोठी ननंद म्हणून सोनलला सावरण्यासाठी मला मोठ बळ आणावं लागलं. दिवस कसातरी गिळायचे रात्रीच्या काळोखात बंद दाराआड डोळे कोरडेठक होइसतोवर हुमसुन रडायचं. हे न जाणे कित्येक महीने सुरू होतं.काळ त्याच काम चोख करीत होता. 2017 साल उजाडला मिंलीदला जाऊन दोन वर्ष लोटली आणि माझा आजारही बळावला एकटे पणासह शारीरीक वेदना बोचत होत्या मासिक पाळी तील त्या प्रचंड वेदनासह रक्तस्राव, पोटदुखी या सह आता लिंबा एवढ्या गाठी पडायला सुरवात झाली सहाजिकच अशक्त पणा कोणाला सांगणार बोलणार मी अधुन मधून अनूप येई. येताना औषधे, डबा,नारळ पाणी आणित असे. बळेच जेवायला लावी पंरतु अन्न समोर पहाण्याची इच्छाच उरली नाही. पुढे पूढे फक्त नारळ पाणि आणि एकादे सफरचंद इतकंच घेऊ लागले, तेही जबरदस्तीने. सोनाली, तृप्ती ही यायच्या काय खाशील काय बनवून आम आणू तुला सारख विचारत त्याही मी शरिरीक दुखण्यानं हतबल होते. मनान धीर धरायचा प्रयत्न करीत असे स्वत:लाच समजावत असे. शरीर खचू दे मनान नाही खचायचं, याच विचाराने रोज पहाटे पाचला फिरायला जायचे. कधी मधी बरे वाटले तर अनूप सोनाली कडे जाई. फोटोग्राफी साठी बाहेर पडे मात्र मासिक पाळी आली की पंधरा दिवस अंथरूनच धरावे लागे. अशक्त पणा आणि चककर यामुळे जागचे हालता नाही यायचे. अनूप दरवेळी दवाखान्यात नेऊन सलाईन ,तर कधी कधी रक्ताच्या एक दोन बाटल्या चढवित असे. कधी फक्त औषधावर भागत असे, गरजे नुसार डॉक्टर ऊपचार करीत असत. किमान आठ दहा वेळा हे असेच ऊपचार झाले दोन वर्षात कितीदा तरी दवाखाणयात एडमीट व्हावे लागलै. पंधरा दिवस अंथरुणात, मग चार पाच दिवस दवाखाण्याच्या बेडवर, पुढे हे दुखण व रक्तस्राव पधरा आणखी वाढला. इतका की, पाळी मासिक न रहाता रोजचीच झाली कि काय अशी वेळ आली अगोदर डॉक्टर म्हणत कमी वयात गर्भाशय काढणे योग्य नाही तात्पुरत्या ऊपचाराने कायमचे बरे करण्याचे पुरेपूर पयत्न केले. रक्त भरून, सलाइन भारीतली औषध देऊन गर्भाशय वाचविण्याचा खुप प्रयत्न केले. स्पेशालिस्ट तज्ञ,मोठ्या खाजगी नामांकित दधाखाणयात कितीदा तरी भरती केले. अनूपने मी सरकारी दवाखाणयात जाण्याचा हट्ट धरी प्रत्येक वेळी खाजगी दवाखिणयाचे इतके प्रचंड बील कोठून भरणार सुरवातीला वर्षभर शक्य झाल. पंरतु, पूढे मात्र अनूपला बील कमी करण्यासाठी खुप विनवणया व धावपळ करावी लागे. जी पाहून मला अपराधी वाटे. माझ्या लहान भावाला माझ्या मुळे होणा-या त्रासाची जाणिव स्वस्थ बसू देत नसे.
काही शासकीय योजणे नुसार,दीनानाथ मंगेशकर दवाखाण्यातील संबंधित स्टाफ ही खूप सहकार्य करून शक्य तेवढे कन्सेशन देतदेत असतं. किती दिवस कधी संपणार होतं है सार. की मझ्या आयुष्याचा अंत या दुखण्यातच होता काय? ती रात्र आठवतेय पोट दुखी सह प्रचंड वेदणेच्या कळा येऊ लागल्या. मी अक्षरश गडागडा लोळू लागले. मी अनूपला फोन केला, तृप्तीलाही बिचारी दिवस भर कामावरून येऊन थकून भागून झोपलेली. माझी भावंड धावत पळत आली. आता प्रश्न होता नेहमीच्या म्हणजे दीनानाथ मंगेशकर मध्ये जायचं की ससुनला खाजगीत न्यायचे? तर लगेच अॅडवहानस भरायला जवळ पैसे नव्हते दरवेळी अनूप पैसे भरायचा. पंरतु आज त्याच्या कडे ही पैसा नाही, त्याने बोलून नाही दाखविले त्याच्या चेहे-यावरील काळजीने मी ताडले की आज हा खरेच हतबल आहे. काही सोन होत थोडफार गहान टाकावे तर रात्रीची वेळ आणि अवस्था आशी की सकाळ पर्यंत थांबणे अशक्य. बिचारा अनूप खर तर मला लाज वाटू लागली स्वताची. माझ्या या लाचार ऊसण्या आयुष्याची माझ्या भावंडाची माझ्यासाठी ची धावपळ, शारिरीक व मानसिक त्रास मला जास्त सलायचा शरम वाटायची. का जगतोय आपण त्या असल्या आयुष्यापेक्षा मेलेल काय वाईट आपल्याला आईबाप नाहीत घरसंसार नाही. हि भावंड मरथि पोएम कविर आपल्यासाठी धावतात जगात जन्मदात्यांनाही काही लोक विचारत नाहीत माझी भावंड घरदार संसार सोडून माझ्या एका फोनवर पळत धावत येतात. जे शक्य ते सार माझ्या साठी करतात हे विचार मनात यायचे आणि जास्त रडे फुटायचे त्या रात्री मी हटटाने ससुन दवाखाणयातच येणार म्हणले नाहीतर घरातच मला द्या मला तुम्ही दोघेही जावा मी दुखणया च्या ग्लानीत बोलले रात्री साडेबारा वाजता आम्ही ससुन दवाखाणयात आलो मी दुखणयाने विवहळत एका बाकावर लंवडले तृप्ती माझ्या जवळ थांबली अनोपची प्रचंड दानादान उडाली केसपेपर पासून तातडीक विभागातील ओपीडी त तपासणी करून मग अडमीशन पेपर भरून मग वार्डात बेड मिळेपर्यंत त्याच्या पायाला भिंगरी लागलयागत तो नुसता धावत होता या विभागातून त्या विभागात याची सही आण आमुक डाॅकटरांना भेट त्या सारया सोपस्कर नंतर पहाटे साडेतीन वाजता मी त्या सरकारी खाटेवर आडवी झाले सलाइन च्या नळ्या, सुया चादरीतले ढेकून, डास उग्र दर्प यात दुखर्या देहाला विलीन केले अनोप दम खात ऊसण हसत कॉटजवळ आला तृप्ती अधिच बाजूला ऊभी होती काही क्षण तिघेही एकमेकाकडे नुसते पहात शांत होतो मीच सुरवात केली जावा आता घरी तुम्ही दोघेही मी बरी आहे सलाइन लावलेय डॉक्टर नर्स आहेत बाजुला पेशंट आहे. महीला वार्ड आहे काही भीती नाही जावा तुम्ही दोघं.ती दोघेही जागचे हलेनात तेव्हढ्यात महीला वार्ड आहे पुरूषांनी थांबायचे नाही असा आवाज आला मी अनोपला तृप्ती ला घेऊन जा लवकर घरी पुन्हा बोलले, पंरतु तृप्ती थांबते मी तुझ्या जवळ म्हणत खोटवर पायथ्याशी बसली तिच्या घरच वातावरण झटक्यात डोळया समोर आल तीची दोन मुल, व्यसनी नवरा स्वता कष्ट करून मुलासह दारुड्या नवरयाला ही पोसणारी तृप्ती जबाबदारी च्या जोखडात विरून गेलेली कस तिला थाबवू मी माझ्यापाशी अधिचेच हालाकीचे जीवन त्यात माझा त्रास, अनोपच तरी काय वेगळ होत. जड अंतकरणाने पावलाने दोघ जायला निघाले चार पावल चालून पुन्हा परतले मी ऊसने अवसान आणून, आता मी मोठ्या दविखाणयातच आहे इथ खुप काळजी घेतात रूग्णाची ऊपचारही बरे होतात मुख्य म्हणजे कमीत कमी खर्चात काळजी करू नका जावा निवांत घरीखाली दोघेही मला खरतर ते हवे होते मनातून माझ्या जवळ थांबावे असेच हवे होते दोघेही दिसेनासे होईपर्यंत मागे वळून वळून खुनेनेच ऊद्या येतो काळजी करू नको वगैरे सांगत होते, दोन बाटल्या रकत सलाइनच्या तीसेक बाटल्या ,भरपूर औषध घेऊन पंधरा दिवसांच्या ऊपचाराअंती घरी आले रक्तस्राव थांबला दुखणेही कमी झाले घरी दवाखाणयातुन घरी जाताना यावेळी ऐक चांगली गोष्ट म्हणजे बिल बिल भरायच टेन्शन नव्हत कारण आमचे अंत्योदय योजणेचे रेशन कार्ड जे आमच्या काकूने खूप प्रयत्न करून काढले होते ते आज आमच्या कामी आले होते एक हि रूपया भरावा नाहि लागला खाजगी दवाखाणयाचे जवळ पास चाळीस हजार रूपये वाचले होते खरंतर मला त्याचाच जास्त आनंद होता अनोपचा त्रास किमान या वेळी वाचला होता नंतरचे पाच सहा महीने बरे गेले ना दुखणे ना रक्तस्त्राव आता कायमचे संपले दुखणे असे वाटले त्याहून जास्त आनंद अनोपचा माझ्या बहीणींचा त्रास कमी झाला हे महत्वाचं होते शेवटी आम्ही भावंड एकमेकांचा विचार करायचो आजही करतो आई बाप नावाचे वटवृक्ष केव्हाच डासळले होते .त्यानंतर खरया अर्थाने आम्हाला सावरणारा अंधार स्तंभ भासणारा मिंलीदही गेला ती एक मजबूत फांदी होती त्या वृक्षाची आता मात्र चार जणच एकाच मुळच्या चार शाखा उरल्या होत्या कशाबश्या तग धरत होत्या त्यात मी तर सर्व भांवडा थोरली अन......अशी जीर्ण फिरून ऑगस्ट महिन्यांची तीच चार तारीख आली त्या नारळी पोर्णिमेला अप्पांच ह्रदय विकारान निधन झालं होत नऊ वर्ष ऊलटले त्यालाही.माझ्या ऊपचारानाही पाचदहा महिने झाले होते त्रास कमीही झाला होता ऑगसट महिन्यातली पाळी आली मात्र पुन्हा पंधरा दिवस ऊलटूनही जाण्याचे नाव घेइना पुन्हा त्याच वेदना,तोच रक्तस्राव ,तीच पाढा,अशक्तपणा, चककर गळुन जाणे पुन्हा अगदी पहिल्या सारखेच सुरू आता मात्र ठरवल काहीही झाल तरीही कोणालाही नाही सांगायचं ऊगाच माझ्या लेकरांना हो आईच्या मागे तिच्या नंतर ही भावंड माझीच लेकरच होती कोणाला फोन करायचा नाही आला तर त्याविषयी बोलायच नाहि अस पकक मनाला बजावले त्यामुळेच अनोप,सोनाली,किंवा तृप्ती तिघांपैकी कोणाचाही फोन आला तरीही मी आवाजात शक्य तेव्हडे धैर्य आणित असे त्यांना म माझ्या दुखणयाची जाणिव न होऊ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागले पंरतु या वेळी तर दुखणयाने वेगळेच रूप धारण केले पुर्वीच्या लिंबाएवढया गाठी आता बटाट्याच्या आकारात वाढू लागल्या दिवसातून अशा चारदोन गाठी पडायच्या सतत लघवीला अलयासारखे होई,रक्ताने माखलेलया कपड्यांनी मोठी पिशवी भरायची कधी कधी तर कोटन टी एक अख्खी साडी घडया घेऊन संपायची दिवसभराच्या साठलेल्या त्या घडया मी पहाटे ऊठून फेकून देत असे सेनेटरी पॅड आणुन कीती आणणार?अक्षरशः घरातले सुती कापड संपवले तरी अंगावरून जाणे संपत नव्हते सार शरीर निर्जिव बधिर होऊन मुंग्या येत असत जेवणं जाणे केव्हाच कमी झालेले त्या दिवशी रोजच्या प्रमाणे मी बसत ऊठत कामे ऊरकली अनोप ने अनुन ठेवलेले नारळ व सफरचंदच काय थोडीफार जात असे दिवसभरात जाईल तसे मी खात राही आज ते ही नाही सकाळ पासून मळमळत असल्याने मी काहीच खालले नाही डोळ्यांची ऊघडझाप करीत मी बारा साडेबारा पर्यंत पडून राहिले.तहान लागली म्हणून पाणि पिण्यासाठी ऊठले मग जराशी गरगरायला झाले नि मी खाली पडले..................डोळे अर्धवट ऊघडले व ग्लानीतच मी ऊठायचा प्रयत्न केला पःरतु हात पाय ऊचलेना शरीर डोक जड झालेल सुन्न सभोवती दृष्टी फिरवली ती एक मोठी खोली होती ज्यात थोड्या थोडया अंतरावर काॅट होत्या शेजारी मोठाले ऑकसीजन चे सिलिंडर, वायरी, मशिनी एकमेकांना जोडलेले पुढे भिती ऐवजी काच त्या पलीकडे धुसर सावलयांच्या हालचाली इकडून तिकडे करीत होत्या कदाचित भिंतिंच्या कोपरयात माझी काॅट असावी पडलया पडल्या मागे पाहिल तर अगदी ऊशाला खेटून भिंत होती अन समोर हा पसारा पाहून जरा जरा ध्यानात आले की मी कुठे आहे सभोवतालची नजर मी माझ्या शरीरा कडे वळविली दोन्ही हाताला पांढर्या पटटया लावलेलया त्याच्या आत सुया टोचलेलया संपुर्ण हातावर जागोजागी इतर ठीकाणी ही सुया टोचलेले व्रण पटयांच्या आतील सुयामधून जोडलेलया सलाइन च्या बाटलयांच्या नळया ऊशाला असलेल्या स्टॅन्ड वर लटकवलेलया पायाला मोठया रूंद बँडेज चिकटवून घट्ट बंदिस्त केलेले छातीवर गोल जुण्या रुपयाच्या नान्याच्या आकाराच्या पलॅसटीकच्या हिरव्या पिवळ्या लाल लाल रंगाच्या चकत्या ज्याला तसल्याचं रंगाच्या वायरी जोडलेल्या ज्यांचे दुसरे टोक त्या भल्या मोठ्या मशीनला जोडलेले त्यावर एक छोट्या टिव्ही सारखा चौकोनी आकाराचे दुसरे मशीन ज्याच्या पडदयावर अखंड ऊमटणारया त्या तिरप्या वाकड्या रेषा माझ्या जिवंत पणाची ग्वाही देत ठिक टिक करत माझा श्वास आपल्या कवेत घेऊन जणू मला माझ्या लाचारीची, शारीरीक असमर्थ तेची जाणिव करून देत होता वर गरगरणारा पंखा त्याच्या लयीत मशीनींच्या आवाजाला साथ करीत होता.त्या खोलीतील तीनहि काॅटा रीकाम्या होत्या तरीही माझ्या काॅट सारख्याच मशीनीनी सुसज्ज होत्या जणू आणखी कुण्या मजसारख्या लाचार बेबस रूग्णाची वाट पहाट होत्या मी शरीरभोवतीच्या वायरचा वेढा नाकावरचा ऑकसीजन मासक, गरगरणारा पंखा, टिकटिकनारे भिंतीवरचे घडयाळ घोंग घोंग मशीनचा आवाज आणि जन्म मृत्यू यामधला बेभरोशाचा काळ सुकर करणार, मानवाच्या प्रयत्नांना बळ देऊन जगण्या मरणयाच नि दान करणार ते मानवनिर्मित अधुनिक यंत्र जे या देवदुतांना ज्यांना आपण डाॅकटर म्हणतो त्याच्या कठोर परीश्रमांना यशाच पाठबळ देणारं एव्हढे जन सोबत होते माझ्या काचेपलीकडची अंधुकशी हालचाल सुरूच होती नर्स किंवा वाॅरडबाॅयच्या वेशातलि असावी चेहेरे अस्पष्टच जोरात किंचाळून कोणाला तरी बोलवावे तोंडातून आवाजच निघेना निष्प्राण शरीर फकत डोळे ऊघडले की जिवंत पणाची हमी देत होते तहान तर प्रचंड लागली होती ऊठणे तर दुरच शरिर तसूभरही हालत नव्हते छताखाली गरगरणारया पंखयाला न्याहाळत मी स्वस्थ पडून राहिले मी आता डोळे लख्ख ऊघडले होते आता नककी नीट ऊमजले हा आभास नाही मी नककी दवाखाणयात आहे अंगावरच्या चादरीवर व ऊशिरा च्या अभ्रयावर असलेल्या नावाच्या लेबल वरून कळले की मी दीनानाथ मंगेशकर रूगणालयात आहे. दहा पंधरा मिनीटांनी दरवाजापाशी कोणितरी डोकावून गेल्याचा भास झाला मी माझ्याच विचारांच्या तंद्रीत होते मी तर घरी..... तहान लागली म्हणून सोफयावरून ऊठले..... पाणि पीत होते....चककर आली ...म्हणून तिथेच आडवी झाले....मग पुढे...पूढे..??????पुढचे काहीही आठवेना मेंदुतून एक मोठी कळ गेली.आटोकाट प्रयत्न केले शेवटी डोक्याला झिणझिणया आलया शरीराच्या एकाच बाजुने प्रचंड मोठी शिरशिरी गेली अर्धांग निकामी झालय काय माझ?जड अगदी जड भर मोठ ओझयाचा दाब शरिरावर पडलाय एकाच बाजुवर अन दूसरी निर्जिव अचेत चेतनाविहीत असे काय होतेय मला मी पुन्हा डोळे मिटुन घेतले............पाचेक मिनीटे झाली असतील कपाळावर हलकासा सपरष नमस्कार कशा आहात मी डाॅकटर विनय कुलकर्णी बरे वाटतेय ना मी आहे डाॅकटर तुमचा दोन दिवस तुम्ही शुद्धिवर नव्हतात तुमच्या भावाने अडमिट केलेय काही आठवतय का धीरगंभीर व मुद्देसुद बोलणारया डाॅकटरांना काय ऊत्तर दयावे मला सुचेना त्यांच्या शांत स्वर प्रेमळ होता मुख्य म्हणजे अतिशय आश्वासक पणे खांद्यावर हात ठेऊन अगदी दोन पाच मिनिटे ते बोलले त्या क्षणी मला त्यांच्या रूपात माझी काकू अप्पा मिंलीद आणि परमेश्वर म्हणतात तो हाच असावा असा भास झाला त्या क्षणी च्या भावना आनंद दुःख या पलिकडे च्या होत्या मी भांबावले होते अचानक समोर येऊन बोलता बोलता सहजतेने माझे डोळे तपासणारे मनगटाची नस काही सेकंद हातात धरून ठोके मोजणारे , कपाळावर हात ठेऊन ताप, व तितकयाच सहजतेने सटेथोस्कोप ने माझ्या ह्रदयाचे ठोके तपासताना माझ्याशी सःवाद साधणारया त्या मूर्ती कडे पाहून मला कशी ऊत्तर देऊ कळत नव्हते मी बरी आहे मला बर वाटतय माझ्या भावाला बोलवा ना असे सरळ डोकटरांनाच सांगितले तेव्हा कोणतीही शिष्टाई न दाखवता डाॅकटर बोलले अगदी स्मित हास्य करत बोलले हो बोलवतो आधी मला सांगा किती दिवसापासून त्रास सुरू होता यावेळी कारण या अगोदरही मी पाच सहा वेळा इथ एडमीट झालेले होते त्यांना आवश्यक ती माहिती विचारून शांत पणे मला ऐकुन घेत तुम्ही कंफरटेबल आहात ना असे म्हणून मागे उभ्या असलेल्या नर्स ला मला पाणी पाजायला खूनवत पाठीवरून हलकासा हात फीरवत सर्व ठीक होईल पाहु आपण पुढे काय करायच ते आसे बोलून डोकटर वळले मध्यम बांधा जराशी ठेंगणी ऊंची गौर वर्ण चेहेरयावर अटल निश्चयी शांत भाव असलेली तो ज्ञानाभृत पाठमोरे रूप कैक आदराने मी नयाहाळले मगापासून अधीरतेने दार सरकवून आत डोकावणारी ती सावली डाॅकटर बाहेर पडताच तत्परतेने आत आली अनोप होता तो माझ्याहुन दहा वर्षांनी लहान मात्र फार मोठा झाला होता तो जबाबदारी च्या ओझयाने मिंलीद गलयावर त्याच लहानपण सरल माझे आजारपण ,घरचे,त्याची पत्नी मुलगी या सारयांचा भार या एकट्या पोरावर आला होता त्याला जमेल तसे शांत पणान तो निभावून नेत होता या क्षणा पर्यंत सावली सारखा माझ्या मागे ऊभा खंबीरपणे .मी प्रश्नार्थक नजरेन त्याच्या कडे पाहील बाई बरी आहे ना तु कस वाटतय आता तुला.......इतकंच तो बोलू शकला लाल झालेले डोळेच पुढचे सार बोलले माझ्या कपाळावरून हात फीरवत समोरचा स्टूल घेऊन अगदी जवळ बसला काळजी करू नको आता तुझे हे दुखणे कायमच बर केलयाशिवाय मी तुला इथन नेणार नाही घरी डाॅकटराशी माझे बोलणे झालय माझे पूढे मला काय विचारायच ते ओळखुन बोलला परवा मी व वृशाली डबा घेऊन घरि आलो होतो ना,((वृशाली त्याची पत्नी दुपारी अनोपकडे डबा पाठवित असे,त्या दिवशी तीही अनोप सोबत आली असावी ))दुपारची अडीच वाजले होते तु घरात किचन ओटयाजवळ पडली होतीस तुला खुप आवाज दिले....असे म्हणून त्याचा कंठ दाटून आला ....खुप घाबरलो होतो ग मी काहीच कळत नव्हते काय करावे वृशाली ने खुप हिमतीने केल सार आम्ही दोघांनी तूला रिक्षातून इथ आणलं आता बघ तुला काहीच होणार नाही मी त्या दिवशी खुप घाबरलो होतो आता तुला पाहून बर वाटतय माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत व आपले भरून आलेले डोळे थोपवत अनोप कातीतरी वेळ माझा हात हातात घेऊन भरभरून बोलत होता शब्द तेच तेच आता तुला पूर्ण बरी केलयाशिवय मी घरी नेणार नाही ऑपरेशन करूनच जायच घरी आपण दोन मागच्या दोन दिवसापासून,दोन्ही बहिनी, वृशाली व या पोराची काय अवस्था झाली असेल याची मला कल्पना आली आणि मी परवा पाणी पिताना बेशुद्ध झाले होते हे समजलंदोघी बहीनी अनोप रात्र भर दवाखाणयातच बसुन होते डाॅकटरांचे शर्थिचे प्रयत्न सुरू होते पंरतु शक्यता कमी आहे आधीच सपष्ट केले होते अनोप एकेक घटना सांगत होता मी सुन्न होऊन ऐकत होते काकू माझी आई गेलयावर फक्त सातवीत असलेल हे पोर, मला निरागस पणे विचारायच कुठ गेली ग काकू आपलयाला सोडून का जातात ग माणस आशी ते एकून होणारी पोटातली कालवाकालव,आणि आज मला धिर देताना आश्वासक आणि खंबीर पणे बोलणारा हाच का तो मासाचा गोळा जो घरात माझ्यासमोर जन्मला होता इतका मोठा कधी झाला कीती पोक्त माणसासारखे मला लहान समजुन बोलतोय जबाबदारी खरच मानसाला वयापेक्षा कीतीतरी समंजस बनवते हुडपणा घालवून शहाणे करून सोडते माझयाहून लहान पण मोठा आधार देऊन इतक मोठा की,मरणाच्या दारात बेशुद्ध होऊन पडले असताना वेळीच दवाखाणयात आणून माझा जीव वाचविणयासाठी करित असलेली धडपड मला तोच माझा जीवण दाता आहे हे सांगत होती यापेक्षा जास्त एका भावान काय केल असेल बहीणी साठी माझ आयुष्यच त्याने ओवाळणी म्हणून पदरात टाकल होत तो जर त्या दिवशी घरी आला नसता तर????इतकया खाजगी मोठ्या दवाखाणयात मला एडमीट करताना,ना पैशाचा विचार केला ना परीस्थिती चा खाजगी शिकवणीत दहा बारा तास राबून पोटापूरतच कमाविणिरा, वयाच्या अगदी बारा तेरा वर्षा पासून कष्ट करून शिकणारा सारयासुन लहान शेंडेफळ हे लहान वयात आईबाप मग मोठ्या भावाचा आधारही गमाविलेला सारी जबाबदारी आपल्या कोवळ्या खादयावर पेलणारा पाठच्या भावापेक्षा पोटच मुल,अन माझ्या तच आईला पाहणारा शांत संयमी ,एकाच वेळी भाऊ व मुलाचीही जबाबदारी पार पाडणारा अनोप माझा हात हातात घेऊन किती तरी वेळ माझ्या शेजारीच बसून राहिला काही वेळात तृप्ती व सोनाली आत आल्या त्या अश्रु ढाळीतच हुंदके देत कावरया बावरया माझ्याकडे पहात हसुही लागल्या आनंद मी शुद्धीवर आल्याचा आणि दुःख माझी हि लाचार अवस्था पाहून दोघीही एकदमच माझ्या चेहेरया वरून केसावरून हात फीरवू लागल्या माझ्याशी काय आणि किती बोलावे असे झाले होते मला समजावित होत्या लहान बाळाला आईने समजावावे अगदी तसे आज मी सर्वात थोरली बहीन अगदी लहान झाले होते अनोप अजुनही माझा हाथ हतात घेऊन बसला होता एके काळी पाच पिल अन चिमणा चिमणी अस सात जणांच घरट सुखी होत आमच आईच सर्वात लाडक म्हणून तीसर पिलू तिच्या मागोमाग ऊडून गेल कदाचित एका नाळेची आता चार ऊरली मोठी मी लहाने मला जपत होते आईसमान प्रेम आदर करीत होते आज मला मरणाच्या दारात पडलेली पाहून हि लेकर हादरली होती विस्कटून डासळली होती पाया दुभांगुन इमारत कोसळावी तशी त्यांची अवस्था मला कळत नव्हती काय???दोन दिवसापासून अन्न पाणी ,झोप ,न घेता आय सी यु बाहेर बसुन माझी शुद्धीवर येण्याची वाट पहात घरचा,लेकरांचा विचार न करता बसून होती दाटून आलेल्या कःठान आणि डोळयात प्राण आणून एकमेकांची समजुत काढीत होती मला बोलताना पाहून मागच्या अठठेचाळीस तास एकमेकांना धीर द्यायला थोपविलेले अश्रु मुक्त आता करीत होती दोघी बहीनी माझा सूकुन मलुल झालेला चेहेरा, विस्कटलेले केस सावरणयात गुंतल्या होत्या तुला काही झाले असते तर....?या पुढे शबदच फुटत नव्हता आम्ही चारी भावंड नी अश्रुंना मुक्त केले.बोलत कुणीच नव्हत पंरतु चौघांच्या मनात काकू अप्पा मिंलीद च्या आठवणी दाटून आल्या होत्या एकाच वेळी...........बरयाचदा शब्दांचे काम अश्रू करतात संवाद सोपा होतो शब्दांची मर्यादा अश्रुपाशी येऊन थांबते मग अश्रुशी संवाद सुरू होतो मिंलीदचे कलेवर घेऊन नागपूर वरून मेव्हणे अशोक पालखे व अनोप सलग दोन दिवसाचा प्रवास करून होते सरकारी दवाखाणयातून संपूर्ण चिरफाड करून दिलेल ते कलेवर आईसबॅग मधे, शववाहिकेतून पुण्यात घेऊन आले तोत्या निपचिप देहाचा चेहरा हसरा आगदी जसाच्या तसा होता पिवळा धमक देखणा माझा मिंलीद स्थिर निश्चल निर्जिव पार्थिवच्या गालावरच हास्य विरलच नाही मरून सुद्धा!!!लहान भावाच्या खांदयावर कित्येक मैलाचा तो प्रवास!!करून तो आला होता आमच्या भेटीला शेवटच दिसायला मातीआड जाण्या आधी ते हसर मुख दाखवायला घ्या जितक साठवायचय तितक डोळतात साठवा मला!!असेच म्हणत होता जणू त्या हो त्या वेळी त्या क्षणी,त्या दिवशीही आम्ही चौघेजण असेच एकमेकांच्या गळ्यात पडून खुप खुप धाय मोकलून रडलो होतो जस गायीविना वासरू आक्रोश करीत होतो आठवला तो दिवस आज मी ही गेले असते तर ही तिघेही पुन्हा एकदा तशीच रडली असती ,आक्रोश केला असता माझा पार्थिव देह पाहून एकमेकांच्या गळयात पडून खुप अश्रू गाळले असते सात जणाच किलकिलाट करणारं घरटं हसर आंनदी दुःखातही हसणार एकजीवान रहाणार जीवाला जीव देणार एक कुटुंब ज्याचा मोठा आधार आई घराचा पाया निखळला जेव्हा काकू गेली तिचा विरहातन सावरत नाही तोवर बाप जे आभाळ असतं लेकरासांठी ते अप्पा गेले पिल पोरकी झाली ऊघडयावर पडली एकमेकांच्या आधारान जगू लागली दुख माग सारू लागली तोच तीसरा आघात झाला काळान तरणाबांड ,निरोगी हसतं मुख, घरटयाचा मजबूत आदराचा कणा झाला होता बहिणीचा लहान आधार भावाचा पाठीराखा, ऐन तीशीत हिरावून नेला हा तर मोठा प्रहार होता आमच्या सहनशक्तीवरचा चार जीव ऊरलो होतो आता एकाच गर्भातून श्वास घेतलेले त्यात मी लाचार आजारान खंगुन गेलेली गेल्या तीन चार वर्षापासून भांवडांच्या आधाराने जगणारी आयुष्याचा शेवट मृत्यूनेच होतो हेच अंतिम सत्य शास्वत सत्य बाकी सारे खोटे निष्क्रीय निराधार बेबस लाचार मग जन्मच कशाला?मग जर जन्म आहे...... तर मृत्यू का आहे..........विचार....विचार....फक्त विचार.......पेशंटला ऐकट सोडा आताच शुद्धीवर आलय पेशंट आय सी यु आहे हा दारातूनच एक नर्स ओरडली मला अजिबात एकट पडायच नव्हत माझी भावंड सोबतच हवी होती जणू कित्येक वर्षानी आम्ही भेटलो नाही तेव्हढ्यात एक दृसरी एक नर्स लगबगीने धावत आली मागुन डोकटरांचा फौजफाटा मुख्य महीला तज्ञ असाव्यात त्या थोड्या पुढे व बाकीचे चारपाच डाॅकटर पोरगेलासे मागे नर्सने अनोप सह दोघीनाही बाहेर पाठवले.डोकटरांचे पुन्हा प्रश्न,तीच माहीतीचा इतिहास मी जमेल तसा त्या महिला डाॅकटर अर्थात स्री रोग तज्ञ अनुराधा वाकणकर म्याडम पुढे कथन केला जो त्याना ही माहीती होता अधी जेव्हा जेव्हा अडमिट झाले तेव्हा मॅडम यांनीच योग्य ऊपचार केले होते शक्यतो गर्भाशय वाचविणयासाठी चे पुरापुर प्रयत्न केले होते मी भोगत असलेली पीढा न पिढा त्या शांतपणे ऐकून घेत होत्या हु,हु करून प्रतिसाद देत होत्या मग काही वैयक्तिक माहिती विचारून बोलते तुमच्या भावाशी बहुतेक आता ओपरेशन शिवाय पर्याय नाही पाहु आपण म्हणून वळलया पुन्हा माझ्याकडे पाहुन काळजी करू नका आपण प्रयत्न करुया म्हणून निघाल्या आय सी यु मध्ये पुर्ण वेळ आकसीजन व सलाइन सुरू होते जयुस चहा नारळपाणी असे पदार्थ सुरू केले आणले जेवणास परवानगी नव्हती पातळ पदार्थ खायला लावले अनोप सारखेएक काही ना काही घेऊन येई तृप्ती सोनालीही काही ना काही देण्याच्या बहानयाने भेटत असत सरळ ऊठून घरी जावे या सलाइन नळ्या सार फेकून द्यावे घरी जावे पटकन ऊठून असे वाटत राही शुद्धिवर आलयावर दोन दिवसांनी मला सामान्य वारडात आणले तोपर्यंत सर्व तपासण्या झाल्या होत्या रकताच प्रमाण एक टकका ऊरल होत शरीरात गर्भाशयात गाठी झाल्या होत्या शस्त्रक्रिया करण तातडीच गरजेच होत गर्भाशयचा बळी निश्चित होता शरीर अशक्त व निर्जिव निस्तेज झाले होते सलाइन व औषध यावरच बिशाद होती रक्त भरावेच लागणार होते अगोदर रकताची कमतरता भरून शस्रक्रिया करावी लागणार होती दिवसातून चारपाच वेळा तज्ञ डाॅकटर तपासण्या व रक्तस्राव थाबविणयासाठी निरनिराळे ऊपचार व औषध देत हळू हळू तब्येतीत सुधारणा होऊ लागली दोन तीन दिवसाआड याप्रमाणे रक्ताच्या सात आठ बाटल्या चढविलया दिड दोन महीने दवाखाणयात गेले आता जेवण जात होते दवाखाणया तर्फे कॅंटीनचे जेवण येई तृप्ती कामावर जाताना डबा देत दवाखाणयात मोफत डब्याची सोय होती ज्या रूग्णाचे घरून डब्याची सोय नव्हती प्रत्येक पेशटची व्यवस्थित पणे चौकशी करून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मदत कशी करता येइल या साठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात स्वतंत्र विभाग आहे, मलाही विचारणा केली तेव्हा माझ्या मोफत डब्याची व्यवस्था संबधित विभागातील व्यक्तीने तत्परतेने केली रकताची पातळी नऊ टककयावर आलीरक्तस्राव ही सुरूच होता ऐके मध्येतरी अंग अचानक घामाघुम झाले रक्ताच्या मोठालया गाठी पडू लागल्या पोटाचा गोळा मोळा झाला माझी शुद्ध हरपली तळमळ तडफड सहन न होऊन मी कधी काॅटवर तर कधी खाली पॅसेजमधे गडागडा लोळु लागले पाणयाबाहेर आलेल्या मासळी प्रमाणे माझे हाल हाल सूरू झाले तृप्ती रात्री सोबत झोपायला असे ती खुप घाबरली डाॅकटर नर्स असे ओरडत धाऊन लागली रात्रपाळी च्या नर्स धावत आल्या तोवर मला ऊलटया होऊ लागलया होय रकताच्या उलट्या लालभडक रकत आजपर्यंत मासिक पाळीच्या त्रासात रक्त वहात होत जे मी गेली चारपाच वर्ष सोसत होते शरिर कधीतरी नष्ट होणार!त्रास शरीराला कितीही होवो मनाला खंबीरच ठेवायच खचायच नाही असे मी स्वतालाच समजावत आले मिंलीद जाण्याआधिची दोन वर्ष कमी होता त्रास तो गेल्यानंतरची दोन वर्ष मात्र कठीन होती आणि आज त्या त्रासाने वेदणेने त्या रक्ताच्या ऊलटीने सहनशकतीचा अंत पार केला आज.. . .....आता सार संपलय आता मुकत होऊ दे मला शरीराने साथ सोडली मनानही.....मनाची खंबीरता ढासळली बर झाल या सारयातुन मी मरून मुकत होइल माझ्या मुळ माझ्या भावंडांना होणारा त्रास संपेल कायमचा माझ्यासह अनोपची धावपळ, धडपड तृप्ती सोनालिची तगमग सारयांचा अंत या प्रकाशमय जगातून अंधारया भयान दुनियेचा प्रवेश रोजचेच मरण रोजची तडफड वेदना, दुखण, नको आता बस!एकदाच त्या आगीत भक्षस्थानी हा देह निष्प्राण होऊन पडेल तेव्हा चटके नाही जाणवणार हा सचेत देह आहे म्हणून दाह आहे पुढच्या काही क्षणात सारे शांत अचेत,अचल दुःख!कसलं कोणासाठी का?काय सोडून चाललोय मागे आजवर काय मिळवले कोणी काय केल कोण काय नेत बरोबर इथून मग तुलाच कसल भय चला अंजली अज्ञाता च्या अनोळखी प्रवासाला सिद्ध व्हा तयार रहा निगर्मन करा.!!!!!!मुखावाटे स्रावत असलेल्या त्या लालभडक रक्ताच्या धारा पाहताना हेच ते सार जे मेलयावर संपेल कायमच सहनशकतीची हदद संपवणारी हि ऐकेक कळ शेवटचीच... ..........एकत्रित आलेलया आवाजाने भान आले कदाचित मुख्य डाॅकटर सह आणखी दोनतीन डोकटर,नर्स व वारडबाॅय चा ताफा सह एक घामाने थरथरारी गांगरलेली चिमणी तृप्ती ओरडुन रडून सार हॉस्पिटल डोक्यावर घेतलं तीने सारा ताफा घेऊन आली पटकन माझ्या जवळ येऊन हात घट्ट धरला जणू मी सोबत आहे तुला काहीही होऊ देणार नाही हे पकक आश्वासन डोळयातून पाझरणारे अखंड अश्रू समोर डोकटरांचा ताफा छे!ते तर जीवणदाते देवदूतच होते याक्षणी मृत्यूच्या वाटेवर मला ओढत असलेल्या त्या यमदुताला थोपवायला आले होते ते परवा सत्तावीस सप्टेंबरला तुमचे ओपरेशन करूया आपणं ऊद्या रात्री बारा नंतर काहीही खायचे नाही पाणिही नाही मुख्य स्री रोग तज्ञ अनुराधा वाकणकर डाॅकटर बोललया आपापसांत चर्चा करून व नर्सला काही सुचना करून मग तृप्ती ला बाजुला घेऊन तिच्याशी काहिक्षण बोलून डोकटरांचा ताफा निघाला.दुपारचे बारा साडेबारा जावे असावेत एक पोरसवदा डाॅकटर अगदी वीस बावीस वयाचा शिकाऊच असावा ताइ तुम्हाला पॅड जमा करून ठेवायला सांगितले होते ठेवलेत का?कुठे आहेत दाखवता का?त्याच हे बोलण ऐकुन खरच मला त्या अवस्थेतही मेलयाहून मेलयासारखे झाले शारीरीक वेदनेने भान नव्हते परंतु मेंदू शाबुत होता अजुन आता पर्यंत कितीदा तपासण्या झालया होत्या त्याची गिणती नव्हती स्री रोग तज्ञ,पुरुष डाॅकटर,की,महीला, आतुन,काय,बाहेरून,काय मला फकत या वेदनेतून बाहेर यायचे होते बस!पण आता मात्र हद्द झाली पाळीचे पॅड आता ह्या लेकराला दाखवायचे, म्हणजे कीती नालस्ती ही छे मेलेल बर पण नको ते ओपरेशन नको ते जगणं इ.इ.विचार मनात घोळू लागले लाजू नका मी डाॅकटर आहे तुम्हाला लवकर नीट व्हायच य ना!बरे होऊन घरी जायचंय ना !तुम्हाला त्रास आहे पीरियड मध्ये कीती प्रमाणात व गाठी पडतात ते ऑपरेशन करणारया डोकटरांना समजणे जरूरी आहे पुढची ट्रीटमेट लवकर व व्यवस्थित होइल मी ऊठायचा प्रयत्न करू लागले अहं तुम्ही ऊठून नका कुठे ठेवलय सांगा मी पहातो ते पोर अगदी हळूवार तटस्थ पणे बोलत होतं मी शांत ऐकत होते कसे सांगु मी माझ्या शरीराला लागलेल्या किडी चा तो भाग मी त्या बाजुच्या कपाटात ठेवलाय म्हणून हे एवढस पोरग अजुन लग्न सुद्धा झाले नसेल, त्याला किळस वाटत नाही का?सोबतच्या नर्स ने कपाटातून पलॅसटीक च्या पिशवीत पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेले ते पॅडच छोट गाठोड डाॅकटर समोर ऊघडलं मला अशक्त पणामुळे हालताही येत नव्हते तरीही चादरीत तोंड लपवले लिंबाएवढया गाठी पाहून त्या शिकाऊ डोकटरच्या चेहरयावरचे दया,व सहानुभुती चे भाव मला पहावेनात .नूकतच मिसरूड फुटलेल ते तरूण पोर मला बोललं अगदी आईच्या मायेने डोकयावरण हात फिरवत आपुलकीने बोललं ताई सांगतो मी मोठ्या डोकटरांना डोकटरांनाच तुमच ऑपरेशन झाले कि नाहि होणार त्रास असा तुम्ही पुर्ण बरया व्हाल. ते पोरग मला धीर देत होत प्रेमानं समजुन सांगत होत कदाचित् मला मुलगा असता तर याच्या पेक्षा जरासाच लहान असता का एवढाच असता का?असाच समजुतदार,हुषार,प्रेमळ, कर्तव्याशी एकनिष्ठ असता अरे मी हे काय विचार करतेय आहे आणि आता तर ते आता तर अशयकयच यापुढे कधीही ते होणे नाही नवा जीव निर्मान करायला गर्भाला पोसणार, गर्भाशयच आता शरिरा पासून वेगळ होणार होतं कायमच जगायचं असेल तर ते शरीरातन ऊखडून फेकण गरजेच होत खुप जनन मार्ग ऊपटूनच मला जीवदान मिळनार होत .दोन तास ऊलटले स्ट्रेचर घेऊन दोन वारडबाॅय माझ्या काॅट जवळ आले मागाहुन दोन नर्स ही चौघांनी मला बेडवरून स्ट्रेचर वर ठेवले गेल्या दिडमहिना भराची या बेडची साथ सुटली आता पुढचा प्रवास ऑपरेशन थियटर पर्यंतचा शस्त्रक्रिया विभाग.... ....सामान्य विभागा पासून मुख्य दाराजवळून तळ मजलयाच्या आवारातून लिफ्ट मध्ये मग पहिल्या मजलया च्या प्रचंड मोठया पॅसेजला वेढा घालून दुसर्या तळमजलयातलये लांबलचक निमुळतया वाटेवरून दुसर्या इमारतीत प्रवेश मग पुन्हा लिफ्ट मधून तिसरया मजलयावरील प्रचंड मोठया दालनात जिथं मधोमध सुसज्ज स्वागत कक्ष एसी ची थंडगार हवा पेशंट, डाॅकटर नर्स, वारडबाॅय, नातेवाईक मामा,मावशी ,इ.इ.ची हि...प्रचंड गर्दी सारे आपापलया कामात कोणाला कोणासाठी वेळ नाहि जो तो आपल्या नादात स्वागत कक्षात पेशंट च्या कागद पत्राची छाननी तपासणी सुरू आहे डोकटरांचे नाव, विभाग, प्रकार कसली शस्रक्रिया किती वाजता,वय, हिस्टरी, आणि काय....काय......ऊत्तर देता देता अनोप घामाघुम झाला त्या गोलाकार स्वागत कक्षाच्या आत बसून कंप्युटरवरच पाहून असंख्य प्रश्न विचारणारे त्या स्टाफ चे समाधान झालयावरच स्ट्रेचर पुढे सरकले. मी तासाभरापासून स्ट्रेचर च्या मागे धावताना लागलला श्वास सावरत अनोप माझ्या जवळ उभा राहिला हूषारीने,जबाब दारीने सारयांच्या सारया प्रश्नाचे नीरसन करित,माझ्या त्रासाचा पाढा जमेल तसा वाचत होता माझ्या वेदना जणू त्याने अनुभवल्या होत्या याक्षणी तो माझा पालक होता मी एक लहान बाळ होते वेदनेने विव्हळणार.मला अनुन टाकलेल्या खोलीतील बेडवरून मी केव्हाची या बावरलया कोकराला टिपत होते कोकरू घाबरले होते पंरतु सतर्क सावध होत दुःखी होत पंरतु आशादायी होत उद्याचा दिवस नवा ऊजाडणार वेदना मुकतीचा होणार आहे शरीराची कीड काढलयावर मिळणारया नव्या जन्माच्या स्वागताची माझ्या पेक्षा त्या कोकराला जास्त अतुरता होती दृढ विश्वासान ते कोकरू एकेक पाऊल टाकत होत माझी साथ देत होत लढाईला बळ देत होत आणि मी एकटी नाही आम्ही सोबत आहोत हे.त्या काचेपलीकडची माझ्या बहिणी ही मला ईशारयाने केव्हाच्या सांगत होत्या........ काल डाॅकटरानी तेच सांगितलं होतं जे मागे कित्येक वेळा अंदाजाने परीस्थिती पाहून तोडगा काढला होता जीव वाचविणयाचा शेवटचा ऊपाय आता गर्भाशयातील गाठी वाढलयात पंरतु वय ही जास्त नाही, सरळ गर्भाशय काढावे शक्यतो औषध, ऊपचार तात्पुरते शयकय ते सर्व प्रकारचे ऊपचार करून झाले होते आता शेवटचा ऊपाय गर्भाशय काढून टाकणे आणि जीव वाचवणे अन्यथा दुखणे कॅन्सर वर जाऊ शकते किंवा रकताच्या कमतरतेने,झालेला अॅनिमिया पुन्हा पुन्हा होऊन जीवाला धोका होऊ शकतो शरीरात एक टकका रकत ऊरले आणि शेवटी मी घरात बेशुदध पडले अनोप व वृशाली अचानक घरी आले त्या अगोदर मी दोन तास तशीच पडून होते आणि ते आले नसते तर कदाचित आजचा हा दिवसही दिसला नसता अनोप वृशालीने ऊचलून दधाखाणयात आणले अॅडवहानस पैशाची तरतुद आणि जगण्याची शक्यता फारच कमी या अटीवर अनोपने स्वता च्या जबाबदारीवर भरती केले इथ शेवटी औषध, सलाइन,इंजेक्शन, रक्त आणि डोकटराचे अथक परिश्रम या सारयांचा मेळ जुळवुन माझे शरीर ऑपरेशनच्या स्थिती पर्यंत आणलेआपरेशन करणारया डाॅकटरांनी अगोदरच माझी पार्श्वभूमी, वय उत्पन्न, घरी कोण असत लग्न, वगैर माहिती विचारली मग नरमाईने नजर दुसरी कडे वळवून गर्भाशय काढावे लागणार तुम्ही भविष्यात कधीही आई नाही होऊ शकणार हे कळतय ना तुम्हाला तुम्ही मुल जन्माला घालू शकणार नाही अवघड आहे परंतु सत्य स्वीकारा तुमची हिस्टरी, रिपोर्ट व फीजीकल कंडीशन पाहता दूसरा अपाय नाही ऊरला तुम्ही मानसिकरीतया हे स्वीकारा.इलाच नाही मी शांत ऐंकत होते निर्विकार पणे जस त्याच गांभीर्य नव्हतच मला फकत या पीढेतुन मोकळ व्हायचय बस सर मी एकटी रहातेनाही मुलाबाळाचा प्रश्नच नाही हा त्रास इतका भयानक आहे ना की मी ऑपरेशन मध्ये मेले तरी चालेल पण हा त्रास नको या यातनापेक्षा मरण यातना परवडलया सर उद्याच्या ओपरेशन मधये एक तर मला मरण यावे अथवा नवे आयुष्य मिळावे दोन्हीची तयारी आहे माझी हा भयानक त्रास सहन करणयाची मात्र ताकद ऊरली नाही डोळ्यांत पाणि आनुन मी निश्चयाने चरफडत बोलत होते बडबडताना आपण कोणासमोर, काय बोलतोय मला भान नव्हत डोकटर, स्रीरोग तज्ञ, मयाडम तो शिकाऊ डोकटर हे तिघेही माझेमन बोलणे ऐकून स्तब्ध झाले होते क्षणभर लक्षपूर्वक मला ऐकत होते माझ्या हालचाली टिपत होते .मी मात्र अतिशय तळमळीने एकेक शबद उच्चारत होते डाॅकटर मॅडमनी खांद्यावर हात ठेवला सर्व ठीक होइल असे आश्वासन दिले.........मला त्या नव्या इमारतीतल्या न जाणे कोणत्या मजलयावरील कुठल्या खोलीत गेलया अर्धा तासांपूर्वी स्ट्रेचर वरून आणून इथ बेडवर टाकल होत पडलया पडल्या मला कालचा दिवस आठवला. या खोलीला काचेच्या भिंती होत्या ज्या मधूध बाहेरच्या पॅसेजमधले व आतील बाजूला असलेल्या खाटे वरचे पेंशटही ते ही बिचारे माझ्याइतके वा त्याहून जास्तच शारीरीक पिढेने हतबल झालेले आपापल्या शरीराची चिरफाड करून पुन्हा शिऊन घेणारयांच्या रांगेत कुणी विवहळत ,होत तर कोण निपचिप पडल होत कोण इकडे तिकडे पहात चेहेरया वरचे भाव बदलत होत कोणाच्या हाताला,पायाला, डोकयाला तर कुणाला पोटालाही पटट्या पोटावरून,हात मान, पाठ,डोकयावरून कित्येक नळ्या जोडलेल्या लघविच्या पिशव्या ही पोटावरच्या नळ्यांना जोडलेल्या शरीरावर गाठी ऊठलेलया अशी कितीतरी मानसं बेडवर पडली होती निरनिराळ्या आजाराला बरे करणयासाठी ऑपरेशन थेअटर बाहेरील त्या पारदर्शी खोलयात ओपरेशन कक्षातून बोलाविणयाची वाट पहात होती इथ कोणीही गरीब नव्हत श्रीमंत, काळा गोरा ऊच नीच नव्हता होता फकत रूग्ण अमुक नं.बेड, वारड व डोकटर इ.चा रूग्ण!!!!!!बॅडवरचा प्रतेक जीव आपल्यातच मग्न होता भेदरलेला बावरलेला भिती, चिंता, दुःख, वेदना, यातना, मात्र समान आणि सोबत च्या प्रिय जनाची स्थिती ही प्रश्न काळजीने भारलेली नाती वेगवेगळी मानस ही आनोळखीच सारी मात्र भावना ऐकच इच्छा एकच आपला रूग्ण, कोणाची आई,भाऊ, वडील, मूलगा पती, पत्नी, लेकरू तर मी बहीण अनोप सारख्या प्रेम करणारयया भावाची.कदाचित त्याची आईची भावना कारण एक मुलगा आपल्या आईसाठी जे करू शकतो ते किंवा त्याहून जास्तच करीत आला होता हा मुलगा.भावापेक्षा पोटच लेकरूच!काकूच्या जाण्यानंतर पुन्हा फिरून नवा जन्म घेणयासाठी त्यान इथवर आणलं होतं खुप खुपच धीर दिला त्यान धावपळ दगदग पैशांची जुळवाजुळव, भेटीगाठी शिफारस पत्र कागदपत्र,दाखला नि काय काय पुढच माहीत नव्हत आता कृतार्थ वाटत होतं इतका कर्तबगार भाऊ प्रेमळ बहीणी मला लाभल्या मी माझ्या आईबापाचे, देवाचे आभार मानत होते काचेच्या पलीकडील काँटरपलीखडच्या मुलीशी काहीतरी बोलत असलेलया अनोपकडे पाहून माझे डोळे भरून आले बाहेरचे सारे सोपस्कर पुर्ण करून आनोप पुन्हा आत आला तीच आश्वासक हिम्मत देणारी नजर ऊसण हसणं तोच खोटा दमलेला ऊत्साह, डोळयात दडलेला पाण्याचा सागर.जवळ येऊन माझे डोळे पुसत अन स्वताचे अश्रु दडवित बेफीरीने बोलला काय झाल रडायला सगळं छान चांगल होणार आहे आता बघच इतका त्रास सहन केलास आता पर्यंत आता फकत हासत रहा इथन पुढ आणखी काही वेळ सहन कर हे ऑपरेशन झाले की ऊठून पळायला लागशील डाॅकटर म्हणत होते सा त्रास मिटला की तू छान आयुष्य जगशील थोडा धीर धर हे बोलताना त्याला किती बळ आणावे लागत होते हे काय मला समजत नव्हते???माझ्याहुन दहा वर्षानी लहान घरातच माझ्या समोर जन्मलेला हा पांढरा शुभ्र मासाचा गोळा. आज कीती मोठा झाला होताएवढा मोठा कधी झाला ?महाशिवरात्री च्या पहाटे दवाखाणयात निघता निघता घरातच झालेला याचा जन्म मला आठवल काकू एकेक गोष्ट सांगत होती तसे अप्पा करीत कढथ पाणि ठेऊन अंघोळ घालण्या पर्यंत आणि नाळ कापणयापासून वार पाणयात नेऊन टाकणया पर्यंत .मी अप्पा ना मदत करीत होते ती पहाट आणि आजचा हा दिवस काळ कीती पटकन सरला कीती घटना घडल्या आयुष्यात आईवडील तरूण भाऊ गमाविणयाचे आघात माझे आजारपण संकटांना पाठ देत आम्ही भावंड जगत होतो दुःख माग सारत होतो काही गोष्टी सुखदायी ही अनोप चे लग्न मिंलीदचे लग्न अनोप च्या मुलीचा जन्म सोनल मिंलीदची पत्नी तिने मिंलीद च्या जाण्या नंतर घरच्या च्या विरोधात जाऊन राहुलला दिलेला जन्म सोनाली धाकटी बहीण तिचा मुलगा जैद आणि तृप्तीची यश आणि श्रेया जी काकू अप्पा असतांनाच जन्मले होते या सारया लेकराच्या गोतावळ्यात मी रमून जाई त्यांना दुरून पाहूनही जगण्याचा उल्हास येत होता सारा...सारा भुतकाळ मी त्या प्रचंड इमारतीच्या न जाणे कितवया मजलयावरील एका लहानशा खोलीवजा काचेच्या तावदानातील खाॅटवर पडल्या पडल्या आठवत होते दोन डोकटर माझ्या जवळ आले सोबत आनोपही होता अनोपशी बोलतच येत होते तेश दोघेही बहुतेक ओपरेशनला न्यायची वेळ झालीय असच काहीतरी मग माझ्या कडे वळून चला ऑपरेशन करायचय ना हसत एकजण बोलले मी होकारार्थी मान हलवली असे म्हणून डोकटर निघाले अनोपही त्यांच्या मागुन गेला मग नर्स व वारडबाॅय ने मला खाटेवरून स्ट्रेचर वर घेतले त्या आधी नर्स ने माझी कपडे बदलली बहुतेक ओपरेशनचा कपडे वेगळे असावेत मग सुरु झाला नवा प्रवास छोटाच पंरतु जन्माचं मृत्यूपासून अंतर वाढवणार की संपवणार?? ओळीने असलेलया अनेक खोल्या बहुतेक आपरेशन थेअटर समोरून भराभर स्ट्रेचर पुढे जात होते म्हणजे ती दोन पोर ढकलत होती मनात विचार आला हे दालन म्हणजे रेल्वे चा प्लॅटफॉर्म आहे काय आणि हे ओपरेशनच्या खोल्या म्हणजे रेल्वे च्या बोगया आहेत आणि मी म्हणजे रेल्वे स्टेशन वरील हमाल ढकलत असलेल्या हातगाडी वरील लगेज आहे. तसाच गोंगाट गर्दी,लगबग, अनांउसमेंटचे आवाज सार सेम टु सेम रेल्वे स्टेशन फरक रेल्वे माणसाला ऊचित ठीकाणी पोहोचविते आणि इथ डाॅकटर शस्र क्रिया करून माणसाचे मृत्यूचे स्टेशन पुढे ढकलत असतात इतकंच!!ऐकेक खोली पार करीत क्रमाक अकरा या खोलीत माझ्या स्ट्रेचर चा प्रवेश सुसज्ज, प्रचंड प्रशस्त यंत्रानी भरल्या खोलीतील छोट्या खाटेवर माझा तो लगेजरूपी देह त्या वारडबाॅय नी एकदाचा आपटला!!!!आले तसे लगबगीने निघून गेले दोघेही जणू दुसरे गाठोडं आणायला मी एकटीच सोबत मशिनी दरवाज्याचा धाडकन आवाज आला. आता मशिनी सह मी ऐकटीच पडल्या पडल्या छताकडे पाहीले टिव्ही च्या सेटलाइट डिश सारखे गोलाकार मोठया छत्री एव्हढे मशीन ज्यावर छोटे छोटे काचेचे?तुकडे चकाकत होते मधोमध सुइसारखे टोक होते अगदी निमुळते गेलेले बरोबर माझ्या खाटेच्या वरती होते की मला त्या मशिनच्या टप्प्यात आणुन टाकले होते मी शांत पडून राहिले पाचव्या मिनिटाला चारपाच माणसे आत आली संपुर्ण शरीर निळ्या रेनकोट सारख्या कीट मध्ये झाकलेले आगदी डोळयावरही मोठाले चष्मा तोंडावर मासक आत स्री आहे की पुरुष कळायला मार्ग नाही मग अणखी एक मॅडम आलया त्यांनी फक्त तोंड झाकलेले व हातात गलोवज घातलेले किंचित हसून बोलल्या एक छोटस इंजेक्शन दयायचय तुम्हाला काय नाव तुमच काय जोब करता देऊ ना दुखणार नाही झोप येइल फक्त जरा वेळ ठीक आहे ना असे म्हणून निघुनही गेल्या मी दाराकडे पाहिलं मघाशी माझ्या स्ट्रेचर मागे धावत अनोप अगदी त्या दारापर्यंत आलेला तो दिसतोय का म्हणून मी त्या म्याडम नी बाहेर जाण्यासाठी उघडलेल्या दाराकडे आधीरतेने पाहिलं. तो पलीकडच्या वेटिंग रूममध्ये बसला असेल ना?की दारातच थांबला असेल जर तो दारात दिसला तर मी डोळ्यांनीच रागवीन जा जाऊन काहीतरी खा चहा वगैरे घे व निवांत बस मी येते?असे खुनेनेच सांगायचे होते त्याला परंतु दार अगदी सावकाश अर्धवट च ऊघडले लगेच बंद ही झाले मला त्या म्याडमचा रागच आला पुर्ण दार ऊघडल असत तर कीमान मला माझ्या लेकराला डोळे भरून पहाता आले असते काय सांगाव ऑपरेशन मध्येच.............सभोवती हिरव्या रंगाचे पडदे तीन डोकयाच्या बाजला भितीला टेकुन सुसज्ज अशी काॅट मशीनचा तोच आवाज जो अगदी सुरवातीला बेशुद्ध अवस्थेत आणल होत त्या आय सी यु त होता तसाच छातीवर तसेच गोल चकत्यासारखे नान्याच्या आकारचे ठोकळे नाकावर आकसीजन व बाजूला भलमोठ सिलिंडर, सलाईनचा स्टॅन्ड, डोक्याच्या बाजुला ती चौकोनी तिरक्या रेषा ज्या मानसाच्या जन्म मृत्यूच्या ठोकयातले अंतर व फरक दाखवणार मशीन अंधुक स दिसत होतं सगळं धुसर हात हलविण्याचे प्रयत्न केले सलाईन च्या नळयामुळे ते हलेनात मग पायाकडे पाहीले तर दोन्ही पाय मांडीपासून बँडेज मध्ये घटट लपेटलेले तसूभरही हलू नयेत पोट मात्र हलक हलक रीकाम भासत होत जणू काही खूप मोठा भार ऊचललाय कोणितरी आणि दुखण जाणवतय का?नाही ऊलट पाणयाने भरलेली घागर कोणीतरी पालथी करून रीकामी करावी इतक हलक निरवात पोकळी झाली होती का पोटाची दुखण पळालय रक्तस्त्राव ही जाणवला नाही हलका तरल अनुभुती होती फक्त बेंबी च्या भोवताली चार ठीकाणी सुया टोचल्या सारख्या वेदना होत होत्या परतु हलक्या तिथं पट्टया लावल्या होत्या मी तर्क लावित होते म्हणजे ऑपरेशन झाले तर!पडदयाआपडूनही प्रकाश झिरपत होता काय वेळ आहे वाजले कीती आज तारीख काय वार कोणता मी त्या वेगळ्या च ठीकाणी ओपरेशन थेअटर मध्ये होते ना मी मघाशी म्हणजे किती वेळा पूर्वी एकटीच होते शांतता होती तिथं. इथ तर माणसाचे आवाज हालचाली पावलांच्या खूणा जाणवत होत्या मग माझ्या कडे का कोणि येईना ती स्ट्रेचर वरन मला वाहून नेलेली पोर ती खोली ती बंद पोशाख बंद माणस त्या इंजेक्शन देणारया मॅडम दारापर्यंत गेलेल्या मी अनोप दिसतोय का पहायला दाराकडे नजर वळवली पुढे......पूढे....मला गुंगी आली?की झोप?काहीही आठवेना मेंदूला तान देऊन मी आठवण्याचा प्रयत्न केला ...पण....काहीही आठवेना ऊलट मेदूमधून एक शिरशिरी सर्वांगातुन गेलीमी शांत पडून रहायचं ठरवल दोन केरळी नर्स प्रसन्न मुद्रेने पडदयात आल्या सोबत च्या भांडयातील गरम पाण्यातलया कापसाच्या बोळयाने जमेल तसे शक्य तेवढे अंग स्वच्छ केले स्फुरण आल्यासारखे वाटले त्या लिकविडच्या वासाने बरे वाटले मला मग दुसर्या भांड्यात गुळणया करारला लावून माझा ब्रश केला विस्कटलेले केस विंचरले ,माऊथवाॅश ने पुन्हा गुळणया, मग टाॅवेलने अंग पुसुन सुगंधी पावडरचा मारा सारया शरिरावर केला माझी मरगळ खरोखर कमी झाली सारा शीन निघाला बेडवरची चादर ऊशाचे अभ्रे बदलले होते ताजातवाण वाटत होत आता.मगरळ कमी झाली होती प्रश्नांनी भरलेले तसेच होते मुख्य म्हणजे मी जिवंत आहे हे खात्री झाली होती त्या मुली अगदी तरूण प्रामाणिक पणे आपले काम निष्ठेने करत होत्या मी कूठ आहे माझे ऑपरेशन झाले काय हो झाल तुमचं ओपरेशन तुम्ही आय सी यु मध्ये आहात तुमचे नातेवाईक बाहेर आहेत बोलवते तुम्ही हालचाल करू नका शांत पडा कालपासून तुमचे भाऊ ईथेच आहे अनोप भालशंकर ना ?पाठवते असे म्हणून दोघी निघून गेल्या.कालचा दिवस होता तो गेला आता नवा दिवस आहे आजचा निराळा आहे पुन्हा विचारात गर्क झाले मी पडदा सारून हसतं मुखाने अनोप आत आला तारवटलेले डोळे पंरतु स्मित हास्याने ऊजळून आलेला चेहेरा जवळचा स्टूल ओढून अगदी काॅटच्या जवळ बसत त्याने माझा हात हातात घेतले काय मग बर वाटतय ना आता मी फक्त त्याला पहात होते शब्द सुटतच नव्हते अश्रूंनी केव्हाच व्यकत व्हायला सुरुवात केली डोळे मिचकावित हात हळुवार दाबत, काल दुपारी तुला ओपरेशनला नेले होते आठवतय ना?साडेतीनला ओपरेशन सुरू झाले रात्री अकरा वाजता तुला बाहेर आणले मोठे ऑपरेशन होते ना पुर्ण भूल होती ना !शुद्धीवर यायला ऊशीर लागला काचेच्या बाटलीत "हाताने आकार दिखवित,"पोटातली ती घाण भरून आणलेली दाखवली त्यानी मला आता काहीही राहील नाही तु आता छान होशील बघ त्याचे हावभाव, आनंद, कमी झालेला ताण मनावरचे दडपण भीती सार संपलय अशा आवेशान तो बोलत होता भरभरून बोलत होता तो लहान होता पण मलाच लहान गोंधळलेल्या बाळाच्या सारया शंकाच आईन निरसन कराव तसे तो मला समजावित होता कितीतरी दिवसाची त्याची धावपळ, धडपड काळजी प्रशन सारयाला विराम मिळाला होता तो आनंदी व मोठे ओझे कमी झाल्याच्या अविर्भावात होता जसे की माझ्या पेक्षा त्याचीच पिढा सरली होती. वेदनेचा अध्यायाचा काल अत झाला होता माझ्या हुन माझ्या भावंडाची पीढा संपली होती दुखाच मुळ ऊखडले होते एक प्रचंड वादळ शांत झाल होत कीती वर्ष भोगलेला त्रास दुःख पीढा,परवड थांबणार होती कीती सोसल होत मी माझ्या भावंडांनी मुखयता:अनोपने कळ मला होती पंरतु झळ माझ्या भावाबहीणींना सार काल संपल होत नवा दिवस ऊगवला होता नवा सुर्य नवी दिशा दाखवित सार जणू नव्यान सुरू करायचे बजावत होता मृत्यू पाहुन मरणाच्या दारातून आलेल माझं जीवन नव्या जगण्याला सज्ज झाले होते. .... पाऊस वेचताना काव्यसंग्रहाल
