माणूसकीची गोडी असलेला फराळ....
माणूसकीची गोडी असलेला फराळ....
पुष्कळ वर्ष लोटली त्या प्रसंगाला.अनुभव हे व्यकती सापेक्ष निराळे असतात. आयुष्यात प्रत्येकाला, बरेवाईट अनुभव येतातच. माझ्या कौटुंबिक जीवनातील कलेशदायी काळात घडलेला लहानपणातला, परंतु कायम मनांत कोरलेला दरवर्षी दिवाळीत आठवणारा...प्रसंग! साल आठवत नाही नककी साधारण सत्त्यान्नव वगैरे साल असावं.नवरात्र संपून आता दिवाळीची चाहुल लागली होती. सारेजण दिवाळसनाच्या आगमणाला अतुर, खरेदी फराळ नवे कपडे नि काय....काय..आजुबाजू सारयाच् घरात ऊत्साह संचारले होते फक्त आमचे घर सोडून....आम्हीही खुशित होतो वेगळ्या कारणाने. गेले तीनेक महीने दवाखान्यात मृत्यूशी झुंज देऊन आमची आई( काकू)नवरात्रीच्या शेवटच्या माळेदिवशी घरी आली होती. खरेतर त्याच दिवशी अप्पा माझे वडिल व चार भावंड आम्हा सारयांची दिवाळी साजरी झाली होती. जगातल्या कोणत्याही आनंदापेक्षा हा आनंद मोठा होता आईविणा पोरके होणयापासुन दैवाने आम्हांला वाचविले होते.नवे कपडे, फराळ ,फटाके या गोष्टी गौन भासत होत्या अगदी सहा वर्ष वयाच्या लहानग्या अनोपला सुद्धा!कारणं आम्ही गेले तीन महिने जे काही भोगले होते आईविणा ते फक्त आम्हालाच माहीत...असो.सन असूनही काकू घरी आलयानंतर, एकही नातेवाईक घरी फिरकला नाही एकंदर आमची परिस्थिती पहाता कदाचित् पैसे मागतील या भीतीने.? शेवटी त्यांची तरी काय चुक म्हणा थोड्याफार फरकाने सारयांची ऐकच स्थिती....☺ ☺☺☺
अप्पा, तीन महिन्यांनी पुन्हा कामावर जाऊ लागले. सदाशिव पेठेत लाकडाच्या वखारीत दिवसभर हमाली काम करून संध्याकाळी आठ वाजता घरी आले की आमच्याकडे स्टो पेटायचा अगदी रोकेल अनन्यापासून भाजीपर्यंत सार.....अप्पांनी पुन्हा काम सुरू केल्याने किमान ऊपासमार टळली होती.सनासुदित किमान चुल पेटली होती.हेही फार होते अप्पा खुप कष्टाळू व स्वाभिमानी होते पाच मुलासह पत्नी सारयानांच ते सांभाळताना, कधीही कोणापुढेही झुकले नाही. पंरतु काकूंच्या अपघातानंतर ते शांत असत अपराध्यासारखे वागत.गेले तीन महिने जीवाच रान करून त्यांनी काकूला वाचविले होते.ती सुखरूप घरी आल्याने, नव्या जोमाने आमच्यासाठी राबत होते ऐकटे.सख्खे नातेवाईक साधी चौकशीही करीत नव्हते. ज्यांच्यासाठी काकू अप्पा दोघंही वेळोवेळी कामी आले होते.☺☺☺☺☺☺काकूला मात्र वेगळेच दुःख! तीच्या स्वताःच्या जखमांच्या वेदनांपेक्षा जास्त, तिला तिच्या लेकरांची फिकीर वाटत होती.सारखी रडत होती. आमच्या कडे पाहुन सनासुदित, माझी लेकर, बेवारशा सारखी दिसत आहेत नवे कपडे नाहित,गोडधोड खायला नाही. सार माझ्यामुळे झालंय. पोंराना निराधारांसारख रहावं लागतय.लेकर उघड्यावर पडली. मी वाईट आई आहे. लेकरांनो मी तुमची गुन्हेगार आहे.मला माफ करा वगैरे, वगैरे बडबडत, डोळ्यांतुन अश्रु गाळीत राही.मधूनच माझ्याकडे अर्थपुर्ण नजरेने पाही.कदाचित गेले तीन महिन्यांपासून म्हणजे तीच्या अपघातानंतर व त्या अगोदरही घरांत सर्व भावडांत मोठी असल्याने, अगदी लहानपणापासूनच जबाबदारीने व परिस्थितीचे भान व मोह, आवरून वागण्याची शिकवण आपसुक दिली आयुष्याने म्हणुनच कदाचित या कठीण प्रसंगी वडील व भावंडांना जितके सावरता येईल तितके, व दवाखान्यातील सर्व परीस्थिती माझ्या परिने हाताळली.आईला घरी सोडले तेव्हा मुख्य डाॅकटर बोलले तूमची मुलगी खुप हिंमतीची आहे तीन महिने खुप धावपळ केली तिने.ती मला पहायची कदाचित् कुण्या भावंडांने हट्ट केला फराळ,कपडे किवा फटाके यासाठी तर मी समजावेन याची खात्री होती .परंतु तशी वेळ आली नाही अगदी दिवाळीचे तीन दिवस उलटले तरीही !अजुबाजुचे सारे लोक दिवाळीत नवे कपडे,फटाके,गोडधोड मिठायां च्या बेतात गुंतले होते तिथे, आमचे घर फक्त आमची आई आमच्यासमोर जिवंत होती याच आनंदात सार विरलो होतो.जे घरात भाजी भाकरी बनायची ती खात होतो. अगदी सर्वात लहानगा सहा वर्ष वयाच्या अनोप त्यानही काहीही मागितले नाही.हट्ट नाही रडारड नाही. गरीबी आंणि काळ व परीस्थिती माणसाला लहान वयातही मोठे भान शिकवुन जाते.
☺☺☺☺☺☺
दिवाळीच्या चौथ्या दिवशी अगदी, सकाळीच मिंलीद माझ्याहुन तिसर्या क्रमांकाचा भाऊ यासह ऐक व्यकती आमच्या घरी आली.त्यांच्या हाती ऐक पिशवी होती. आईसह आम्ही सारेजन कुतुहल व काहिसे बुजुन त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांचा पेहराव, हावभाव, दिसणे सारे च वेगळे व उच्चभ्रू व सुशिक्षित, श्रीमंत व तितकेच नम्र होते.दरातूनच काकुकडे पाहुन नमस्कार येऊ का मावशी!आत म्हणत सरळ काकूंच्या काॅट समोर पोहोचले सुदधा!हातातली पिशवी काकूंच्या हाती देत दिवाळीचा फराळ आहे यात घ्या तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या विषयी समजले!आईने दिलाय!आणि हे घ्या म्हणत खिशातून काही पैसे काढून माझ्या काकूच्या जखमांनी भरलेल्या हातात दिले. अगदी हसतमुखानं लवकर बरया व्हा!येतो म्हणत आलयापावली दिसेनासेही झाले.मिंलीद बाहेर सोडवून काही मिनिटांत आला आम्ही सारे प्रश्नार्थक नजरेनं काकू भरल्या डोळ्यांनी त्या पाठमोरया आकृतिला दरवाज्यातून जाताना पहात होती अजुनही तीची नजर दाराकडेच होती.अग! ते आमच्या शाखेतले उमेश शिक्षक !उमेश अभ्यंकर नाव आहे त्यांचे. खुप चांगले आहेत ग!शिक्षक तुझ्याविषयी कळले म्हणून बघ फराळ घेऊन आले ते!☺
☺☺☺☺☺
मी विचारांत पडले नवरात्रीच्या त्या, रात्री बेशुद्ध असलेल्या आई साठी देवीकडे प्रार्थना करा. म्हणत दवाखान्याच्या त्या खोलीतून जिथं माझी आई, निष्प्राण पडली होती तेथून खिडकीतून दिसणार्या, समोरच्या देवीच्या मंदिराकडे बोट दाखवत, डाॅकटर म्हणाले होते तुम्ही आई साठी दवीकडे प्रार्थना करा मुलांनो. मी माझे प्रयत्न करतोय आहे.हे ऐकून क्षणाचाही विलंब न, करता मी मंदिराकडे धाव घेतली. मिंलीद माझ्या मागोमाग आला रात्रीचे अकरा, साडेअकराची वेळ. नवरात्री सुरू असल्याने मंदिरात बरीच गर्दी होती.गरबा नाचगाणे व देवीचा जागर आणि गुनगान गायला, ऊंची वस्र, दागदागिणे घालून मोठमोठ्या गाडयातून श्रीमंत लोक तिथे आले होते. आम्ही बहिन भाऊ तिथे काकूच्या प्राणाची भीक मागायला गेलो होतो.दर्शन घेऊन मंदिरातील एका कोपरयात खिन्न बसलो.त्यात आमचे मलूल चेहेरे फाटका अवतार पाहून पुजारयाने काही मिनिटांतच ईथे जास्त वेळ नाही बसायचं जावा बाहेर.खरेतर मिंलीद व मी आईच्या काळजीत होतो.आजुबाजूला आमचे लक्ष नवते तरीही मिंलीद धीर करुन बोलला इतके लोकं आहेत ईथ आधिपासून आम्ही आईसाठी, आलोय जरावेळ बसुदया .तो खरंतर माझ्याहूनही लहान तरीही हिंमतीने बोलत होता. मी घाबरले होते.शेकडो नजरा आमच्यावर खिळल्या होत्या गोंधळ ऐंकून प्रवेशद्वाराजवळील बंदोबस्तातले पोलीस धावत आत आले. पुजारयासह दमदाटीने आम्हाला बाहेर काढू लागले. हाकलवताना तिथे असलेले गोरेगोमटे, उच्चभ्रू, देवीच्या भक्तीत बुडालेले ?सारे श्रीमंत कुत्सित पणे आम्हाला पहात होते. तो श्रीमंत बंघ्याचा मनाने दरिद्री समूहाच्या नजरा डोकयात भिनलया होत्या त्या रात्री.आणि आता आज काही क्षणापुर्वी पिढीताचे, काळ,वेळ,व परीस्थितीने खचलेल्या एका कुटुंबाचे, दुःख, व्यथा जाणून आपल्या परिने शक्य ती मदत करून आनंद वाटणारया या ऐका नजरेने, व स्मितहस्याने त्या अमानुष शेकडो नजरांना केव्हाच तुच्छ ठरविले होते!ऐका आईची व्यथा दुसर्या आईनेच जाणली होती.दिखाव्याच्या,भौतिक बेगडी, श्रीमंतीपेक्षा मनाच्या मोठे पणाची श्रीमंती श्रेष्ठ ठरली होती. फराळाला माणुसकीची गोडी आली होती.
