माझ्या आठवणीतील प्रसंग
माझ्या आठवणीतील प्रसंग
मी तेव्हा चौथी इयत्तेत शिकत होती श्रीगोंदा याठिकाणी माझ्या मामाचे लग्न होते म्हणून मी माझी मोठी बहिण व वडील ट्रकने कुरकुंभ मधुन दौंडला चाललो होतो कुरकुंभ घाटातून ट्रक चालली असताना अपघात झाला सुदैवाने ट्रकमधील कोणालाच काही झाले नाही जरासे खरचटले पण त्यावेळेस आम्ही खूप घाबरून गेलो काहीच सुचेनासे झाले अंगाचा थरकाप झाला फिरंगाई मातेच्या गावात हा अपघात झाला परंतू तिने आपल्या भक्तांना संकाटातुन वाचविले .काळ आला होता पण वेळ आली नव्हती . अजूनही तो प्रसंग आठवला तरी अंगाचा थरकाप उडतो माझा. त्या घाटातुन जाताना आजही आठवण येते त्या प्रसंगाची. अपघातातुन सावरल्या नंतर आम्ही तिघेही श्रीगोंदा याठिकाणी लग्नासाठी सुखरूप पोहोचलो. परंतु माझे वडील आजही फिरंगाई मातेचे दर्शन घेण्यासाठी जातात.