लबाड मित्र
लबाड मित्र
एक शासकीय कर्मचारी स्थानांतरावर आपल्या मूळ राज्यातुन हिंदी भाषी राज्यात संपूर्ण परिवारात सोबत वास्तव्यासाठी जातो. त्याला एक नटखट लहान मुलगी पण होती. तो त्या कर्मस्थान शहरी किरायाने राहत होता. त्याचा मकान मालक एका जवळच्या गांवी मुख्याध्यापक होता. तो रोज आपल्या स्वयम चलित दुचाकीने शाळेत जात होता. त्या भाडेकरुचा जेव्हा सुट्टीच्या दिवशी मकान मालका सोबत संवाद होत होता, तेव्हाच नगरातील त्यांच्या परिचयाचे लोकांन सोबत ते आपल्या भाडेकरुचा पण परिचय करुन देत होते. त्यामुळे त्याची नगरात ब-याच लोकांशी चांगली ओळख झाली होती. त्याच्या बाजुला एक नवयुवक राहत होता. त्याला पण एक सुंदर मुलगी होती आणी त्याची पत्नि भारतीय डाकघरात कार्यरत होती. जेव्हा दोन्ही मुली त्यांच्या पालकासोबत बाहेर हिंडत होती तेव्हा त्या एकमेकींशी खेळत होत्या. त्यामुळे इच्छा नसतांनाही दोन्ही पालक फाउल्या वेळात अनावशक गोष्टि करत होते. त्यामुळे त्यांच्यात मित्रता झाली होती. शेजारी मित्राचा एक अजुन शिक्षक समवयस्कम मित्र त्याच नगरात राहत होता. त्यामुळे त्याच्या सोबत पण घनिष्ठ मित्रता झाली होती. सकाळ-संध्याकाळ फिरण्याची दोघांनाही सवय असल्यामुळे ते रोज सोबतच फिरत होते.
शेजारी मित्र हा एका ओद्दोगिक प्रशिक्षन केंदात प्रशिक्षक होता. तो फार चालाक ,चतुर व बडबोला होता. त्यामुळे त्याची मित्रता ब-याच ठिकाणी होती. सुरुवातीला शिक्षक मित्राने प्रशिक्षक मित्रा विषयी विशेष काही उलघडा केला नव्हता. पण बोलता- बोलता तो सहज म्हणाला कि त्याच्या सोबत आर्थीक व्यवहार सांभाळुन करने फायद्याचे राहील !. प्रशिक्षक मित्राने आपल्या योजने प्रमाने आम्हा दोघांनाही ढाब्यावरच्या पार्टी मधे आमंत्रीत केले होते. तीथे पोहचल्यावर तो आपल्या काही मित्रान सोबत बसला होत. आम्हचा त्याने त्यांच्या सोबत गर्म-जोशिने परिचय करुन दिला होता. त्याने त्या दिवशीच्या यजमानाची पण चांगलीच ओळख करुन दिली होती.त्याने आम्हाला स्थान ग्रहन करण्यासाठी सांगितले होते. पार्टीला सुरुवात झाली होती. तो बडबोला त्या घरधनी अर्थात यजमानाची सारखी स्तुती करित होता. त्याला त्या दिवशी बघुन मला त्याला भाटाची पदवी देण्याची तीव्र झाली होती. शेवती पार्टी खुप रमली होती. यजमानाची इतकी स्तुति केली होती कि त्याने ती पार्टि त्याच्या तर्फ आहे असे शेवटी घोषित केले होते. सर्वांनी त्याला शानदार-जानदार पार्टिसाठी धन्यवाद दिला होता आणी सर्व आपल्या घरी निगुन गेले होते.त्याने एक वेळा-पत्रकच आपल्या मेंदु मधे कोरले होते. त्या योजने प्रमाने तो टोपी ईडुन –तिकडे हिशोबाप्रमाने फिरवत होता. परिचय दांडगा असल्यामुळे तो बरेच मित्रांचे काम करुन देते होता. व त्याला मग आपल्या सुचि प्रमाने त्या बक-याचा बळी घेत होता. व त्या पार्टीत ज्यांचा आधी बळी घेतला होता त्यांना पण खुश करण्यासाठी पाचारण करित होता.
काही काळानंतर आमच्या शेजारी लबाड मित्राची बायको आपल्या माहेरी गेली होती. बराच काळ लोटुन गेला होता. तरी ती परत आली नव्हती. चौकशी केला नंतर लबाड मित्र म्हणालां कि त्याच्या पत्निने लग्ना आधीच बदली साठी अर्ज केला होता. त्या वर फार उशिरा कारवाई करण्यात आली होती. तो पण प्रयत्न करुन तीथेच काही महिण्यात जाण्याच्या बेतात आहे. पण नंतर शिक्षक मित्राने सांगितले की त्याने तदर्थ नौकरीची खरी माहिती आपल्या सासुरवाडीला दिली नव्हती. तो प्रधान कार्यालयातील काही अधिका-यांना घूस देवुन नेहमी तदर्थ नौकरीचे नूतनीकरण करित होता. त्याची नौकरी कधीही बंद होवु शकते ?. त्यामुळे पति-पत्निचे मतभेद आणी मनभेद झाले होते आणी वहिणी त्याला सोडुन आपल्या वडिला कडे राहत होती.
कौटोंबिक परिस्थिति मुळे तो आतुन हालुन गेला होता. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण त्याच्या सवयी मधे काहिच बदल घडुन आला नव्हता. त्याने एक मित्राकडुन चांगली रक्कम उधार घेतली होती. तो त्याच्या मागे हात धुवुन पडला होता. तरि तो त्याला शांत करुन व नविन आश्वासन देवुन परत घरी पाठवित होता. त्या कलेत तो अगदम महारथी होता. त्याला कुठुन तरी माहिती मिळाली कि त्याला नविन मोटर सायकल विकत घ्यायवयाची आहे. त्याने त्याला शातिर युक्तिने त्याचे पैसे काही दिवसातच परत करतो असा विश्वास दिला होता. त्यासाठी त्याने त्याला आपले मुदतबंद ठेवी चे पत्रके दाखविले होते. ते काही दिवसातच परिपक्व होणार होती. त्याला आपले पैसे वापस मिळणार याची खात्री झाली होते. त्या लबाड मित्राने त्याला एक पार्टीत बोलावले होते. नेहमी प्रमाने त्याने एक नविन बकरा फासला होता. पार्टिला रंग चढला होता. आवळा देवुन भोपळा कसा घ्यायचा त्याला चांगले माहित होते. त्या मित्राची त्याने अन्य मित्रा समोर खुपच प्रशंसा केली होती. त्याला खुश पाहुन तो म्हणालां अजुन एक पार्टि लगेच होणार आहे !. असे भागित त्याने केले होते. ते ऐकुन सर्वच आश्चर्याने बघु लागले होते. तेव्हा त्याने त्या मित्रा कडे बोट दाखवले होते.ती पार्टी नविन मोटरसायकल गाडी घेण्याच्या प्रित्यर्थ होती. त्याने पण त्या पर्टिला हमी दिली होती. जर काही पैसे शिल्लक उरले तर देवु म्हणालां होता !. आता त्याची चालाकी सुरु झाली होती. त्याने त्याला सल्ला दिला कि जर गाडी राजधानीच्या शोरुम मधुन घेतली तर बरेच पैसे वाचु शकतात. त्याने लगेच कागद पत्र व पेन काढुन त्याला पटवुन दिले होते. तो पण सहमत झाला होता. नंतरच्या भेटित त्याने गाडी विकत घेण्यासाठी शेष रक्कम मागितली होती. व तो येतांना बाईक घेवुन येईल असा विश्वास त्याला दिला होता. आता परवा आपली बाईक येणार म्हणुन तो खुपच खुश होता. पण त्याच्या पदरी निराशा पडली होती. तो त्याला एक सारखे वेग-वेगळे कारने सांगत होता. पण ताची बाईक काही केल्या येत नव्हती.
त्याच्या शेजारी मित्राला या सर्व गोष्टिची भनक लागली होती. त्यामुळे तो आधीच हुशार व चौकस झाला होता. त्याला पण एक नविन स्कूटर घ्यावयाची होती. म्हणुनं त्या लबाड मित्रला सोबत राजधानीच्या शोरुम ला घेवुन गेला होता.त्याच्या अनुभवाचा फायदा घेवुन त्याने नविन स्कूटर घेतली होती. नविन गाडी घेवुन आम्ही वहिणीला भेटण्यासाठी घरी गेलो होतो. वहिणीला भानक लागताच ती घरुन त्याला थाप देवुन निघुन गेली होती. आमच्या सोबत त्याच्या सासुने वार्तालाप केला होता. जलपानचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही सासुबाईंचा दोघांनी निरोप घेतला होता. त्याची ती अवस्था बघुन त्याच्या मित्राला फार वाईट वाटले होते. जसे करावे तसेच भरावे लागते हा प्रकृतिचा नियम आहे. लबाडमित्र खरचं चुकला कि नाही याबदल काही भाष्य करने सोईसकर नाही. पण मित्राची कृति व व्यवहार हा सुर्य लाजेल अन चंद्र लपेल अशी त्याची नक्कीच थोरवी होती.
