STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Action Inspirational Others

3  

ANJALI Bhalshankar

Action Inspirational Others

लाल दिव्याची गाडी

लाल दिव्याची गाडी

3 mins
168

सप्रेम नमस्कार

भावी सरकारी अधिका-यांस सस्नेह पत्र


वर्तमानपत्रात बातमी वाचली गेली, दहा वर्षापासून एम .पी. एस. सी. चा अभ्यास करणारा विद्यार्थी तरून अमर मोहीते याने नवी पेठेतील खॉटबेसीस वरील, खोलीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.मनाला चटका लावणारीच घटना आहे पंरतु हे अस का? संपवतात जीवन ही तरूण पोरं ऐन ऊमेदिच्या वयात एक्झीट घेण इतकं सोपं का? वाटतं या पीढीला आयुष्य इतकं स्वस्त नाही रे पोरांनो! आईने, नऊ महीने जिवाच्या पल्याड जपलं तुम्हाला जन्म देताना तिचाही नवा जन्म झालाय. तुमचे पालनपोषण करताना तुमच्या जन्म दात्यांना किती कष्ट उपसावे लागले, असतील त्याची तुलना केलीत ना! तर कधीही, कशीही, कुठेही ,करा. तुमच्या मेहनतीपुढे आईबापाचे पारडे नेहमीच जडंच राहिल. जरा मागे वळुन पहा, आपल्या जन्मापासूनचा जितका आठवतोय तितका लहानपणापासूनचा काळ आठवा, किती खस्ता खाव्या लागलयात, त्यांना तुम्हाला मोठं करण्यासाठी. गरीब असो वा श्रीमंत, आईबापाचं प्रेम तर समानच असत जास्तीत जास्त आपल्या लेकरासाठी काय करू शकतो आपण असा विचारात बापाने कित्येक रात्री जागून काढल्या असतील. तुम्ही जेवल्याशिवाय आईच्या घशात घास ऊतरला नसेल. कपडा, लता, औषधपाणी, लहानपणी शी शु, रात्र रात्र जागून तुमच्या पालन पोषणाची सारी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या अडीअडचणी, पैशांची कमतरता, कधीही तुमच्या समोर जाहीर न करता मागाल ती गोष्ट देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तुम्हाला इतकं काबील बनवलं की तुमच्या पुढंच्या आयुष्यात काय करायच,कोणत्या क्षेत्रात करीअर करावं हे ठरविणयाइतकी सक्षमता तुमच्यात आली. तरूण वयात पंख फुटतात. त्या बळावरच तुम्ही स्वप्नांच्या नव्या आभाळात झेप घेता. दिशा ठरवून घरापासून दूर केवळ उज्वल भविष्य च्या शोधात भटकता. काहींना खरतर वाटेतूनही मार्ग काढतात काहीजणांना निराशेचा सामना करावा लागतो. परमुलखात राहण्या-जेवणाच्या सोईपासून अभ्यासा पर्यंत सारच नियोजन बद्ध करावं लागतं पैशाचा प्रश्न ही महत्त्वाचा. हे सार कोणाला पेलतं, तर कोणाला नाही झेपत केवळ आपला मित्र किंवा मैत्रीण करतेय, सरकारी सेवेत आरामच आराम, भरपूर पगार, जन्मभराची सोय, लाल दिव्याची गाडी, लग्नाच्या बाजारात चांगले भाव वगैरे वगैरे ऊत्तर मी कितीदा तरी ऐंकलीत सहज म्हणून माझ्या घराजवळच्या दत्त मंदिरातील परिसरात किंवा जोगर्स पार्क मध्ये तासन् तास अभ्यास करणा-या या भावी यू,पी,एस,सी,किंवा एम पी एस सी अधिकारयांना? पोरापोंरीना विचारलेल्या प्रश्नांची. भविष्याचा विचार करून अभ्यास करण्यात चूक नाही. करायलाच हवा! परंतु नीट विचार करून आपला कल कुठे आहे, मनापासून आपल्याला काय आवडत, आणि काय केल्याने आपलयाला अंतरीक समाधान ख-या अर्थाने मिळणारं आहे, याचा अगोदर विचार नको का करायला. जेणेकरून आपण निवडलेले क्षेत्र योग्य आहे आपल्या भविष्याचा यात डोळसपणे विचार होतो की नाही आहे हे कळेल .आपण जे काही करू त्यात यश नक्कीच मिळेल, हे पहा. कष्ट तर, सा-याच क्षेत्रात सा-यानांच करावे लागतात त्याला पर्याय नाही. परंतु निराश मनस्थितीत केलेले व आत्मविश्वास व आनंदाने केलेली मेहनत यात नक्कीच फरक आहे. जी गोष्ट आपण मारून मुटकून, केवळ समाज,आईबाप किंवा ऊगाचचे स्टेटस सांभाळण्यासाठी करत आहात त्यासाठी पुन्हा, पुन्हा विचार व्हायलाच हवा की, हे नक्की मला आवडतंय का? माझ्यासाठी इथं स्थान मी निर्मान, करू शकेन का? कि मी दुस-या कोणत्या गोष्टीसाठी परफेकट आहे हे नक्की आत्मपरीक्षण करा. शेवटी जगात कोणतीही परिक्षा आयुष्यापेक्षा मोठी नाही हे लक्षात घ्या. प्रतिकुल परिस्थितीतील मृत्यू ही सर्वात मोठी हार आहे, मुलांनो. जीव सलामत तर परीक्षा हजार!



Rate this content
Log in

Similar marathi story from Action