shubham gawade Jadhav

Abstract Fantasy

3  

shubham gawade Jadhav

Abstract Fantasy

क्षुधा - भूक

क्षुधा - भूक

3 mins
221


क्षुधा म्हणजे भूक .जी माणसाला कोणत्याही पातळीचं काम करण्यास भाग पाडते .भूक ही वेगवेगळ्या प्रकारची असतें कोणाला श्रीमंतीची , कोणाला वासनेची तर कोणाला पोटाची .सगळ्यात वाईट म्हणजे पोटाची भूक मग त्यासाठी माणूस एकदम तळातलाही थर गाठण्यास तयार होतो. टीचभर पोटाच्या खळगीसाठी अतोनात कष्ट ,हाल ,अपेष्टा सहन कराव्या लागतात .मग या भूके- साठी माणूस वेगवेगळे पर्याय शोधू लागतो .काही इमानदारीने तर काही गैरपद्धतीने आपली भूख भागवायचा प्रयत्न करतात. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की चुकीच्या मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही क्षणभंगूर असतें तर स्वकष्टाने ,मेहनतीने मिळवलेली गोष्ट ही चिरकाल टिकते .


             बाहेर पाऊस कोसळत होता .वीज कडकडून चमकत होत्या आणि निसर्गाच्या महाभयानक दृश्याचं दर्शन देत होत्या .सगळा आसमंत त्यांच्या चमकण्याने उजळून निघत होता .पावसाने सगळी जमीन न्हाऊन निघत होती .त्या लख्ख पडणाऱ्या उजेडात जमिनीवरच गढूळ पाणी वाट भेटेल तिकडं धावत होतं . रमेश शेठ आणि त्याच कुटुंब ह्या विक्राळ पावसाचं रूप आपल्या घरातून पाहत होते .

             असल्या पढत्या पावसात त्यांना एक आकृती त्यांच्याकडे येताना दिसत होती .डोक्यावर टोपी ,धोतर, जुना सदरा आणि बगलेत एक गाठोडं . त्याची चर्या म्हातारपणाकडे झुकलेली .चेहरा त्याच्या वृद्धावस्था सांगत होता .त्याच्याकडे पाहून त्याच्या करुणामय अवस्थेचे दर्शन घडत होते .तो घराजवळ आला आणि आवाज देऊ लागला, " माई ओ माई ,साहेब आहे का कोणी घरला ? " त्याचा आवाज ऐकताच रमेश शेठ आणि त्याची पत्नी दाराशी येतात .

रमेश शेठ - कोण आहात तुम्ही ?

म्हातारा वृद्ध - मी सदा .कामाच्या शोधत हाय जी .रस्त्याने चालत हुतो तर म्हणलं जरा इचारून बघावं .काही काम असलं तर सांगा .काय बी करायला तयार हाय बघा .

रमेशची पत्नी - अहो .ऐका ना आपण तसही कामाला कोणीतरी शोधत होतोच की .मग ठेवा यांना .

रमेश शेठ - कुठल्या गावाचे आहात ?

सदा - लय लांबचा हाय जी .

रमेश शेठ - कोण कोण असतं घरी ? 

सदा - जी एकलाच हाय बघा म्या .

रमेश शेठला हे ऐकून खूप वाईट वाटलं .अशा अवस्थेत काय काम करणार हे .आपल्याही घरात कोणी वृद्ध माणूस नाही .तिलाही सोबत होऊन जाईल . मुलांना सांभाळलं आणि थोडंफार काम केल तरी चालून जाईल .

रमेश शेठ - बरं .बाबा ही माझी पत्नी रमा .ही सांगेन ती काम करायची .

रमा - हो .जास्त काही नाही पण मुलांना सांभाळणे आणि थोडीफार बाकीची काम .

सदा - व्हय जी.करील की .

रमेश शेठ - बरं मग किती पैसे घेणार.

सदा - साहेब पैक नग मला .फक्त दोन येळचं पोटभर जेवायला द्या .


रमेश हे ऐकताच सुन्न झाला .फक्त पोटासाठी काम करणारीही लोक असतात यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता .त्याला त्या वृद्धाच्या चेहऱ्यावरती पोटाची भूक स्पष्ट दिसत होती .सदाचा चेहरा आनंदी झाला होता .त्याच्या चेहरा तसं सांगत होता .त्याच्या चेहऱ्यावरती भूकही तितक्याच प्रखरतेने जाणवत होती .रमेश ने त्यांना आत यायला सांगितलं .रमेशने त्याला त्याची राहायची जागा दाखवली .नंतर त्याला सगळ्यांसोबत जेवायला बोलावलं होतं .सदाने समोर अन्न पाहताच त्याला नमस्कार केला .वाढलेल्या ताटातला एक अन्नाचा घास तोंडात घालणार तोच त्याचे डोळे पाण्याने भरून आले .भरपूर दिवसांनंतर त्याला अन्न भेटत होतं .पोटाच्या भुकेसाठी तो मैल न मैल तुडवून आला होता .वेड्यासारखा सगळीकडे भटकत होता फक्त या भुकेसाठी .रमेशला त्याच्या मनातलं सगळं समजलं त्याने सदाला वडिलांसारखा दर्जा दिला .त्या ठिकाणी रमेशच्या हृदयात असणारी पित्याच्या मायेची भूक आणि सदाची असणारी टीचभर पोटाची भूक दोन्हीही एकमेकांना आलिंगन देत होत्या .त्या दोघात मोठं कोण ? याची तुलना होणारीही नव्हती आणि ती आपण करूही नये.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract