shubham gawade Jadhav

Comedy Drama

3  

shubham gawade Jadhav

Comedy Drama

बेवडा

बेवडा

6 mins
658


करिता प्राशन अमृताचे थेंब

उसळतो देही पराक्रमाचा डोंब

उतरता उदरी अमृत

पाश्चत्य भाषा जमते उत्तम


प्रसंग १ : गाव

        

                गाणं म्हणतं दादाराम रस्त्याने चालला होता . त्याच्या दिवसाची सुरुवात पोटात दारू गेल्यानंतरच होते .

तो दारूच्या गुत्त्यावरून दारू पिऊन गावच्या पाराकडे निघालेला असतो .काही टवाळ पोरांचा घोळका एका झाडाखाली बसलेला असतो .त्यातला एकजण अचानक दादारामला येताना पाहतो .

सम्या - टोक ती बघ . सकाळ सकाळ टाकली वाटत आज दादारामनी .

तसं घोळक्याचं लक्ष दादाराम कडे जात .तो आपला डौलत डौलत सापासारखी नागमोडी वळण घेत रस्त्यावरून चालत असतो .त्याचं ते चालणं पाहून सगळेच हसायला लागतात .दादाराम स्वतःशीच काहीतरी बरळत असतो .

दादाराम - आपला नाद कुणी करत नाही आन कुणी करणार पण नाही .

दादाराम जसजसा जवळ येतो सगळा घोळका त्याची टिंगल करायचं ठरवतो .घोळक्यातलं एक वात्रट पोरग

आद्या - ए बेवड्या .

तसा सगळा घोळका हसायला लागतो. बेवड्या शब्द ऐकताच दादाराम चा मोर्चा घोळक्याकडे वळतो .

दादाराम - कार गाबड्या हो , आई बापानी काय चांगलं शिकावलय का नाही ?

घोळका शांत .मधूनच एकजण बोलतो .

नान्या - व्हय पाटील हीकडं कुठं ? सकाळ सकाळ .

दादाराम - कोण पाटील ?

नान्या - आव तुम्हीच .दुसरं कोण ? तुमचा नाद हाय का राव गावात .

दादाराम - हा मग आपला कुणी नाद करत नाही आन नदी बी लागत नाही .

घोळक्यातलं आणखी एक टवाळ पोरग .

बाब्या - हा गावाला तेवढच कामय तुझ्या सारख्या बेवड्याच्या नादी लागायच.

दादाराम - ए कोणय र त्यो ? म्हंजी आमी पेलोय का ?

नान्या - मग हिकडं कुठं ? गेलता सकाळ सकाळ.

दादाराम - परसाकड गेलतो .

सगळी घोळक्यातली हसायला लागतात .

नान्या - इतक्या लांब ?

दादाराम - आरं बाबा . गावात आलो होतो आन फिरता फिरता एकदमच मुरडा मारला पोटात .

नान्या - राती आद्याच्या जागराणात तरी जास्त वडली काय ?

आद्या - आरं ५ भाकरी खाल्या ह्यानी .

नान्या - मग त्याचं जोर हाणित असत्याल.

दादाराम - का ? तुझ्या बापाचं काय गेलं त्यात .

आद्या - काय पाटील खोटं बोलताय राव .भकाभका वास येतोय दारूचा हितपर .

नान्या - वासानी पार आम्हाला चढायची येळ आली .

दादाराम - ए बेन्या गप . त्यो दारूचा वासय का ? बावळाटा .

त्याचं बोलणं ऐकून सगळी नाकाला हात लावतात . दादाराम खाली पायजम्याकडं पाहतो आणि पोरांना म्हणतो .

दादाराम - ए गाबड्याहो काय बी कस बोलताय र . दाखवू काय इंगा मग आपला .एका बुक्कीत दात पाडीन सगळं .

नान्या - मंग खरं सांग कुठं गेलता ?

दादाराम - आरं परसाकडला गेलतो म्हण.

आद्या - आरं पिऊन आलंय ही .खोटं बोलतंय .तुला आंबाट वास यायना व्हयं .

दादाराम - आरं त्यो शेंट मारलाय म्या शेंट .त्याचा वास हाय त्यो .

नान्या - आसला कसला ? दारुगत वास येती त्याची .

दादाराम - बाहेर देशातून माघवलाय . इम्पॉर्टन्ट हाय .

आद्या - काय हाय ?

दादाराम - इम्पॉर्टन्ट .

नान्या - आरं इंपोर्टेड म्हणायचं आसल त्याला .

मग सगळं घोळका परत हसायला लागतो .

दादाराम - ए हासायला काय झालं .हासायला काय झालं ? बुक्कीत दात पाडीन .

दुबई वरून आणलाय दुबईवरून .

नान्या - अय्यो .दुबईवरून .

दादाराम - मंग .

आद्या - काय तुझा बाप होता तिथं का आई कामाला .

दादाराम - ए बेन्या . माझा आजा गेलता तिकडं .

सम्या - कशाला ?

नान्या - हाजामती करायला .तिथल्या लोकांच्या .

पुन्हा सगळ्या घोळक्यात हशा पिकतो .दादाराम रागराग उठतो आणि खूप दारू पिल्याने खाली पडतो .पुन्हा सगळे त्याला हासतात .

नान्या - पाटील दमानी .दमानी .

दादाराम - तू मला शिकिवतो का आता ? LLLLLB शिकलोय .

आन म्या काय पडलो नाय .व्यायाम कसा करायचा ते शिकिवतोय तुम्हाला .

आद्या - हा राहूद्या पाटील .

सम्या - पिऊन पिऊन छातीच्या फासुळ्या आल्यात वरती आन ह्यो आपल्याला शिकिवणार व्यायाम .

प्रसंग २ : पहार

दादाराम उठतो आणि डौलत डौलत पाराकडे निघतो . घोळका पाठीमाघून ए बेवड्या , ए बेवड्या करत त्याची टिंगल करत असतात .दादाराम पारावर पोहचताच .दोनचार लोक तिथं बसली असतात .एक प्रतिष्ठित व्यक्ती ( अण्णासाहेब ) लोकांना काहीतरी सांगत असतात .दादाराम चं आणि त्याचं नखभरही पटत नसतं .

दादाराम - राम राम मंडळी .

अण्णासाहेब लगेच त्याला पाहून रागाला जातात पण तो पिलाय हे पाहून काहीच बोलत नाही .ते पुढे बोलू लागतात .अण्णा मुद्दाम खोचक बोलतात .

अण्णासाहेब - माणसानी कस शांत मधी जगल पाहिजे . दारू वगैरे ,व्यसन लय वाईट .बेवड्याची पदवी कशाला फुकट .

समोर बसलेली मंडळी मान डोलावत्यात .बेवडा म्हणलं की दादारामची सटकती.त्याला समजत की अण्णा आपल्यालाच बोलत्यात .

दादाराम - शान मधी जगल पाहिजे आणि बायकूनी आतून कधी लावून कोपऱ्यात घालून हाणल पाहिजे .

तसा सगळ्या घोळक्यात हशा पिकला .कारण अण्णांची बायको हौसा लय कडक लक्ष्मी .

अण्णा - दाद्या मी तुला बोलत नाही .

दादाराम - म्या तरी तुम्हाला कुठं काय म्हणतोय .म्या घेतलंय का तुमचं नाव ?

अण्णा - नाय .

दादाराम - मंग .

अण्णा शांत बसतात .सगळा घोळका मुरक्या मुरक्या हासत असत्यात .दादारामच्या एकाच डायलॉग मध्ये अण्णा शांत बसतात .

अण्णा - तू जा इथून .

दादाराम - जा मजी .

अण्णांचं दोन गाडी बाजूलाच असतात .ते त्यांना इशारा करतात की ह्याला इथून हाकला .ते गडी दादाराम कडे वळतात .पिळदार शरीर पाहून दादाराम थोडा घाबरतो .

दादाराम - जातोय . हात लावायचं काम नाय .बुक्कीत दात पाडीन .

अण्णा - हा निग.

तिथून निघून दादाराम अण्णांचे दुशमन आबासाहेबाकडे जातो .त्याला अण्णांनी हाकललं असतं त्याचा अपमान झालेला असतो .त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या मनात एक कल्पना येते .आबा हाटेलात काही मंडळींना चहा पाजत असतात .

दादाराम - राम राम आबासाहेब .

आबासाहेब - राम राम दादा . आज सकाळ सकाळ घेतली वाटतं .

दादाराम - नाही राव आबा .

तो आबाजवळ जातो आणि आ वासून बघा बरं म्हणतो .

आबाला वास नकोसा होतो आणि त्याला लांब करण्यासाठी नाही म्हणतात .

दादाराम - बरका आबा. आपल्या मनात तुमच्या इषयी लय प्रेम .पण ..

आबासाहेब - पण काय ?

दादाराम - जाऊद्या .आता काय ?

आबासाहेब दरडावून विचारतात .

आबासाहेब - दाद्या सांग काय झालं ?

दादाराम - अहो त्यो अण्णा तुमच्या इषयी काहीतरी बोलत होता .म्हणत होता .शानमधी जगलं पाहिचे नुसतं कडक कपडे घालून काय फायदा .नुसत्या गप्पा नाही मारल्या पाहिजे मोठ्या मोठ्या .

आबासाहेब - आसं होय .कुठाय तो अण्णा ?

आबासाहेब आणि त्यांचं दोन - तीन गडी आपला मोर्चा अण्णांकडे वळवतात .दादाराम ठिणगी टाकून मोकळा झाला होता . तिकडे अण्णा ही जोमात आले आबासाहेबाला पाहून .दोन गटात बघता बघता चांगलीच बाचा बाची सुरु झाली आन हाणामारीही लागली . परिस्थिती हाताबाहेर जाताच दादाराव तिथून पळ काढतात आणि घरात पोहचतात .


प्रसंग ३ : घर

दादाराम घरी पोहचतात .त्यांची बायको आशा घरात बसलेली असतें .

दादाराम - ए आशे जेवाय वाढ.

आशा - झाली का गिळायची आठवण .फक्त तेच जमत खायचं आणि मुतारा ढोसायचा .

दादाराम - मुतारा नाय अमृत हाय अमृत .

आशा - हा पिऊन अमर होणारे .

दादाराम - हाळु बोल .गावात इज्जत हाय माझी .ऐकलं कुणी .

आशा - मुडदा बशीवला त्या इज्जत देणाऱ्यांचा .

आशा एका ताटात भाजी भाकरी आणि तांब्या भरून घेऊन येते आणि दादारामच्या पुढे आदळते जोरात .

आशा - हमम गिळा.

दादाराम - हाळु .जमिनीला खड्डा पडल आणि पाणी लागलं.

आशा - हमम .

दादाराम - एवढं काय झालं .जेवू का नगो मग .

आशा - काय नाय गिळा .

दादाराम - काय झालं ? माझी राणी रुसली वाटतं .

आशा - हा दारू पिल्यावरच राणी वाटते व्हय मी .

दादाराम - आगं तसं नाय .पण काय झालं ?

आशा - घरात भाजीला काय नाय ? धान्य संपत आलय लक्षच नाही घरात .नुसती आपली दारू ढोसायची .

दादाराम - तू यादी कर काय काय लागतंय ती .

आशा - हा . आन त्याला पैसं कुठून आणायचं ?

दादाराम - लय पैशेत आपल्याकडं .

आशा - काय दरोडा टाकला का काय कुठं ?

दादाराम - जास्त बोलू नगो .सांगितलं तेवढं कर .

आशा - हमम .

दादाराम - तुला सोन्यानी मढवीन एवढा पैसा हाय .

आशा - मला सोन्यानी मढवणार आणि खाणार काय माती .

दादाराम - तुला तर कशाचचं कौतुक नाय .

आशा - हमम .काय बघावं आता मोठा पराक्रम गाजवून आलायत ना .म्हण कौतुकच नाय .

..

दादारामला आठवतं की पराक्रमच गाजवलाय अण्णांची आज चांगलीच जिरवली .मुकाट्यानं जेऊन घेतो आणि तिथंच आडवा होतो .



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy