shubham gawade Jadhav

Abstract Tragedy

3.5  

shubham gawade Jadhav

Abstract Tragedy

खरच... माणुसकी हरवली आहे

खरच... माणुसकी हरवली आहे

3 mins
406


माणुसकीच्या शत्रुसंगे

युद्ध आमुचे सुरू

जिंकू किंवा मरू


लढतिल सैनिक, लढू नागरिक

लढतिल महिला, लढतिल बालक

शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू


देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा

शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू


शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर

मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू


हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर

अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू


                  .... ग. दि. माडगूळकर

                  

  ही कविता वाचली की मन अगदी भारावून जात.अंगावरती शहारे उभा राहतात मन अगदी घट्ट होत आणि वाटत कितीही मोठ संकट आलं तरी सहज सामना करू शकतो.... पण अचानक मनात विचार येतो अरे!! पण ती तर हरवली आहे. जिच्या जोरावर माणसामाणसांमध्ये एकी निर्माण होते आणि एक घट्ट समाज तयार होतो.तीच जर नसेल तर समाज कसा तयार होईल आणि मग आपण लढणार कसे?? मन अगदी सुन्न होऊन जात. डोळे मिटल्यानंतर जो भयाण गिळून टाकणारा अंधार होतो तसं काहीस जाणवत.

              मग ती म्हणजे नक्की कोण? तिचा उपयोग काय? खरच ती गरजेची आहे का? ती म्हणजे माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा.

              एवढ्या असंख्य माणसांच्या गर्दीत चार अक्षरी शब्द आता लोप पावत चालला आहे. माणूस माणसाला ओळखत नाही. हे तर खूप दूरच उदाहरण आहे सख्या भावाला भाऊ ओळखेनासा झालाय. राक्षसी प्रवृत्ती वाढत चालली आहे. कुठे बलात्कार होताहेत, चोऱ्या, स्फोट, आतंकवादी हल्ले, खून, दरोडे, जाळपोळ असे कित्येक प्रकार रोज घडत आहेत. विश्वशांती पसरवाण्याचं ध्येय आपल कधीच पूर्ण होणार नाही कारण आपल्याच देशात रोज अगणित निंदनीय प्रकार घडत आहेत. याला आळा का बसत नाही?, कोण?, कुठे? आणि का? चुकत आहे. नेमकं काय कमी पडत आहे? याला जबाबदार कोण?, का? संपत चालला आहे एकमेकांमधला जिव्हाळा.

बलात्कारासारखे क्रूर कृत्य करायला का? प्रवृत्त होतोय. दिवसा ढवळ्या वार करत आहेत. एवढे क्रूर तर आपल्या दंत कथेतले, पुराणकथेतले राक्षसही नव्हते.

       कवितेच्या पहिल्या कडव्यात ग. दि. माडगूळकर म्हणतात, "माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु जिंकू किंवा मरू" पण इथे माणुसकीचे शत्रू आपणच आपले होत आहोत. स्वार्थ, तिरस्कार,कपटीपणा, लोभ हे शत्रू मारायला हवेत तर याउलट आपण आपल्यातला माणूस मारत आहोत.

आपण जिंकणार नाहीच कारण युद्ध विरोधकांसोबत होण्याऐवजी स्वतःसोबतच होत आहे मग आपण जिंकणारच कसे.

       माणुसकी हरावी आहे. खरच हरवली.कारण माणूसाच्या अपेक्षा खूप आहेत. अपेक्षा वाढताहेत म्हणून माणूस धावपळ जास्त करत आहे आणि त्यात माणुसकीच्या रोपट्याला पाणी घालायचं तो विसरत आहे. यात नुकसान स्वतःचच आहे.कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, स्वतःला वेळ देऊ शकत नाही परिणामी तो चिडचिडा आणि रागीट होत चालला आहे.त्याची मानसिकता अधिकच बिघडत चालली आहे. तो एक चालता फिरता स्फ़ोटक बनत आहे. यातूनच तो न्यूनगंडात ( depression ) जात आहेत. व्यसनाधीन होत आहे.

 प्रवृत्ती क्रूर होत चालली आहे. प्रेमाने कोणाशी वागत नाही.

      कोणी कोणाला विचारायलाच तयार नाही. एकमेकांवर चिडणं, थोडं भांडण झालं की वार करणं, चोऱ्या करण, आपल्या काम वासनेसाठी निष्पाप आया-बहिणींची इज्जत घेणं, विस्फोट घडवून आणन, निरपराध लोकांचा बळी घेणं, जात-धर्म यावरून भांडत राहण किती किती क्रूर वागणारेत आणखी.काय? निष्पन्न यातून नक्की. आपल्या पुढच्या पिढीला काय आदर्श देतोय आपण.

    नक्की माणुसकी म्हणजे काय? ती जोपासायची म्हणजे काय करायचं? त्याचा नक्की अर्थ काय होतो? जर समोरच्याची परिस्थिती पाहूनही आपल्याला दया येत नसलं तर समजून जायचं आपल्यातली माणुसकी मेली आहे. आपण एवढे पाषाणहृदयी केव्हापासून झालो. माणूस हा एकमेव प्राणी आहे जो वस्ती करून राहतो ज्याला आपण समाज असं म्हणतो. मग त्यात आपण एकोप्याने राहतो, गुण्यागोविंदाने नांदतो, सांग - उत्सव साजरे करतो, कोणाला काही मदत लागली तर सढळ हाताने मदत करतो, एकमेकांच्या सुख - दुःखात सहभागी होतो,काळजी घेतो,एक नातं आपल्यात निर्माण होत आपुलकीच प्रेमाच जे एकमेकांना जात, धर्म विसरून हृदयाशी जोडत ते म्हणजे माणुसकी.हीच माणुसकी हरवली आहे.

    बोलणं, विचारपूस करण, गरजूना मदत करणं,स्वतःचा आनंद शोधणे,रागावर नियंत्रण ठेवणे,स्त्रियांचा आदर करणे, मोठ्यांचा मान राखणे,व्यसनाधीन न होणं, प्रगतीच्या गोष्टी शोधण या साऱ्या गोष्टी लहानपणापासून शिकवायला हव्यात म्हणजे माणुसकीच रोपटं हळूहळू त्या बालमनात मनात रुजेल. संस्काराचे बाळकडू द्यावे लागतील.म्हणजे माणुसकी टीकायाला मदत होईल.

    जर आपण लोप पावत चाललेल्या माणुसकीला रोखण्यास आयशस्वी झालो तर आपल्याला खूप क्रूर लोक तयार झालेली दिसतील. राक्षसी प्रवृत्तीचे, विध्वंसक. जे आताही कुठेतरी दिसतात. त्यांना कुठेतरी चाप लावायला हवा...... नाहीतर या पृथ्वी तलावरून माणूस नावाचा प्राणी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract