shubham gawade Jadhav

Romance

4.0  

shubham gawade Jadhav

Romance

लग्न

लग्न

1 min
411


तो - आपण लग्न करूयात का?

ती - अरे काय झालं तुला अचानक? तुझ्या तोंडून असा प्रश्न .. आणि लग्न म्हणजे तुला चेष्टा वाटली का?

तो - मी तुला खरं विचारतोय आणि चेष्ट्येचा काय प्रश्न?

ती - एवढा सिरिअस झालास म्हणून विचारलं.

तो - का मी सिरिअस गोष्टी बोलू शकत नाही का?

ती - अरे तसं नाही रे बाबा.. पण लग्न..??

तो - अरे आपल्याला समाजाच्या साक्षीने आणि मानपाणाने लग्न करायचं आहे.

ती - अरे हो पण....

तो - पण काय? मी तुला आवडत नाही का?

ती - तसं नाही रे काही. मला तू सोडून कोणीच नकोय.

तो - मग अडतंय कुठे

ती - अरे आयुष्यभराचा प्रश्न आहे हा. एवढ्या घाईत घेऊन जमेल का?

तो - आयुष्यभरचा प्रश्नय म्हणूनच विचारतोय.

मला आयुष्यात प्रत्येक क्षणी माझ्या सुखात, दुःखात आणि प्रत्येक पाऊल टाकताना सोबत असणारी जोडीदारीन हवीये.

ती - हो का?

तो - आयुष्यात तू भेटली म्हणजे काहीच कमी नाही मला. मला माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटेल.

ती - आई बाबांशी बोलला का तू हे

तो - हो म्हणजे बोलणारच आहे.

ती - ते होकार देतील

तो - का नाही?

ती - बघ हा आयुष्यात अर्ध्यावर टाकून तर नाही ना जाणार.

तो - श्वासात श्वास असेपर्यंत तू माझीच राहशील.

दोघेही खळखळून हसतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance