shubham gawade Jadhav

Comedy Drama

4.0  

shubham gawade Jadhav

Comedy Drama

तू नवरा मी बायको

तू नवरा मी बायको

5 mins
1.0K


      नवरा बायकोची भांडणं कुठं नसतात . जगात असा कोणतच घर नाही की जिथे नवरा बायकोची भांडणं होत नाहीत . काही वेळेस ही लवकर मिटतात तर काही वेळेस अगदी शेवटच्या टोकापर्यंत जातात . मग शेवटी काडीमोडचा पर्याय निवडतात . काहींची लटकीच भांडणं असतात म्हणजे मजेशीर . रागराग तर खूप करतात एकमेकांचा पण त्यामाघे त्यांचं प्रेम दडलेलं असतं . त्यांना थोडावेळ सुद्धा दुरावा सहन होत नाही आणि भांडणं केल्याशिवायही करमत नाही . आपण अशाच एका जोडप्याची नाट्यरूपी कथा पाहणार आहोत .


शामराव भाजीपाला घेऊन दाराची बेल वाजवतात पण त्यांची पत्नी शीतल काही लवकर दरवाजा उघडत नाही कारण ती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागलेली असतें . शामराव भाजीपाल्याच्या ओझ्याने ताठून गेलेले असतात त्यामुळे जोरजोरात बेल वाजवतात .

आतून आवाज येतो , आले आले कोणय मेल थोडासा सुद्धा दम निघत नाही . शीतल येऊन दरवाजा उघडते .


शामराव - काय करत होतीस ? किती वेळच झालं मी बेल वाजवत आहे ते .

शीतल कोचकपणे बोलते .

शीतल - तुम्ही टांगलेला तो झोपाळा आहे ना त्यावर बसून झोका झोका खेळत होते .

शामराव - हो का . मग झाला असला खेळून तर घे ह्या पिशव्या .

शीतल - एक दिवस काम सांगितलं की लगेच जणू एखादा मोठा डोंगर उचलून आणल्यासारखं करायचं आणि आम्ही मेल त्या बैलासारखं वर्षाचे ३६५ दिवस राबायचं . निदान त्या बैलाला तरी बैलपोळ्याला सुट्टी भेटते .

शामराव - हो सगळी काम तुम्हीच करता आणि आम्ही आयतं बसून खातो .

शीतल - मग नाही तर काय .

शीतल अस्पष्ट हळू आवाजात बोलते पण ते शामरावांना ऐकू जातच.

शामराव - होय का ? आज जरा जास्तच पारा चढलाय .

शीतल - हे घ्या पाणी .

शामराव - हे बघ तुझ्यासाठी काय आणलय .

शामराव लाडात येत खिशातला गजरा काढून शीतलच्या समोर धरतात . शीतल जास्त काम पडल्याने आणखीनही रागातच असते. ती खोचकपणे बोलते.

शीतल - अरे वा . मला तर वाटलं की सोन्याची चैनच आणली माझ्यासाठी .

शामराव ह्या उत्तराने खूप चिडतात कारण शीतलच्या तशा वागण्याने त्यांचा नकळत अपमान झालेला असतो . शीतलला त्यांना फक्त चिडीला लावायचं होतं पण शामराव जास्तच चिडतात .

शामराव - हा तुझ्या बापाने माझ्या नावावर १० कोटी टाकल्यात ना .

शामरावांनी केलेला बापाचा उद्धार ऐकून आता तीही रागे चढती . साडीचा पदर कमरेत खोवत ती शीत युद्धाचं रणशिंग फुंकते .

शीतल - बाप कोणाचा काढता ?

शामराव - कोणाचा काय कोणाचा ? तुझा .

शीतल - हो . तुमचे गेले वर म्हणून आमच्यांच्या हातपाय धुवून पाठीमाघे लागलात का ?

शामराव - हा मग. मी सोन्याची साखळी कुठून आणणार .

आमच्या बापाने काय पैशाचं झाड नव्हतं लावलं . गेलं झाड हलवलं आणि आणले पैसे गोळा करून .

शीतल - बाई . मेलीच नशीबच फुटकं . तुमच्यासारखा माणूस पदरात पडला .

शामराव - हो का ? नाहीतर काय तुला राकेश रोशनच भेटला असता .

शीतल - तो नाही पण निदान तुमच्यापेक्षा तर नक्कीच चांगला भेटला असता .

शामराव - नशीबवान आहेस की मी भेटलो . नाहीतर तुझ्यासारखा हिटलर सांभाळणं कोणाला जमलं असतं .

शीतल - मी हिटलर होय . स्वतःला बघा आरशात . पोट गरोदर बाईसारखं , डोक्याचा अर्धा चंद्र . म्हणे हिटलर

शामराव - कष्ट करतोय फुकट नाही . आणि तुझ्यासारखं थोडीच २४ तसं आरश्यात बघायचं काम आहे मला .

कावळ्याला संतूर साबणाने जरी अंघोळ घातली तरी तो काळाच राहणार .

शीतलचा पारा आता आणखीच वर चढतो कारण रामराव तिला कावळा म्हणाले होते .

शीतल - मला कावळा म्हणालात ? कावळा .

शामराव - आगं बाई मी उदाहरण दिल .

शीतल - नाहीतर माझी आई म्हणालीच होती तुझा नवरा खूप झापाय . खाली मुंडी आणि पाताळ धुंडीये .

शामराव - हो तुझी आई ज्योतिषी आहे तिला सगळं कळत . तासंतास पोरीला फोन करायचे आणि माझ्याबद्दल कान भरायचे . तरी म्हणलं एवढं बिल कसकाय येतंय .

शीतल - माझं नशीबच खराब असला धोंडा माझ्या गळ्यात पडला .

शामराव - मी म्हणून सांभाळलं तुला . नाही तर काही खरं नव्हतं .

शीतल - आई नको म्हणत होती पण ऐकलं नाही त्यावेळी .

शामराव - ऐकलं असतं तर मी सुटलो असतो .

शीतल - हो ना .

शामराव - घरी मरणाचं काम करत होतीस आणि हितच काय होतय तुला ?

शीतल - हो गप्प बसा .

शामराव - हुकूम नाही द्यायचा . हे माझं घर आहे .

शीतल - जाते सोडून मग .म्हणजे तुमच्याही मनाची समाधानी होईल .

शामराव रागारागाने जा बोलतात . त्यांना वाटतं कशाची जातेय पण वातावरण खूप पेटलेल होतं हे त्यांच्या लक्षातच येत नाही .शीतल रागारागाने आत जाते आणि बॅग भरायला घेते .शामराव हे वातावरण पाहून तिथून पळ काढतात आणि बाहेर निघून जातात .शीतल बॅगा घेऊन बाहेर येते .

शीतल - निघाले मी .बसा आता एकटेच .

ती शामरावांना इकडे तिकडे शोधते आणि हॉल मधल्या सोफ्यावरती बसते .बराच वेळ होतो पण शामराव काही परत येत नाहीत मग ती बॅगा पुन्हा आत ठेवते आणि सोफ्यावर बसून राहते .तीला तशीच झोप लागून जाते . बऱ्याच वेळाने बेल वाजते आणि तिची झोप मोडते ती पटकन जाऊन दरवाजा उघडते. समोर शामराव असतात . तिच्या चेहऱ्यावर खोटा राग अजून असतोच .

शामराव मस्करीने

शामराव - आणखी इथेच .गेली नाही ?

शीतल एक जळजळीत कटाक्ष शामरावांवर टाकते .

शीतल - बॅगा आणखी भारलेल्याच आहेत .

शामराव - मस्करी केली ग . बरं तू बस मी तुझ्यासाठी मस्त चहा बनवतो .

शीतल - नका लाडीगोडी लावू .मला जायचंय माहेरी .

शामराव - चहा पिऊन जा . वाटलस तर मी सोडवायला येतो ना .

एवढं बोलून ते गालातल्या गालात गोड हसतात .

शीतल थोडी नरम होते आणि सोफ्यावर बसते .

शामराव - ए शीतल आजच जेवणही मीच बनवतो .तू मस्त अराम कर . थकली असशील .

शीतल - तब्बीयेत बरीये ना तुमची ?

शामराव - मला काय धाड भरली ?

शीतल - नाही आज माझ्यासाठी जेवण ,चहा .

शामराव - चुकलं ग मघाशी माझं . तुम्ही एवढं काम करता आणि आम्हाला एक दिवस करायचं जीवावर येत .

आज तू आराम कर मी करतो सगळं .

शीतल मस्त एक गोड स्माईल देते .शामराव मस्त चहा बनवतात .दोघे मिळून चहा पितात मग जेवणही शामरावचं बनवतात .

शीतल - वा .मस्त झाल होतं जेवण .

शामराव - मग .

शीतल - चला केसांची मालिश करा आता

असं म्हणून ती हसते .

शामराव - हे म्हणजे असं झालं .भटाला दिल ओसरी आणि भट हळूहळू पाय पसरी .

असं म्हणताच दोघेही हसतात .

शीतल - मग .

शामराव - आत्ताच वातावरण असं झालाय तू नवरा आणि मी बायको.

असं म्हणताच दोघेही दिलखुलास हसतात आणि तिथेच त्यांच्या शीतयुद्धाचा शेवट होतो .


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy