STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Others

3  

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Others

बुक (पुस्तकं)

बुक (पुस्तकं)

1 min
143

बा माझा मला ओरडून सांगायचा

जरा चार बुक शिकून घी

येळ हाय तुह्याकडं लय अजून

आयुष्य सवताच सावरून घी


शिकलो नाही तवा आम्ही म्हणून बघ 

कष्ट आमच्या पाचवीला पूजल

आली आसती चार बुक तर

आमचं आयुष्य आस नसतं झीजल


बुकामधीच सगळ्या आयुष्याच

लय मोठं ज्ञान हाय

लक्षात ठेव त्याशिव

समाजात कुणालाबी किंमत न्हाय


शिकला सवारला म्हंजी

घरा दाराला पुढ घिऊन जाशील

सवताची स्वप्न तू

दिमाखात पूर्ण करशील


नाही शिकला आता तर

तयारी ठेव काबाड कष्टाची

तवा मग तुला हुईल जाणीव

बघ चार बुक न शिकल्याची 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy