shubham gawade Jadhav

Romance

1.8  

shubham gawade Jadhav

Romance

माया आणि प्रतिक (नाटक)

माया आणि प्रतिक (नाटक)

2 mins
155


माया - प्रतिक सांग ना मी तुला आवडते का रे?

प्रतिक - हा काय प्रश्न झाला का?

माया - सांग ना.. प्लीज

प्रतिक - अचानक तुझ्या मनात हे काय भलताच घुसलंय

माया - सांगतोस का आता

प्रतिक - ए आदिमाया थांब सांगतो

माया - म्हणजे मी आवडते की नाही याचा विचार करत बसणारे आणि मग उत्तर देणारेस का?

प्रतिक - अरे

माया - मला नाही बोलायचं तुझ्याशी जां

प्रतिक - हे डिअर

असं कुठे असतं का? अचानक प्रश्न विचारायचा आणि उत्तरही लगेच माघायचं. हे काय कौन बनेगा करोडपतीचा खेळ आहे का? खाली चार ऑपशन्स चॉईस करा यासारख.

  (माया नाक मुरडते )

 प्रतिक - तुम्हा मुलींचं हे खूप अवघड आहे बाबा. लहान लहान गोष्टीवर रुसून बसता.

 आपल्या हाताने तिची हनुवती पकडीने स्वतःकडे करत.

 अगं आयुष्य कितीही आनंदाने भरलं तरी आपलं असं कोणी नसल की ते रिकामच भासत.

 माया - म्हणजे

 प्रतिक हातातलं गुलाबाचं फुल घेऊन.....

 हे बघू या फुलाचा रंग बघू किती छान आहे ना

माया - हो बघ ना आणि किती सुंदर दिसत आहे हे.

प्रतिक - जर याला रंगच नसता तर

माया - तर काय याला कोणी फुलांचा राजा म्हणालं असतं का? गुलाब विदाऊट रंग कल्पनाच करू शकत नाही मी.

प्रतिक - हो ना

माया - हो

प्रतिक - मग माझ्या आयुष्याचही अगदी तसच आहे

माया - म्हणजे

प्रतिक - म्हणजे. माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय चवच नाही. मी तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारच करू शकत नाही.... तू माझं हार्ट बीट आहेस. तुझ्याशिवाय ते काय कामाचं.

माया - खरं??

प्रतिक - अगदी खरं (तिझ्या डोक्याला लाडीकपणे टक्कर देत )

चंद्र एकटाच आकाशात चमकत राहिला तर सुंदर दिसत नाही आकाश रिकामच वाटत पण तो जेव्हा खूप साऱ्या टीमटीमणाऱ्या चांदण्यांसोबत आकाशात असतो तेव्हा आकाश भरून जात आणि सुंदर दिसत.

माया - हो..

समजलं माझ्या राज्या

आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात प्रेमानं पाहून गोड हसतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance