कोर्टातली भांडणं..
कोर्टातली भांडणं..
आजकाल कोर्टात पती विरुध्द पत्नी हिच भांडणं दिसत आहेत...तिला एक दोन लेकरं जरी असले तरी भाडण कोर्टात... लग्न होऊन चार दोन वर्ष संसार झाला तरी भांडणं कोर्टात...एवढच नाही नवरा मोठा नौकरदार असू द्या,डाँक्टर,वकिल,प्राध्यापक,शिक्षक...कोणी आधिकारी असो...भांडण मात्र कोर्टात... कारण...बायकांचे कायदे...कौटुंबिक हिंसाचार...पोटगी...
मला वाटतय, आजच्या सारखे बायकांचे लाड कधी झालेच नसतील...कोणताच नवरा स्वतःसाठी काही करत नाही...त्याला वाटतं,आपल्या आई वडिलांच, नी बायको पोरांच प्रत्येक स्वप्न पूर्ण करावं...त्यासाठी वाट्टेल ते करावं... माणूस लग्न करतो तो,बायको हवी म्हणुन,त्याची खूप स्वप्न असतात... संसार सुखान करावं...बायको,लेकरांना सुखात ठेवावं....दोघांनी मिळून खूप मौजमजा, मस्ती करावं आनंदानं अगदी वेडं व्हावं, नाचावं, बागडावं, आनंदीआनंद असावा....पण घडतं ते वाईटच...
मुळात बायकांची अनपेक्षित अपेक्षा....घरचे कुठले काम नको...कुटुंबात नवऱ्याशिवाय दुसरं कोणी नको कुणाची सेवा, ऊठबस, खाऊपिऊ घालणे, धुणीभांडी, सारवनी, स्वयंपाक या भानगडी नको...नवऱ्याने पुरवावे फक्त लाड.....निघाला शब्द तो प्रमाण माणावा....पाहिजे ते, मागेल ते, हवे तेव्हा सर्व मिळावे.... हिडणं, फिरणं, खाणं, पहाणं, खरेदी, हाँटेल, पिक्चर, साड्या, दागिने, बंगला, गाडी, चाकर, सर्व पुरवेल तो नवरा....
आई बाप, भाऊ, बहिन,ह्याचा पुळका नवऱ्यानं करु नये...कुणाचे बोलणे, दडपण, घुसमट, बंधन, ना असु नये. आपल्या सर्वात सुखी मैत्रिणीपेक्षा आपण सुखी हवं. सुख म्हणजे काम नको, कष्ट नको, पैसा आणि स्वातंत्र्य यात तीळमात्र तडजोड नको. पाहिजे ते साडी, दागिने, सर्व अगदी मनासारखंच हवं... सहनशीलता, आदरभाव, मानमरातब, क्ष भाषाच नको होते, कुणाची मर्जी राखणे यासारखे मोठे दुःख नाही.....असा भाव..
नवऱ्याचा अनादर, सासरची अनास्था, माहेरचा पुळका, आईवडिलांचं अमर्याद प्रेम, संयम, समज न देनं, असं आहे का... आपण कुठं कमी आहेत.. राहा इथं... तुला काही कमी पडू देणार नाही... बघू त्याची, दाखवू त्याला, अशी नवऱ्या, जावयाबद्दलची भाषा... समज न देणं आणि शिकवण न देणं... लग्नाआधी, लग्नानंतरचे वाईट संबंध, गैरवर्तन, व्याभिचारीपणा या गोष्टीमुळे संसाराचे किती जरी वाटोळे झाले तरी पर्वाच नाही...
दोन चार लेकरं होऊनही बायका नांदत नाहीत ह्याला काय म्हणावं... छळ, जाच, त्रास ह्या गोष्टी फारशा नाहीत... तेवढा अमानुषपणा नाही राहिला... पण.. नवऱ्याची गरज नसेल तर... ती एक वेगळी नशा असते. त्यापुढं सर्व सर्व व्यर्थ...ना नवरा...ना लेकरं.. ना लेकरं...फक्त फक्त सहवास, वासना, नि भूक....देहाची...मग सर्व वाटोळं झालं तरी चालेल....
या वृत्तीमुळे अनेक नवऱ्यांचे प्रियकरांकडून खचन केले गेले....अनेक लेकरं आई बापाविना निष्पाप बळी गेले, वाटोळे झाले...कोर्टाच्या चकरा मारत...नशिबाला दोष देत....लाखोची पोटगी भरत पोलिस, कोर्ट याच्या चक्रात नाहक अडकलेल्या निष्पाप नवरोबांचा विनाकारण बळी जातोय...व्यर्थ जीवन होतय. त्याला ना कोणी वाली...ना कोणता न्याय...बर्बादी दोघांचीही...पण..पण...विनाकारण...
ज्याची काहीच चीक नाही त्याच्याही जीवनाचं असं वाटोळं का व्हावं... नांदणारी बाई वाटोळं होऊ देत नाही... न नांदणारी पाया पडूनही नांदत नाही. वाटोळं होतंय त्याचं काय? प्रश्न प्रश्नच आहे... शेवटी प्रश्नच...
या प्रश्नात अडकलेल्या, सापडलेल्या तो, ती आणि त्याच्यापोटी जन्मलेल्या निष्पापांना दुःख नि दुःखच....दुःख नि दुःखच...🙏🙏🙏🙏🙏
