STORYMIRROR

Pradip Warade

Crime Thriller

3.9  

Pradip Warade

Crime Thriller

खुनी कोण?

खुनी कोण?

16 mins
2.9K


राहुल लहानपणापासूनच हुशार होता. कदाचित परिस्थितीने त्याला ते शहाणपण मिळालेलं असावं. अवघा तीन वर्षाचा असतानाच आई-वडील अपघातामध्ये गेले होते,तेव्हा शेजारच्या चाचानीच त्याचा सांभाळ केला होता. रोज चाचा सोबत राहून त्यालाही कुराण ऐकण्याची सवय झाली मस्जिदमध्ये जाणे, सर्वांना सलाम करणे ही कामे त्याच्या दैनंदिन यादीमध्ये होती. शिक्षणात मात्र त्याला तोड नव्हती एकदा एखादी गोष्ट वाचली किंवा ऐकली की त्याला ती अगदी परफेक्ट लक्षात रहात असे. यामुळेच दहावीला त्याला 98 टक्के मार्क मिळाले. चाचानी सांगितलं, 'आता पुढील शिक्षणासाठी मात्र तुला तुझी शक्ती पणाला लावावी लागेल आता काम करून शिकावे लागेल कारण पुढचा खर्च माझ्या ऐपतीच्या बाहेर आहे.' मग त्यांच्याच ओळखीने एका गॅरेजवर राहुलला कामासाठी रुजू केलं. 

राहुल सकाळी बारा वाजेपर्यंत कॉलेज करून दुपारी बारा ते रात्री दहा वाजेपर्यंत गॅरेजवर थांबायचा. या बदल्यात त्याला राहणं आणि दोन वेळचं जेवण सोबतच दरमहा दीड हजार रुपये वेगळे मिळत होते.दोन वर्ष खडतर मेहनत करून त्याने बारावीमध्ये देखील 85 टक्के मार्क मिळवले. आता पुढे काय करायचे? यासाठी तो देशपांडे सरांकडे गेला.त्यांनी त्याला कमी खर्चात चांगला स्कोप असणारे करियर सुचवलं. त्यानुसार त्याने देवगिरी कॉलेजमध्ये बीएससी ला ऍडमिशन घेऊन आता चांगला अभ्यास करायचा असं ठरवलं. कॉलेज चालू असताना त्याला पैशाची गरज भासू लागली म्हणून त्याने ठरवलं एखादा पार्ट टाइम जॉब शोधावा. अशातच एका खाजगी क्लासेस मध्ये Biology शिकवण्यासाठी त्याला बोलविण्यात आले शिकवण्याचा त्याचा विचार नव्हता परंतु बायोलॉजी आवडीचा विषय आणि म्हणून त्याने हा जॉब करायचं ठरवलं. ज्यासाठी त्याला एका तासासाठी तीनशे रुपये मिळणार होते.


राहुल पूर्वीपासूनच कामात खूप प्रामाणिक होता आणि म्हणूनच त्याने ठरवलं विद्यार्थ्यांना अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यायची त्यासाठी त्यानी अजून अभ्यास करायला सुरुवात केली. 'मानवी मेंदू' हा त्याचा सगळ्यात आवडीचा भाग आणि जेव्हा तो हे शिकवायचा सर्व विद्यार्थी ते ऐकताना मग्न होऊन जायचे. हळूहळू राहुल मध्ये आता एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला होता. तो रोज नवनवीन गोष्टी शिकू लागला, ऑनलाइन ब्लॉग, वेबसाईट यांच्या माध्यमातून तो बायोलॉजी बद्दल वाचायला लागला, ऑनलाईन डिस्कशन करू लागला. त्याची इच्छाशक्ती आणि जिज्ञासा याच्या जोरावर त्याने क्लासमध्ये देखील चांगले नाव कमावले.

ऑनलाईन डिस्कशन करत असताना त्याची ओळख बऱ्याच फॉरेनर्स सोबत झाली होती त्यातीलच एक होते "अँड्र्यू न्यूबर्ग" जे त्यांच्या Neotheological प्रॅक्टिसेस साठी जगात फेमस होते ज्या माध्यमातून ते ब्रेन आणि religion किंवा spirituality यांचा समन्वय साधत होते राहुल आणि त्यांच्यामध्ये बरेचसे ऑनलाईन डिबेट झाले ज्यामध्ये अँड्र्यू ला राहुलने प्रभावित केले होते म्हणूनच त्यांनी राहुल ला सांगितलं कि "तू शिकण्यासाठी अमेरिकेला ये इकडे युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया मध्ये न्यूरो सायन्स साठी खूप स्कोप आहे आणि तुझ्या सारख्या लोकांची गरज आहे.जो काही खर्च होईल ते आपण बघून घेऊ तुझी फक्त तयारी दाखव आणि डिसीजन घ्यायची घाई नाही एक महिना वेळ घे आणि मग मला सांग." ते ऐकल्यानंतर राहुल विचार करू लागला शिकायचं तर आहेच, पण तिकडे आपल्या ओळखीचे कोणी नाही, तसेही म्हणा इकडे तरी आपल्याला कोण होतं! असा विचार करुन तो जाण्यासाठी तयार झाला..


खरे पाहता अँड्र्यूदेखील एखाद्या चाणाक्ष बुद्धीचा शोधात होता. त्यातच राहुलचा स्पष्टवक्तेपणा त्याला आवडला होता आणि कमी वयात त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने तो प्रभावित झाला होता. आज तब्बल एक महिन्याने राहुल त्याच्या कर्मभूमीत पोहोचला. अँड्र्यू त्याला एअरपोर्टला घ्यायला पोहोचला मग त्याने राहुलला आपल्या घरी नेले आणि सांगितले जरा रेस्ट कर थकला असशील उद्या सकाळी आपण बोलू...असं सांगून निघून गेला राहुल ला ती जागा खूप आवडली वातावरणही खूप छान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अँड्र्यूने त्याला ब्रेकफास्टसाठी बोलावले आणि तिथे पुढचे प्लॅनिंग काय असेल त्याबद्दल कल्पना दिली, 

"राहुल तू माझ्यासाठी काही दिवस असिस्टंट म्हणून काम करशील आणि सोबतच आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुझा ऍडमिशनदेखील मी करून देतो आणि तुझं इंटरेस्ट बघून आपण ठरवू या मधलं नेमकं कोणतं करिअर तुझ्यासाठी निवडावे जसं की तुझं वय सत्तावीस आहे तूझ्या हातामध्ये खूप सार्‍या संधी असतील या सर्व कामासाठी तुला माझ्याकडून काही स्टायपेंडदेखील मिळेल सोबतच राहणे आणि खाण्याची सुद्धा व्यवस्था होईल तू मात्र मन लावून काम व्यवस्थित कर. जमेल ना? हे तुला ठीक वाटते ना? असं विचारताच राहुल ने उत्तर दिलं, 'हे तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे पण मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाल नाही या कामासाठी मीच का? ' जरा वेळ थांबून अँड्र्यू ने उत्तर दिलं तुझ्या बोलण्यातला स्पार्क मला खूप आवडला आणि अध्यात्म बद्दल तुझे विचार सर्व लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत आणि स्वतंत्र आहेत म्हणून तू.राहुल ला स्वतःचं कौतुक ऐकून खूप छान वाटलं असही आतापर्यंत त्याच्या पाठीवर थाप टाकणारे कुणीही नव्हतं. त्याने देवाला याबद्दल धन्यवाद दिले. दुसऱ्या दिवशीपासून राहुल ने कामाला सुरुवात केली तो सगळ निरीक्षण करत होता- युनिव्हर्सिटीचा कॅम्पस राहुल ला स्वतःचं कौतुक ऐकून खूप छान वाटलं असही आतापर्यंत त्याच्या पाठीवर थाप टाकणारे कुणीही त्याने देवाला याबद्दल धन्यवाद दिले दुसऱ्या दिवशीपासून राहूनही कामाला सुरुवात केली तो सगळा निरीक्षण करत होता युनिव्हर्सिटीचा कॅम्पस अँड्र्यू सर कुठे बसतात, तिथे काम काय काय असतात याबद्दल सगळ निरीक्षण केलं त्याला बघून अँड्र्यूला आपल्या निवडीबद्दल अभिमान वाटत होता. दोघांच्यात खूप चर्चा रंगत असे राहुल वयाने लहान असला तरी अँड्र्यू सरांनी त्याच्या मेंदूचं वय हे 40 ते 45 वर्षापर्यंतच असावं असं सांगितलं होतं.


आता मागील तीन वर्षांनंतर खूप काही बदललं होतं राहुलच शिक्षण पूर्ण झालं होतं अँड्रूनेदेखील पीएचडी पूर्ण केलं होतं आणि जगातील पहिल्या पंधरा रिसर्चर्सच्या यादीमध्ये प्रस्थापित केलं होतं. राहुलदेखील त्याच दिशेने पावले टाकत होता पण आता मात्र राहुल आणि अँड्र्यू यांच्या बेसिक प्रिंसिपल्समध्ये फरक व्हायला लागला. अँड्रूच्या म्हणण्यानुसार 'आपण स्पेशालिस्ट असायला हवं म्हणजे जगात नावलौकिक मिळतो' पण राहुल म्हणायचा आपण Generalist असावं म्हणजे आपलं नॉलेज समाजाला उपयुक्त ठरेल नाहीतर शिक्षण काय फक्त नाव कमावण्यासाठी घ्यायचं? इथूनच राहुलचा एक नवा प्रवास सुरू झाला. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यामध्ये त्याला चांगलं यश मिळालं आता जगातील पहिल्या पाच शास्त्रज्ञांमध्ये त्याचा उल्लेख केला जाऊ लागला. एवढं असूनही राहुलचे पाय अजूनही जमिनीवर होते. "फार कठीण असतं- यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचून सुद्धा जमिनीची ओढ उराशी बाळगून ठेवणं."


अशातच राहुलची ओळख मिशेलसोबत झाली होती. तीदेखील तशीच हुषार आणि neuro scientist होती. या नात्याला मिशेलच्या वडिलांचीदेखील परवानगी मिळाली आणि या जोडीचा सुखी असा संसार सुरू झाला. मिशेलचा स्वभाव थोडा रागीट होता. त्याला कंट्रोल करण्यासाठी एकच औषध ते म्हणजे राहुल तसं राहुलने काही गोळ्या वगैरे त्यासाठी दिलेल्या होत्या. त्यामुळे तात्पुरता रागावर तीला कंट्रोल करायला सोपे जाई. दोघेही चांगले कमवायचे आणि सोशल सर्विससुद्धा करायचे. त्यांच्या लग्नाला आता दिड वर्ष झालं अशातच राहुलला एक गोड बातमी ऐकायला मिळाली त्यांच्या घरी एक नवा पाहुणा येणार होता दोघांनीही खूप तयारी केली होती बरीच स्वप्ने रंगवली होती त्याला किंवा तिला असं घडवायचं की आपल्यासारखे जगामध्ये त्यांनी नाव करावं.


"माणूस किती स्वप्नरंजन करतो स्वप्नांची चाहूल लागली की मग तो त्यावर हळू हळू स्वप्नांची इमारत बांधू लागतो आणि मग त्या बांधलेल्या इमारतीच त्यालाच कौतुक वाटायला लागत आणि अचानक वास्तवात काही तरी वेगळं घडतं ज्यामुळे ती काल्पनिक इमारत धुळीस मिळते"

अगदी तसंच काहीस राहुलच्या बाबतीत झालं मुलगा झाला पण तो मतिमंद होता. मिशेल ला कळालं तसं तिला खूप टेन्शन आल पण तेवढ्यात राहुल तिथे आला आणि त्याने तिला समजावून सांगितलं "अगं असं काही नसतं, मुलगा झालाय आणि बघ किती गोंडस आहे तो. तसंही देव प्रॉब्लेम त्यांनाच देतो जे त्याला सॉल्व्ह करू शकतात म्हणून तू त्रास करून घेऊ नको नक्कीच पुढे काहीतरी चांगले यातून होईल..." तिला धीर देत होता पण तरी मनातून राहुल देखील खचला होता पण हि वेळ सावरण्याची होती खचून जाण्याचे नाही.


आता राशील पाच वर्षांचा झालेला होता. हो राहुल आणि मिशेल या दोघांनीही त्याचं नाव राशिल ठेवलं आणि त्याची फुलासारखी काळजी घेतली.

सर्वांना राशील हे नाव खूप आवडायचं पण राशीलच वर्तन मात्र खटकायचं शाळेत जात असून सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टी अजूनही कळत नव्हत्या कधीकधी कुणी एखाद्या पाहुण्यांसमोर सुद्धा तो पॅन्ट मध्येच लघुशंका करे... 

एक दिवस अँड्रू ने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केलं आणि त्यासाठी या जोडीला निमंत्रित केलं. शक्यतो पार्टीला जाताना हे दोघे राशीलला नेत नसत परंतु मुलाचा वाढदिवस म्हटल्यानंतर राशीलला घेऊन या अस आवर्जून त्याने सांगितलं होतं. म्हणून तिघेही पार्टीला गेले. पार्टी सुरू झाली राशीलला मात्र एवढी गर्दी बघण्याची सवय नव्हती, त्यामुळे तो भांबावून गेला आणि अचानक जोरात ओरडायला लागला. तिथे उपस्थित सर्व मुले घाबरली तेवढ्यात राहुल त्याला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि एक इंजेक्शन देऊन शांत केलं पण पार्टी मात्र भंग पावली होती. त्यांनी अँड्रयू ची माफी मागितली तेव्हा तो म्हणाला, 'असं काय करतोय राशील ने काही जाणून-बुजून केलं नाही, त्याला आराम करायला लावून आपण डिनर करुन घेऊया' पण मीशेल ने नकार दिला आणि सगळेजण घरी आले. राहुल तसा शांत होता मिशेल ची मात्र खुप चिडचिड चालली होती आपल्यासोबतच असं का? मी काय पाप केलं असेल? असं भरपूर भरपूर विचार ती स्वतःशीच करत होती. राहुल मात्र शांत झोपी गेला होता... 


मिशेल च्या वडिलांनाही हे सर्व माहिती झालं. त्यांना अत्यंत वाईट वाटलं तसे ते थोडे अहंकारी होते, सर्वांना पैशांमध्ये मोजणारे एक दिवस मिशेल ला त्यांनी बोलावलं आणि सांगितले आपल्या कुटुंबात आतापर्यंत असे काही प्रॉब्लेम नव्हते नक्की राहुल मुळेच आपला मुलगा असा झाला असावा. त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी विचारलं तुझा तो एक्स बोयफ्रेंड Donald सध्या कुठे आहे? तिने सांगितलं तो याच सिटी मध्ये राहतो आणि सध्या ड्रायव्हिंग चे काम करतो. हे ऐकून मिशेल चे वडील म्हणाले परफेक्ट!आणि तिच्या कानात काहीतरी सांगितले मिशेल ने विचारले Is it Fair? तसं मिशेल ने उत्तर दिलं "कुटुंब आणि समाजातील अस्तित्व टिकवण्या साठी सगळं काही योग्य असतं, कृतींमागील हेतू महत्वाचा आणि तिलाही ते पटलं,तीच्याही डोक्‍यात तेच वाक्य सारखं सारखं घोळत होतं.


घरी आल्यानंतर तिने Donald ला कॉल केला आणि भेटण्या बद्दल सांगितले दोघेही हॉटेल रॉयल पॅलेस ला भेटले तिथे बर्‍याच गप्पा नंतर एक डिसिजन फायनल झालं.ज्यामध्ये डोनाल्ड आता मिशेलची गाडी चालवणारा ड्रायव्हर होणार होता.दोन दिवसांनी मिशेल ने राहुल ला सांगितले 'मी ड्रायव्हर चेंज करत आहे. Donald नावाचे पप्पांचे एक मित्र आहेत ते ड्रायव्हर म्हणून ठेवले तर चालेल का?' राहुल म्हणाला 'तुला ओके असेल तर मला नो प्रॉब्लम' एवढं बोलून तो निघून गेला आता मिशेल आणि डोनाल्ड यांची पुन्हा एकदा मैत्री सुरु झाली. सी एस आर ऍक्टिव्हिटी च्या नावाखाली मीशेल उशिरा घरी यायची आणि सहाजिकच यातून राशील कडे दुर्लक्ष होत होतं. राहुल मात्र मिशीलला रागावन टाळायचा कारण त्याला तिचा स्वभाव माहिती होता उगाच कशाला वाद वाढवायचे! म्हणून तोच राशील ची जास्त काळजी घ्यायला लागला.


असंच एक दिवस राशीलच्या शाळेमध्ये एक प्रोग्राम होता. तो अटेंड करण्यासाठी राशील मिशेल आणि डोनाल्ड हे तिघेही निघाले प्रोग्राम अटेंड केला आणि संपून ते परतीला निघाले तेवढ्यात डोनाल्ड ला जाणवलं की गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत आणि त्याने तसं मिशेल ला सांगितलं दोघेही खूप घाबरले आणि गाडी एका पुलावरून खाली कोसळली. मिशेल आणि डोनाल्ड यांनी गाडीबाहेर उडी मारली परंतु राशील मात्र वाचू शकला नाही.


घटनास्थळी पोलीस पंचनामा करण्यासाठी "इन्स्पेक्टर स्टीव" पोहोचले. काय घडलं? असं विचारल्यानंतर डोनाल्डने गाडीची ब्रेक फेल झाल्याचे सांगितले गेले. इन्स्पेक्टर ने बराच वेळ तिथे गाडीची तपासणी केली काही पार्ट बघितले आणि त्यामध्ये असे लक्षात आले की ब्रेक जवळचे सर्व पार्ट व्यवस्थित आहेत स्त्रिंग तसेच लायनर ओके आहेत आणि त्याला थोडा संशय वाटला म्हणून त्याने क्राईम डिपार्टमेंटच्या सायमनला तिथे बोलावले आता सायमन आणि स्टीव्ह दोघे मिळून काय घडल असाव याची थेरी मांडत होते.

तिकडे राहुल मात्र खूप दुःखी झाला होता. कसाही असला तरी राशील एकुलता एक मुलगा होता जो आता त्याने गमावला होता. राहुलने अँड्रू ला कॉल केला आणि भेटायचे म्हणून सांगितल. दोघे एका हॉटेलमध्ये भेटले. अँड्रू ने त्याला समजावलं जरा धीर धर तू असं केलं तर मिशेल काय विचार करेल? तिनं कसं जगायचं?म्हणून तू धीर धरायला हवा आणि तिलापण सावरायला हवे.

दोन दिवसांपासून या गोष्ट

ींवर विचार करून त्यानुसार सायमन ने ड्रायव्हर तसेच मिशेल वर नजर ठेवली होती.डोनाल्ड तसा खूप चालाख होता पण त्याचा एक वीकनेस होता तो म्हणजे एखादी सुंदर मुलगी बघितली की तो तिच्या सौंदर्य मागे वासनांध व्हायचा आणि म्हणूनच त्यावर ही अशी वेळ आलेली होती. त्याला एक मागची केस फार महागात पडली होती.

 त्याने नियामी नावाच्या एका मुलीला त्याच्यापासून एक मुलगा असताना सोडून दिलं होतं. नियामी चा भाऊ मात्र माफिया होता आणि तो डोनाल्ड चा शोध घेत होता म्हणून डोनाल्ड सगळं काही सोडुन इकडे ड्रायव्हर म्हणून काम करत लपून बसलेला होता.आता इकडे आपल सगळं व्यवस्थित होईल असं त्याला वाटायला लागलं म्हणून त्याने सर्व मिशेलला सांगितलं. यातून मला बाहेर काढण्यासाठी एक पर्याय आहे. आज नियामी आणि मी भेटणार आहोत. जर तू बॅकअप ला असेल तर बर होईल असं सांगून रात्री उशिरा भेटू असं दोघांचही ठरलं सोबतच त्याने मिशेल ला सांगितलं आपल्यावरती सध्या पोलिसांची नजर आहेत म्हणून जरा सावधानता बाळग आणि रात्री अकराच्या नंतर भेटू.

रात्री दहाच्या नंतर घरातील सर्व लाईट तिने बंद केले आणि झोपण्याच्या तयारीला लागले हे बघून पाळतीवर असणारे पोलीस निघून गेले त्यानंतर हळूच राहुल न कळू देता मिशेल घरातून निघाली आणि "हॉटेल एमराल्ड विला" जिथे नियामि आणि डोनाल्ड भेटणार होते तिथे पोहचली नियामि एकटीच तिथे मुलाला घेऊन आलेली होती ते दोघे बोलत होते मीशेल या दोघांचा मागे एकवीस नंबर च्या टेबल बसून त्यांच्या गप्पा ऐकत होती. तो तिला मिशेल बद्दल सांगत होता तिच्यावर माझं प्रेम आहे आणि आपलं जे काही झालं एक्सीडेंटल होत,म्हणून प्लीज मला सोडून दे' नियामी मात्र हट्टावर अडून बसली होती ती रागारागात बोलून गेली,'तू जर या मुलाला आपलं नाही केलं तर मी या ड्रिंक मध्ये विष घालून तुला मारून टाकेल'?मिशेल हे सर्व ऐकत होती आणि रेकॉर्ड ही करत होती नियामीला शांत करण्यासाठी तिचा हात हातात घेऊन तो म्हनाला 'तू शांत हो तू माझीच आहे' मिशेल ला मात्र हे असह्य झालं होतं आणि म्हणून ती रागारागात निघून जाते.

दुसऱ्या दिवशी पेपर मधील न्यूज वाचून मिशेल आणि राहुल दोघेही चकित होतात "डोनाल्ड चा रात्री बारा वाजता हार्ट अटॅकने मृत्यू" राहुलला नेमकं काय होतय हेच कळत नाही आणि म्हणून त्याने सायमनला कॉल करून सांगितलं 'सर्व कुठेतरी जुळल्यासारखे वाटते प्लीज तुम्ही जरा लक्ष घाला.'

सायमन ने मिशेल ला कॉल केला आणि enquiry साठी येण्याबद्दल कल्पना दिली. राहुलने तिला समजावलं टेन्शन घेऊ नको निवांत रहा शांत राहून उत्तर दे. ही फक्त चौकशी आहे आणि तो निघून गेला. सायमन ने घरात प्रवेश केला आणि एन्क्वायरी ला सुरुवात झाली.

सायमन : Sorry to disturb you पण मला माहितीये तुम्हाला भरपूर दुःख होत असेल

मिशील : एकुलता एक मुलगा गेल्यावर आईचे दुःख काय असतं हे आई झाल्यावरच कळतं.

सायमन : मी त्याबद्दल नाही तुमच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलतोय.

(मिशेल शॉक होऊन बघते परंतु तिला याची पूर्वकल्पना डोनाल्ड ने आधीच दिली होती त्यामुळे तिने बोलायला सुरुवात केली)

मिशेल : जगातील प्रत्येक व्यक्तीला Past असतो माझ्याच बाबतीत घडले यात नवीन ते काय? 

सायमन : हो पण Past जर Present बनायला लागला म्हणजे Future काहीतरी वेगळे शीजत असणार.

मिशेल : म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मी माझ्या मुलाला मारलं? 

सायमन: मी तसं काही म्हटलं नाही, अजून तरी. माझे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं सापडली नाहीत म्हणून इकडे आलो. 

मला सांगा गाडीचा ब्रेक फेल झाला म्हणून तुम्ही सांगितलं पण आम्ही गाडीचे पार्ट बघितल्यावर समजलं तर सगळे पार्ट व्यवस्थित होते.

मिशेल : मला जे डोनाल्ड ने सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं यापेक्षा जास्त मला माहिती नाही.

सायमन: थँक्स एवढीच माहिती पाहिजे होती. काळजी घ्या गाडी मधल्या तुम्ही एकट्याच बाकी आहात हे दोघेही गेले म्हणून म्हटलं....

सायमन आणि स्टिव्ह तिथून निघाले सायमन ने स्टीव्ह ला विचारलं काय वाटतं? तसं त्याने उत्तर दिलं, 'बाई खरं बोलत असावी बहुतेक..' लगेच सायमन म्हणाला आय डोंट थिंक सो... मला वाटते ती काहीतरी लपवते आहे 

तेवढ्यात स्टीव्ह ला फॉरेन्सिक लॅब मधून कॉल आला आणि जे ऐकायला मिळालं ते शॉकिंग होतं डोनाल्ड च्या बॉडी मध्ये टॉक्झिक साइनाइड मिळालं होतं आता सायमन च्या डोक्यात सगळं क्लियर झालं म्हणजे सायनाईड मुळे ही अटॅक ची केस वाटावी या पद्धतीने खून केलाय. ग्रेट! हुशार आहे खुनी.'असा मनाशी विचार करून ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने सगळे धागेदोरे जे बोर्डवर लावले होते ते जुळवले जातात त्याला एकच नाव पुन्हा पुन्हा समोर येतं आणि ते म्हणजे मिशेल त्याने मग तिला कॉल केला आणि सांगितलं खरं सांग डोनाल्ड च्या बॉडी मध्ये विष सापडलंय... तुम्ही त्याला मारले तर का मारलं? 

मिशेल : अहो खरच मी नाही मारलं हा पण ती नियामि बोलत होती मी तुला वीष पाजुन मारेल. Actually नियामि म्हणजे त्याची ती एक्स गर्लफ्रेंड आहे जिला डोनाल्डपासून एक मुलगा आहे आणि हो त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे ती मी तुम्हाला पाठवते आणि रात्री घडलेल्या सगळं तिने सांगितलं (नीयामीचा नंबर व रेकॉर्डिंग पाठवलं)

 सायमन: ओके थँक्स फॉर युवर सपोर्ट सायमन ने लगेच नियामि ला कॉल केला आणि भेटण्यासाठी हॉटेल पेनसिल्व्हेनिया ला बोलवले भेटल्यानंतर नियामि ने ते रेकॉर्डिंग ऐकली आणि म्हणाली 'माझ्यासाठी डोनाल्ड केव्हाच मेलेला होता माझ्या मुलासाठी वडील पाहिजे म्हणून मी त्याच्याकडे आले होते आणि परत मीच त्याला कशाला मारेल, मी मारलं नाही माझ्या मुलाची शपथ.'

सायमन: बर ठीक मला सांगा की आल्यावर काय काय घडलं होतं ते सविस्तर सांगा

मियामी: आम्ही आलो मी नेहमीप्रमाणे ड्रिंक मागवलं माझ्यासाठी ड्रिंक आणि त्याने स्पेशल वाइन...अरे हो पण त्या दिवशी जो वेटर होता त्याने स्पेशल मध्ये एप्पल फ्लेवर साठी डोनाल्डला फोर्स केला होता. त्यानंतर काय बोलणं झालं ते तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं त्यानंतर तो थोडा घाबरलेला वाटत होता.मला वाटलं त्याला माझ्या भावाचं प्रेशर आलेल असेल मग मी त्याला सुचवलं "घाबरू नको घरी जाऊन आराम कर,तुला पाहिजे तेवढा वेळ घे, पण महिन्याभराने का होईना आपल्या फॅमिली मध्ये ये", तसं तोदेखील "हो!" बोलला आणि निघून गेला.

सायमन: हॉटेलच नाव काय ? 

नियामी: हॉटेल रॉयल विला 

सायमन: ( लगेच स्टीव्हला कॉल केला आणि रॉयल व्हिला ला जाऊन माहिती काढन्याबद्दल सांगितले)

बरं ठीक! आणखी काही संशयास्पद होतं.

नियामि : नाही पण एक दोनदा त्याने त्या मिशेल चा उल्लेख केला होता माझ्यासमोर...

इकडे स्टीव्ह हॉटेल ला पोहोचला. तिथे टेबल 20 पासून तर 25 पर्यंत स्टीफन नावाचा वेटर सर्व्ह करायचा त्याला विचारले तर त्याने सांगितले की हो ती जरा विचित्रच केस वाटत होती. एकाच पुरुषासोबत दोघी जणी होत्या आणि तो जिच्यासोबत बसला त्यांच्या मागच्याच टेबलला म्हणजे एकवीसला ती लेडीज होती आणि तिने सांगितलं की यांना अँपल फ्लेवर सीड्स वाला जरा जास्त आवडतो आणि तोच टाकून एक स्पेशल वाईनचा पॅक बनवून आण.त्यानुसार मी केलं

आणि मग त्या मॅडम लगेच निघून गेल्या. स्टीव्ह ने मिशेलचा फोटो दाखवला हीच का ती मॅडम त्यावेळी स्टीफन म्हणाला हो. 

स्टीव्ह ने सायमन ला कॉल केला आणि सगळं सांगितलं. 

सायमन ने नियामि ला थँक्स म्हणत निरोप घेतला.आता जवळपास सगळे धागे जुळले होते. सायमन ने राहुल ला कॉल केला आणि सांगितले तुम्ही अर्जंट घरी या केस जवळपास सॉल्व्ह झाली.येताना सायमनला रस्त्यावर हॉटेल रॉयल व्हिला दिसलें तिथे भेट देऊन राहुल च्या घराकडे तो निघाला. राहुल आणि मिशेल दोघेही हॉलमध्ये येऊन बसले आणि सायमन व स्टीव्ह दोघेही त्या ठिकाणी पोहोचले सायमन मिशेल कडे बघत होता तेवढ्यात

मिशेल: काय झाले ऑफिसर तुम्ही असे का बघतात माझ्याकडे? 

सायमन: ज्या आई बद्दल लोक एवढे गुणगान करतात तिच आई आपल्या मुलाला कस काय मारू शकते याचा विचार करतोय? 

मिशेल: अच्छा! तर कळालं तुम्हाला सगळं आता लपवण्यात काय अर्थ?

आम्ही दोघे एवढे हुशार असून पण मुलगा मतिमंद याने आमची पूर्ण इज्जत धुळीस मिळवली म्हणून माझ्या वडिलांनी मला एक उपाय सांगितला तू डोनाल्ड सोबत संबंध ठेवून एक आपत्त्य मिळवावं जे राहुल ला कळणार नाही या पद्धतीने. पण मला मात्र राहुल शिवाय दुसरं कुणीही नको होतं आणि मतिमंद मुलगाही नको होता म्हणून माझ्या राक्षसी बुद्धीत एक युक्ती आली.त्या दिवशी अँड्र्यू च्या घरी जे घडलं त्यादिवशीच मला राशीलचा फार राग आला होता. सर्व विचार करून मी एक निर्णय घेतला राशीलला संपवायचं पण डोनाल्डचा वापर करून त्यानुसार सर्व प्लान नुसार व्यवस्थित झालं होतं पण मध्येच केस इन्स्पेक्टर स्टीव्ह कडे आली आणि आमचा प्लॅन फसला. पहिल्याच दिवशी ब्रेक फेल नव्हते हे तुम्हाला कळलं तेव्हाच आम्ही दोघे घाबरले होतो. त्यात डोनाल्डचा पळकुटा स्वभाव मला आधीपासूनच माहिती होता आणि तो कधी कधीही सुधारणार नाही हे देखील माहिती होतं म्हणुनच त्या दिवशी मी गोळ्या न घेतात हॉटेलला गेले होते.

सायमन: गोळ्या कसल्या? 

मिशेल: मला रागावर कंट्रोल राहत नाही मला intermittent explosive disorder आहे म्हणून मला सारख्या गोळ्या घ्यायला लागतात त्या दिवशी देखील मी गोळ्या टेबलवर शोधल्या पण त्या टेबलवर सापडत नव्हत्या.कपाटात अजून असतील पण कपाट उघडले तर राहुल जागा होईल म्हणून मी ते टाळलं.

सायमन: ओके मग

मिशेल : बाकी पुढे मी काय केलं तुम्हाला कळालं असेल ऍपल सीड्स मध्ये टॉक्सिक सायनाइड असतं. मी तर डोनाल्डला आधीपासूनच संपवायचं ठरवलं होतं. मला कोणताही धोका नको होता. माझी चूक झाली मी फॉरेन्सिक चा विचार केलाच नाही आणि पूर्ती अडकले.आय एम सॉरी राहुल मला असं करायला नको होतं पण माझ्या पुढे दुसरा मार्गच नव्हता...(ती राहुल कडे शरमेने मान खाली घालून बघते)

राहुल: shame on you स्वतःच्या मुलाला कसं मारू शकतेस तू? 

सायमन: अगदी तसेच जसे तुम्ही करू शकता.

राहुल: what are you talking?

सायमन तुझं काय डोकं फिरलय का? 

सायमन: स्टीफन मध्ये ये. स्टीफन ला बघून राहुल जरा घाबरला 

आता आणखी काही पुरावा हवा आहे काय? 

डोनाल्डच्या बॉडीमध्ये आणखी एक विष सापडले होते जे की फक्त फिशमध्ये असते आणि याबद्दल राहुल तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनलवरती लेक्चरमध्ये डिटेल सांगितले ज्या दिवशी मी ते लेक्चर ऐकलं तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे कारण सायनाईड मध्ये वाचण्याचा चान्स आहे मीशेल फार फार तर हेच वापरेल आणि जर डोनाल्ड मेला नाही तर तुमचा सगळा प्लॅन तो मिशीलला सांगणार होता आणि म्हणूनच तुम्ही त्याला संपवण्यासाठी या स्टीफनला त्या ड्रिंक मध्ये टेट्रोडीटॉक्सिन ऍड करायला सांगितले आणि पैसे देऊन त्याला आम्हाला अर्धीच माहिती द्यायला सांगीतलं डॉक्टर मिशेलला खूप चांगल्या पद्धतीने वापरलत तुम्ही. तिला वाटले डोनाल्ड तिच्यासाठी आला पण त्याला आणणारे तुम्ही होतात हे आम्हाला कळलं डोनाल्ड च्या कॉल हिस्टरी वरून ज्याच्यासाठी तुम्ही एक नवीन फोन नंबर घेतला आणि तो देखील मिशेल च्या नावाने.काय भारी प्लॅन केला होता.राग नका येऊ देऊ पण एक सांगू तुम्ही भारतीय आहात आम्ही जेवढे भारतीयांबद्दल ऐकलेल आहे त्यानुसार असं करण्याची तुम्हाला एकदासुद्धा लाज वाटली नाही,संस्कार आडवे आले नाहीत.

राहुल: हो मीच मारलं त्याला मिशेलचा वापर करून.लहानपणापासून फार मेहनतीने मी या पोजिशन ला पोहचलो. एकदम कमी काळामध्ये जगात पहिल्या पाच लोकांच्या यादीत येणे काही जोक नाही.पण एका क्षणात मला ही सर्व शून्य वाटायला लागलं मुलगा मतिमंद का? यावर काही उपाय आहे का? याचा शोध घेण्यासाठी मला पाच वर्षे लागली पण उत्तर मिळालं यावर काहीही उपाय नाही...

एक तर मुलगा नाहीतर लौकीक.मुलगा तर आताच मिळाला सोबतच नंतर पण होऊ शकतो पण लौकिकता एकदा गेली की मी पूर्ण संपेन.ही भीती मला झोपू देत नव्हती म्हणूनच मी हे सगळं केलं डोनाल्डला मी पहिल्याच दिवशी हाताशी धरला होता पण त्याचीही इमानदारी जागी झाली त्याने माझा प्लॅन मिशेल ला सांगणार असल्याची चुणूक मला लागली आणि त्याला संपवण्याचा निर्णय मी घेतला हें सगळं मीच केल माझ्याच हातानी केलं. मला फाशी द्या किंवा त्याहून वाईट शिक्षा असेल तर ती द्या पण माझी शेवटची इच्छा आहे की 'ही बातमी मी मेल्या नंतरच जगाला कळू द्या मी जिवंत असेपर्यंत नको'

सायमनने स्टीव्हला या दोघांनाही अटक करायला सांगितले आणि मनाशी विचार करायला लागला...

"माणूस लौकिकतेच्या एवढा आहारी जाऊ शकतो ज्यामध्ये त्याला आपले मित्र,नाते काहीही लक्षात राहू नये. लौकिकते साठी एवढी लाचारी पत्करून घ्यावी. समाजाचं मत खरंच इतकं आवश्यक असतं? समाजाचा विचार करून आपणच आपल्याच लोकांवर घाव घालावे! आतापर्यंत मिळवलेल ज्ञान, उचललेले संस्कार असे क्षणात संपणारे असतात.

या समाजात कुणी आपल्यावर हसू नये म्हणून फक्त स्वतःच्या खोट्या स्वाभिमानासाठी स्वकियांवर असले प्रहार करण कितपत योग्य? 

मनाच्या सर्व भागावर अभ्यास करणाऱ्या जगातील अशा महान म्हणून मिरवणाऱ्या लोकांना खरंच मानवी मन कधी समजून घेता येईल? नक्कीच नाही... 

हे लोक म्हणजे पुस्तकासारख्या दैवतालासुद्धा शस्त्र म्हणून वापरणारे कसाईच नाही का...?"


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime