STORYMIRROR

Pradip Warade

Drama

4.3  

Pradip Warade

Drama

प्रवास आणि रामायण

प्रवास आणि रामायण

4 mins
440


मला प्रवास आवडतो कारण स्वतः स्वतःला भेटवतो तो प्रवास, 

अस्तित्व निर्मितीसाठी विचार करायला लावतो तो प्रवास, 

जिथे घेता येतो मोकळा श्वास तोच खरा प्रवास... 


त्यावेळी मी साधारण ग्रॅज्युएशनला असेल. एक दिवस असाच प्रवासाचा मूड होता आणि म्हणून कॉलेजवरून डायरेक्ट बस स्टँड ला गेलो, तिथे गेल्यानंतर बाहेर बुक स्टॉल होता. वाटलं प्रवासात एक बुक असलं सोबतीला तर चांगलंच असं म्हणून त्या स्टॉलवर गेलो. तिथे एक रामायण वर आधारित "इक्ष्वाकु वंशज" नावाचं पुस्तक दिसलं. कव्हर छान दिसलं म्हणून मी 120 रुपये देऊन ते विकत घेतलं. ठरल्याप्रमाणे मिळेल ती बस पकडून जायचं तसं मला एक बस मिळाली आणि ती निघाली होती "अजिंठा लेणी"ला...


वाटलं बर झालं पहिलीच बस मिळाली आणि ती पण एकदम निवांत, गर्दी पण नव्हती आणि मस्तपैकी आवडीची म्हणजेच खिडकीच्या जवळची सीट मिळाली. फक्त पुस्तक बाजूला काढून मी बॅग वरती ठेवली आणि आता मी सीटवर निवांत बसलो.


तेवढ्यात समोरून एक जोडपं आलं त्या मुलाचा पेहराव, पांढरा शुभ्र शर्ट ब्लू कलरची डार्क पॅन्ट, चॉकलेटी शूज आणि चेहऱ्यावरचा आनंद... 

तिकडे ती मुलगीसुद्धा हातात डझनभर बांगड्या, मान खाली घालून हळूच आजू बाजूला बघणं, दोन्ही हातांनी पकडून ठेवलेला घागरा-जो बस स्वच्छ करणार नाही याची काळजी घेत हळुवार चालणं. यातून एक गोष्ट तरी लक्षात आली होती के ते नवीन जोडपं असावं...


त्या मुलाने माझ्याकडं बघून एक smile दिली आणि मीदेखील ती त्याला तशीच ती परत केली. ते जोडपं माझ्या बाजूच्याच सीटवर स्थिरावलं तसं स्वतःचा हात पुढे करत त्याने मला त्याची ओळख करून दिली

Hi I am Anny...

मी बोललो,

Hello My name is Pradip..

आणि मग त्याने इंग्लिशमध्ये सांगायला सुरुवात केली. आपला देश काही सुधारत नाही आणि हेच ओळखून मी दोन वर्षाखाली USA ला सेटल झालोय. मग त्याने सांगितलं USA मध्ये तो एका IT कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. त्याच्या बोलण्यावरुन मला एक लक्षात आलं होतं की, कितीही इंग्लिश बोलला तरी हा महाराष्ट्रातलाच. कारण महाराष्ट्रीयन शैली कशीही आणि कुठेही उमटून दिसते. मी सर्व ऐकून घेतलं.


आता गाडी निघून साधारण अर्धा तास झाला होता. आता नवीन जोडप्याच्या नवीन गप्पा सुरु झाल्या होत्या. तसं मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. प्रास्ताविक वाचूनच माझी जिज्ञासा पराकोटीला पोहचली होती. अर्धे वाचून झालं असेल की त्या मित्राने माझ्याकडे एकदम तुच्छतेने बघत विचारले, Do you think this book will help you to improve your career or future this is the only reason why we are lacking the developed countries we should read the books of Robert kiyosiki, Robin Sharma etc.

आता राहवत नव्हतं तरी मी शांत राहिलो आणि पुस्तक वाचत बसलो आणि त्याच्याकडे बघून एक छोटी smile दिली.


मनात विचार केला ज्याची त्याची आवड असते आता सगळ्यांना सारखंच आवडलं असतं तर इथे सगळं बॅलन्स कसं झालं असतं आणि त्याचे ते फॉरवर्ड विचार ऐकून मला त्याला काही बोलण्याची इच्छा नव्हती...


थोडं पुढं आल्यानंतर गाडी सिल्लोडच्य

ा पुढे एका "साई हॉटेल"वर नाश्त्यासाठी थांबली ते दोघेही खाली उतरले... 


बाजूला एकजण ओरडत होता,

"कैरी कांद्याची भेळ, कैरी कांद्याची भेळ..." न राहवून मी त्यांना विचारलं

दिवाळीच्या काळात तुम्ही कैरी कुठून आणली. मग त्याने सांगितलं, "अहो याच नाव कैरी कांदा पण यात असतो फक्त कांदा, कैरी फक्त उन्हाळ्यात मिळते यात...”

मी डोक्याला हात लावला आणि त्याला फुकटचा सल्ला दिला, “सध्या हिवाळ्यात याला कांद्याची भेळ म्हणत जा म्हणजे माझ्यासारखी लोक फसणार तरी नाहीत...”

१० मिनिटे होऊन गेलेली होती ही दोघेही अजून आलेली नव्हती कंडक्टरने बेल वाजवली मी त्यांना थांबा म्हणणार तोच Anny येताना दिसला तशी बस थांबली कंडक्टर जोरात ओरडले "ओ चला लौकर.." पळत येऊन तो बस मध्ये चढला गाडी निघाली पण ती मात्र अजून दिसत नाही हे त्याला आठवलं आणि तो म्हणाला, "ओ थांबा माझी बायको राहिली..."


आणि तेवढ्यात ती पळत येताना दिसली, "ओय अरे चल लौकर"असा तो ओरडला तिनेपण स्पीड वाढवली आणि कशीबशी बसमध्ये चढली. दोघेही काहीसे घाबरलेल्या अवस्थेत वरती आले आणि सीट वरती बसले...


आता ती ज्या पद्धतीने त्याच्याकडे बघत होती ते बघून ती मनात कदाचित विचार करत असावी, "कसा भेटलाय असा काय माहित! माझ्या आधी गाडीत येऊन बसला मला सोबत घेऊन येऊ शकत नव्हता का?"

त्याच्याही मनात असंच असावं... "काय राव लैच स्लो दिसते हि कसं होईल माझं आयुष्यभर?"


आता तिच्याशी काही बोलता येईना म्हणून त्याने चेहरा माझ्याकडे वळवला आणि मला विचारलं, "बघा आमच्या बुद्धिचातुर्यामुळे आणि presence ऑफ माईंडने आज आम्ही पटकन decision घेतलं. त्यामुळे दोघेही आज इथे आहोत नाहीतर ती खालीच राहून गेली असती हे असलं रामायण वाचत बसलो असतो तर आम्हीसुद्धा वेंधळे राहिलो असतो...”


आता जरा जास्तच होतंय म्हणून मी बोलायला सुरुवात केली, "कसंय ना आपल्याला पाश्चात्यांचं ऐकायची सवय लागलीय. आपण त्यांच्या ओंजळीनेच पाणी पितो म्हणून असं होतं. तुम्ही जर रामायण वाचलं असतं ना तर तुमच्यावर ही अशी वेळच आली नसती कारण राम हा स्वतःच्या आधी सीतेला प्राधान्य द्यायचा...”


आता काय समजायचं ते त्याला समजलं असावं खाली मान घालून तो तसाच विचार करत बसला...

आजकाल कॅटायन आणि आणायन शिकण्याच्या नादात 

आपण दिव्य तेज भरणारं "रामायण" विसरत चाललोय,

Positive आणि Negative ला बॅलन्स करते ते रामायण, 

प्रवृत्ती की निवृत्ती याचंवउत्तर देणारं रामायण,

आदर्श पुत्र बनून पित्याच्या मनाविरुद्ध न करण्याचं शिक्षण देणारं रामायण, 

रखडत चाललेल्या अर्थशास्त्राला चोख उत्तर म्हणजे रामकालीन अर्थव्यवस्था, 

अभिप्राज्यम राज्यमने चालणारी स्वयंशासित समाज असणारी राज्यव्यवस्था, 

कुटुंबाप्रमाणे एकत्र राहून निर्णय घेणारी आदर्श समाजव्यवस्था,

या सर्व व्यवस्था जिथे परिपूर्ण होत्या असं रामायण,

आत्यंतिक प्रेम, प्रेमासाठी त्याग, त्यागातून धर्मपालन, धर्मपालनातून मिळालेली शिस्त, शिस्तीतून "सत्याय मितभाशीनाम"सारखे संस्कार देणारं रामायण- आपण एकदा तरी वाचून जीवनात आणायला हवं, तीच खरी रामनवमी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama