STORYMIRROR

Pradip Warade

Romance Fantasy

2  

Pradip Warade

Romance Fantasy

मैत्री की प्रेम - भाग 3

मैत्री की प्रेम - भाग 3

6 mins
216

संदेशला मी बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्या नजरेत नजरहि मिळवत नव्हता नी काही उत्तरही देत नव्हता.

"कभी कभी खामोशी मगरूर को भी मजबुर कर देती हैं,

जवाब की चाहत में अक्सर सवालो में उलझा देती हैं..."


शेवटी न राहून एक दिवस मी त्याच्या मित्राला अमोदला बोलावून घेतलं. तो आमच्या दोघांचाही मित्र त्यादिवशी जे काय झालं त्याबद्दल मी अमोदला सगळं सांगितलं, त्यानंतर अमोद म्हणाला "अहो अजून बरच काही आहे तिच्याबद्दल आणि संदेश बद्दल सांगण्यासारखं"

"मला काहीच ऐकायचं नाही! हे शक्य नाही संदेश माझ्यावर खूप प्रेम करतो तो माझ्याशी असं वागूch शकत नाही!"

तेव्हा अमोद ने मला सांगितलं "एका कार्यक्रमानिमित्त तू शाळेत ये! तिकडे आल्यानंतर तुला सगळं काही कळेल." असं म्हणून अमोद निघून गेले.

संदेश घरी आल्यानंतर त्यांनीहि मला सांगितले की कार्यक्रमासाठी तू ये आणि आपण सोबत जाऊयात म्हणून.

शाळेत कार्यक्रम सुरू झाला. 'प्रियंका'या मुलीचं नाव घेतल्यानंतर एक मुलगी समोरून येताना संदेशकडे एकटक बघत चालली होती. तेवढ्यात डोळ्याने तिला संदेश न इशारा केला आणि मला बघून ती जरा स्तब्ध झाली. पण कदाचित मी येणार हे तिला आधीच माहिती होतं. त्यानंतर तिने पारितोषिक स्वीकारून माझ्याही पाया पडली आणि मला थँक्यू पण म्हटली. मी म्हटलं "थँक्यू कशाबद्दल?" तर म्हणाली "तुमच्यामुळे आणि सरांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले." असं म्हणत ती अगदी लाजुन तिथून निघून गेली. मला तर काहीच समजलं नाही.

संदेश सोबत मी घरी यायला निघाले त्यावेळेस संदेश ने स्वतःहून सांगायला सुरुवात केली, "हि पियू म्हणजे ना अगदी सोज्वळ, टिपिकल अभ्यासू आणि सगळ्याच बाबतीत एकदम हुशार! तिच्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम होते जे सोडवण्यासाठी मी तिला मदत केली म्हणून ती मला खूप जास्त रिस्पेक्ट देते आणि आता तर बारावी मध्ये फर्स्ट आलीय शाळेत तर होताच आता कॉलेज चाही नाव रोशन केलं. त्यामुळे "ब्रेन विथ ब्युटी" वाल कॉम्बिनेशन क्वचितच बघायला मिळतं त्यातलीच ही एक आणि हो बघितला ना केवढी नम्र आहे ती. तुझं देखील दर्शन घेतलं तिनं. " जेवढं कौतुक संदेश करत होता तेवढी माझ्या मनात त्‍यांच्‍याबद्दल घृणा वाढत होती. एवढ्या वर्षात माझ्यातला एकही गुण त्याने कधी एका शब्दानेही बोलून दाखवला नव्हता आणि हीच कौतुक मी निमूटपणे ऐकत होते. तीच कौतुक ऐकत-ऐकत आम्ही कधी घरी पोहोचलो कळलच नाही.

"कधी कधी असं वाटतं आयुष्यात सगळ्यात मोठा शाप म्हणजे 'समजुतदारपणा' तो जेवढा जास्त तेवढा त्रास जास्त, म्हणूनच कदाचित तुकाराम महाराज म्हटले, 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' समजदार त्रास सहन करत मरतो आणि बाकीचे मात्र नासमज म्हणून मजा मारतात..."


आज बऱ्याच दिवसानंतर बँकेतून कॉल आला म्हणून मी बँकेत गेले होते. तिथे गेल्यावर काही धक्कादायक बातम्या माझ्या ऐकण्यात आल्या. माझी एक लाख रुपयांची एफडी मोडून संदेश नी फस्त केली होती. सोबत आणखी एक लाख रुपयांचं पर्सनल लोन माझे खोटे हस्ताक्षर करून घेतलं होतं. हे सगळे ऐकून मी तर चक्रावूनच गेले. मी जागीच खाली बसले तिथल्याच एका व्यक्तीने मला पाणी आणून दिले आणि मला जरा बरं वाटलं.


"कभी कभी किस्मत भी अपना साथ छोड देती हैं

हसने के बहाने मिलती और ज्यादा रुलाकर जाती हैं..."


'आपल्याच कर्माची फळे म्हणत' जरा बरं वाटल्यावर तिथून बाहेर पडले तेवढ्यात समोरून अमोद येऊन उभे राहिले, "वहिनी इकडे कुठे?"

"काही नाही भाऊजी, जरा बँकेत आले होते असं म्हणताच त्यांनी मला गाडीवर बसायला सांगितलं. आम्ही दोघे कॉफी शॉप मध्ये बसलो. तिथे बसल्यावर बँकेत जे काय घडलं ते सगळं अमोद समोर मी सांगितलं तसं अमोद बोलायला लागला "ओ आय सी! असं झालं तर सगळं, शेवटी तुम्हाला कळलंच. मी तुम्हाला सगळं त्याच दिवशी सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि असे वाटले होते की शाळेत आल्यावर तरी तुम्हाला कळेल.पण त्यातही संदेशने अशी काही सेटिंग लावली की तुम्हीच क्लीन बोल्ड झाल्या."

"अहो सध्या पिऊने 75 हजार रुपयांची स्कूटी घेतली आहे, तिच्या वडिलांनी घेऊन दिली असे ती सांगते पण मला 101% माहिती आहेत की ती संदेशनेच दिली आहे. कारण रोजंदारीवर काम करणाऱ्या बापाची 75 हजार रुपये असे गाडीवर उडण्याची इच्छा होणार नाही पण पुराव्याअभावी मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो पण आता माझ्याकडे पुरावे देखील आहे. मागील काही महिन्यांपासून तिच्याकडे एक नवा फोन, सोन्याची चैन वगैरे बर्‍याच वस्तू आहेत.जस तुम्ही म्हणताय एक लाख रुपयांची एफडी आणि एक लाख रुपयांचे कर्ज हे घेऊनच त्याने हे सगळं केल असावं, अन्यथा 20 हजार रुपयांच्या पगारात तो काय काय करणार?" " हो ना! अहो पण यांना कसं सुचतंय हे? माझ्यासोबत असं का होतंय मी काय वाईट केलंय कुणाचं? माझ्यासोबत असं का?"

"वहिनी! तुम्ही आधी शांत व्हा.आपण यावर काहीतरी मार्ग काढू!" तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन आला दोघांनीही कॉफी घेतली. कॉफी झाल्यावर अमोद बोलले, "खरंतर संदेश कडे अजून एक फोन आहे ज्यावर फक्त तीचे कॉल येतात तोच दाखवण्यासाठी मी तुम्हाला शाळेत बोलावलं होतं पण तिथलं वातावरण बघून तुम्हाला काही बोललो नाही पण आज बँकेतली सगळी माहिती तुम्हाला कळली म्हणून आज हे सगळं सांगतोय. याआधीही मला बऱ्याचदा तुम्हाला सांगायचं होतं पण नेहमी कैचीत सापडायचो आज जरा हलकं वाटतंय...

"वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळं सुरळीत होईल." असं बोलून नंतर भाऊजी नी मला घरी सोडलं. घरी आल्यानंतर सगळ्या विचार करत सगळं असह्य झालं होतं विचार केला आपण स्वतःला कशात तरी गुंतवायला पाहिजे तेवढ्यात पुस्तकाच्या कपाटावर नजर गेली त्यातील एक पुस्तक उचललं 'क्रौंचवध वि स खांडेकर' प्रस्तावना वाचताना डोळ्यातून अश्रू वाहायला लागेल. "आपण सगळे म्हणजे निष्पाप क्रौंच आणि समाज म्हणजे निषाद.

याच निषादाच्या तावडीत सापडलेला झ्वाईग नाझींच्या तावडीत सापडल्यावर, प्रिय जन्मभूमीचे दर्शन होणे अशक्य - या विचाराने त्याची होणारी फडफड आणि त्यातच त्यांनी घेतलेल्या मृत्यूचा आश्रय. माझ्या मृत्यूने तरी हेच जग शुद्धीवर येवो असा भाव. त्याच्या मृत्यूच्या वेळी पतीच्या सोबत करण्याकरता विष प्राशन करून त्याच्या गुडघ्याला मिठी मारून बसलेली त्याची प्रिय पत्नी...."

"किती भाग्यवान पत्नी म्हणावी लागेल मरतानाही पतीच्यासहवासात आणि इथे मी जिवंत असूनही विरह यातना सहन करतेय ! माझ्याच नशिबात हेचं का असेल? पण तेवढ्यात पुन्हा झ्वाईग आणि त्याची पत्नी समोर यायला लागली प्रत्येक वेळी अगदी मरतानाही पतीची साथ न सोडणारी त्याची पत्नी मला दिसली आणि ठरवलं आज संध्याकाळी मी घरी आल्यावर काय ते फायनल करून टाकू... संध्याकाळचे आठ वाजले तरी संदेश घरी यायचा पत्ता नाही. फोनही उचलत नाही. मग काय झाल असेल? नेहमी फोन करून कळवतात तरी...आज असं काय झाल असेल? त्या मुलीच्या सोबत फिरत तर नसतील? तिला पण काय माझंच घर सापडलं आग लावायला! नेमकं सगळं सुरळीत होतं ना! कुणास ठाऊक कुणाची नजर लागली आहे? पण दुसर तर काही झालं नसेल ना! माझ्याच मनाला आवर घालत मी दरवाज्याकडे वाट बघत उभी होती....

तेवढ्यात अमोद भाऊजींच्या गाडीवर मागे बसलेले घराकडे येताना दिसले आणि जीवात जीव आला.

पण तेवढ्यात बघते तर काय त्याचा चेहरा एकदम रक्ताळलेला!

"अरे देवा! हे काय झालं? काय लागलं? " असं म्हणत मी रडायला लागले तेवढ्यात अमोद भाऊजी म्हणाले "वहिनी तुम्ही शांत व्हा मी सगळं सांगतो"असं म्हणताच संदेशने त्यांच्याकडे बघितलं आणि अमोद भाऊजी बोलायला लागले "गाडीला छोटासा अपघात झाला आणि त्यात थोडे लागलं, काही जास्त घाबरण्यासारखं नाही! तुम्ही काळजी करू नका." मी संदेशला पाणी दिलं आणि मग त्यांना बेडवर झोपवून हॉलमध्ये भावजींना पाणी देत विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, " रस्त्यावर एका फोर व्हीलर ने त्यांना धडक दिली,पण एवढा काही जास्त मार नाही लागलेला डॉक्टरांनी सांगितले की त्यांना थोडा आराम करू द्या आणि जास्त त्रास देऊ नका..."


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance