Pradip Warade

Drama Fantasy Inspirational

3  

Pradip Warade

Drama Fantasy Inspirational

धनवान!!!

धनवान!!!

6 mins
218


"प्रतीक" नेमकं माझं नाव कशावरून बर ठेवलं असेल! बराच वेळ झाला तरी याच विचारात मी गुंतून गेलो होतो.

मग लक्षात आलं कदाचित आपलं आयुष्य गरिबीचंच प्रतीक असेल म्हणूनच तर एवढे लहान असताना पासून काम करावे लागते.

प्रतीक सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षात होता. स्वतः काम करून अभ्यास करत करत सगळं आयुष्य व्यवस्थित सांभाळत होता. सगळ्या जबाबदारीतून जरा उसंत मिळाली म्हणजे तो तिला वेळ देत असेल आणि आयुष्य पूर्ण झाल्याचा आनंद मिळवत असे. ती म्हणजेच मोहिनी- नावाप्रमाणेच दिसायला अगदी स्वर्गातली अप्सराच! तिचा तो लाघवी चेहरा, चेहऱ्यावरील विलक्षण स्मित, भुरभुर उडणारे केस आणि अलगद मंद हवेच्या झोताने कपाळावरून खाली उघडणारी ती बट... या सर्वांनी तर तिचं सौंदर्य अजूनच खुलून उठायचं. हे सगळं आठवून प्रतीक चा गरिबीचा आणि विचारांचा थकवा पार निघून गेला. चेहऱ्यावर एक आकस्मित छटा उमटल्या असतानाच डॉक्टरांचा आवाज कानावर पडला "अरे! झोपतो काय गाढवा ते नव पेशंट आले बघ जरा नाव लिहून घे!" मागच्याच आठवड्यात प्रतिक ने हा दवाखाना जॉईन केला होता. त्याने मोहिनीला शब्द दिला होता की या सहा महिन्यांमध्ये तो तिला एक सुंदर नेकलेस जो तिला आवडला होता परंतु २० हजाराचा टॅग बघून तिने परत ठेवून दिला होता. तसं मेडिकल वर काम करून प्रतिक ला 5000 मिळायचे त्यातून दैनंदिन खर्च भागायचा. दिवसभरातील अजून चार तास वेगळे काढून इथे त्याला चार हजार रुपये पगार मिळायचा. शिवाय पेशंटची जास्ती गर्दी नव्हती म्हणून मध्ये मध्ये अभ्यासाला वेळही मिळायचा म्हणून त्यांनी ही नोकरी करायचा निर्णय घेतला होता- ज्यामाध्यमातून पाच ते सहा महिन्यात वीस हजार रुपये वेगळे जमा होणार होते आणि तो मोहिनीला एक सरप्राईज देऊ शकणार होता.... या विचारांमध्ये 12 तास काम करूनही त्याला थकवा जाणवत नव्हता. त्याला प्रत्येक वेळी थकवा आला की तो तिचा चेहरा आठवायचा आणि नवा जोश मिळवून परत कामाला लागायचा.

"प्रेमात किती अफाट शक्य असते ना! रात्र रात्र जागून सुद्धा दिवसभर तीच ऊर्जा टिकून असते! कितीही काम झालेले असेल तरी एक वेगळी प्रेरणा मिळते- खरंतर प्रेम हे एक वेगळच रसायन आहे, जे कॅटलिस्ट प्रमाणे काम करतं प्रत्यक्ष रिऍक्शन मध्ये भाग घेत नाही पण रिऍक्टंटला मात्र कायम प्रेरणा देत राहतं."


प्रतिकने पेशंटचं नाव लिहून घेतलं आणि पुढील पेशंटची वाट बघत बसला पण नवीन कोणी दिसलं नाही म्हणून त्याने पुस्तक वाचायला घेतलं रात्रीचे साडेआठ वाजले होते, जरा थकल्यामुळे प्रतीकला झोपही यायला लागली होती आणि पेशंट नाही म्हणून डॉक्टरांना विचारून बाहेर चहा पिण्यासाठी तो टपरीवर गेला...शांतपणे चहाचा घोट घेत मनातील विचारांना शांत करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्या वाफांप्रमाणे अनेक विचार वातावरणात विलीन झाले...

त्याचं वेळी एका शायरी च्या ओळी आठवल्या,


कहा ईश्क ने की "मर जाओगे,

ये जहरीली चाय छोड दो,"

मैंने कहा "हम तो जहर पे ही मरते हैं,

तुम अपनी राय छोड दो... "


इकडे डॉक्टरांकडे एक नवीन जोडप आलं त्या मुलीने जरा घाबरत घाबरत आणि चेहरा लपवत डॉक्टरांना विचारलं "डॉक्टर साहेब, जरा दार बंद करू का, थोडं प्रायव्हेट प्रॉब्लेम आहे?" तिच्यासोबत असणारा मुलगा आणि तिची स्थिती यावरून डॉक्टरांना सगळा प्रकार काय असावा याचा अंदाज आला होता. सोबतच दोघांनाही एका आलिशान गाडीमधून उतरताना बघितल्यावरच डॉक्टरांना शंका आली होती.

मुलगी, "डॉक्टर साहेब हा माझा बीएफ आहे आणि आम्ही लवकरच लग्नही करणार आहोत! परंतु नकळत आमच्याकडून नको ते घडलं. आम्हाला माहिती आहे हे चुकीच आहे; पाप आहे, हे सगळं अचानक घडलं पण आता यावर काय करावे तुम्हीच सांगा ! त्यातच काल मीनल भेटली होती आणि तिने आम्हाला तुमचं नाव सुचवलं म्हणून इकडे आलो."

डॉक्टर, "अच्छा तर मीनलने सांगितले हरकत नाही! मग मीनलने तुम्हाला फीस बद्दलही सांगितलं असेल."

मुलगी, " डॉक्टर तुम्ही पैशांची चिंता करू नका माझा हा बीएफ एकदम श्रीमंत आहे मीनलने दिलेले त्यापेक्षा दहा हजार नक्कीच माझ्याकडून तुम्हाला जास्त मिळतील फक्त मला यातून बाहेर काढा!"

बाजूला बसलेला मुलगा तिच्याकडून स्वतःची स्तुती ऐकून जरी खुश होत असला तरी दहा हजार जास्त ऐकून त्याची खुशी जरा कमी झाली, तरीही उघड उघड न दाखवता त्याने स्मित करत तिच्या बोलण्यात सूर मिळवला.

डॉक्टरांनी सिच्युएशन सांभाळण्यासाठी होकार दिला आणि सांगितले 'उद्याच्या दिवशी आपण संध्याकाळी सात वाजता सर्जरी करू पण पुरेशी काळजी घ्या ह्या सगळ्या तपासण्या करून मग आपण निर्णय घेऊ' असा सल्ला देत डॉक्टरांनी प्रतीकला आवाज दिला आणि त्या मुलाला स्वतःचे नाव लिहायला सांगितले.

नाव लिहून झाल्यावर डॉक्टरांनी प्रतीकला बोलावून घेत उद्याच्या सर्व अपॉइंटमेंट कॅन्सल करून सर्व कन्सल्टंट डॉक्टरांना बोलवायला सांगितलं....


अशा तऱ्हेची मागील सात दिवसांमधली ही तशी तिसरी केस होती त्यामुळं काय झाले हे समजायला प्रतीकला जास्त वेळ नाही लागला. सहज म्हणून प्रतीक डॉक्टरांना बोलला, "डॉक्टर आजकालच्या मुली कशा विचित्र झाल्या आहेत ना! सगळी बंधन वगैरे सोडून असं कसं काय वागू शकतात!"

डॉक्टर, "अरे! हो बाबा आजकाल सगळेच फास्ट झाले मग त्या तरी कशा मागे राहतील आणि चालू दे ना भो त्यांच्याच जीवावर तर आपलं सगळं सुरळीत चाललंय, बरं गप्पा कमी कर आणि या गोळ्या औषधी फक्त त्या पेशंटला नेऊन दे आणि तिला कशा घ्यायच्या त्या समजावून सांग.


प्रतीक केबिनच्या बाहेर आला आणि ती मुलगी तिथेच दारात उभी होती. का कुणास ठाऊक? पण त्याला क्षणभर वाटलं तिला कुठेतरी बघितले असावे पण चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याला लक्षात आलं नाही तिनेही त्याच्याकडे बघून लगेच नजर वळवली तसं प्रतीक तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि तिला गोळ्या कशा घ्यायच्या ते सांगू लागला. तिच्यासोबतचा मुलगा गाडी वळवून घेऊन आला तसं त्याने आवाज दिला,"मोहिनी झाल असेल तर चल!" "मोहिनी" नाव ऐकून प्रतीक दचकलाच अरे ही पण मोहिनी पण नाव सारखं असून किती फरक ती कुठे आणि ही कुठे? अस मनात विचारलं करतं असतानाच त्या मुलीने तिने चेहऱ्यावरचा रुमाल हटवला आणि त्याला आपला चेहरा दाखवत म्हणाली, "हो मीच आहे." तिने त्या मुलाला आवाज देऊन बोलवलं आणि म्हणाली, "अमन मी तुला बोलले होते ना माझ्या एक्स बद्दल हाच आहे बघ तो ज्याने मला कधीच काही गिफ्ट दिलं नाही किंवा कधी गादीवर फिरायला घेऊन गेला नाही काही दिलं असेल तर फक्त गरिबी आणि भिकारीपणा! साधं हॉटेलला नेणं सुद्धा याला परवडत नव्हतं म्हणून मला ती रस्त्यावरची घाणेरडी पाणीपुरी खाऊ घालायचा! चल बरं झालं तू पण भेटलास याला...आज तुझ्यासमोर याला ब्रेकअप सांगून टाकते आणि हो प्रतीक उद्यापासून माझ्यासमोरही येऊ नकोस भिकार कुठला!"


अमनेही त्याच्याकडे एकदम तुच्छतेने बघितलं आणि दोघे तिथून निघून गेले.

बाजूच्या चहाच्या टपरीवरील रेडिओवर गाणं वाजत होतं.....

"छन से जो टूटे कोई सपना जग सुना सुना लागे...."


क्षणभर प्रतिकला काय घडतयं तेच लक्षात येईना, विश्वास बसेना! ज्या सुंदर स्वप्नासाठी प्रतीक जीवाचं रान करत होता ती तर एक क्षणही त्याचा विचार न करता फक्त पैशांसाठी त्याला सोडून गेली होती.

हाच विचार करत प्रतिकला रडायला होतं. "काय काय स्वप्न बघितले होते! एकमेकांच्या सोबतीच्या सर्व आठवणी त्याला आठवत होत्या. ते वर्गामध्ये एकमेकांकडे प्रेमाने बघणं, कॅन्टीनमध्ये चहाला एकत्र भेटणं, चहा पिताना टेबलवर बसून हातात हात घेऊन बसणं एकीकडे हे सर्व आठवत असताना त्या सोनेरी स्पर्शाची जाणीव झाली आणि या सगळ्यांमध्ये अचानक अमन ने तिला केलेल्या स्पर्शाची आठवण येऊन त्याला तिची घृणा निर्माण व्हायला लागली... कसबसं दवाखान्यातून तो घराकडे निघाला, चालता चालताच असंख्य विचार एकदाच त्याच्या डोक्यात चालू होते. एवढं सगळं होऊनही मोहिनी चुकली हे मान्य करायला त्याचं मन तयार नव्हतं. उलट त्याला वाटत होतं तिची तरी काय चुकी आहे मी एवढा गरीब,भिकारी मग तिने असा निर्णय घेणं सहाजिकच आहे आणि आता त्याला त्याच्या गरिबीचा राग यायला लागला... राग, द्वेष उद्वेग अशा सर्व भावना एकत्र आल्या आणि तो जोरात ओरडायला लागला," देवा माझ्यासोबतच का असे केलं? मला तू का एवढं गरीब बनवलं आणि डोक्याचे केस ओढत जीवाच्या आकांताने तो बोलत होता. एवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला, "You have clered the first stage of golden treasure of Mahival Group please check your bank accoint for details..." तो मेसेज वाचल्यावर त्याला आधी तर हसायला आलं चुकून तर हा मेसेज आला नसेल म्हणून!...

पण महिवाल ग्रुप वाचल्यावर त्याला सगळं लक्षात आलं आणि तो वरती देवाकडे बघून जोरजोरात हसायला लागला..."देवा! धन्य तुझी लीला" असं ओरडत देवाला thanks म्हणून उद्याच आता मोहिनी ला सगळं सांगून टाकाव आणि परत आपल्या आयुष्यात तिला तिची जागा द्यावी या विचाराने तो खुश झाला. "

तसं बघितलं तर प्रतीक हा महिवाल ग्रुपचा सर्वेसर्वा होता परंतु त्याला ती जागा मिळवण्यासाठी काही परीक्षा द्याव्या लागणार होत्या.

त्यातलीच ही एक परीक्षा होती जी तो सहावीच्या वर्गात असताना पासून सुरू झाली होती, शाळेतील फीस व्यतिरिक्त एकही रुपया त्याला मिळणार नव्हता जोपर्यंत तो या परीक्षा पास होणार नव्हता...

प्रतीकही एवढ्या वर्षात हे सर्व विसरून गेला होता आणि त्याला वाटायला लागलं होतं की आता आपण काय या परीक्षा पास होणार नाही आणि आपल्याला असंच भिकारी म्हणूनच मरावं लागणार पण तेवढ्यात आलेल्या या मेसेजने त्याच सार दुःख पळून गेलं...


प्रतीक उद्या मोहिनी ला सगळं सांगेल का? आणि ती सगळं विसरून त्याच्याकडे परत येईल का?


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama