Pradip Warade

Others

4.9  

Pradip Warade

Others

वाट अस्तित्वाची

वाट अस्तित्वाची

1 min
933


वाट अस्तित्वाची

प्रत्येकाच्या आयुष्यात तो क्षण येतो जेव्हा ना दु:ख असतं ना सुख असतं,न तो हवा असतो न ती हवी असते मन आनंदी हि नसते आणि उदासही नसते अगदी या सर्वां पलीकडे जाऊन कुणीही आणि काहीहि हवं नसतं….. आणि मग निवांत “आयुष्य पट” समोर उभा राहतो,झालेल्या चुकांची जाणीव होते, ज्यांची मने आपल्यामुळे दुखावली गेली त्या सर्वांची ‘चलचित्रे’ डोळ्यांसमोर तराळतात स्वतःच्या Ego साठी कित्येकांना कमी लेखले त्या सर्वांची आठवण होते, आयुष्यातील प्रत्येक चुकीबद्दल पश्चाताप, निघून गेलेल्या… नाही नाही आपण आयुष्यातून हाकलवून लावलेल्या त्या सर्व व्यक्तींबद्दल विवंचना, मनामधील घालमेल या सर्वांचा परिपाक म्हणजेच “एक नवी पहाट जीवनाची, जी दाखवते - वाट अस्तित्वाची …..”

तिनं आजपर्यंत आयुष्यात खूप काही गमावलं होत ज्या गोष्टी तिच्या अतिप्रिय होत्या त्या सगळ्या तिने सोडल्या होत्या. मी बघितलं होतं तिला आधीही आणि आताही खूप बदल झाले होते तिच्यात .

कॉलेज्यात असताना ती म्हणजे एकदम कडक, बिनधास्त स्वभावाची आजच्या भाषेत कॉलेजची आर्चीच होती ती 

तीच तेच ते वागणं आम्हा सगळ्यांच्या मनात बसायचं. ती नेहमी म्हणायची, 

"मी त्यांच्यासाठी का बदलू ज्यांचा श्वास सुद्धा इतरांच्या इशाऱ्यावर चालतो "


आणि म्हणूनच इतरांचा विचार न करता मनाला वाटत तशी जगणारी वेळ प्रसंगी खंबीर झाशीची राणी तर कधी अल्लड छकुली, तिचा मुड कुणालाच लवकर कळायचा नाही म्हणून कुणी त्या भानगडीत पडायचा नाही ती कॉलेज मध्ये एन्ट्री करताना गुणगुणत अली म्हणजे मुड भारी… आणि मग गोळा व्हायची सगळी तिच्याभोवती…. मग गप्पा, जोक्स आणि मोठमोठ्याने हसणं, ह्याची उडव त्याची उडव स्वतःची जरी उडवली गेली तरी त्याबद्दल तिला कधी राग येत नव्हता आणि त्यामुळंच ती कॉलेज मधील अनन्य साधारण बनली होती. Song वगैरे नाही किंवा कुणाला बोलली नाही कि समजून जायचं मॅडमच कुणासोबत तरी वाजलंय आणि मग तीला गरजेचा असायचा “एकांत” यात कुणी जवळ गेला तर मेलाच सगळी भडास त्याच्यावर निघायची…..

कितीही काहीही असलं तरी तिला समजावण्याची ताकत फक्त राम्यातच होती. ती रामावर मनापासून प्रेम करायची राम म्हणजे हुशार, तल्लख बुद्धी असणारा कॉलेज च्या गोकुळातील कृष्णच जणू… तो कधी एकटा सापडणारच नाही नेहमी कुठल्या ना कुठल्या घोळक्यात असणारा, भरपूर मस्ती करणारा परंतु त्याच्या जीवनाचं साधं तत्व होत 

 “मिळालं तेवढं हसून घ्यायचं थोडच पण मनापासून जगून घ्यायचं”


आणि नेहमी हसणारा, सर्वाना हसवणारा, गरज पडेल तिथे प्रत्येकाची साथ देणारा पण प्रेमाचा मनापासून तिरस्कार करणारा, ‘युवकांना बिघडवणारी एकमेव गोष्ट म्हणजे ज्याला ते प्रेम समजतात यांना कळत तरी का प्रेम काय असतं ते …


“प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे पूर्तता,

प्रेम म्हणजे आग, प्रेम म्हणजे पूर्णता,

दुर्बळाची शक्ती बनते ते प्रेम ,

अंधाची दृष्टी बनते ते प्रेम,

मुक्याची वाचा बनते ते प्रेम, 

प्रेम ते नव्हे ज्यात युवान बरबाद होतो 

प्रेम तर ते असते ज्याने जग आबाद होते “


आजकालच्या प्रेमाचा त्याला राग येत असला तरी तो होताच असा कि कुणालाही त्याच्या वर प्रेम होईल, परंतु तो मात्र अर्पिताला भेटण्या आधी कुणाच्याही प्रेमात नव्हता हि भेटल्या पासून - प्रेम… म्हणून नाही पण त्याला तिचा सहवास आवडायचा तीच बोलणं, तीच हसणं, तीच पाहणं, ती जशी बोलायची, तो ते तासंतास ऐकत बसायचा ,आणि आता तर जरा जास्तच व्हायला लागलं होत ती सोबत नसतानाही ती सोबत असल्याचा भास व्हायचा, ग्रुपमध्ये असताना एखादा जोक झाला तरी अचानक हसत हसत तिने पाठीवर थाप टाकल्याचा भास व्हायचा अन नकळत राम मागे बघायचा; आता हे जरा जास्तच होतंय असा विचार रामच्या मनात आला. स्वतःच मन रमावण्यासाठी त्याने एक पडलेलं पुस्तक हातात घेतलं पुस्तकाचं नाव होत “yes or no”.

आपला मन मोठं विचित्र असतं त्याला जे पाहिजे तेच ते आपल्याकडनं करून घेत ते पुस्तक वाचताना त्यातील शब्द त्याच्या मनाला भिडले आणि त्याने ठरवले, होऊन होऊन काय होणार? एकतर Yes नाहीतर No पण आज बोलायचंच.त्याने अर्पिताला call केला “बोलना राम, काय झालाय? राम ‘ऐक ना मला भेटायचंय तुला आपल्या कट्ट्यावर ये ना” कट्टा- हो घरापासून जवळच एक चहाची टपरी होती- जिथे राम्या आणि त्याचे मित्र वगैरे बऱ्याचदा भेटायचे. राम्या कुठे नाही भेटला किंवा call नाही उचलला कि तो अड्ड्यावर असणार.

राम वेळेआधीच येऊन बसला होता आणि तयारी करत होता, सुरुवात कुठून करायची? म्हणून तो जरा restless feel करत होता, तेवढ्यात अर्पिता तिथे पोहोचली त्याची अवस्था बघून तीही गडबडली. अरे! नेमकं काय झालय is everything allright ?

रामने बोलायला सुरुवात केली सगळं व्यवस्थित आहे. आधी तू शांत हो आणि मी काय सांगतो ते ऐकून घे लगेच react करू नये. एव्हाना तिला बरयापैकी लक्षात आलं होत आता ती मनातून भयानक खुश होती पण जेवढी ती रामला ओळखायची त्यानुसार तिलाच त्याला बोलायची भीती वाटायची, उगीच तो चिडला तर असलेली friendship जायची आणि म्हणूनच सगळीकडे bold असणारी अर्पिता प्रेमाच्या विषयात मात्र लाजली होती.

लहानपणापासून मला जे संस्कार मिळाले आहेत ते भारतीय संस्कृतीचे. मला आधीपासूनच प्रेम या गोष्टीचा- so called प्रेमाचा किती राग आहे? हे तू जाणते पण आजकाल माझ्यासोबत वेगळेच घडतंय, सगळीकडे तूच दिसतेस तुझे dialogues आठवतात तुझी हसतानाचा आवाज कानात येतो आणि अचानक पाठीवर तुझी थाप पडल्याचा भास होतो….. ऎक ना त्या आभासाला वास्तवात उतरवता येईल का ? तू माझी Shizuka आणि मला तुझा Nobita व्हायचंय..

 खर सांगू का (आता तिच्या चेहऱ्यावरील भाव बघून रामचा confidence वाढला होता ) आणि त्यातच तो गुढग्यावर खाली बसून तिचा हात हाती घेत बोलला ‘माझी जिंदगी लैच भारी चाललीय राव, जरा खराब करायला तू जीवनात हवी आहेस आयुष्यभरासाठी….. ? आणि तिनेही शब्दांच्या पल्याड जाऊन भावना समजल्या आणि मानेनेच होकार दिला… तेवढ्यात ती भानावर आली आणि म्हणाली, काय म्हणालास? जिंदगी खराब करायला!!

 तस तो हसत हसत उठला आणि तिचा मार वाचावा म्ह्णून जरा हळू हळू धावायला लागला आणि ती त्याच्या मागे….

इंतजार कि घडी खत्म हुई,

इजहार से जिंदगी खुलं गई…


दोन वर्ष उलटून गेले होते दोघांनीही ठरवलं होत, तस चांगलं शिक्षण घेऊन दोघांनाही चांगली नोकरी मिळाली होती ठरवल्याप्रमाणे घरच्यांशी बोलावं लागणार होत

दोघेही खूप आनंदात होते, रामच्या वडिलांचा तर तसा या निर्णयाला विरोधच होता, परंतु आता काय करणार? तो घरातला करता पुरुष म्हंटल्यावर…… शिवाय एकुलता एक. दोघांनाही लग्नाबद्दल court marriage करावं यासाठी एकमत झालं आणि त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. सगळं अगदी मजेत चाललं होत. परंतु रामच्या वडिलांना मात्र मनापासून सल होतीच. चांगला १० लाख रुपयांचा हुंडा बुडला हि गोष्ट त्यांना नेहमी सलायचीच,कारण त्यांच्याच एका मित्राने त्याच्या मुलींसाठी रामला विचारले होते आणि १० लाख हुंडा देऊ असं सांगितलं होत.

वर्षभराच्या सुखीसंसारानंतर रामच्या आईने नातवासाठी हट्ट धरला राम आणि अर्पिता दोघेही अजून तयार नाही असे कारण सांगायचे परंतु अर्पिता लाही आता chance घेण्याची इच्छा होती जी तिनेही बोलून दाखवली होती. परंतु राम मात्र अजून नको असं म्हणून टाळून द्यायचा. दोघांच्याही कामामुळे आता हळूहळू संवाद जरा कमी होऊ लागले होते

“जिथे संवाद संपतो तिथेच

संशययुक्त वाद जन्म घेतो….”


आणि शेवटी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं, रामला अर्पिताच्या ज्या bold राहण्यावर तो फिदा झाला होता तेच त्याला आता सलायला लागलं होत. अर्पिता हि स्वच्छंदी मुलगी होती मनाला आवडेल तसं जगणारी तिच्या Bucket list मध्ये असणारी सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी, बँकेतील सगळ्यांशी तीच चांगलं जमायचं, त्यातच तिचे बॉस देखील तिच्यामुळेच एक्दम फ्री बनले होते आणि त्यांची चांगलीच मैत्री जमली होती.

एक दिवस bank मध्ये जरा audit असल्यामुळे Boss ने अर्पिताला थांबवून घेतलं दोघांनीही मिळून काम आटपली आणि मग उशीर झाला म्हणून आपण खायला हॉटेलात जाऊ असं Boss ने अर्पिताला सांगितलं. अर्पिताने याबद्दल राम ला कॉल करून सांगितलं “ऑडिट मुळे जरा उशीर झाला आणि आता आम्ही बाहेरच जेऊन येतोय म्हणून जरा घरी यायला उशीर होईल.”पण “संशय” नावाचा मामा एकदा नात्यांमध्ये घुसला कि नात्याला संपवल्याशिवावाय तो जात नाही. राम ती नेमकी कुठे ? कोणासोबत जाते? हे बघण्यासाठी निघाला .

जवळच असलेल्या हॉटेलमध्ये दोघेही मस्त गप्पा मारत होती, हसत होती, त्याने दुरूनच बघितलं आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने सरळ गाडीला किक मारून बंड्याच वाईन शॉप गाठलं.तिथे दारू पिऊन तो घरी आला अर्पिताला बोलायला त्याला नको वाटत होत, म्हणून बाहेरच्याच खोलीत अंथरून टाकून तो तिथेच पडला वडिलांना एव्हाना लक्षात आलं होत काहीतरी बिनसलंय म्हणून याच संधीचा आपल्याला फायदा घेता येईल. आपल्या श्रीमंत मित्राची मुलगी सून म्हणून आणता येईल अश्या आसुरी आनंदाने मनातल्या मनात ते हसायला लागले. त्यांना कितीतरी दिवसांनी निवांत झोप लागली,इकडे अर्पितालाही थकल्यामुळे निवांत झोप लागली,सकाळी उठल्यानंतर अर्पिताने जेव्हा बघितलं ते अगदी धक्कादायक होतं. अर्पिताच्या bags कपडे वगैरे सगळे भरले जात होते , मामाजी आपल्या मुलाला म्हणजेच रामला म्हणत होते “तुला आधीच म्हणल होतं हि अवदसा आपल्या घरात आणू नको पण आपल्याला लईच पुळका….” आणि नको नको ते बोलून मामाजींनि तिला हाताला धरून बाहेर ढकलले. रामही आज शांत होता अर्पिताने काही विचारण्या आधीच रामने तिच्यावर ओरडला “साहेबांच्या घरी राहायला जा ……..”

आता अर्पिताला सर्व काही clear झालं आणि काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही हा विचार करून तिने माहेरी जाण्याचा विचार केला पण राम त्या आधीच तिकडे जाऊन आलेला होता. त्यामुळे अर्पिता जेव्हा घरी पोहोचली तसं आईने सांगितले “दूर हो आमच्यापासून एकुलती एक म्हणून सगळे हट्ट पुरवले ते काय हे दिवस बघण्यासाठी? आता भोग आपल्या कर्माची फळ” एवढे ऐकल्यानंतर अर्पिताच तिथे थांबणं शक्यच नव्हतं आणि ती निघाली bus stand वरती एका बाकड्यावरती झोपली. सकाळी तिथेच फ्रेश होऊन ती office ला निघाली तिथे गेल्यानंतर staff मधील सगळे तिच्यावरती हसायला लागले " लाज कशी नई वाटत हिला…. अजून वर तोंड करून office ला आली आज….." हे सगळं ऐकून ठरवलं इथून कुठेतरी निघून जायचं तितक्यात तिला आठवण झाली औरंगाबादला राहणाऱ्या काकूंची. लहानपणी ती त्यांच्याकडेच राहायची, तिथे जायचं तिने ठरवलं पण देव किती परीक्षा घेतो ना….. 

त्या काकूही घर सोडून निघून गेल्याच तिथं राहणाऱ्या मावशींनी सांगितलं.त्यांनी मला घरात बोलावलं आणि मग मला विचारलं हि काकू तुझी कोण? मी सर्व घडलेलं सांगितलं मावशी खूपच समजूतदार होत्या, आधी तर त्यानी मला शांत व्हायला सांगितलं मग मावशींनी मला चहा व नाश्ता दिला त्यांनी विचारलं आता इथे काय करणार? आणि पुढे काय planning? मी तशीच बसून राहिले शांत. माझी अवस्था बघून मग त्याच म्हणाल्या हरकत नाही. माझ्या ओळखीच्या ठिकाणी छोटे मोठे काम आहेत. करशील का? आणि मी हो म्हंटल…. “तसही लहान पनापासून कोणत्याही कामाची लाज कधीच वाटली नव्हती, परिस्थितीशी दोन हात करून झुंज द्यायची सवय होती, वाईट फक्त एवढच वाटत होतं कि ज्या माणसांसाठी आपण एवढा त्याग केला तीच आज सोबत नाहीत.

 काम लहान मुलांना साम्भाळायचं होत. त्यांचं काय हवं नको ते त्यांच्या सर्व गरजा बघणे, पण अर्पिताने आता ठरवलं होत, आज काहीही झालं तरी परत फिरायचं नाही. MPSC परीक्षासाठी तयारी करायची असं तिने ठरवलं आणि म्हणतात ना “एकदा सर्व जग साथ सोडून निघून जातात तेव्हाच आपण जगातील सर्वात जवळच्या व्यक्तीला म्हणजे स्वतःला भेटतो आणि अर्पितानेही ते ओळखलं होत… 

वर्षभर अभ्यास… सगळी काम… यात तिने स्वतःला वाहून घेतलं, आज परीक्षेचा दिवस तिने खूप तयारी केली होती; परंतु आजच तिच्या मैत्रिणीचा call आला आणि तिच्या वडिलांना attack आल्याची बातमी तिला कळली पण 'एकतर वचन द्यायचं नाही आणि दिलतर पाळायचं’ असे म्हणून स्वतःला सावरत ती त्याच निवांत ठिकाणी बसलेली होती आणि विचार करत होती तेवढ्यात बॉस इथे आले..

“मग आता परीक्षाला जायचं का नाही?” त्यांनी विचारलं. “जी जीवनात हरली ती या परीक्षेत कधी पास होईल?” तिचा तो सूर ऐकून मला विश्वासच बसेना हि तीच अर्पिता आहे का ? आणि मी तिच्यावर ओरडलो आज मी जे काही करतोय business, घर, गाडी केवळ तुझ्या ideas मुळेच. अर्पिता तू जर EXAM ला नाही गेली तर जीवनातून हरशील आणि मला सांग तुझ्या बाबाना हे आवडेल ? त्यांचा आत्माही सुखावेल का आपल्या मुलीचा उध्वस्थ संसार आणि जीवन बघून? 

जर तू exam पास केली तर सर्व चित्र बदलेल वडिलांबद्दल ऐकून तिले exam ला जाण्याचं ठरवलं….

 आज ३ महिन्यानंतर final result होता अर्पिता PSI झाली होती खूप खुश होती. इकडे राम ला देखील आपल्या चुकांबद्दल खंत वाटत होती, मोठी हिम्मत करून तो तिला भेटायला गेला. तब्बल २ वर्षानंतर ते एकमेकांच्या समोर आले होते कस बोलाव हे राम ला काळात नव्हतं तरीही डोळ्यात पाणी आणत तो बोलला “चुकल माझ चल आता परत आपल्या घरी सगळे जण तुझी वाट पाहत आहेत” मनामध्ये असलेला सगळं राग आवरत ती बोलली “२ वर्षात एकदाही तुला मला भेटावसं वाटलं नाही, जेव्हा मला तुझी खरंच गरज होती त्याच वेळी तू नव्हतास….”

“वो कैसे हमसफर जो बीच राह में साथ छोड जाये, 

हमसफर तो वह जो जाण दोस्ती के नाम कर जाये”


आणि एकदा चूक झालीय ती मी आता परत नाही करणार असं म्हणत तिने बॉस ला म्हनजेच प्रदीप ला कॉल केला आणि विचारल "माझ्याशी लग्न करशील?" प्रदीप तसाही तिच्यावर मनापासून प्रेम करायचा पण कधी त्याची जाणीव त्याने तिला होऊ दिली नव्हती आणि आज असं समोरून विचारल्यावर त्याला राहवलं नाही तरीही तो म्हणाला " जर राम हो म्हटला तरच... " आणि पुन्हा अर्पिता ने राम कडे बघितलं… काय समजायचं ते त्याला समजलं होतं आणि खाली मन घालून तो निघून गेला....


Rate this content
Log in