Anil Chandak

Thriller

2.5  

Anil Chandak

Thriller

काळ आला होता,पण वेळ आली नव्हती

काळ आला होता,पण वेळ आली नव्हती

3 mins
2.0K


काळ आला होता,पण वेळ आली नव्हती


एकदाची परीक्षा पार पडली, चिंग्याने धावतच घर गाठले .दप्तर जवळ जवळ टेबलावरती फेकूनच दिले. आज त्याचा मूड खुप चांगला होता. आजचा पेपर खुप छान होता.


येता येताच, त्याच्या मनात उद्याचे नियोजन चालले होते.आईने बाहेर येऊन त्याला पाणी दिले ."काय रे कसां गेला, पेपर. " "छानच होता आई". 


तिने त्याला ग्लासभर ताक पिण्यास दिले. चिंग्या घाईघाईत गटगट प्याला." अरे,अशी कोणती घाई आहे आता ,हळु पी की. दमाने".

" आई मी चाललो आंघोळीला,ओढ्यावर.". " अरे ही काय वेळ आहे,आंघोळीची, तुझ्या बाबांना कळलं तर मार खाशील." "आई बाबांना प्लिज ,सांगू नको."

अन तसाच तो टाँवेल, कपड्याची पिशवी घेऊन, आईचं न ऐकता घराबाहेर पडला.

सूर्य डोक्यावर आला होता. तसा चालत चालत, तो मधूच्या घरी आला .तो, मधु व संतोष, एकाच वर्गात होते, एकमेकांचे जिवलग दोस्त होते. त्यांच आधीच ठरलं होतं.

मधु तयारच होता, तेवढ्यात संतोष ही येऊन मिळाला,अन तिघे ओढ्याकडे निघाले.

आता ओढ्यावर कोणीच नव्हती. कपडे धुणाऱ्या बाया ही केव्हाच घरी गेल्या होत्या.


आज सकाळ पासून, वातावरणात बदल होत होता, आकाशात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे उन्हाचा त्रास कमी झाला होता.

ओढ्यांवर पोहोचताच ,शर्ट काढून फेकून दिले, हाफ पँटवरच ओढ्यात जाऊन पडले. थंड पाण्याचे तुषार अंगावर पडताच, मने उल्हासित झाली त्यांची. एकमेकांवरती पाणी उडवीत खेळु लागली. खेळता खेळता,शाळेत आज काय घडले ते सांगु लागले." काय रे मध्या,खिशात एवढी कागदाची जंत्री घेऊन गेला होता, तुला पकडलं नाही." अरे काय सांगु तुम्हाला, त्या बाप्याच्या मुर्खपणामुळे, जवळ जवळ सापडलोच होतो मी,पण वाचलो, देवाचीच कृपा."

"ए काय, झालं,सांग ना आम्हाला".

"चिंग्या त्या बाप्याने तर,माझा पेपरच, काँपीसाठी हिसकावला होता. मस्तपैकी लिहीत बसला, तेवढ्यात परिक्षक तेथे आले,अन बाप्याजवळ उभे राहिले. तेवढे तरी बरे,आधीच बाप्याला चाहुल लागली,अन त्याने तो पेपर आपल्या पेपरच्या खाली ठेवला.पण माझी तर दातखीळच बसायची वेळ होती. मला भीतीने घामच फुटला.

पण तेवढ्यात बाहेरून,शिपाई पुरवणीचा गठ्ठा घेऊन आला,अन ती संधी साधून माझा पेपर घेतला." ते ऐकून ती दोघे हसायला लागली.


खरोखरच, बालपण किती मोहक असते, त्या गप्पा टप्पा, खेळ माणसाला,आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऊर्जा देतात.


म्हणूनच प्रत्येकाच्या मनात लहानपण लपलेले असते.  

आता त्यांचा खेळ, रंगात आला होता, तेवढ्यात तिथे एक लहान मुलगा तिथे आला, तो केव्हापासून या तिघांची मस्ती पाहात होता.त्याला ही पाण्यात डुंबण्याची सुरसुरी आली,अन त्याने ही ओढ्यात उडी घेतली. तो त्यांच्या ओळखीचा, गावचा नव्हता, त्यामुळे तो काय करतो, याकडे त्यांचे लक्ष नव्हते.
हे तिघे,पोहण्यात मश्गुल असताना, तो लहानसा मुलगा एकटाच खेळु लागला.अन एका बेसावध क्षणी, त्याचा पाय घसरला,अन तो पाण्याबरोबर वाहत जाऊ लागला. त्याला पोहताही येत नसावे.

अचानक चिंग्याचे लक्ष त्याच्याकडे गेले, तेव्हा तो बरेच लांब गेला होता. ओढ्याला चांगलाच वेग होता.

मग मात्र ते तिघे,खेळ सोडून तिकडे धावले.

तो. मुलगा,डुबक्या खात, डोहाकडे जात होता,

चिंग्याने अक्षरश:जीव तोडुन त्याला गाठले, पण पाण्याने डोहाजवळ भोवरा झाला होता.

चिंग्या ही त्या मुलाच्या मागे डोहात शिरला.

पण डोहात तो मुलगा आणखीन खाली जाऊ लागला.चिंग्याने त्याला खेचायचा प्रयत्न केला, पण त्याची शक्ती पुरी पडेना.

तेवढ्यांत मागून मधु व संतोष ही आले. तिघांनी हिकमतीने पकडले ,पण डोहातून बाहेर पडता येईना.


बराच वेळ झाला तरी,चिंग्या अजून जेवायला येईना ,तेव्हा तिने घाबरत घाबरत, चिंग्याच्या वडिलांना सांगितले.

वडील खुप रागावले. पण लगेच शर्ट घालुन,ओढ्याकडे निकाले, त्याला असे घाईघाईने जात असताना, गावातली आणखीन तरणी पोरं ही निघाली.


डोहाजवळ गेले असताना, ही चार पोरं बुडत असताना दिसली, ते दृश्य पाहुन काळजात चरर्र झाले.

सोबतच्या तीन चार तरण्या पोरांनी भराभरा डोहात उड्या घेतल्या. ते सारे पट्टीचे पोहणारे होते. त्या सर्वांनी मिळून त्या सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले.

त्यांना पालथं झोपवुन पोटातलं पाणी बाहेर काढलं, मुलं थकल्यामुळे भीतीने बेशुध्द पडली होती. कुणीतरी डाँक्टरला ही लगोलग बोलवायला गेले,ताबडतोब दवाखान्यात नेऊन सलाईन लावली.थोड्या वेळाने सर्वांमुळे धोका टळल्यानंतर गावाने सुस्कारा सोडला.


चिंग्याच्या वडिलांना, खुप राग आला होता, पण आपल्या मुलांने केलेला पराक्रम पाहून,त्यांना अभिमानाने भरते आले.

ते सारे गावात मारूतीच्या मंदीराजवळ जमले. एव्हाना त्या छोट्याशा गावात ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली होती. मग चिंग्याच्या वडिलांनी सर्वांना चहा पाजला.

त्या मुलाचा ही तपास लागला, तो एका मेंढपाळाचा मुलगा, होता.

रात्री सर्व गावांच्या वतीने सरपंचाच्या वतीने, अन साऱ्या मेंढपाळाच्या वतीने चिंग्या, मधु, संतोषचा सत्कार करण्यात आला.

अशारीतीने वेळ आली होती काळ आला नव्हता.सारी सुखरूप राहिली, ही मारूतीरायाचीच कृपा होती.Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller