वैचारिक लेख-शान मराठी,अभिमान म
वैचारिक लेख-शान मराठी,अभिमान म


जय जय, महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!!
दख्खनचा दरारा, वाढवणारा,काळ्या खडकांचा,महाराष्ट्र, सह्याद्रीप्रमाणेच,राकट कणखर,ज्वालामुखीतुन तयार झालेला, महाराष्ट्र, पश्चिमेला अरबी समुद्राची लांबलचक किनारपट्टी,सह्याद्री,विंध्य,सातपुड्याच्या डोंगर रांगांनी वेढलेला,
गोदावरी,कृष्णा,प्रवरा मुळा,भीमा,तापी नर्मदा सारख्या नद्यांनी समृद्ध केलेला.दऱ्याडोंगरातील डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य.
सह्याद्रीच्या मुशीत तयार झालेली कणखर,राकट, पण देवभोळी साधी सात्विक माणसे .
भात मासे,ज्वारी बाजरी सारखे अन्न ग्रहण करणारा मराठी माणुस.
छत्रपती शिवरायाच्या राष्ट्रवादांनी प्रेरित असणारा माणुस,महात्मा फुले पतीपत्नी,शाहु,आंबेडकर ,लोकमान्य टिळक यांच्या विचारानी ज्याचे अंगपिंड पोसला गेला आहे,तो मराठी माणुस.स्वातंत्र्यवीर सावरकर,तात्या टोपे,वासुदेव फडके,झांशीची राणी लक्ष्मीबाई,शिंदे होळकर,पहिले बाजीराव पेशव्यासारखी ,प्रेरणादायी नररत्नांची खाण असलेला.
मरहठ्ठ ,म्हणजे कधी मागे न हटणारा,किती ही संकटे येऊ द्या,खंबीर धीरोदात्तपणे प्रतिकुल परिस्थितीत लढणारा.ज्यांच्या वीरांनी थेट अटकेपार झेंडे लावुन,भीमागोदां काठच्या तट्टुंना अटकेचे पाणी पाजले होते.
हिंदवी स्वराज्याचे स्वप्ने पाहून शिवरायांनी ते अमलांत आणुन इथल्या समशेरीचा धाक जगाला बसविला.इथला एक एक दगड,गडकिल्ले शुर मावळ्यांच्या
सांडलेल्या रक्ताने भारलेला आहे.पराक्रमाच्या कथा,दंतकथा इतिहासातुन आपल्यासमोर येतो,अन अभिमानाने आमची छाती फुगून येते.
शिवाजी महाराजांची दृष्टी एवढी विशाल होती की पुढील काळ हहा समुद्री आरमारांचा आहे हे त्यांनी जाणले.प्रबळ आरमार व समुद्री किल्ले उभारून त्यांनी विलायती इंग्रज,डच,पोर्तुगीज,फ्रेंच आरमारांना शह दिला.
शिवाजी पुर्व काळात ही यादव,सातवाहन सारखी मराठी राजवटी होऊन गेल्या.
साऱ्या जगाला भुरळ पाडणारी,स्वप्ने विकणारी मुंबई, हरहुन्नरी कलावंताची मुंबई नगरी आहे.जगातील एक अग्रगण्य शहर,महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई अहोरात्र धावतच असते.वेग हा इथला मंत्र आहे.सर्व थरातले जातीधर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात.असं म्हणतात मुंबईत, रहायला घर मिळणार नाही एकवेळ,पण कोणी उपाशी झोपणार नाही.
महाराष्ट्राची खरी संस्कृती,संतांच्या आध्यात्मिक वाग़मयात आहे.अध्यात्मिक ज्ञानाने इथे सहिष्णुता,सर्वधर्मभाव, दिले.पंढरीची वारी,भगवा जरीपटका, छत्रपती शिवराय,धर्मवीर संभाजी, इथले मानबिंदू आहे. नामदेव,ज्ञानदेव,तुकाराम, समर्थ रामदासस्वामी सारख्या असंख्य संतांची मांदीयाळी आहे.
तुळजापुरची मायभवानी,पंढरीचा पांडुरंग,कोल्हापुरची महालक्ष्मी,सप्तशृंगी गडावरची माता,माहुरगडावरची आई ,जेजुरीचा खंडोबा इथली कुलदैवते आहे.
महात्मा फुले,राजर्षी शाहु महाराज,आंबेडकर ,लोकमान्य टिळक,यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राला आहे.त्याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.
कोकण,प.महाराष्ट्र,खानदेश,मराठवाडा, विदर्भ ,असे विभाग आहेत.
माझी माय मराठी भाषा ,दर बारा कोसावर बदलते,त्या त्या भागातल्या बोलीभाषेचे तिच्यावर संस्कार झाले आहेत.मराठी भाषा बहुवीध अलंकार,शब्द सुमन,प्रतिभा,काव्य साहित्य,आदी विविधतेने नटली आहे.म्हणुनच ज्ञानदेव माऊली म्हणायचे," अमृताचे ही पैजा जिंके,आमची मायबोली".
या मातीत असंख्य आंतरराष्ट्रीय किर्तीचे कवी,साहित्यक ,नाटककार, संगीतकार, गायक जन्माला आले,अन त्यांनी मराठी साहित्य अजरामर केले.
म्हणूनच आम्ही अभिमानाने म्हणतो." आम्ही चालतो बोलतो मराठी!
मान मराठी! शान मराठी!!
गोदावरी,कृष्णा,प्रवरा,मुळा,तापी, नद्यांच्या सुपीक खोऱ्यांनी इथले जीवन समृद्ध केले आहे.
महाराष्ट्र ही सहकाराची जन्मभूमी, हरित क्रांती,दुग्ध क्रांती,शुगर लाँबी मुळे सर्व भारतात पहिल्या नंबरवर आहे.
स्रीयांविषयी आदरणीय पुज्यभाव लक्षणीय आहे.भारतातील मुलींच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ इथे सावित्रीबाई फुलेंनी केली.
झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिलाबाई होळकर जिजाऊमाता ,ताराराणी आदी असंख्य महिलांनी रणांगण,राजकारणात कसलेल्या मुत्सद्यांना ही मागे सारले.
भारतातील दुसऱ्या कोणत्या ही प्रांतातील स्रीयांपेक्षा इथे असंख्य स्रीया प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करीत आहेत.नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत.त्या बरोबरीने मुलांवर त्या लहान पणापासून उत्तम संस्कार घालतात.म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी, पुज्य ती जगा दारी असे म्हंटले जाते.
महाराष्ट्रात जो कोणी आला,तो इथला होऊन गेला.इथल्या मातीत मिसळून कायमचा इथला झाला.
इराणी, पारशी,ज्यु लोकांना त्यांच्या देशाने देशोधडीला लावले,महाराष्ट्रानेच त्यांचा प्रतिपाळ केला.
गणेश उत्सवात महाराष्ट्रात उत्साहाला उधाण येते.आरास,महाकाय मुर्त्या मिरवणुकांनी वातावरणात उर्जा,चैतन्य वाहते.
गोकुळष्टमीला दहीहंडी साठी हजारो लोक जमतात.राखी पौर्णिमा असो,बैलपोळा असो,गुरूपौर्णिमा असो,महाराष्ट्र कृतज्ञभाव,व्यक्त करतो.
लक्ष लक्ष दिव्यांनी दिपावली येते,वसुबारस,नरक चतुदर्दशीचे अभ्यंग स्नान,धनतेरस,लक्ष्मीपुजन,बळीप्रतिपदा पाडवा अन भाऊबीज धुमधडाक्यात साजरी होते.
नवनवे वस्र,घरदार अंगणातील स्वच्छता,रांगोळ्यांनी सजलेले अंगण,लाडु चकल्या,करंजी,चिवड्याच्या फराळ, फटाकड्यांनी दिपावलीचे स्वागत होते.
पुरणपोळी,श्रीखंड,केशरीभात,बासुंदी आदी खावी तर महाराष्ट्रातच,पण वांग्याची काळ्या मसाल्यातली भाजी,मासवडी, तर्रीदार मिसळ ,पावभाजी ,ज्वारीचा हुरडा,कांदाभजी,लाल मिरचीचा ठेचा खावा तर महाराष्ट्रातच.
शाकाहारी काय मांसाहारात ही विविधता आहे.
देश कधी ही संकटात असो,हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावुन गेला आहे.म्हणूनच महाराष्ट्राला भारताचा खड़गहस्त म्हणतात.
भारतीय सेनेत मराठी सैनिक हरहर महादेव या वीरगर्जनेने शत्रुवर चाल करून जातात.इथे वीरांची परंपरा आहे.
स्वातंत्र्य चळवळ असो,शैक्षणीक,औद्योगिक,वैचारिक,साहित्यक राजकारणात महाराष्ट्र देशात जगांत आघाडीवर असतो.
महाराष्ट्रीय माणसे जगभरात जिथे जिथे गेली,तिथे तिथे त्यांनी नामच कमावले.
लावणी,पोवाडे,तमाशा ,लोक संगीत ही ग्रामीण महाराष्टाची खासियत.
लाल मातीवरची कुस्ती,कब्बड्डी,खोखो हे इथले मैदानी खेळ.
मकरसंक्रांत होळी,धुळवड,रंगपंचमी, शिवजयंती,आंबेडकर जयंती,व हनुमान जयंतीपर्यंत चालणाऱ्या गांवागावांतील जत्रा.
ग्रामिण भागात,स्रीया नऊवारी पैठणी साडी,नाकात नथ,सुवर्ण अलंकार, घालुन सणासुदीला सजतात.
नवरात्री उत्सव,विजयादशमी दसरा ही इथे धुमधडाक्यात साजरे होतात.
सर्वधरःमीयांचे सण ही तेवढःयाच उत्साहाने इथे साजरे होतात.
म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीचा,संस्कृतीचा, आम्हा गर्व आहे, परंपरांचा,सात्विकतेचा,सहिष्णुतेचा अभिमान आहे.
जयहिंद, जय महाराष्ट्र !!