Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Anil Chandak

Others

5.0  

Anil Chandak

Others

फँशनचे मायाजाळ

फँशनचे मायाजाळ

2 mins
727


आजकाल आपण सर्वत्र पाहतो, सौंदर्याच्या कल्पना बदलल्यामुळे,प्रत्येकजण मनमोकळेपणाने खर्च करीत असतात.

एकदर नोकरीसाठी इंटरनँशनल कंपन्यात जावे लागत असल्याने,कपड्यातली आधुनिकता साहजिकच आली.

जगाला भारताच्या तरूण मध्यम वर्गाची प्रचंड क्रयशक्ती खुणवीत आहे. आयटी कंपन्यांच्या मुळे इथल्या तरूण मुलांच्या हातात, योग्यतेपेक्षा अल्पावधीतच जास्त पैसा येतो.


जी कंपनी जास्त पँकेज देईल,तिकडेच त्यांचा ओढा असतो. 

विदेशी कंपन्यांना भारतातले मार्केट काबिज करावयाचे असल्याने,जे माँडेल्सचे शो पुर्वी युरोपात व्हायची,ती दिल्ली मुंबईत ही व्हायला लागली आहेत.

माँडेल्स इथल्या फँशन डिझायनरचे दिलेले कपडे घालत असल्याने तर,सध्या माँडेलिंग,फँशन डिझायनर,चे कोर्सेससाठी काँलेजेसचे पेव फुटले आहे.


भारतात तर इंग्रज,मुगलांनी बरीच वर्षे राज्य केल्यामुळे,गोऱ्या रंगाचे जनमाणसात आकर्षण आहेच. इथल्या मुलांना काळी मुलगी सहसा चालत नाही.

मग माध्यम सिनेमा,दुरदर्शन ,वेब्स सिरीयल्स काही ही असो,गौरवर्ण,सुंदर उंचेल्या मुलींची चलती आहे.

घरात वधु आणतांना ही गोरी,रूपवान मुलगी ज्याला त्याला हवी असते.


अन पुर्वीपासून पी हळद अन हो गोरी असा समजच आहे,त्याचा फायदा माल उत्पादक कंपन्यांनी घेतला नाही तर नवल कसले.


आता टिव्ही मोबाईल मुळे सारे जग जवळ आले आहे, त्यामुळे शहरी,ग्रामिण हा फरक राहिलेला नाही.त्यामुळे जीन ,टी शर्ट,शरारा अशी शहरी भागातच वापरली जाणारी वस्रे आता ग्रामिण भागात ही वापरली जात आहेत,याचाच अर्थ असा की,ग्रामिण भागातलन मोठं माकर्केट आता,उद्योगांसाठी खुले झाले आहे.


पुर्वीच्या काळी हेमामालिनी ,मुमताज व मालासिन्हाने आकर्षक केशरचना करून महिलांना वेड लावले होते.राजेशखन्नाचा गुरू कडता व अभिताभचे केसांचे कल्ले व बेलबाँटम पँट, गल्लीबोळातले हिरो घालत होते.

अन ही फँशन दर वीस वर्षांनी परत येते म्हणतात.

जुन्या फँशनचे कपडे घालणाऱ्या मुलीला काकुबाई,व मुलाला गांवढळ समजले जाते.

आज तर केसांच्या एवढ्या रचना आलेल्या आहेत की,आपले डोके चक्रावून जाते.

मुली व महिलांनी पंजाबी ड्रेस स्विकारला आहे तर जमाना मात्र लेगीन्स व टाईट टाँपचा आहे.


मोठमोठे माँल्स व त्यांच्या शाखा आता भारतभर पसरत आहेत.

मिस वर्ल्ड,मिस युनिवर्स सारख्या जागतिक पातळीवरील स्पर्धात भारतीय मुली हिरीरीने भाग घेत आहेत. अन विजेता ही ठरत आहेत.


टिव्हीवर ही ही फँशन जनतेच्या मनी ठसविण्यासाठी,रोज रोज नवनवीन रिअल शोज चालु आहेत.त्यात प्रामुख्याने सिलीब्रिटीजचा समावेष असतो.सिलीब्रिटी जरी असले तरी राग क्रोध,द्वेष ईर्ष्या या त्यांच्यातही तेवढ्याच असतात.अन त्यांचे प्रदर्शन कँमेऱ्याद्वारे गुपचुप जनतेसमोर टि आर पी वाढविण्यासाठी मांडले जाते.

प्रत्येक गावांतील पुढारलेली महिला मंडळे लोकल लेव्हलवर स्पर्धा आयोजित करीत आहेत.त्यात कँटवाँक वगैरे साऱ्या गोष्टी आल्याच.

सौंदर्यवान सिनेअभिनेत्री,फँशनची चालती बोलती अँबेसडर बनल्या आहेत.

त्याचं मुळ कारण म्हणजे,त्या अनुशंगाने होणारा मालाच प्रचंड खप.प्रत्येकाची नजर त्यावरच आहे.

अन आता गँट करारामुळे,साऱ्या जगाला आपली मार्केट खुली करणे बंधनकारक झाले आहे,अन आपण ही त्यापासून दुर राहु शकत नाही.


फँशनच्या या मायाजाळात कोळ्यापरि सारेच अटकले आहेत.ती गत स्विकारण्याशिवाय पर्यायच नाही.


Rate this content
Log in