विद्वान सर्वत्र पुज्यते
विद्वान सर्वत्र पुज्यते
नेहमीप्रमाणे शरद फिरावयास आला तेव्हा किसनराव कामात गुंतलेले होते.संध्याकाळी फिरायला जायचं म्हणजे जायचं.
शरिर व मन दोन्ही ही मोकळ व्हायचं.
"अरे शरद, आज मितल कंपनीच्या CEO चा फोन आला होता.यंदा कंपनीने काँन्फरन्स अँमस्टरडँम,नंतर हाँलड ,फ्रान्स,व वेळेत जमेल तेवढी आजुबाजुची शहरे पहायची टुर आहे.फारच आग्रह आहे त्यांचा.मी अजुन काही त्यांना हो म्हटलं नाही."
किसनरावांची ती सवय होती.भावनांचं प्रदर्शन कधीच नसायचं. एवढ्या साऱ्या डिलरमधुन आपल्यालाच पहिला फोन यावा,याचा त्यांना अभिमान होता." मग काय करावं मी शरद."
" काय करावं म्हणजे,अरे ओली पार्टी झाली पाहिजे.
" तुझं आपलं शरद वेगळंच काही तरी असते.कुणांच काय अन कुणाला काय,बोडकीला केसाचं ओझं!पार्टी ना दिली."
शरद मात्र बेरकीच त्याने प्रश्न टाकलाच,"पण किसन,त्याने तुलाच एवढ्या लोकांतून निवडले कसे,कळत नाही मला."
" अरे शरद भोळाच राहिला रे तू.अन तुम्हांला माझी किंमत कधीच कळणार नाही.तू माझा लंगोटीयार आहे म्हणून धकवुन घेतो.सारे मलाच बोलावतात.कारण"विद्वान सर्वत्र पुज्यते."
किसनराव एक पदवीधर सुशिक्षीत व्यक्ती.अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले.ग्रँज्युएट झाल्यानंतर साखर कारखान्यात नोकरी ही केली.सहकार क्षेत्रात नोकरी केल्यामुळे ,माणसे ओळखायचा वकुब पाठिशी होता. ग्रामिण बेरकीपणा होताच.बरेच दिवस नोकरी केल्यानंतर स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरविले.कारण त्यांचा बराच मित्रपरिवार व्यवसायात होता व व्यापारी वर्गात उठबस होती. बुध्दीला,कष्ट,मेहनत,चिकाटीची जोड असल्याने,व्यवसाय नांवारूपाला आला.लक्ष्मणासारखे भाऊ त्याची पाठराखण करित होती.ते दादा हाक मारत असल्याने सारा गांव दादा म्हणत होता.
ह्यापुर्वी ही त्यांनी कंपनीतर्फे सिंगापुर दर्शन केले होते.विमान प्रवास,पिण्याची हौस भागवली जायची.सिंगापुरला खुप भारतीय पर्यटक असल्याने,त्यांना काही वेगळं वाटलं नाही.
सिंगापुरच्या वेळेस मित्रांनी ,फार थाटात,दादा व वहिनीला निरोप दिला होता.
सिंगापुरला सगळ पाहिलं,पण बायको बरोबर असल्याने, ऐन जवानीच्या दिवसात ही तिथलं रंगेल लाईफ अनुभवायचं राहुन गेलं,तेवढी एक खंत त्यांना कायम होती.
काळ जसा गेला ,त्यानंतर किसनरावांच्या मुलीचं ही लग्न झाली. इंजिनियर मुलगा ही,सुन घेऊन आला.आता नातवंडांत त्यांचं आयुष्य छान चाललं होतं.किसनरावांना पुढारी छाप कडक पांढरा ड्रेस व पायजमा खुप आवडायचा.
किसनरावांना बरेच छंद होते.मराठ्यांचा इतिहास,संतांचे अभंग,वगैरे.तमाशा व लावणी त्यांना जीव की प्राण होती.
तंबाखु चुन्याबरोबर हातात चुरून , थाप मारून ओठाखाली तोंडात ठेवली की,त्यांच्या रसवंतीला बहर यायचा.
मित्रांमध्ये गप्पा मारायला बसले की,सोबत कुणी ही असो,आपलं म्हणणं रेटुन,त्याला डोस पाजल्याशिवाय सोडायचे नाहीत.तेव्हां बाकीच्यांना चुप राहण्यावाचून पर्याय नसायचा.एखाद्याने प्रत्युत्तर दिले तर,ते त्याला हमखास वेड्यात काढायचे.एकदा सुरू झाले की,थांबायचं माहितचं नव्हतं.
तर असे हे आमचे किसनराव सरतेशेवटी ,प्रवासाला निघाले.मुंबईहुन प्लेन होतं,ते आपल्या कुटुंबीयासोबत,मुंबईला विमानतळावर पोहोचले.विमान प्रवास आता पुर्वीपेक्षा स्वस्त झाल्यामुळे विमानतळ,बस स्टँडसारखं गजबजलेलं होतं.पुर्वीच्या हिंदी सिनेमातल्या दृश्यासारखा रोमँटीकपणा नव्हता. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापली आँफिसे थाटलेली होती.यावेळेस त्यांची पत्नी बरोबर नसल्याने कुटूंबीय चिंता करीत होते,पण कां कोणास ठाऊक किसनराव खुशीत होते.ट्राँलीवर बँगा टाकुन स्वत: ढकलत चेकींग पोस्टवर आले तिथे लाईनीत उभे राहुन सामानाचे वजन चेक झाले. आले. इतर डिलर्स ही होते.
कंपनीचे अधिकारी सोबत असल्याने काळजीचा प्रश्नच नव्हते.
अधिकाऱ्यांनी लाऊंजवर सारे सोपस्कार पार पाडले.व्हिसा तपासुन पाहिला.रेल्वेच्या गाड्यांसारखं इथं ही अनौंसमेंट चालु होती.
विमानाला उशीर होता,तेव्हां किसनरावांनी एकदा तंबाखुचा बार हाणला,न जाणो पुढे खायला मिळते की नाही.कारण इथे भारतात थूकता येईल,पण परदेशात दंड भरावा लागतो. सोबत खिशात एक प्लँस्टिकची पिशवी ही घेतली होती.पुढची सोय म्हणून.विमान लागेपर्यंत,दोन तीन वेळेस टाँयलेटला ही जाऊन आले.
एकदाचं विमान लागल्याची अनौंसमेंट झाली,अन किसनराव ,पुन्हा एकदा चेंकींगमधून,लुफ्तांसा एअरलाईन्सच्या विमानाकडे निघाले.विमानातल्या त्या गोऱ्यापान,सोनेरी केस,निळ्या डोळ्याच्या,सौंदर्याच्या पुतळ्या एअरहोस्टेस बघून एंट्रीलाच,किसनरावांचा कलेजा खल्लास झाला.जर्मन उच्चाराच्या इंग्रजीतून त्या प्रवासांशी संवाद साधीत होत्या.तेव्हां किसनने अँमस्टरडँम असे काहीसे ,मोडक्या तोडक्या इंग्रजीतुन म्हटलं.अन आमचं ठिकाण आलं तर,आम्हांला झोपेतून उठवा,असा जोक मारला.रिस्पॉन्स साठी,आजुबाजुला पाहिले,सोबतचे किसनरावाच्या गटातील डिलर लोकं हसली,पण त्या पोरी निर्विकारपणे स्मित हास्य करीत होत्या.कदाचित त्यांना जोक समजला नसावा.
एकदाची किसनरावांना सिट गवसली. किसनरावांना सीटबेल्ट बांधता येत होता,पण एअर होस्टेस आपल्या हाताने बांधते आहे,पाहिल्यावर,आपण ही नाही कशाला म्हणा. ती जवळ आल्यानंतर अंगावर सेंट मारलेला सुवास त्यांच्या नाकांत दरवळला.त्यांनी दिर्घ श्वास घेऊन तनामनांत साठवला.बेल्ट बांधतांना तिच्या हाताच्या स्पर्शाने त्यांना मोरपीस फिरल्यापरि गुदगुल्या झाल्या.
तेवढ्यांत किसनरावा शेजारच्या सीटवर एक युवती बसली.तिला पाहुन किसनरावांना हायसे वाटले.किसनरावांनी हळुच एक दृष्टिक्षेप जोडीदारांकडे टाकला.त्यांच्या चेहऱ्यावर असुयेचे भाव उमटले होते.बिचारे आपापल्या बायका बरोबर गुपचुप बसले होते.
त्यांच वेळेस विमानाने टेक आँफ घेतले,जसं जसं ,रन वे वरून विमान वर जात होतं,विमानतळ,व मुंबईतील झगमगाट बारिक बारिक दिसत होता.नंतर समुद्रावरून जातांना पाण्याशिवाय काही दिसत नव्हतं.
एअर होस्टेस पाणी सर्व्ह करीत होत्या.किसनरावांनी पुर्वीच्या अनुभवावरून ड्रिंक्स ड्रिंक्स असे पुटपुटले. एअरहोस्टेस मुरलेली होती,ती काय समजायची ती समजली.तिने लागलीच एक व्हिस्कीचा पेग आणुन त्यांना दिला. किसनराव पट्टीचे पिणारे होते. एक पेग रिचवताच, मोकळेपणाने त्यांनी शेजारच्या युवतीला ही घेण्याचा आग्रह केला.कुठं त्यांना खिशातुन द्यायचा होता.तिने ही ,नकार दिला नाही.ती मुलगी हेडफोन घालुन, म्युझिक ऐकत होती.
ड्रिंक्स पित असतांना तिने,हेडफोन काढला होता.किसनरावांनी तिचे नांव गांव विचारले.तेव्हा तिने मोडक्या तोडक्या मराठीत" काका मी मुळची बेळगांवच्या मराठी कुटुंबातली,पण कानडी भर्तार केल्यामुळे,जर्मनीत दोघे नवराबायको आय टीकंपनीत सर्वीस करतो.बऱ्याच वर्षापासून भारतात NRI म्हणून येतो."
तिने काका संबोधताच,किसनरावाचा चेहरा पडला.त्यांचे हिरवे मन दुखावले गेले.पण त्यांनी तसं दाखवलं नाही.त्या मुलीने लागलीच हेडफोन चढवून म्युझिक ऐकायला लागली.
एव्हांना किसनरावांवर ड्रिंक्सचा असर होत होता, मन खुलले होते,त्यांनी बोलायला सुरवात केली. " बघ मुली,"अन या नंतर त्यांनी भारतीय संस्कृतीचा इतिहास,अभंग,लावणी,कारखान्यातलं सडकं राजकारण,राजकिय मुर्खपणा या विषयावर असंख्य ठोस पाजले.समोर कुणी भेटला तर थांबायचे नाही,हा नेहमीचा गांवाकडचा शिरस्ता कसोशीने पार पाडला.ती ही त्यांच्या ओठाच्या हालचालीकडे तोंड वासून आदराने पहात होती.ऐकायचा प्रश्नच नव्हता,कारण कानावर हेडफोन होता.ती ऐकते आहे हे पाहुन,किसनराव आणखी खुलले,कारण विद्वान सर्वत्र पुज्यते.
अँमस्टडँमच्या विमानतळावर रात्री उतरले तेव्हां ,तिकडची समुद्र किनाऱ्यावरची उबदार थंडमिश्रीत हवा अंगावर येताच तरतरी वाटली. बसने त्यांचा सारा ग्रुप कंपनीने आरक्षित केलेल्या हाँटेलमध्ये पोहचला.प्रत्येकाला रूम अलाँट करण्यात आली.रूमच्या खिडकीतुन समुद्राचे विहंगम नजारा दिसत होता.हाँटेलचा थाट राजेशाहीच होता.चकचकीत बाथरूम,टबमध्ये स्नान करतांना आपण जणु स्वर्गात असल्याचा भास होत होता.टबमधील पाणी बाहेर जात नाही,याचं त्यांना खुप नवल वाटले.बायको बरोबर नसल्याचं चुकलंच गड्या.पुन्हा अशी चुक करायची नाही,हे त्यांनी मनोमन ठरविले.
प्रवासामुळे थकवा आलेला होता.रात्री कंपनीने भारतीय पध्दतीचे जेवण होते,सोबत नेहमी प्रमाणे दारू ही होती. दारू पित पित ते जोडीदारांना जोक्स सांगायचे,अन खुप हसायचे.मोबाईल वरील नातवंडांचे फोटो वत्यांच्या बाललिला मित्रांना कथन केली.जे काही असेल,ते खुल्लमखुल्ला आत बाहेर असा इथे मामलाच नव्हता.दारूचा अंमल असल्याने त्यांच्या अभंगवाणीला धार आली होती.एकच गोष्ट पुन्हा पुन्हा रंगवुन सांगायची कला होती.अन वरून तुला सांगितला कां हा मी किस्सा,असे ही विचारायचे.साहजिकच त्यांच्या भोवती माणसे गोळा व्हायची.
थकव्यामुळे त्यांना रात्री गाढ झोप लागली.सकाळी रूम सर्विसच्या वेटरने त्यांना उठवले.
बेड टी घेऊन त्यांनी ,सकाळची कर्मे उरकली.अन कडक पाश्चिमात्य वेशभूषा परिधान करून काँन्फरन्ससाठी सिध्द झाले.
वेळेवर काँन्फरन्स सुरू झाली.कंपनीच्या सीईओंनी,सर्वांचे स्वागत केले.त्यानंतर अर्धा तास कंपनीची प्रगतीबद्दल,पुढील धोरणाबद्दल सांगोपांग चर्चा केली.
नवनवीन उत्पादने तेथे मांडलेली होती,अन त्याची माहिती इतर अधिकाऱ्यांनी विषद केली.
नंतर मागिल वर्षीच्या कामगिरीबद्दल डिलर्सना पारितोषिक व त्याचे मनोगत हा कार्यक्रम होता.
किसनरावांचा पहिलाच नंबर होता,कारण त्यांचा शब्द कंपनीत प्रमाण होता,विद्वान सर्वत्र पुज्यते.नेहमीच्या लकबीने माईक हातात घेताच आपल्या विनोदप्रचुर हिन्दी,मराठी, इंग्रजी मिक्स भाषेत त्यांनी सर्वांची खुप करमणुक केली. इतर लोकांची ही भाषणे झाली.सर्वांना कंपनीने भेटवस्तु दिल्या.
जेवणे झाल्यानंतर अर्धा तास वामकुशी झाल्यानंतर सारेजण कंपनीच्या बसने फिरायला निघाले.सोबत गाईड ही दिला होता.
अँमस्टरडँम या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की,समुद्राची पातळीवर आहे,अन जमीन खाली.डच लोकांनी तंत्रज्ञानांने समुद्राचे पाणी बांध घालुन रोखुन धरले होते.इथे सायकल चालविणाऱ्यासाठी मार्ग आहे.
रस्त्यात एक फुटबाँलचे मोठ्या मैदानावर मुले फुटबॉल खेळत होती.सगळा ग्रुप ही तो सामना पहायला गेला.खेळ रंगात आलेला होता.किसनरावांना प्रश्न पडला,सगळेजण एकाच बाँलमागे कां धावतात.प्रत्येकाल बाँल मिळाला पाहिजे,असा विचार चमकुन गेला.तेवढ्यात एक खेळाडु कौशल्याने बाँल घेऊन गोलपोस्ट जवळ आला,पण फटक्याचा नेम चुकला.सारे प्रेषक हालोशालो म्हणायला लागले.
किसनरावांच्या ज्ञानात भर पडली.
टुमदार अत्याधुनिक घरे,त्याबरोबर जाणिवपुर्वक जपलेली पुरातन वास्तुकला,चर्चेस,सुंदर गर्दी नसलेले रस्ते,हिरवीगार झाडी पाहन मन प्रसन्न होत होतं.कुठे ही त्यांना पानपट्टी,वडा भजीच्या टपरी,भिकारी आढळला नाही.
मैलोगणती ट्युलिप च्या रंगीबेरंगी फुलाची शेती बघुन,आपण आपल्या शेतात अशी शेती करावी,हा विचार आला.गाय छाप थूकून पिचकारी पिशवीत घ्यावी लागत होती.
रात्री तर त्यांच्यासाठी एक कँबेरा होता.खास हिंदी गाण्यावर नाचत नाचत नर्तिका किसनराव जवळ आली,किसनराव ही तिच्याबरोबर नाचायला लागले.मग किसनरावांनी ट्युन बदलुन नागिन डान्सची फरमाईश केली.नर्तकीमुळे अंगात जोश संचारला होता.थोडावेळ नाचुन ते बसायला लागले,पण ती नर्तिका सोडायला तयार नव्हती. ती त्यांना उत्तेजित करीत होती.तिला हात जोडुन किसनराव म्हणाले," बाई सोड मला ". तरी नाईलाजाने मनाशी पुटपुटले" हालो शालो".
तेथून सारी मंडळी फ्रान्सला निघाली. नेपोलियन बोनापार्टचा फ्रान्स,जगात लोकांच,लोकांसाठी,लोकांनी चालवलेलं राज्य असं बिरूद मिरविणारा फ्रान्स,सोळाव्या शतकात तुरूंग फोडुन क्रांती करणारा फ्रान्स,जोन आँफ आर्कचा फ्रान्स,अशी विवीध रूपे किसनरावाच्या डोळ्यासमोर चमकुन गेली.
आयफेल टाँवर वर जाऊन त्यांनी समुह फोटोसेशन केले.किनारपट्टीवर,उन खात लोळत पडलेल्या निर्वस्र ललना पाहुन,त्यांना भरते आले. नेत्रसुखद दृश्य त्यांनी अंतरंगात साठविले. बर्मुडा घालुन समुद्र स्नानाची हौस ही भागवली.शँपेन पित वाळुस्नान ही उरकले.तिथल्या लोकांची आठवण त्यांनी,त्यांच्याबरोबर स्टाईलमध्ये फोटो ही काढले.
पँरिसची नाईट तर रंगीनच असते.तिथल्या उंचेल्या सुंदर रूपवती पाहुन,हिटलरने फ्रान्स काबिज केले याचा खुलासा त्यांना झाला.
समोर एवढ्या सौंदर्यवती होत्या,पण वय झाल्याने इच्छा असुन ही बेत कँन्सल करावा लागला.
किसनरावांचे काँलेजचे शिक्षकांनी ही इथल्या एका सोशल काँलनीत अभ्यास केला होता,त्याचे त्यांना स्मरण झाले.पण तेथे जाता आले नाही.
मार्केटमध्ये काही शाँपिंग करावे असा विचार केला,पण किंमती पाहुन त्यांचे डोळेच फिरले." मुंबईत गेल्यानंतर खरीदी करू,असाच विचार केला.
तिथे पेंगत पेंगत ज्युडो स्पर्धा ही पाहिल्या.
पँरिसपासून जवळ एका द्राक्षाच्या बागेत जाऊन,स्वत: च्या पायांनी द्राक्षा तुडवत वाईन बनविण्यात भाग घेतला.तिथल्या असल्ल वाईनचा आस्वाद घेऊन किसनराव परतले.अर्थात घरच्यांसाठी दोनचार खंबे आणायला विसरले नाहीत.
रात्री बँले पाहायला सगळेजण गेले.
पँरिसमधुन झुरीचला गेली सारी. तिथे आजुबाजुची छोटी मोठी स्थळे त्यांनी पाहिली.अंगवार स्वेटर,कानटोपी असुन ही थंडी मी म्हणत होती.पण तिथले निसर्गसौंदर्य,शहरातील स्वच्छता,शांतता उल्लेखनीय होती.तिथे एका स्थानिक भारतीय मंडळाच्या दुर्गा पुजेत भाग घेतला.तिथे त्यांना बऱ्याच दिवसांनी घरच्यासारखं जेवण मिळालं.संपुर्ण प्रवासात,ब्रेड,बेकरी,ज्युसवर भागवावे लागत होते.अन तिकडचं नाँनव्हेज तोंडात धरवत नव्हतं.नाही म्हणायला मासे खायची हौस झाली.
या दौऱ्यांत त्यांनी तिथली शेती,माणसे,रमणीय स्थळे, लोकजीवन हे सर्व पाहिले.
दुसऱ्या दिवशी तेथून फ्लाईटने मुंबई ला रवाना झाले.
अन थकलेले किसनराव मुंबईत शाँपिंग उरकुन यथावकाश घरी परतले.