जीवन संग्राम
जीवन संग्राम


जेव्हां मी शाळा काँलेजात शिकत होतो.त्या दिवसात महाराष्ट्र टाईम्समध्ये रोज एक कथा क्रमश: छापुन येत होती. त्या कथेने,आमच्या मनावर खुप प्रभाव टाकला होता. आम्हांला पुढे काय, याची उत्सुकता लागलेली असायची. त्या कथेत काय नव्हते, अपघात, दु:खद प्रसंग, असामान्य धीरोदात्तपणा, धाडस, अन आहे त्या परिस्थितीतीत आनंदी, आशावादी राहण्याची मानवाची मुल प्रवृत्ती, हे सारे नाट्य दर्शन त्या कथेत होती.
ती कथा एका सत्य घटनेवर लिहीली होती. मुळ कथा अलाईव्ह या नांवाची इंग्रजी भाषेतील पुस्तक. मटामध्ये मराठी भाषांतर वाचकां साठी येत होते.
अँडीज पर्वत शृंखलेतील, उरूग्वे, अर्जेटिना व चिली या देशामध्ये घडते. उरग्वेतील एक रग्बी टिम मँच खेळण्यासाठी चिलीला जाते. त्यात खेळाडु व्यक्तिरिक्त त्यांचे काही नातेवाईक ही असतात. कारण त्याशिवाय विमानाचा खर्च त्या टिमला पेलवला नसता.
उरूग्वे एअरफोर्सचे , एक जुने विमान ,अत्यंत प्रतिकुल वातावरणातुन जात असतांना, पर्वतराजीवर कोसळते. त्यात बरेच जण मृत्यू ही पावतात. 1966 ते सत्तर काळातील घटना असल्याने, मोबाईल वगैरे दुरसंचार व्यवस्था नव्हती.
जे काही जिवंत राहतात,त्यांना जगण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला.
सगळ्यात आधी, जे जखमी होते,त्यांना विमानात उपलब्ध असलेल्या सामग्रीतुन औषधोपचार करवीणे. त्यानंतर रोजच्या आहार पोषणाची. तिथे वातावरण अती शीत होते. पिण्यास पाणी बर्फातूनच घ्यावे लागायचे. जवळपास कित्येक मैलात चिटपाखरू ही नव्हते,तर मनुष्यवस्तीची शक्यता नाही समानच होती.
मृत पावलेल्या जोडीदारांच्या प्रेतांची विल्हेवाट ही महत्वाची होती.
रोज त्यांना शोधण्यासाठी आकाशात जी विमाने यायची, ती हे न सापडल्यामुळे मागे फिरायची. मग रोज गट बनवुन वेगवेगळ्या दिशांना ही फिरत मनुष्यवस्तीचा शोध घ्यायची. पण अपयशच हाती लागत होते.
शेवटी एक वेळ अशी येते की, त्यांच्या जवळील सारे अन्नसाठा संपुष्टात येते.मग जिंवत राहण्यासाठी त्यांना आपल्या मेलेल्या जोडीदारांचे मांस खावे लागले.
जवळजवळ असे सत्तर दिवस घालविल्या नंतर एका गटातील एका व्यक्तीला लांबच लांब डोंगर दरी पार केल्यानंतर, एक गुराखी दिसतो व कुत्री भुंकू लागतात. मग तो गुराखी त्या व्यक्तीला वस्तीवर घेऊन जातो. त्याला पांघरून, शाल, गरम पेय व अन्न पुरवितो.
त्या व्यक्तीची अवस्था अतिशय बिकट असते. वाढलेली दाढी, अन्नानदशा झाल्यामुळे खपाटीला गेलेले पोट. त्यांच्या तोंडुन भितीने शब्द ही निघत नव्हता.
पोटात गरम अन्न गेल्यानंतर थोडी उर्जा आल्यानंतर तो बोलता होतो, पण चिलीतील त्या व्यक्तीची भाषा समजत नव्हती. मग तो तेथील चर्च मधील फादरला बोलवतो. तो इंग्रजीतून त्याच्याशी बोलतो,
तो सांगत असतो, आमचे विमान कोसळले या डोंगराच्या मागच्या डोंगरात कुठेतरी अन वर अजुन बरीच माणसे आहेत.
त्या फादरला तिकडे वर्तमानपत्र नसल्याने या घटनेची माहिती नसते, पण तो जवळच्या मोठ्या शहराशी संपर्क साधता, तेथील पोलीस व्यवस्था कामाला लागते.
एव्हाना ती बातमी अर्जेटिना उरूग्वेत ही जाते.अन त्यांचे सारे नातेवाईक त्या शहराकडे धाव घेतात.
मग डोंगरावरील त्या अपघातग्रस्तांना सर्वांना त्या खेड्यात आणले जाते. त्यांना उबदार कपडे,अन्न,पिण्यास पाणी, दिले जाते.
आपले नातेवाईक जिंवत पाहुन त्यांना आनंदाचे भरते येते व ज्या व्यक्ती मृत पावलेल्या असतात, ती दु: ख सागरात लोटतात.
मग थोडं वातावरण निवळल्यावर त्यांना विचारलं जातं, तुम्ही इतके सत्तर दिवस काय खात होते.मग ते बोलतात, आम्ही मृत जोडीदाराचे मांस खात होतो.
तेव्हा ज्यांची नातेवाईक मेलेली असतात,ती सारी संतापतात व त्यांना मारायला उठतात.
तेव्हा तो चर्चचा फादर पुढे येऊन जगण्यासाठी काहीच उपाय नसेल, तर परमेश्वरच त्यांना तसं सुचवितो.कारण जिंवत राहणे हाच प्रसंगातील धर्म असतो. मग त्यांचा राग निवळतो.
म्हणूनच त्या पुस्तकाला अलाईव्ह हे समर्पक नाव दिलेले होते. ती कथा अजून ही मला कायम आठवते. म्हणुनच ते पुस्तक ही मला आवडते.