Anil Chandak

Inspirational

4.8  

Anil Chandak

Inspirational

कर्मवीर

कर्मवीर

8 mins
1.0K


सोनी टिव्हीवर कौन बनेगा करोडपतीचं ,लाईव्ह प्रक्षेपण,हाँटसीटच्या समोर कलाशिरोमणी,शहेनशाह अभिताभ बच्चन अन त्याच्या समोर येणारे जाणारे भाग्यवंत. अभिताभची हातोटी ,येणारे भाग्यवंत कुणी 12.50 लाख,कुणी 3:20 तर कुणी दहा हजार जिंकुन जातात, दाखवुन जातं की जनसामान्यांत अभिताभ या वयात ही किती लोकप्रिय आहे.


आज शुक्रवारचा दिवस,नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज ही एका कर्मवीराच्या गौरवाचा दि्वस,

अभिताभ सांगतात ,"आज आपल्यासमोर जे कर्मवीर येत आहेत,ते महाराष्ट्रातील डोंगरगांवचे रहीवासी नामदेवराव सांगळे आहेत. त्यांनी केलेल्या कार्यामुळे,ते हजारो कार्यकर्त्यांचे दिपस्तंभ बनले आहेत. आज त्या समाजकल्याणाच्या कामातून हजारो लोकांनी प्रेरणा घेतली तर, आमचा कार्यक्रम सत्कारणी लागला असे आम्ही समजतो"


तेवढ्यात नामदेवराव सांगळेंचे आगमन होते,सगळे टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत करतात. टिव्हीवरून आधीच या कार्यक्रमाची जाहीरात आधीच झालेली असल्याने, त्यांच्या तालुक्यातील गांवागावांतील ग्रामस्थ मंडळी टिव्हीसमोर ठाण मांडुन बसली होती. आपल्या माणसाचे कौतुक डोळ्यात साठवीत ते होते.


नामदेवरावां बरोबर पत्नी सगुणा,गावचे पाटील,ग्रामपंचायत सदस्य सारे सारे आले होते. अभिताभनी स्वत: त्यांचा हात धरून त्यांना हाँटसीटवर बसवीले, त्यांच्याबरोबर आणखी एक दुसरे कर्मवीर ही होते.


मग अभिताभनी एक व्हिडीओ दाखवला, त्यात नामदेवराव,त्यांचे गांवकरी,शेत वावरे, हिरवाई ल्यालेला डोंगर, डोंगराखालील हिरवाईत मोतीच्या पाचूप्रमाणे भासणारा मोठा तलाव,पाईपलाईन, गांवची पाण्याची टाकी, सरकारी योजनेतुन साकार झालेले शौचालय, बंदीस्त गटारी, मुलामुलींसाठी, सुबकशी काँक्रीट ची बांधलेली शाळा,सर्व काही कँमेरामनने कौशल्याने टिपले होते.

मुलाखात चालु होती, वरकरणी नामदेवराव अभिताभच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थीत देत होती, मन भुतकाळात डोकावत होते.अभिताभ कुशल सारथी आहेत,त्यांनी अबोल नामदेवांना बोलते केले,


नामा डोंगरगांवचा रहिवासी, एका डोंगराच्या जवळच त्याची शेती होती.गांवापासून दुरच,होते ते.पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते,मग शेतीसाठी कुठून मिळणार.

पावसाळ्यात जो थोडाफार पाऊस पडायचा,त्यातुन नाही म्हणायला काही बाजरी व्हायची,पण ती घरी खायलाच पुरायची नाही.


नामाच्या घरात त्याचे अंथरूणाला खिळलेले म्हातारे वडील,बायको सगुणा व दोन लहान गोंडस मुले.नाही म्हणायला दोन भाऊ होते,पण दुर शहरात नोकरी करीत होते.

नामा शिकलेला नव्हता म्हणून जाऊ शकला नाही.आई गेल्यानंतर भावांनी वाटणीचा हट्ट धरला व नामाला त्याच्या वाटणीची ही जमीन आली होती.

भाऊ हुशार असल्याने त्यांनी शहराजवळचे वावर घेतले.नामाच्या शेतात विहीर होती,पण तिला पाणी नव्हते. मग कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वाडवडीलांचा शेळ्यामेंढ्या राखण्याचा व्यवसाय करू लागला.


जग जरी बदलत चालले तरी,नामाच्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांच्या जीवनांत अंधारच होता.पिढ्यानपिढ्या त्यांत फरक पडला नाही.शिक्षणाचा प्रसार नांवापुरताच होता.

अन जी मुले शिकली,त्यांनी घराकडे ढूंकून ही कधी पाहिले नाही.

नामा तसा हरहुन्नरी गडी होता.कोणतं ही काम करायची त्याची तयारी होती.त्याला आपण शिकलो नाही याची खंत होती,म्हणून मुलांना त्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले होते.


रोज सगुणेकडुन दोन भाकरी व ठेसा पुरचंडी बांधुन शेळ्यामेंढ्या घेऊन नामा निघायचा.शेळ्या मेंढ्या डोंगरावर जो पाला मिळेल तो खायच्या.अन नामा बाजुला उभा राखण करायचा.


एके दिवशी साऱ्या ग्रमस्थांबरोबर नामा जवळच्या तालुक्याच्या गांवाला गेला.नामा क्वचितच शहरात जात असे.तेथल्या मोठमोठ्या इमारती,भुरभुर इकडुन तिकडे फिरणाऱ्या गाड्या,रस्त्यावरती नटुनथटुन फिरणाऱ्या मुली,महिला पाहुन अचंबीत होऊन जायचा.

नामाची हौसमौज, लग्नाआधी आजुबाजुच्या गांवातल्या जत्रेपुरत्या होत्या.आपल्या सायकलीवरून तो मित्रांबरोबर जत्रेच्या दिवसात,पंधरवडाभर,आज या गांवची जत्रा,उद्या त्या गांवची जत्रा करीत रात्रभर फिरायचा. जत्रेत गोडीशेव,भेळ,अन दोन रूपयातला तमाशा पाहायचा. म्हातारा जोपर्यंत बरा होता तोपर्यंत नामावर कसली ही जबाबदारी नव्हती.


ग्रामस्थांबरोबर नामा पंचायतसमितीच्या बाहेर पटांगणावर गेला.तिथे दुरदुरचे शेतकरी गोळा झाले होते.

तिथे एक सरकारी अधिकारी त्यांना  पावसाचे पाणी कसे साठवायचे,समतल बांध घालुन झाडी कशी वाढवायची याची माहीती दिली. साहेब बोलत होते." मित्रांनो इस्राएल हा देश आपल्या एका जिल्ह्याएवढा ही नाही. तिथे पाऊस ही आपल्यापेक्षा खुप कमी पडतो.पण तो देश आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या देशाइतकं अन्नधान्य,फळफळावळ,दुधदुभते निर्माण करतो,याच कारण आहे तो तिथं पडलेल्या पाण्याचा थेंब न थेंब साठवुन ठेवतो. अन अत्यंत कमी पाण्यात शेती करतात. आपल्याकडे काय आहे, ज्याच्याकडे खुप पाणी आहे,ते बदाबदा ते पाणी पिकांना देत राहतात, त्यामुळे पिकांबरोबर जमिनीचा ही पोत बिघडतो. यासाठी पाऊस वाढविण्यासाठी झाडे वाढली पाहिजे. वृक्ष कटाईवर बंदी आणली पाहिजे.डोंगर उतारावर , समतल बांध घालुन झाडे लावली पाहिजे व पावसाचे पाणी डोंगराखाली अडविण्यासाठी तलाव बांधले पाहीजेत.

जेणेकरून निदान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल व पावसाचे पाणी जिरल्यामुळे,जमीनीतली पाण्याची पातळी वाढेल."


नंतर साहेबांनी शेळ्या मेंढ्या,पशुपालन आदीची नवनवीन तंत्राची माहिती दिली.लोकरीपासून घोंगड्या कशा बनवायच्या,याचे प्रात्यक्षिक दाखविले.

तसं शिकण्यासारखे बरंच काही होते.संध्याकाळी गावच्या माणसाबरोबर नामा एस.टीत बसून फाट्यावर उतरला.गावातुन सायकल घेऊन तो पुढचा रस्ता अंधारातच घरी निघाला.सवयीने सायकल चालवत होता.साप विंचु वाघराची ही भिती होतीच.पण मेंढपाळ धनगरांना त्याचे शिक्षण जन्मापासून मिळत असते.

रात्री घरी उशीरा पोहोचला तेव्हा,सगुणा वाट पहात होती.

म्हातारा अंगणात विड्या फुकत बसला होता.लेकरे झोपी गेली होती. 

सगुणाने फुंकणीने चुलीत जाळ केला अन तव्यावर बाजरीचे पिठ थापुन भाकर्या टाकल्या.सगुणा सुगरण होती.घरांत अठराविश्व दारिद्र्य होते,पण सगुणाचा घरच्या लक्ष्मीचा हात फिरत असल्याने खोपटात ही स्वच्छता व टापटिप होती.नवरा किती ही उशीरा येवु दे,गरम गरम करून जेवु घालत होती.तसा कुणी पै पाहुणा ही आला तरी उपाशी जात नव्हता.


रात्री झोपतांना, त्याच्या डोळ्यासमोर, साहेबाचे बोलणे घुमत होते.त्याला अस्वस्थ पाहुन सगुणा म्हणाली" का हो बरं वाटत नाही कां? डोकं चेपून देऊ कां?"

" नाही गं,आज ते साहेबाचं बोलणं डोक्यात घुमतय बघं"

"काय झालं तिथे?"

मग नामदेवाने तिला इत्तंभुत कथा सांगीतली.

ते ऐकुन ती बोलली," अहो ती मोठी माणसं,त्यांना कुठं शेती करायची,बोलायला काय जाते,कामासाठी पैका,साधनं लागतात,अन तो कुठून आणायचा,चला झोपा बरे निवांत आत्ता,पाहु उद्या."

तिच्या प्रेमळ दटावणीकडे पाहात नामाने तिला हळुच बाहुपाशात घेतलं,अन दिवा विझवुन ते झोपी गेले.




कोंबडा आरवला,अन दुसऱ्या दिवसाची कामे सुरू झाली.सगुणेने दिलेला चहा घेऊन नामा अंघुळीला बसला.दोन चार तांब्ये अंगावर घेतलं तरी,रात्रीच्या विचारांचे भुत जाईना.

सकाळी भाकरी खाल्ल्यावर,नामा वावरात गेला.बाजऱ्यांची दशा पाहुन डोळ्यात पाणी येत होते. दैव आपल्यावर कां रूसावा,हेच त्याला कळंना.

नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन तो डोंगराकडे रानात निघाला. रोजच पाहात होता तो डोंगर,पण त्याची नजर वेगळंच शोधित होती. नव्याने त़ो डोंगराचं, बारिक निरिक्षण करीत होता. तसा डोंगराच्या पायथ्याजवळ त्याला खडकाळ जमीन आढळली." हा इथे पाणी साठु शकतं" तो स्वत:शीच उदगारला. तिथे उंच डोंगरमाध्यावरून आलेला एक धबधबा ,जो पावसाळ्यातच वाहतो आढळला.त्याच्या अनुभवी नजरेने जागा बरोबर हेरली.

त्यापुर्वी त्याने रोजगार हमी योजनेवर खोदकाम करून मजुरी, मिळवली होती. आता तोच अनुभव कामाला येणार होता.

जमीनीला नमस्कार घालुन ईश्वराचे स्मरण करून खडकावर कुदळीचा घाव घातला.


जवळजवळ चार ते पाच तास तो ,सलग काम करीत होता.दिवस मावळल्यानंतर शेळ्या घेऊन तो घरी आला. त्याचं घामाघुम शरीर पाहुन सगुणा मनातुन हादरली होती.घाबरतंच तिने त्याला पाण्याचा ग्लास दिला नाना प्रश्नांनी तिच्या मनात घर केले होते." काय झालं, डाँक्टरला बोलवायचं कां?"काय ते कळेना.

भावजींना बोलावु कां?"

त्याचा मित्र जवळच्या वस्तीवरच होता. काळ वेळेला ती एकमेकांना उपयोगी पडायची.

" अगं काही झालं नाही मला." मग तिने आपण त्या साहेबाच्या माहितीनुसार कसे काम चालु केले हे सांगीतले .

" अहो तुम्ही म्हणता ते सारं खरं आहे,पण आपण आपली ऐपत बघायला नको कां? एवढा खर्च करायची ताकद आहे कां आपली.पैका कुठनं आणायचं माणसं व साधनांसाठी.?"

नामाकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, अन तो थकला ही होतो.वळकटीवर पडल्या पडल्या, त्याला गाढ झोप लागली.


मग त्याचा तो रोजचा परिपाठ झाला.डोंगरावर का ही फुटावर समपातळीवर खड्डे घ्यायचे,अन माती व दगडे, समांतर रेषेत दाबुन घ्यायची,जेणेकरून खड्डे बुझणार नाहीत.तो हाडाचा शेतकरी होता. तसा कफल्लक असला म्हणून काय झालं,कष्ट,अंग मेहनतीला कच

कुणापेक्षा कमी नव्हता.

कोंबड किती ही झाकुन ठेवलं तरी ते दिवस आल्यावर आरविल्याशिवाय राहात नाही.

नामाच्या कामाची बातमी, कर्णोपकर्णी सगळीकडे पसरली. लोक आपापसात कुजबुजू लागले. गांवातल्या बायका ही नामाच्या रिकामटेकडेपणाबद्दल सगुणेला टोमणे मारू लागल्या.

सांजवेळेला नामा घरी परतायचा,हातात कुदळ,फावडे,डोक्यावर मुंडासे ,पाटी,चालतांना आत्यंतिक थकव्यामुळे, त्याचे हातपाय थरथर कापायचे.

वाटेत लोक त्याला रामराम करून जायचे,अन त्याची पाठ वळताच कुत्सितपणे हसायचे. नामाला वेड लागलं आहे,असे बऱ्याच लोकांचं एकमत होतं.

नामा जसा घरी पोहोचला, घरात पाय टाकताच,सगुणा कडाडली, "अहो काय चालवलंस तुम्ही,त्या शेळ्यामेंढ्यांना राखायचं सोडुन,हे काय भुत घेऊन बसलात.तुमचे रिकामे धंदे पाहुन मला माहेरी जावं लागल अश्याने." मग अचानक ती आत्यंतिक क्रोधाने रडु लागली," तुम्हांला माहित नाही,बायका मला काय काय बोलतात तुमच्याबद्दल. एखादं करडु जरी रानात गहाळ झालं तरी,दोन वेळ खायची वांदी पडतील."


" ये सगुणे,उगाच तोंड सोडुन बोलु नगंस मला.तुझा टोमणा कळतो मला.एवढा काही मी दुधखुळा नाही. म्या इकडचा डोंगर तिकडं करीन अन तुला गुंजभर ही कमी पडु देणार नाही."


नामाला आता जगाच्या टोमण्याची सवय झाली होती. सगळीकडुन त्याची शाब्दिक हेटाळणी चालु होती.तरी तो स्थिरप्रज्ञ ,धीरगंभीर होता. आपले लक्ष्य पुर्ण करायचेच,या ध्येयाने त्याला पछाडले होते.

सगुणाला नवऱ्याचा स्वभाव चांगला ठावुन होता,त्याचा स्वाभिमान अन एखादे काम हाती घेतले तर पुर्ण करण्याची वृत्ती. मग तिने त्याला विरोध करायचे सोडुन दिले.अन ती ही रोज त्याच्याबरोबर कामात साथ देऊ लागली.




नामाचे जवळचे मित्र त्याची मेहनत पाहात होते. काही जण मैत्रीखातर स्वत: हुन त्याला मदत करू लागले. हळुहळू कामाने चांगलाच वेग घेतला.

त्यापैकी एकाची शहरातल्या पत्रकाराची ओळख होती.तो त्या पत्रकाराला तेथे साईटवर घेऊन आला. त्याने आपल्या डोळ्यानिशी ते काम पाहिले,त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. जे काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे,ते काम एकटा नामा व त्याचे मित्र करताहेत पाहिले. ती बातमी त्याने फोटोनिशी आपल्या लोकल दैनिकात छापली.


ती बातमी तालुक्याच्या आमदारांच्या कानावर गेली,त्यांनी त्या गांवच्या सरपंचाना फोनवरून शहानिशा करण्यास सांगितली.

आदेशानुसार मग सरपंच व ग्रामपंचायतीचे कार्यकारिणी सदस्य ही तेथे साईटवर पोहोचले.

कामामुळे घाम गाळीत असलेला नामा ,सगुणा व नामाचे मित्र बघुन चकीत झाले. सरपंचांना कामाचे गांभीर्य व तळमळ लक्षात आले. त्यांनी ताबडतोब गांवाला या कामी जुंपण्याचा निर्णय घेतला.

मग गांव करील ते, राव काय करेल , सारेच स्रीपुरूष, तरणी मुले कामात सामिल झाली. कामाने एका जन आंदोलनात रूपांतर झाले होते.रोज कामाची प्रगतीचा रिपोर्ट वर्तमानपत्रातुन, राज्याच्या कानोकानी जात होता.

पक्षाच्या हेड कमाननी आमदारसाहेबांना जागे करताच, ते स्वत: जातीनिशी आपले कार्यकर्ते, सहकारी कारखान्याचे चेअरमन,पंचायत समिती अधिकारी,जिल्हा परिषदेचे इंजिनिअरसह तेथे आले.

त्या सर्वांनी नामदेवाचे खुप कौतुक केले.वर्तमानपत्रात नांव झाल्यापासुन गांवकरी नामा ऐवजी नामदेवराव म्हणायला लागले.


मग जिल्हा परिषद,पंचायतसमिती यांनी मदतीला जेसीपी व लागेल ती मदत देऊ केली. पुन्हा नामाच्या जागेचा सर्वे करून मोठ्या तलावाचा नकाशा व धबधब्यापासून पाणी तलावात कसे येईल व ते पाणी गांवागांवात पाईपलाईन द्वारे कसे पोहोचेल,याचा आराखडा करण्यात आला.काम मार्गी ही लागले. वनाधिकाऱ्यांनी डोंगर उतारावर झाडे लावण्यासाठी सरकारी नर्सरीतुन रोपे व बिया उपलब्ध करून दिल्या. खोलगट तलाव करून त्याच्या आयताकृती चारी बाजुला भिंतीवर खडकांचे तुकडे बसविण्यात आले. बांधावर आंब्याची, वडाची झाडे लावण्यात आली.


काम पुर्ण होता होता,पावसाळा कधी लागला,समजलेच नाही. देव नामदेवाची परिक्षाच पहात होता,मृग धो धो पाऊस बरसायला लागला,अन डोंगरमाध्यावरून पाणी खाली झेपावु लागले.

अन ते पाणी तलावात साचु लागले.ते पाहुन नामदेव व गांवकरी हर्षाने नाचु लागले.पावसाळा होता होता तलाव पुर्ण भरला.एव्हांना डोंगरावर लावलेल्या रोपांनी अस्तित्व दाखवित उजाड डोंगर हिरवा भासु लागला.जवळच्या गांवातील विहीरी ही पाण्याने तुडुंब भरल्या.वर्षभर जिल्हा परिषदच्या टँकरवर अवलंबून असलेली गांवे टँकरमुक्त झाली होती.


ते पाहुन,इंजीनिअरच्या नकाशानुसार, आमदारांनी तलावापासुन गावापर्यंत पाईपलाईन मंजुर केली. पाईपलाईन मधुन घराघरात नळातुन पाणी पोहोचले.


नामा,नामदेव नव्हे, नामदेवरावांचा गावाने शाल,श्रीफळ देऊन व फेटा बांधुन सत्कार केला. सरकारनेही कृषी भुषण पदवी दिली, कसण्यासाठी त्यांना सरकारनी जमीन ही दिली.

नामदेरावांना सरपंचपदावर बसवुन गांवकऱ्यांनी त्यांच्या कर्तुत्वाला दाद दिली. नाही म्हणायला प्रस्थापितांकडुन विरोध होत होता. नामदेवरावांच्या कार्यकिर्दीत गांवाची कामे भरभर व्हायला लागली.यापुर्वी तक्रार करून ही कामे होत नव्हती. अडचणी पुष्कळ होत्या,पण व्यावहारिक सामंजस्यामुळे नामदेवराव ती पार पाडीत गेले. ग्रामपंचायत महिलांना प्रवेश,गांवात दारूबंदी,वृक्षांवर कुऱ्हाडबंदी,घराघरात स्वयंपाकासाठी गँस,गांवात मुलांमुलींसाठी सुसज्ज हायस्कूल,,तसेच उघड्यावर शौचास बंदी आणुन घराघरात पंचायतसमितीच्या अनुदानावर शौचालये बांधली.पुर्ण गांव हागणदारीमुक्त केलं,गांवाबाहेर ओढ्याजवळ एक सुबकसे ,फुलझाडे लावलेले स्मशानगृह व गांवात ग्रामदेव मारूतीरायाचे भव्य मंदीर ही बांधले.




आज अभिताभच्या समोर बसतांना सगुणाला हे सारे आठवत होते.एका बाजुने डोळ्यातून आनंदाश्रु वाहात होते व वरून ती खेळ पाहात होती. नामदेवराव व त्यांच्या बरोबरच्या आणखी एक जोडीदार खेळात पन्नास लाखाच्या प्रश्नापर्यंत पोहोचले होते. तेवढ्यात कार्यक्रम संपल्याची घोषणा केली.अन नामदेवराव व जोडीदारांनी पंचवीस लाख जिंकल्याचे जाहिर केले.

अभिताभनी दोघांच्या खात्यावर आँनलाईन साडेबारा लाख वर्ग केले.

नामदेवराव व गांवकरी गांवी परतताच फेटा बांधुन वेशीपासून गांवात ट्रँक्टरवर बसवुन त्यांची मिरवणुक काढली.

नंतर झालेल्या आभार प्रदर्शनात नामदेवरावांनी बक्षीसाची रक्कम गांवाच्या विकास कामाला दान केली.गांवकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दानशुरतेचे कौतुक केले.


आज नामदेवराव जिल्हा परिषदेवर सदस्य आहेत.त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन स्वत:च्या पायावर उभी आहेत. सगुणा नातवंडांच्या बरोबर आयुष्याची संध्याकाळ सुखात व्यतित करित आहे. कष्टाच्या जोरावर ,रंकाचा राव होतो,त्याचेच प्रत्यंतर त्यांच्या जीवनीत दिसून येते. इच्छा व इच्छापुर्ती,या दोघांमधील काळ काळ,ओढ धडपड,मनाची घालमेल,अगतिकता या गोष्टी माणसाला कशा बांधुन ठेवतात,हा आनंदापेक्षा ही आल्हाददायक असतात,कारण हा प्रवास घडताना कटु गोड अनुभव,वादळवाऱ्यांचा सामन्यांना सामोरे जात ते क्षण ते समाजाच्या भल्यासाठी जगले. ते निश्चितच प्रेरणादायक आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational