Shobha Wagle

Abstract

5.0  

Shobha Wagle

Abstract

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

3 mins
1.3K


"अगं आलीस तू? तुला सांगायच राहून गेलं."

काय झालं? केक करणार आहे ना?"

"अगं, तेच तर ना राहून गेलं. आज माझ्या सासू बाईंची कट्टा पार्टी आहे. त्यामुळे आजचा केक उद्या करू"

"कट्टा पार्टी? ते काय बाबा?

"अगं कट्टयावर सगळे जमतात त्या लोकांची पार्टी." तुला माहीत आहे ना माझ्या सासूबाई रोज फिरायला जातात. कधी बागेत तर कधी बीचवर. मोठा ग्रुप आहे त्यांचा. चल आज आपण पण जाऊ."

"नको गं, त्यांच्यात आपण कशाला?"

"अग सासूबाईंनीच तुलाही घेऊन यायला सांगीतले आहे. हे दोन डबे घेऊन जायचंय"

असे म्हणून नंदा आणि तिची मैत्रीण दोघी ही सासुबाईंच्या कट्ट्या वर निघाल्या.

शहरातल्या मोठ्या पार्क मध्ये भला मोठा जमाव होता. पुरुष आणि स्त्रिया सगळेच वयस्कर पण त्यांच्याकडे पाहिले तर सगळे उत्साही दिसले. आम्ही तेथे गेल्यावर सासुबाईनी माझी आणि शिलाची सर्वांशी ओळख करून दिली. थोड्या वेळाने समोरच्या इमारतीतीत मिनाकाकू आणि त्यांची सून ही दोन डबे घेऊन आल्या. असे बरेच जण येत होते. बरोबर पाच वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.


एक वयस्कर तरूण उभा राहून बोलू लागला, "माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपली पार्टी खास आहे. आज आपल्या पार्टीत आपल्या सर्वांच्या लेकी सुना ही आलेल्या आहेत. 

आम्ही आता जेष्ठ नागरिक आहोत. आम्ही आमच्या कर्तव्यातुन मुक्त झालो. मुले आपली आप आपल्या संसारात रमलीयं. त्यांच्या संसारात लुडबुड करणे बरोबर नाही. उगीच त्यांना सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नका. आपण मानान राहावे. त्यांना ही सुखाने जगू द्यावे. आपल्या लेकीशी जसे नाते ठेवतो तसे सुनांशी ठेवा आणि वागा. जसे द्याल तसे घ्याल. पुढे त्यांचीच मदत लागणार आहे. तेव्हा गुण्या गोविंदाने रहावे."


नंतर गोविंद पंत उभे राहिले, "सदाशिवने सांगितले आम्ही आता जेष्ठ आहोत. अहो, पण आपल्यातल्या बऱ्याच जणांचा बालीशपणा अजूनही आहे. आयुष्य सुंदर जगायचं तर तो खूप फायद्याचा असतो. आम्ही सुरुवातीला फक्त चार जण होतो आणि तेही पुरुषच. पण आता ह्या दोन वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा! त्याला कारण ही ह्या सर्व आपल्या मैत्रिणी. ह्या ग्रुपात वेगवेगळे उपक्रम राबवतात. महिन्यातून चार पाच वेळा आपल्या खवय्या पार्टी असतात. त्यात आम्ही पुरुष कधी स्वयंपाक घरात घुसलो नव्हतो, आता मस्त डिशेस बनवतो. आपले सारे छंद, आवडी आमच्या संसाराच्या कामामुळे जोपासले नव्हते, ते आता पूर्ण करता आलेत. आम्हाला आमच्या बायकांचे बरेच गुण माहीत नव्हते, ते आता कळायला लागले. असे एक एक जण येऊन जेष्ठ नागरिक समूहा बद्दल सांगू लागले. 


या सगळ्यांनी मिळून एक मोठा हॉल घ्यायचं ठरवलं. तिथे वेगवेगळे खेळ, कला, वाचनालय, नाच गाणे सर्वांचे छंद जोपासण्याचे आणि पावसाळ्यात बागेत, बीचवर जाणे शक्य नसल्याने आता त्यांना सगळं हॉल मध्ये करता येणार होते. तसेच कधी अडीअडचणीत छोट्या कार्यक्रमाला हॉल भाड्याने देता येणार असे ही मत व्यक्त केले. तसेच एक दिवसीय, आठ दिवसीय पिकनिक काढायच्या व त्या करता लेकी सुनांनी पुढाकार घेऊन त्या आयोजित कराव्या हे ही सांगण्यात आले. ह्या मध्ये सासू सासरे, आई बाबा सगळे एकत्र

त्यामुळे जेष्ठांची एक शाळा आणि त्यांना मदतीस म्हणून जमेल तसे तरुणांनी पुढे यायच ठरलं. नंतर सगळयांनी डब्यातला खाऊ डीश मध्ये घालून दिला. आणि एकमेकांचे निरोप घेऊन घरी निघाले.


वाटेत शीलाने नंदाला विचारले, "वाह गं नंदा, मस्तंच की गं ह्या ज्येष्ठांचे!"

अगं त्याचे नियमित सकाळी व्यायाम, योगा, हास्यासन, चालणं, धावणं सगळं नियोजित चाललेलं असंत".


"छानच गं! सासू सासरे, आई वडील खरंच सगळ्यांचा एकोपा, आपुलकी आवडलं मला. सगळ्या जेष्ठांनी आणि त्यांच्या लेकी सुनांनी असं वागायचं ठरवलं तर आपले वृध्दाश्रम बंद पडतील. आपली भारतीय संस्कृती विकासीत होईल आणि घर एक नंदनवन होईल."माझ्या सासूंना पण ह्या समूहात शामील व्हायला सांगते."


असे बोलून शिलाने नंदाचा निरोप घेतला व वेगळ्याच आनंदाने ती घरी परतली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract