जन्मपत्रिका
जन्मपत्रिका
एका साधारण शहरात एक मुलगा होता.आलेल्या परिस्थितिला तोंड देत –देत त्याने आपला शैक्षणीक प्रवास पूर्ण केला होता. त्याने विज्ञान शाखेत स्नातकोत्तरची पदवी ग्रहण केली होती. तो सुरुवाती पासून वैज्ञानिक स्वभावाचा होता. तो नास्तिक किंवा आस्तिक असल्या कोणत्याच प्रकारात मोड़त नव्हता. तो वास्तविकतामधे विश्वास करीत होता॰ तो थोडक्यात अंधविश्वासी नव्हता. सयोगवश तो एका वैज्ञानिक विभागात कार्यरत होता. तो अनावश्यक धार्मिक विधीचा समर्थक नव्हता. त्याला दोन अपत्य होती. मुलांची आई जरी कला शाखेत स्नातक असली तरी ,ती प्रचलित भारतीय पंरपरावर दृढ विश्वास करणारी होती. तीचा राशी-भविष्य ,जन्म-पत्रिका, कुंडाली आशा अवैज्ञानिक शास्त्रावर विशेष विश्वास होता. तीचे आणी पतिचे हे वाद –विवादाचे क्षेत्र होते. ती नवजात बाळाच्या जन्मची वेळ, तारीख व जन्म पत्रिके वर विशेष विश्वास करीत होती. ती धार्मिक कार्यात भरपूर वेळ खर्च करीत होती. दोघांमधे विरोधाभास असताना ही त्यांचा संसार व्यवस्थित सूरळीत चालू होता. पती नेहमी तीला ह्या सर्व गोष्टी फक्त काही धार्मिक ठेकेदारानीं स्वःताहाच्या व्यक्तिगत लाभसाठी समाजात प्रस्थापित केल्या आहेत हे तीला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे म्हनणे होते की कोणत्याही बाळाचा जन्म हा त्याच वेळी होतो जेव्हा स्त्री गर्भ धारण कराते. ती वेळ मेडिकल विज्ञान अचूक पणे सांगू शकत नाही. तर बाळाच्या वेळेचे जगात येणाचे काय महत्व आहे. दूसरे जर त्याचे महत्व इतके आहे तर बाळाला असमयी चीर –फाड़ करुन डॉकटर बाळाला कां जन्माला आणतात ?. हे तीतकेच खरे की त्यात स्त्रीची सुरक्षा आणी डॉकटरांचा आर्थीक लाभ असतो. बाळाचा खरा जन्मवेळ तर नैसर्गिक प्रसुतीची असते!. जुन्या काळात कुठे अचूक वेळ धाखवणारी घडाळे सर्वत्र उपलब्ध होती ?. तरी तीचा विश्वास त्यावर कायम होता. मुला-मुलींचे लग्न , जन्म-पत्रिका बघून केल्यावर ही घटस्फोट सारख्या गोष्टी समाजात होतात. मग या सर्व गोष्टीचा काय उपयोग होता.
त्यांची दोन्ही संतती बुद्धिमत्तेने हुषार होती. ते दोघेही त्यांच्या जीवणात सफल अभियंता झाले होते. ते चांगल्या पगारावर कंपानी मधे कार्यरत होते. मुलगी आता लग्नची झाली होती. त्यामुळे तीचा जीवन परिचय पत्रक बनवण्यात आला होता. त्यात मुलीची सर्व माहिती दिली होती. फक्त त्यात जन्मवेळ नमूद केली नव्हती. तीच्यासाठी बरेच प्रस्ताव आले होते. पण त्या सर्वांना मुलीची जन्मवेळ पाहिजे होती. त्या कारणाहून मुलीच्या वडीलांचे वर पक्षाशी वाद होत होता. ह्या वादामुळे घरातील वातावरण बिघड़त होते. शेवटी एक वर पक्ष त्याच्या विचारशी सहमती असणारा आला होता. त्या पक्षाने फक्त मुलीचा जीवन परिचय पत्रक पाहुनच मुलगी बघण्याचा आग्रह केला होता. मुलाचा जीवन परिचय पत्र वधू पक्षाला पण पसंद आले होते. मुला –मुलीने एक –मेकांना पसंद केल्या नंतर त्यांचा विवाह संपन्न झाला होता. त्यांचा संसर सुखत , सुरळीत चालू होता. त्यांना एक सुंदर मुलगी पण झाली होती॰
काही वर्षा नंतर त्याचा मुलगा अभियनंता झाला होता। त्याला एका नामी कंपनी मधे नौकरी मिळाली होती. आई-वडिलांनी त्याच्या लग्नासाठी मुली शोधने सुरु केले होते. त्याचे पण जीवन परिचय पत्रक बनवण्यात आले होते . त्यात त्याची व मुलाच्या संपूर्ण परिवाराची माहिती होती. त्यात फक्त त्याची जन्म वेळ आणी स्थान याचा उल्लेख नव्हता. बरेच वधू पक्षाचे निरोप आले होते. पण अडचण एकाच होती. मुलाची जन्मवेळ आणी स्थान ते विचारत होते. याला मुलाच्या वडीलांचा तीव्र विरोध होता. कारण त्यांना त्यांच्या पंडिताकडून पत्रीका मिळवयाची होती. मुलाचे वडील स्पष्टपने त्यांना सांगत होते की त्याचा त्यावर विश्वास नाही. त्यामुळे आलेले निरोप फिसकटत होते. मुलाच्या आईला नेहमी प्रमाणे त्याचा संताप होत होता. तीला माहीत होते की तीच्या पतीने मुलीच्या लग्नाच्या वेळस तीचे काही ऐकले नव्हते. आता तर त्याचा वर पक्ष असल्याने तो ऐकणारच नाही !. पण सुदैवाने त्याच्याकड़े त्याच्या विचारांशी सहमत असणारा वधू पाक्ष आला होता. मुला –मुलीची पसन्दी व सहमती झाल्यावर त्यांचे लग्न झाले होते. ते आनंदाने आपला संसार चालवत होते॰ दोघेही आपल्या संसारात खुश होते.
समाजात तर्क आणी प्रश्न न करता चाललेल्या रूढ़ीचे डोळे मिटवून पालन करने याला सुसंस्कृत शिकलेला बुध्दिजीवी मनुष्य म्हणणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. मुलाची किंवा मुलीचे आर्थीक, सामाजी, शैक्षणिक बाजु सोडून नुसते जन्म-पत्रिका आणी गुण मिळत नाही म्हणून लग्न होवु शक्त नाही, किंवा केल्याने पति-पत्नीला जीवणात अनेक विघ्न येतात !. व त्यांचा संसार मोड़तो हेच मुळात चुकीचे आहे. हे जर त्रीकाल बाधित सत्य असते तर समाजात जी भाड़ने दिसतात ते दिसायला नको होती. त्यांची तर कुंडली मिळवुन विवाह झाला असतो. मग समस्या क्या ?. घटस्फोटाँची न्यायालयात संख्या वाढली नसती. उलट जन्मपत्रीकेच्या नादत मुला-मुलींचे आई-वडील चुकीच्या मुला –मुलीची निवड करीत असतात. व आपला दोष लपवण्यासाठी त्यांच्या भाग्यला समोर करतात हे एकदम चुकीचे असते. सगळ काही ठीक उघडया डोळयांनी दिसत असतांना लग्न पत्रीके साठी संबंध नाकरने ही घोड चूक असते!.
