जादू जादू
जादू जादू
जादू ही जादू च असते.जादू प्रत्येकालाच आवडते.लहानांपासून मोठ्यांपर्यंत.मला तर अगदी लहानपणापासून जादू आवडते.तस तर सारी दुनिया ही एक जादूच असून प्रत्येक माणूस हा एक जादुगारच आहे.निसर्ग , निसर्गातील सर्व घडामोडी आणि विज्ञान सर्व काही जादू आहे... माणसाचा जन्म नी मृत्यू एक जादूच...
निसर्गाच्या सर्व घटनाक्रम जादूच आहेत.उलगडा न होणे म्हणजे जादूच.तसे पहाता काळी जादू,पांढरी जादू, बंगाली जादू...जादूचे प्रकार किती ते काही माहिती नाही परंतु कितीतरी प्रसिद्ध जादूगार होऊन गेले.जादूगार नी जादूचे प्रयोग म्हटले की गर्दी आलीच.मलाच काय प्रत्येकालाच ही जादू आवडते...मी कितीतरी जादूगार नी जादूचे प्रयोग पाहिले.अगदी शाळेत असल्यापासून... प्रत्येक जादूगार जादूचे प्रयोग करत असताना प्रेक्षकांतून कोणालातरी,एखादा प्रेक्षक बोलावतोच...हसवतो... त्याचं मस्त सुरू असतं... एका,..दोना...तिना...वकटी...रंडू...मोडु....
जादूगार कितीतरी प्रयोग करतात, हसवतात नी पैसे कमावतात....मी कितीतरी जादू चे प्रयोग पाहिले .. विशेषता शाळेत असताना आणि सर विद्यार्थी, शिक्षक यांच्या कडून पैसे जमा करून जादूगाराला दिले. जादूगार नाकातून दोरा, रंगीत कागद काढतो... कितीतरी ओढायला सांगतो.तोंडातून मोठे लोखंडी गोळे काढतो... खोक्यात रुमाल टाकून तिरंगा, कबुतर काढतो...कागदाचे रंग बदलतो...कागद जाळून नोटा बनवतो...माती पासुन साखर बनवतो...रंग बदलतो... मुलाला झोपवून पाय,मान,डोके वेगळे करून दाखवतो.. हातातील,खोक्यातील वस्तू गायब करून दाखवतो.मुलाला, मुलीला,गायब करतो,बकरा,बकरी बनवून दाखवतो... खोक्यात, बॉक्स मध्ये मुला, मुलींना बंद करून मध्ये तलवार,चाकू खुपसून दाखवतो... पत्ता गायब करणे.रंग बदलणे.असे अनेक प्रयोग तो करतो. कितीतरी जादूचे प्रयोग मी पाहिले.जादू खरोखरच जादू असते...
प्रत्येक जादूगार शेवटी सांगतो . हे सर्व पोटासाठी करावे लागते..जादू .. जादू.. काही नसते तर ती एक हात चालाखी असते... किती प्रामाणिक पणाने ते बोलून जातात.. रघुवीर जादूगार हे एक नाव सर्व परिचित आहे... त्यांना ज्यांनी पाहिले ते भाग्यवानच...
मला तर सारी दुनिया एक मोठी जादूच वाटते...कारण ह्या दुनियेत खूप काही अनाकलनीय आहे.मला जादू आवडत होती, आवडते नी आवडेलच...
