STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

चांगले नी वाईट...

चांगले नी वाईट...

3 mins
2

चांगल्याला चांगलं नी वाईटाला वाईट च म्हणावे... समाजात फारच विचित्र घडतं लोक चांगल्या ला चांगले नी वाईटाला वाईट कधी म्हणतच नाहीत... लोक स्वार्थ भावनेने संधी साधू पणाने,वाईटाच्या नादाला कशाला लागावं म्हणून किंवा बिघडल्याला अधिक बिघडवण्यासाठी व स्वतः चा फायदा पाहून चांगल्या ला चांगले नी वाईटाला वाईट कधी म्हणतच नाहीत त्यामुळे वाईट सुधरत नाही आणि चांगला त्याची कोणी दाद, दखल घेत नाही कौतुक करत नाही, शाबासकी मिळत नाही त्यामुळे त्याला चांगुलपणा बदल समाज दखल घेत नाही... चांगल्याला चांगलं म्हटलं तर तो कधी च वाईट बनणार नाही कारण त्याची जबाबदारी वाढेल त्यांच्या चांगुलपणा चे कौतुक झाल्यामुळे तो अधिक च चांगला म्हणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांच्या चांगुलपणामुळे त्यांच्या विचारांमध्ये समाजाला फायदा तर होईलच उलट अनेक बिघडलेले स्वतःला चांगले म्हणून घेण्याचा प्रयत्न करतील... चांगल्याचं कौतुक व्हावे, शाबासकी दिली जावी पारितोषिक, सन्मान, सत्कार व पद बहाल करण्यात आले तर तो तर अधिक चांगला बनेलच पण त्याच्या सोबतच तो अनेकांना चांगले बनवेल आणि बणतील यातुन समाजाचा फायदा होईल वाईट पणा कमी होईल पण घडतं ते उलटं चोर,व्येसनी, लबाड,बेकाराला इथे कोणी वाईट म्हणत नाहीत...एखादा पिऊन चारचौघात विनाकारण कोणाला वाईट बोलू लागला, शिवीगाळ करू लागला तर लोक त्याला तुझं चुकतं, हे बरोबर नाही, ते वाईट आहे, असे वागू नये असे न म्हणता त्याला चडीस घालतात त्याला तसे वागायला, बोलायला भाग पाडतात लई भारी बोललास ,तू लई भारी आहेस,कसा भिऊन पळाला त्याची हिंमत नाही तुझ्या पुढे यायची बोलायची असं तो अनेकांचं ऐकतो कारण लोकांना तो गोरगरीबांना बोललेले आवडतं नी हा किती वाईट आहे हे त्याला कळत नाही उलट त्याला जोर चढतो नी त्याचं पाहून दुसरे चार बिघडतात... गावात, चौकात उभे राहून विनाकारण शिवीगाळ करताना माझ्या सारखा मीच महान.. माझ्या पुढे बोलायची कोणाची ताकद, हिंमत नाही असे ते बोलू लागतात पण तो वाईट आहे त्यांचं वागणं वाईट आहे त्याचे परिणाम... त्याला,शिक्षा, धिक्कार, विरोध, वाळीत टाकणे असे घडायला हवे ते समाजात घडत नाही उलट त्याला खावू पिऊ घालणे नी आपणास जे जमत नाही ते त्यांच्याकडून करून घेणे भांडण तंटा,वाद,विवाद, शिवीगाळ, चोरी, मारामारी, अशा वाईट वागण्यास त्याला वारंवार प्रवृत्त केले जाते थोडक्यात त्याला सुधारण्या ऐवजी बिघडवले जाते त्याला वेळीच बिघडण्यापासून परावृत्त करुन सुधारता आलं असतं पण समाज सुधारण्याचे ऐवजी बिघडण्याचं काम जाणीवपूर्वक करतो नी यातून समाजाचं वाटोळं होत... चांगले लोक एकत्र येत नाहीत पण वाईट लोक फार लवकर एकत्र येतात कारण त्यांचे विचार, वागणे, समस्या, परीणाम नी गरज सारखी असते...त्यांचा गट निर्माण होतो नी खाणं, पिणं टवाळखोरी, चोरी मारी, गुन्हेगारी याला उत येतो... चांगले लोक वाईटाच्या नादाला लागत नाहीत ते अशा लोकांच्या पासून दूर रहातात...वाईटांना बचाव करते,रक्षण करते, तारणहार पाठीमागे हवे असतात यातुन हुजरेगिरी, चमचेगिरी, लाचारी निर्माण होते... अशा लोकांची राजकारण्यांना निर्माण होते नी राजकीय लोक यांचे वरदहस्त ठरतात... वाईट ते वाईट बनत जातात ते कधीच सुधारत नाहीत परीणामी समाजात सुधारणा,भले काही होण्या ऐवजी समाज बिघडायला लागतो, समाजाचं वाटोळं होत, गुन्हेगारी वाढतं समाजात चांगल्या ला चांगले न म्हटल्यामुळे, चांगल्याची किंमत न केल्यामुळे ही हुजरेगिरी नी राजकारण, गुन्हेगारी वाढताना दिसते. दोन नंबरचे धंदे... दादागिरी, गुंडगिरी, वेसण सारं नको ते वाढायला लागतं नी समाज बिघडतो नाही वाया जातो.. चांगल्या घरची मुले या अशा दादा, अण्णा, भाऊ, च्या नादी लागून स्वतःला भाऊ, दादा समजू लागतात.. गाडी, मोबाईल, गुटखा नी खान पान शौकीनपणा रिकामा खिसा पार्ट्या यातून चोरी,मारी, गुन्हेगारी वाढून समाज वाया जाताना दिसतोय बिघडलेली औलाद आईबापाला सांभाळणं अवघड होत आहे... संस्कार, मूल्ये,नीतीमत्ता सत्ये यापेक्षा... चोरी, लबाडी, गुन्हेगारी वाढताना दिसत आहे... राजकारणी या गुन्हेगारी ला खतपाणी घालत असून गरीबांची घरे उद्ध्वस्त होत आहेत... पैसा मोठा झाला...नी माणूस वाया गेला... समाज टिकवायचा असेल नाती जपायची असतील खरं सुख, उध्दार हवा असेल तर चांगले वाईट ओळखायला, वाईटाला रोखायला नी चांगल्या चे समर्थन करायला शिका... चांगले चांगलेच नी वाईट वाईटच असते म्हणून चांगल्याला वाईट, वाईटाला चांगले म्हणणे सोडून... वाईटाला वाईट व चांगल्या ला चांगले च म्हणावे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract