इंडिया ×भारत=वस्तीतली आजी.
इंडिया ×भारत=वस्तीतली आजी.
वेळ सकाळी साडेआठची बागेत प्राणायाम झाल्यावर मी डोळे ऊघडले तर बाजुलाच एक आजी बसलेल्या.माझ्या नेहमीच्या खुर्ची वर रोजच्याप्रमाणे मी योगा करीत एकटीच बसले होते आजही.आजीची व माझी नजरानजर झाली.त्या प्रसन्न हसल्या.पण का कुणास ठाउक मला ते केविलवाण भासल.जुजबी गप्पा सुरू झाल्या अगोदर आजी बुजुन बोलत होत्या.मी हसुन काहीबाही गोष्टी बोलत राहिले जेणेकरून आजी मोकळेपणाने बोलयला लागलया मग कुठे रहाता या प्रश्नावर,अहो ताई मध्ये नाही का अमुक अमुक वस्तीतलया झोपडयांवर बिल्डरनं बुलढोझर घातला तिथ होती माझी खोली. मागच्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुराने लोकाईच लय नुकसान झाल बघा कुणाच कागदपत्र,भांडी घर दार सारच गेल हुत तरीबी आमची हटलो नाय बघा पर यावर्षी पाणी बीणी कायबी आल नाय तरीबी मेलयांनी बुलढोझर फिरवला आमच्या घराईवर का?तर म्हण पावसाळयात पाणी येतय तुम्हाला हिथन दुसरीकडे जाव लागल आधी सारयाईनी एकी केली पार दिललीपोतर कसे गिली बगा पण नंतर सारीच फुटली बगा आमी आमचीच मानस पलटताना पाहिली बघा ताई घर सोडायला सई करायला घरागणिक पाच हजार मिळायच वाटायला पोर कधीबी यायची कुणी म्हणायचं सई करू नका,कुणी मणायच पाच,हजार घ्या अन करा की सई .काय बाय आमच्यापुढं बोलायच आण नेत आल बिल्डर आल की मग गिळून गप्प राहिच नायतर त्यांच्याकडन बोलायच घर खाली करा तुमचाच फायदा पैशाच्या खेळ बाई सारा .दोनचार जण आहेत आपली जरा बोलणारी त्यांच्यामाग आम्ही ते महणल तस खरं समजत राहिलो मग कळल बघा दहा लाखाची रोकड वाटून घेतली मेलयांनी.आणि आपलं दिली कागदपत्र काय बोलायचं कूणाला आपण करून खाणारी गरीब माणसं कूठ दादागिरी झेपल?आता दुसरीकड ईथ जवळच दिलय बघा तिसर्या मजलयावर एकच हाय हितूनतिथून मुठी खुली हाय पाणि एक तास येतया पण मोठ असतया बघा जरा पायाने जीने चढायचा त्रास होतोय पण तेव्हड चालतया आसरा तरी मिळाला की बाई पार बात्तरच्या दुष्काळात आलतु बगा ईंदराबाईन आगिनगाडया फुकट सोडल्या व्हत्या करून खा !जगा! कुटबी' जाऊन जगा! म्हणून तवा गावातून ईथ आलो तवापसन या वस्तीत. रायलो ईतकं वरस नाय आल पाणी. मागच्या दोन तीन वरसातच कस याय लागलं? अव सगळं राजकारण हाय आमाला हाकलून कुणी मणतय मोठा माल( माॅल )बांधणार हायती! कुणी मणतय बसस्टॅन्ड व्हणार हाय !आज्जी सलग तावातावाने बोलत होत्या, मनातली खदखद त्यांना सलत होती भरभरुन, साचलेल रीत करीत होत्या मी सुन्न पणे ऐकत होते. मध्येच हो! का !म्हणून प्रति साद देत होते कारण मला त्यांच उद्विग्न मन मोकळं होऊ द्यायच होत.आजी जरा शांत होऊन, पुन्हा बोलल्या जावदया जग आसलच हाय! हे काय बदलनार नाय !म्हणचं देवान करूना(करोना) आणला बघा त्यान कुट पायल पैशेवाल अन श्रीरमंत ?ज्याला न्यायच त्याला नेलं बघा आमच तर तवा लय हाल झाल बघा काम बंद. सार पुलीस बसलेल व्हते चौकात अन, कुणी मोठी लोक काय काय,राशन म्हणू नकू कुठ संपरचंद, कुट तेल,पीटाच्या पिशव्या जेवण कायबाय वाटायचे. सार चौकातच गडप कुणाच्या घरात चार,चार,पाच पाच पिशव्या आण आमी रोडला ईवस्तोर सार संपलेल .वाटणार निघून गेलेल .आणि घेणार पसार बघा मग एकी दिशी कुट अलका टाकी,का नव्या पेठेत धान्य वाटीत व्हती कळल म्हण दोनचार बाया न मी निघालो तर चौकात पुलीस खुर्ची टाकून बसलेलं दोन चार. गेले मी तरी पण !म्हणल काय चोरी केलीय व्हय ?मग निघालो पुढ तर आडवल की ऐकान आता बाकीच्या जरा तरूण बाया तुमच्या वयाच्या सोबत व्हत्या! मीच म्हातारी! बोलला की मलाच! आजी बाहेर किती रोगराई पसरलीय तुमच वय काय? कशाला या वयात बाहेर फिरताय, लागला की आरडायला मला वाईट लागल बघा ताई मी रडायला लागले तसा बोलला आजी रडू नका!तुमच्यासाठीच चाललंय ना हे सार!जावा घरी कशाला कुठं जाताय मग म्या खरखर सांगितलं बाबा तिकडं धान्य वाटतंय कोणतरी तिथ चाललोय. मग बोलला आजी सगळ रस्त बंद आहेत अस करा तुम्ही घरी जा.घरी कोण असत? मुलं कुठं आहेत?तुमची आता कूठ रहाता ?मला घर दाखवा चला घरी सोडतो. म्हणून मला घरापतोर आणून सोडल की.बघितल घरात विदवा पोरगी माझी सुन अन तीजी दोन लेकर आन म्हातारं पुलीसानं पायल अन गेला .(मी मध्येच हो का)!थांबा की! सांगते बगा आपण पुलीसाला बोलायला घाबरतो.पण पुलीसातबी चांगली मानस आहेत व ताई. तोच पुलीसच दुसर्या दिवशी गाडीवर मोट गठूड घेऊन आला. सरळ स्वताच ऊचलून घरापतोर आनलं. कीतीतरी किराना सामान व्हत त्यात.पार घरापतोर माझ नाव विचरत आला बिचारा !अजुन म्हणले आजी मोबाईल नम्बर द्या तुम्हाला फोन करतो. नंतर तिथ चौकात या परत कुठून मदत भेटली,कुणी काय वाटायला,आल की फोन करतो तुम्हाला आता हे मी आनून दिलय तेव्हढ्यात भागवा .म्हणून बिचारा गेला देवासारखा बघा पुलीस असुन माझी किवदया केली बघा त्येन.म्हणत आजी कोरोनाच्या त्या कठीन काळाच्या आठवणीत हरवल्या एकंदर बोलण्यावरून आजीची घरची परिस्थिती समजली घरी विधवा सुन दोन लहान मुल आजीचे पती ई.असावेत असावेत हे कळले.पुन्हा भानावर येत आजी बोलल्या तुम्हाला किती मुल.काय करतात मालक.परंतु मलाच आजीविषयी अणखी जास्त जाणून घेण्याची उत्सुकता होती त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मध्येच त्यांना थांबवत मी बोलले आजी तुमच्या घरी कोण कोण असत अजुन दुसरी मुल?तशा आजीच्या डोळ्यातून अश्रू ओघळु लागले ते पुसत बोलल्या तीन पोर न ऐक पोरगी व्हती पर माझी दिनी पोर दारूपायी वाया गेली बगा एकाच तर लग्न बी नव्हत झालं बगा !एक हाय तो आजुन तिथंच वस्तीत रातोय. आज चार वरीस झाल आमच्याशी बोलन भाषणं करीत नाय .आपली बायकापोर सोबत असतोय.पेतय ते बी!मी अन म्हातारं त्या वारलेलया पोराच्या बायकुपोंरासकट रातोय बगा! ती सुन संबाळतीय चांगली. काय काम करू देत नाय .सकाळी लवकर ऊटून सार करती. म्हातारयाचा डबा बी करती. म्हणजे!मी मध्येच प्रश्नार्थक नजरेन पाहिल.हे ओळखून आजी बोलल्या म्हातारं हातगाडी वडतयं हमाली करतंय बाजीराव रोडवर हमाली नेत बघा हे ऐकुन आता माझे भरून आलेले डोळे आणि पोटातील कालवकालव लपवत मी आंजीना बोलले बापरे !ते या वयात हातगाडी ओढतात !मग काय करायचं ताई कुणाचा आधार हाय सांगा ......?मी मनात हिशोब लावत होते आजीचे वयाने सत्तरी गाठलेली असावी मग त्यांचे पती दोन तीन वर्षाने तरी सहज मोठे असणार म्हणजे बाहत्तर वयाचा वृद्ध हातगाडीवर मोठमोठे फर्नीचर ओढत नेतोय म्हणजे किती मजबुर हतबल असेल त्यांच जीवन.क्षणात विचारांतून बाहेर येऊन मी आजीकडे पाहून उसनं हसले खोटेच ते!आजी नका टेन्शन घेऊ सर्व ठीक होईल. तुम्ही मस्त रहा त्या लहान मुलांकडे आणि सुनेचकड पाहा. ते आहेत ना तुम्हाला सुन सांभाळतेय ना जमेल तशी.हो आता पोरांचं दुःख रहानारंच जन्म भर शेवटी तुम्ही आई आहात! तुम्ही जन्म दिलात नका वाईट वाटून घेऊ शेवटी जन्मला आला तो जाणारच ना एक दिवस. असं म्हणून मी ऊठले येते हा आजी! काळजी घ्या ! म्हणत आजीच्या खांद्यावर हात ठेवला.आंजीनी माझा हात हाती घेऊन त्यांच्या ओठाजवळ नेला.माझ्या सर्वांगावर जणू मोरपिंसाचा मखमली स्पर्ष झाला.मी आजीकडे न पाहता झरझर पुढे आले .खरतरं मला अजुन खूप बोलायचं होत आजींशी पंरतु माझा संयमाचा बांध सुटत होता. आजीसमोर डोळ्यातले कीती तरी वेळ थोपविलेलया अश्रूंना मुक्त करायचं नवतं.दहाव्या मिनिटांत घरी येऊन ढसाढसा रडले.वाटलं या आजीला हे माहित तरी असेल का ?तीच्या वस्तीच्या बाहेर एक भारत नावाचा देश आहे ज्याला new india म्हणतात ज्यात जेष्ठ नागरीकासाठी म्हणे विविध पेन्शन योजना सुरू आहेत भ्रष्टाचार खत्म करो देश कलीन करो म्हणून स्वच्छ भारत नावाच अभिमान सुरू आहे आणि करोना काळात इथल्या सरकारी यंत्रणेने कोट्यावधी रुपयांचे पॅकेज जनतेला दिलं आहे. या आजीची कहानी यापैकी कुठलयाच योजनेत कशी नाही बसत हा न ऊलगडणारा प्रश्न मला विचार करायला लावित होता पुन्हा पुन्हा आंजीची वस्ती नक्की या डिजीटल इंडियातच येतेय ना? त्या वृदधेच्या केविलवाण्या हास्याला सहजच दिलेल्या प्रतिसादान मला रडवलं, विचार करायला, व प्रश्न पडायला भाग पाडलं.अशी कितीतरी वयोवृद्ध माणसं आपल्या अजुबाजुला असतील .हदयात काय काय दडवून, साठवून या पृथ्वीच्या पोटात आपल्या जन्मभराच्या व्यथा वेदना घेऊन गुडूप होतं असतील कायमची...
