Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Dr.Smita Datar

Abstract


2  

Dr.Smita Datar

Abstract


हवा हवाई

हवा हवाई

2 mins 8.4K 2 mins 8.4K

       आज बाहेर सगळ अंधुक, भुरकट दिसतंय. हवेला वासही वेगळाच येतोय, धुरकटलेला . हवेचा वास स्वच्छ, निर्मळ नाहीये. प्रदूषणाची पातळी वाढल्याचा परिणाम. शास्त्रीय कारणे काहीही असोत. पण हवा सुद्धा नाचरी असते, हसरी असते, दु :खी असते, सुखी पण असते. हवा ही पर्यावरणाचा आरसा असते. मुंबई सारख्या शहरात हवा प्रदूषित असण नित्याचच आहे. पण तरीही ही हवा रोज वेगळी असते. कधी ती जड, बोथट असते. कधी तिचा पोत जाड असतो. कधी ती मउ असते. शास्त्र सांगत, हवेला रंग, वास, चव काहीच नसत. फक्त घनता असते. मग तरीही तिचं मनावरच वजन रोज वेगवेगळ कसं भरत?

        या हवेला सुद्धा एक स्वभाव असतो. गूढ, कोंदलेला, तापट. तिच्या वागण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. कधी ती मंदपणे मोरपीस फिरवते, कधी तिच्या वावटळीत मनात पडझड होते. म्हणूनच शब्द आला असेल हवापाण्याच्या गप्पा. नाहीतर रोज उठून या हवेवर बोलण्यासारख काय आहे? परदेशात सुद्धा एकमेकांना भेटल्यावर “हाउ इज वेदर?“ हा प्रश्न हटकून येतोच.

         आपल्या मनात या  हवेला रंग, रूप, गंध,स्पर्श ,चव सगळ काही असत.कधी हवा उनाड असते, कधी ती चंचल नवयौवना असते. तर कधी ती रुखी, बेजान असते.कधी आकाशाची निळाई तिच्यात उतरते, तर कधी पावसात ती हिरवी कंच होते. ती काहीवेळा घुसमटलेली असते, कधी ती हुंदके देऊन रडते.कधी सगळा संवाद संपल्यासारखी ती अबोल होते. कधी ती अल्लड पाखरासारखी नुसतीच चिवचिवत राहते.

           हवा अशी आपल्या मनात उतरत जाते, आपल्यातून ती उमटत जाते. आपला मूड सुद्धा त्या दिवशीच्या हवेवर ठरतो.माणसासारखी वागणारी हवा कधी आपलं इमान सोडते, आणि कोणी कवी म्हणून जातो, आज मोसम बडा, बेईमान है बडा.तर कधी प्रेयसी ची नशीली, शराबी, गुलाबी ही बिरूद हवेला बहाल करून कोणी मोकळा होतो. हवेला जर गोत्र, नात सगळंच असत, तर निर्वात पोकळीत काय घडत असेल, जिथे हवाच नाही? तिथं उरत असेल एक शून्य, त्या पोकळीला भरून राहिलेलं एक शून्य. आता अश्या निर्वात पोकळीतून आगगाडी सोडणार म्हणे...हायपरलूप. माणसाच्या शरीरावरचे त्याचे परिणाम भ्यासण्यासाठी समिती नेमणार आहेत. माणसाच्या मनावर त्याचा काय परिणाम होणार, याचा अभ्यास करणार आहे का कोणी? हवेशी नात सांगणार तितकंच तरल मन या हायपरलूप मधून जाताना त्याचं काय होईल? हवा हवाई .

                                                                                              


Rate this content
Log in

More marathi story from Dr.Smita Datar

Similar marathi story from Abstract