Dr.Smita Datar

Others

3  

Dr.Smita Datar

Others

मनीच्या कानी भाग-४

मनीच्या कानी भाग-४

2 mins
8.3K


मनीच्या कानी भाग-४

४.

हाय मनी,

     दोन दिवस सबमिशन्स आहेत न तुझी? म्हणून फोन नाही करत . फक्त मेसेज करतेय. पण तुझ्याशी बोलल्याशिवाय पोट नाही न भरत. काल पास्ता जमला न नीट? अग, प्रयत्न केले की सगळ जमत . पास्ता उकळला की थंड पाण्याखाली धरायचा, म्हणजे चिकट होत नाही, भेंडीच्या भाजीत आंबट , कोकम टाकल की ती बुळबुळीत होत नाही. इतक्या सोप्या टीप्स असतात. करून करून आपल्यालाच सुचायला लागत. हळूहळू तूच एक्स्पर्ट होशील आणि मला शिकवशील.

      मला पण सध्या खूप काम असतात, संस्थेची. हौशी नाट्यवर्ग चालवतेय आमची संस्था. काही गाजलेले, काही धडपडणारे कलाकार विनामूल्य शिकवतात. आम्ही संस्थेतर्फे मुलांचे कार्यक्रम ठेवतो. मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. मराठी भाषेसाठी काम करणारा एक ग्रुप जॉईन केलाय सध्या, तिथे काम चालू असते. शिवाय रोजची स्वतःची काम आहेतच. कधी कधी वाटत, कशाला एवढा पसारा वाढवतेय? पण वेळ मजेत जातो. मला न तो एम्प्टी नेस्ट सिंड्रोम नको होता व्हायला . नाही म्हटल तरी आयुष्य आणि वेळापत्रक तुमच्या भोवती आखलेलं होत. तुम्ही दोघे परदेशी गेल्यावर मी तुम्हाला जो वेळ देत होते, तो अंगावर धावून येणार, अशी अटकळ होती. जितका वेळ जास्त, तितकी मी काळजी करत बसणार, हे ही झालं असत. मी दुख्खी झाले असते, टर घर दुख्खी झालं असत. तुम्ही तिकडे अभ्यासाकडे लक्ष देऊ शकला नसता. म्हणून तुम्ही जायच्या आधीपासूनच काही गोष्टीत स्वतःला गुंतवून घेतलं होत. घरटे बांधलं, तेव्हाच ठरलं होत न ग , की पिल्ले चारा खाणार, पाणी पिणार आणि भुरकन उडून जाणार. पिल्लांचे पंख मजबूत करायला तर हे घरटे पक्क विणल होत न? . मग पिल्ल उडून गेली की इतक का मनाला लावून घ्यायचं? तुमच्या आठवणीनी माझं हे नेस्ट कायमच भरलेलं असणार आहे. मग एम्प्टी नेस्ट सिंड्रोम होईलच कशाला?

        स्वप्न आपणच दाखवायची मुलांना, आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुल धडपडली की ती आपल्याला विसरली अस म्हणून गळे काढायचे यात काही अर्थ नाही. पुढची पिढी कामात जास्त व्यग्र होणार, त्यांना जास्त आव्हानं असणार् हे सूर्यप्रकाशाएवढ स्वच्छ आहे. त्यांच्यावर बेफिकीरपणाचा आरोप करण तितकस बरोबर नाही.मी काही निष्काम कर्मयोग वगैरे मोड मध्ये जात नाहीये. डोन्ट वरी . पण कित्येकदा नाती शब्दाच्या जखमांनी रक्तबंबाळ होतात. नात्यांची वीण उसवतच जाते आणि न शिवता येण्यासारखं नात्याचं कापड वेडवाकड फाटत जात. म्हणून ठरवलं होत, माझं घरट कधीच रिकाम करायचे नाही. उमेदीचे, उत्साहाचे , आनंदाचे दरवळ कायम असतील, आपल्या नेस्ट मध्ये. जिथे माझी पिल्ल घटकाभर विसावतील, चारा खातील, पाणी पितील आणि भुरकन उडून जातील.

      येत्या वीकेंड ला फेमिली स्काईप कॉल करूया.

लव यू.

मम्मा.


Rate this content
Log in