Dr.Smita Datar

Others Inspirational

3  

Dr.Smita Datar

Others Inspirational

मनीच्या कानी भाग- ५

मनीच्या कानी भाग- ५

2 mins
8.3K


हाय मनी,

    काल फोनवर चेहरा अगदी इतकुसा दिसत होता. अग, एक संधी गेली तर काय एवढ ? संधी परत येईलच की. संधी एकदाच दार ठोठावते वगैरे अस काही नसत. संधी वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर उभी रहाते. आपण ती कधी आणि केव्हा स्वीकारायची ते आपल्यावर आहे. student council ची निवडणूक परत होईल, परत जोमाने उभी रहा.तोपर्यंत तुझ्या अजून ओळखी होतील. आत्मविश्वास वाढेल.डान्स मध्ये तू निवडली गेलीस ना? अग, आयुष्य असंच वळण, रेषांनी बनलेलं असत. कधी कधी ते सोप्प वाटत तरी कधी त्याच गणित उलगडता उलगडत नाही.आपण मात्र आयुष्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे.

    आयुष्य हे ब्लाक एंड व्हाईट नसत. त्यात अनेक रंग इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे एकमेकांत मिसळलेले असतात. हे रंग परस्परांपासून वेगळे करता येत नाहीत. किंबहुना आयुष्यावर प्रेम केलं न की ते रंग वेगळे करूच नयेत अस वाटत. सुखाच्या पाठीला पाठ लावून दु:ख येत ना ते तितक बोचर नसत, कारण त्याला सुखाचा थोडासा रंग लागलेला असतो, फुलपाखरू हातातून निसटताना बोटाला त्याच्या पंखांचा रंग लागतो न, तसं. आणि दुःखानंतर आलेलं सुख तर सोनसळी उन्हाचा कवडसा घेऊन येत. नवी उमेद घेऊन येत. त्याचे रंग आपल्या मनात पण उतरून भरून राहतात.

    एकरंगी आयुष्य बोरिंग झालं असतं न, म्हणून वरचाच करत असेल ही योजना. पण असे खाच खळगे आले ना की आयुष्याचा रस्ता सारखी डागडुजी करून पक्का बांधून काढला जातो. मग कितीही वाहतूक होऊ दे त्यावरून..कसलाही धोका नाही. नो डेंजरचा आपला बोर्ड अगदी फिट्ट. हा रस्ता कधीतरी धूसर होतो, कधी धुक्यात हरवतो. कधी तो संपल्यासारखा वाटतो.पण तो संपलेला नसून ते एक वळण असतो, तो शेवट नसतो.

    मग, हसली का आमची परीराणी ? गुड. उद्या आजीचा वाढदिवस आहे. तुमचं दोघांच सरप्राईज तयारच असेल म्हणा.

उद्या आजी कडून फोन करीन. बाय.

लव यू.

मम्मा.


Rate this content
Log in