Dr.Smita Datar

Others Inspirational

3  

Dr.Smita Datar

Others Inspirational

मनीच्या कानी भाग- ११

मनीच्या कानी भाग- ११

2 mins
8.9K


         हाय मनी

  काल सुपर्णा मावशीच हाउस वार्मिंग होत. म्हणजे आपली वास्तूशांत. शब्दांमधला भौगोलिक फरक. आपण उगीच उचलला आहे तो. पश्चिमेला थंडी जास्त म्हणून ते घर वार्म करतात, आपल्याकडे उन्हाळा जास्त म्हणून आपण घर शांत, थंड करतो , आणि काय ? भावना दोन्हीकडे सारख्याच. तुझी सगळ्यांनी आठवण काढली. दादाचं गाणे मिस केलं.

   तुझ्या मैत्रिणीकडच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे विडीयो बघितले. खूप छान उत्सवी वातावरण होत ना? किती देखणी सजावट , केवढे पदार्थ केले होते जेवणाला. जास्त कौतुक वाटलं ते याचं की त्यांच्या कडे कुणी मदतीला नसून ते लोक किती काम स्वतः करतात. पश्चिमेचे श्रमांचे संस्कार तुमच्या वर होताहेत, हे ही चांगलं आहे. आम्हाला खूप बर वाटलं, तू तिथे तुझी आपुलकीची बेट तयार करते आहेस. तुला तुझी जीवाभावाची माणस मिळताहेत. माणस जोडणे आणि ती जोडलेली रहावीत म्हणून एक्स्ट्रा माईल चालणे, तू ही करते आहेस. खूप बर वाटलं.

   तुला त्यांचे सण जवळून बघायला मिळताहेत. सांताक्लोजच्या नैवेद्याची मात्र गंमत वाटली. मला वाटायचं की आपणच देवाला नैवेद्य ठेवतो.पण सांता ला आदल्या रात्री दाराबाहेर पुडिंग आणि रम ठेवतात, हे ऐकून मजा वाटली. भावना त्याच आहेत ग. आपण त्याला भक्तिभावाने अर्पण करायचं, मग तोच आपल्याला भरभरून परत देईल, हीच ती वैश्विक भावना. माणस सगळीकडे सारखीच असतात अग. हे जग वाईट आहे, असं आम्ही कधीच सांगितलं नाही तुम्हाला. चांगलं, वाईट समोर येतच राहणार, आपण त्यातलं काय निवडणार, हे महत्वाच.

   पूर्वी वाटायचं ..तिकडे कुटुंब व्यवस्था पारच रसातळाला गेलीये की काय? पण तुम्ही दोघे तिथे गेल्यापासून कळल की तिकडचे पालक पण मुलांची काळजी घेतात. जेनीचे आजी आजोबा भेटल्यावर तुला आपले आजी आबा भेटल्याचा आनंद झाला ना? तुझे पण खूप लाड झाले ना त्यांच्या मुलांबरोबर . A Home Away From Home . तिथे तुला माय नाही पण मावशी मिळाली आहे काळजी घ्यायला, ही भावना सुद्धा मला शांतवून जाते. 

   तुमची शीळसप्तमी ऐकून तर हसून हसून मुरकुंडी वळली. ख्रिसमस चा उरलेला टरकी दुसऱ्या दिवशी त्याचीच सांडवीचं खायची . आपल्याकडे नसते का शीळसप्तमी आणि बासी ईद , त्यातलाच प्रकार. स्वयंपाकघराला विश्रांती, दुसर काय?

   देश उगीच भांडतात ना एकमेकांशी? आणि देश भांडतात म्हणून माणसे एकमेकांचा दुस्वास करतात. मला नवल वाटत, जगभर न फिरता, सर्व संतांना हे विश्वबंधुत्व कसं कळल? दुनिया गोल है, हेच खर.

    आंटी कडून परत आलीस की स्काईप करू.

बाय.

लव यू .

मम्मा .


Rate this content
Log in