arun gode

Abstract

3.6  

arun gode

Abstract

होशियारी

होशियारी

2 mins
240


  मुल-मुली मोठी झाली कि त्यांची घर ग्रहस्ती जमवुन देण्याची जवाबदारी ही घरातल्या वडिल मंडळीची असते. ती जवाबदारी ते फार जवाबदारी घेवुन पार पाडत असतात.जुण्या काळात लग्न जमवण्याची व्यवस्था आजच्या सारखी नव्हती. तेव्हा काही आजच्या सारखे संचार माध्यम नव्हते. मुला-मुलींचे लग्न हे जेव्हा काही वरिष्ठ मंडळी किंवा नातेवाईक कोणच्या तरी लग्नात किंवा तेरवित व अन्य प्रसंगात भेट झाल्या नंतर विषय निघाल्या वर जमुन यायचे. यासाठी घरातील मोठे जेव्हा मुल-मुली लग्नाची झाली कि हमकास लग्न आणी तेरव्या मध्ये आपली उपस्थिति देत असायचे. लग्न जुळवुन आणत असत. अशिच एका लग्न जुळवुन आलेला मजेदार प्रंसगाची चर्चा आपण यात करणार आहो.

     एका परिवारत एक लग्नाला आलेली मुकी मुलगी होती. तसेच दुस-या एका परिवारत एक लग्नाला आलेला आंधळा मुलगा होता. दोन्हीं परिवारात मुला-मुली मध्ये दोष असल्या मुळे त्यांचे लग्न जुळत नव्हते. सर्व नातेवाईका मध्ये आणी परिचीत मित्रमंडळीत याची चर्चा असल्यामुळे कोणी लग्न जुळवुन आण्यासाठी शिव धनुष्य पेलुन घेण्याचा पुढाकार घेत नसे.

     एक दिवसी एक वेळेस दोन्ही कडिल परिवारातील सदस्य लग्न जुळवण्यासाठी निघाले असतांना विश्रांतिसाठी वाटेत लागलेल्या नदीच्या पात्रात विश्रांति घेत असातांना एक दुस-याचा समाचार घेण्यास प्रारंभ केला. परिचय झाल्या नंतर त्यांनी आपण कशासाठी बाहेर निघाले असा प्रश्न एकमेकांना केला. तेव्हा संबधीत परिवारांनी आपल्या मुला-मुलीच्या लग्ना विषयी चर्चा केली. काखेत कळसा अन गावाला वळसा, जर आपण एकच कार्यासाठी जात आहो तर मग आपण सुध्दा लग्ना विषयी बोलु शक्तो. मग दोन्ही परिवार एक्मेकाशी चर्चा करु लागले. चर्चा नंतर मुला-मुली संबधी माहिती घेने सुरु झाली. जेव्हा वर पक्षाने मुली विषयी विचारले तेव्हा वधु पक्षाने सांगितले कि मुलगी एकदम सुंदर आहे. काही बोलाच कामच नाही. नंतर वधु पक्षाने तोच प्रश्न केला.तेव्हा वर पक्षाने सांगितले कि मुलगा एकदम होतकरु आहे काही पाहयचं काम नाही. नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्ने येतात म्हणुन दोन्ही पक्षाला आपल्या मुला-मुलीत असणारा दोषा मुळे जास्त चर्चा न करता लग्न जुळवुन आणले होते. सुसर बाई तुझी पाठ किती मऊ, त्यांनी आपल्या मुला-मुलींची व परिवारांची खोटी स्तुति केली होती.प्रत्येक परिवाराला भ्रम होता कि आपली बाजु लंगडी असतांनाही आपण बाजु सावरुन घेतली. खुशित दोघेही जास्त वाटा-घाटी न करता लग्नची तिथि पक्की करुन आप-आपल्या गांवी निघुन गेले.ल्ग्नाच्या वेळी माहित पडले कि मुलगी काही बोलायचे काम नाही म्हणजे ती मुकी आहे. मुलगा काही बघयचं काम नाही म्हणजे मुलगा अंधळा आहे. असे लग्न झाल्यावर समजले.

        या वरुन आम्हाला शब्दाच्या बनावा-बनवीची शिक मिळते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract