होल्याचा मुलगा
होल्याचा मुलगा
दोन दशकापूर्वीची गोष्ट आहे. एक होल्याचा मुलगा दुसऱ्या वर्गात शिकत होता. तो परिस्थितीने नाजूक व घाबरट स्वभावाचा होता. त्याचे लेखन उलटया अक्षरात असे. वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यांचं सामान हरवलं की, प्रामुख्याने त्याचेच नाव घेतले जाई; पण त्याने चोरी केलेली नसे. मग तो दुसऱ्या दिवसापासून शाळेत येत नसे. गुरुजीने त्याच्यावर विशेष लक्ष दिले. त्याच्यात आमूलाग्र बदल दिसून आले.
