ग्रामीण युवकांचे पलायन .
ग्रामीण युवकांचे पलायन .
भारत देश हा खेड्यांचा देश म्हणुन त्याची जुनी ओळख आहे.देशात जवळ –पास पाच लाखांपेक्षा जास्त खेडे आहे. भारतीय संस्कृति खेड्यातील लोकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे हजारो वर्षाच्या गुलामी नंतर पण ती टिकुन राहली आहे. देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या शासकांनी खेड्यानकडे एकप्रकारचे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे देशाची दूर-गतिच झाली असे म्हनावे लागेल.ग्रामिनांची अवस्था खायला कोंडा अन झोपायला धोंडा अशी झाली होती.देशात मोठे –मोठे उद्योगा सोबत लहान मध्यम उद्योग पण आले आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या आणी छोट्या शहरांचा उदय आणी विकास झाला.सोबतच शहराच्या वाढत्या लोकसंखेमुळे शाहरानं मधे अनेक समस्या पण निर्माण झाल्या होत्या आणी अजुनही होत आहेत. प्रत्येक शहरामधे झुग्गी-झोपड्यांची सपाट्याने वाढ झाली होती आणी होत आहे. त्यामुळे अनेक बिमा-याचे थैमान शहरात माजले होते आणी ती स्तिथी कायम आहे. झोपडवासी शहराअमधे चिंध्या वेचुन अन गोदडया शिवुन कसे तरी जगत आहेत. शहरांची दुरुन दिसणारी विलासी जीवन शैली ग्रामिन युवकांना प्रेरित करु लागली होती. त्यामुळे खेड्यातील युवक मोठ्या प्रमाणात शहरात, शहरातील युवक महा-नगरात पलायन करु लागले होते. त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सरकारी, अर्धसरकारी, सार्वजनिक संस्थान व नीजि कंपन्यामधे स्थाई नौकरी मिळने होती. त्यामुळे ब-याच युवकांचे जीवनमान उंचावले होते. त्यांच्या मुला-बाळांची शिक्षणाची चांगलीच सोय होवु लागली होती.
खेड्यातील युवकांचे सारखे पलायन होत असल्यामुळे ग्रामिन अर्थव्यवस्था ढासळीत चालली होती.त्यांच्या पलायनामुळे गावांतील धंदे व वयुवकांची स्थिती जणु कुर्हाडीचा दांडा अन गोत्यास काळ झाली होती.
खेड्यातील कित्येक पिढ्यापासुन चालत आलेले व्यवसाय बंद पडत होते. शासनकर्ताच्या चुकीच्या धोरणामुळे शेतिवर आधारित ग्रामिन अर्थव्यवस्था सारखी कोलमडत होती. त्यामुळे कृषक सारखा कर्जात डुबत चालला होता. तो कर्जात जन्म घेत होता आणी कर्जातच मरत होता. त्यामुळे शेति हा न परवडनारा धंदा बनला होता. घरातील मुली या सर्व गोष्टिंचे लहानपणा पासुन अध्ययन करित होत्या. आई-वडिलांचे आर्थीक तंगित जगलेले जीवन पाहुन त्यांना खेड्याविषयी घृणा निर्मान झाली होती. त्यांच्या मधे अशी मानसिकता निर्माण झाली कि शहरातील एखाद्या चपराशासी किंवा चहाविक्रेता टपरीवाला,भाजीवाल, अन्य कोणच्या शहरातील छोटे-मोठे काम धंदा करनेवाल्याशी लग्न करावे पन खेड्यातील जमिदार किंवा सिमांत शेतकराशी लग्न करण्याची घोड चूक करु नये असी त्यांची मानसिकता तैयार झाली होती. त्यांचे दिसायला वाडे मोठे होते, पण बासे पोकळ झाले होते. याची जाणिव त्या मुलींना झाली होती.
एक परिवार साधारण मोठ्या खेड्यात राहत होता. पति-पत्निच्या व्यतिरिक्त घरात दोन मुले आणी एक मुलगी होती. शेतमालक शेति करुण आपला कुंटुंबाचे पालन-पोषण करित होता. त्याने काही पैशाची जुगाड करुण पिठ-गिरनी आपल्याच घरी लावली होती. शेति सोबत जोडधंदा असल्यामुळे परिवार साधारन सुखात होता. शेतक-याने आपल्या आपत्यांना बारावीं पर्यंत गावांतच शिक्षण दिले होते. मोठ्या मुलाने बारावीं नंतर शिक्षण सोडुन देवुन पिठ-गिरणीचा व्यवसाय करु लागला होता. लहान मुलगा शिक्षणात हुशार होता म्ह्णुन त्याने प्रथम पॉलीटेक्नीक केले आणी मग इंजिनिअर झाला होता. मुलगी वयात आल्यामुळे तीच्या वडिलांनी तीच्या लग्नाची घाई केली होती. समाजातील अनेक चांगल्या घरच्या मुलांनी तीची मागनी केली होती. पण तीने आणी मुलीच्या आईने ठाम निर्धार केला होता कि खेड्यातील शेतक-याच्या मुलाशी लग्न करायचे नाही. शहरातील राहणा-या मुलाशीच लग्न करायचे !. मुलीचे भाग्य चमकले असे म्हणाला काही हरकत नव्हती. तीला शाहरातील एका मुलाने मागनी घातली होती. त्याला एक धाकटा भाउ आणी आई-वडिल होते. वडिल सरकारी कर्मचारी होते. म्हणुन वडिलांना ब-या पैकी सेवानिवृत्ति वेतन मिळत होते. नवरामुलगा नीजि कंपनीमधे कार्यरत होता. त्यांचे स्वतःचे घर-दार होते. पण त्यांच्याकडे शेति नव्हती. मुलीला आणी आईला हव्या असणा-या सर्वच किमान अटी पूर्ण होत होत्या. म्हणुन त्यांनी मुलीचे धुम-धडयाकाने लग्न केले होते. त्यांना दोन आपत्य पण झाली होती. मुलीच्या मोठ्या भावाचे पण लग्न झाले होते. लहान भाउ त्याच शहरात अभियंता म्हणुन कार्यरत होता. त्याने आपल्या जन्मगांवच्या प्रियेसीशी लग्न केले होते. आई-वडिल आता मोठ्या जावाबदरी मधुन मोकळे झाले होते. सर्वांचा संसार फार आनंदाने थाटात चालु होता.
देशात अचानक एका भयंकर महामारीने थैमान घातले होते. महामारी इतकी भयावय होती कि संपूर्ण देश आणी शासन हादरुन गेले होते. नविन महामारी असल्यामुळे तीचा सुरुवातीला इलाज करने कठिन झाले होते. त्यात अनेकांनी आपले सगे–संबंधी गमावले होते. कित्येक मुल-मुली अनाथ झाले होते. महामारीच्या प्रकोपामुळे कोनाचे खेटर कोणाच्या पायात नव्हते. आलीया भोगाशी असावे सादर म्हणुन सर्वजन मुक-दर्शक होवुन स्वतःच्या परिवाचे रक्षण करित होते. त्याच काळात माहमारीमुळे आर्थीक संकट देशात तोंड फाडुन उभे झाले होते.बाजारात खाण्या-पिण्याच्या वस्तु व्यतिरिक्त कोणत्याच वस्तुची मागनी नव्हती. त्यामुळे सर्वच उद्योग-धंदे व कारखाने बंद पडले होते. ब-याच लोकांचे आर्थीक संकटामुळे रोजगार गेले होते.प्रत्येक जन किमान गरजा कशा तरी भागवत होते.सर्वत्र हाहाकार माजला होता. त्यात तीच्या पतिचापण रोजगार गेला होता. जोड धंदा नसल्यामुळे ते कुंटुंब काहीच करु शकत नव्हते. देशात सर्वत्र आर्थीक स्त्रोताचे चक्र थांबले होते. फ्क्त देशातील शेतक-यांनी देशाच्या आर्थीक स्थितिला आधार दिला होता. त्यामुळे सरकाला पण बळीराजे महत्व समजले होते. पण तेव्हा खुप उशिर झाला होता. शेतक-याने देशाला कसे तरी आर्थीक संकटातुन उचलुन धरले होते.
पीडीत दांपत्याजवळ शेति नव्हती. त्यांनी रोजमर्याच्या लागना-या वस्तुंचा उद्योग करण्याचे ठरविले होते. आता लगेच नौकरी मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे हात-पाय हालविने आवश्यक होते.पति-पत्निने गृह उद्योग सुरु केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी काही छोट्या-मोठ्या मशिनी विकत घेवुन गृहउद्योग मोठा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. आणी काही लोकांना पण रोजगार देवुन त्यांची व स्वतःची मदत करुन आर्थीक संकटातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करित होते.
महामारीचा प्रकोप गांव-खेड्यानपेक्षा शहरातच जास्त होता. रोजगार आणी भूकमरीची समस्या शहरातच विकराल होती. त्यामुळे शहरवासी महामारीच्या सपट्यात फार थंडगार झाले होते. पण खेड्यात तेवढी भयावय स्थिति नव्हती. गांवकरी फारसे हादरले नव्हते. उलट गांवक-यानी देशाला अन्न-धाण्याच्या उत्पादनाचा उच्चांक गाठुन बळी राजाचे महत्व पटवून दिले होते.
