Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Inspirational


4.0  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Inspirational


गोष्ट लाख मोलाची..

गोष्ट लाख मोलाची..

2 mins 219 2 mins 219

सुख, दुःख, आनंद मिळवणं खूप काही आपल्या वरच अवलंबून आहे... देणे आणि घेणं यांचा नेहमी विचार करा... कोणी जवळचा असो या दुरचा .. अगोदर द्यायला शिका..वेळ पडेल तेव्हा.. वेळ पडेल त्याला.. होईल ती मदत करा. मदतीला नाही म्हणू नका.. कारण मदतीला संकटात धावून येतो तो देव... देतो तो देव नी राखून ठेवतो तो राक्षस..! जरूर, जरुर मदतीला धावून जा.. अडचणीत च माणसाला धिर, आधार, मदतीची गरज असते.. जेव्हा सर्व काही ठीक असेल तेव्हा कुणाला कुणाची काय असणार...


उपकार जरुर करावेत.. आत्म्याचा न्याय हा सर्व श्रेष्ठ असतो. संकटात केलेली मदत कधीच वाया जात नाही.. एखाद्यावर केलेले उपकार कधीच कोणी विसरू शकत नाही.. आणि आपल्या मुळे जर एखाद्याला सुख , आनंद, समाधान मिळत असेल.. एखाद्याचे संकट, दुःख,जर दूर होत असेल तर त्याचं समाधान, सुख तुम्हाला मिळणार च,, उलट आपल्यात माणुसपण येईल आणि तुमचं नाव.. ओळख निर्माण होईल.. चांगले करा चांगले च होईल.. किर्ती कमावणे मुळीच सोपे नाही..त्याग तर करायला च हवा..


सर्वात वाईट आहे तो स्वार्थ... स्वार्थ आला की सर्व संपलं.. स्वार्थ माणसाला हैवान बनवतो.. माणूस, माणूस राहत नाही तो या स्वार्थामुळे.. या स्वार्थामुळे सर्व नाती संपून गेली.. स्वार्थ आला की भाऊ भाऊ राहत नाही..भावा भावाची,जावा जावा ची जीवघेणी भांडण होतात ती फक्त या स्वार्थामुळे.. एकमेकांचा ईस्तू आडवा जातं नाही तो या स्वार्थामुळे.. ज्या घरात भावा भावाची नी जावा जावा ची भांडणं होत नाहीत ते घर म्हणजे स्वर्ग आहे..

 सांगायचं एकच ते म्हणजे स्वार्थ सर्वांत वाईट असतो..त्याचा त्याग करायला च हवा.. काळ आणि वेळ कधीच कुणाला सांगुन येत नाही.. इतरांना नेहमी मदत करावी.. संकटात धावून जावे .मदत ही मदत च असते.. केलेली मदत कधीच वाया जात नाही.. मदतीची गरज प्रत्येकाला च असते.. तुम्हाला नी मला सुद्धा.. सर्व सुखी असा कोणी नाही.. प्रत्येकाला दुःख हे असतं च दुसऱ्या चे अश्रू पुसण्यासाठी देवाने हे दोन हात दिले आहेत.. एवढं लक्षात असावे..


द्यायला शिका.. देणं हे चांगले आणि घेणं हे वाईट च असते.. कोणीच कुणाच कधीच हिसकावुन घेऊ नये.. मोठ्या मनाने दान करावे..देत जावे.. तुम्ही जेवढं द्याल..जे द्याल तेवढं तुम्हाला नक्कीच मिळेल.. कदाचित त्याहून जास्त पण कमी नाही..मग ते दुःख असो या सुख..जे दिलं, जेवढं दिले ते, त्याहून जास्त मिळणारच.. सुख द्या, सुख मिळेल.. दुःख देणारा सुखी होणारच नाही..


बाबासाहेब आंबेडकरांना वेळेवर केलेली मदत च लाख मोलाची ठरली..मदत ही लाखमोलाची असते.. हे प्रत्येकाने मनावर बिंबवावे..

तुझी दुसऱ्या चे भले करा, दुसऱ्यांना मोठं करा.. तुमचं भलच होईल.. तुम्ही मोठेच व्हाल.. संकटांना डगमगू नका.. संकटांना तोंड द्यावं च लागतं.. संकटात जे साथ देतात, धावून येतात,तेच आपले..तेच खरे जिवाभावाचे.. बाकी सगळे व्यर्थ नी व्यर्थ च आहे...

🙏🙏🙏🙏🙏


Rate this content
Log in

More marathi story from " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Similar marathi story from Abstract