ANJALI Bhalshankar

Abstract

4.0  

ANJALI Bhalshankar

Abstract

गणवेश

गणवेश

3 mins
207



  1. आर ये!!!हो की बाजुला का मदी ,कोलमडतोस.झेेेपत नाही तर कशाला ,बांधायचा एवढा भार. मी हळूच स्व:ताला सावरत' ऐका हाताने सायकलीचा हॅनंडल घट्ट पकडून केविलवाण्या नजरेन मागे वळून पाहिले माझ्या नजरेत यातना होती आंणि दयेची आस होती. ...........
  2. खरच!! न झेपेल एवढ, लाकडाच वजन माझ्या सायकलला बांधले होत. ते घेऊन मी नारायण पेठेपासून अलका टोकीज चोंकापर्यंत कसा बसा आलो होतो. संध्याकाळचा गारवा हवेत होता .तरीही अंगातला शर्ट घामाने ओलाचिंब झाला होता. गर्दीत पुण्यातल्या रहदारीतून, कशीबशी वाट काढत मला प्रभात रोड गल्ली क्रमांक पंधरा पर्यत जायचं होत .माझ्या नजरेत पष्ट दिसत असाव कि आता हे ओझे मी एक ईंच ही पुढे ढकलू शकतं नाहीं .
  3. पण त्या व्यक्तीला माझी दया आलीच नाहीं तो स्वताच्या, दुचाकी वरून उतरून सरळ माझ्या अंगावर धावून आला सायकलीसकट अक्षरशः फरफटतच, त्याने मला बाजूला केल. आणि कडेला होऊन पुन्हा खेकसला आतां बस हित रातभर दम खात .
  4. बांधलेल्या वजनामुळे सायकल कधीच आडवी झाली होती. मी फुटपाथ वर बसलो होतो. रहदारी तशीच सुरू होती .सिग्नल लागतं होते आंणि सिग्नलला थांबलेल्या प्रत्येक गाडीवालयाच, लक्ष माझ्याच कडे होत.त्याच्या चेहरयाकडे बघुन मी त्याच्या हावभावांना वाचत होतो. कुणी,पुटपुटत शिव्या घालत होते तर कुणी हळुच नजरेन आधार देत होते जणु मायेन माझ्य डोकयावरून हात फिरवत होते व स्मित हास्यातुन सांगत होते.लढत रहा आंणि माझ्या हसणयाची वाट पहात होते .
  5. सगळं कसं सुरळीत चालू आहे जग धावतय, पळतेय ,मी मात्र थांबलेला .ऊठणयाचा त्राण शरीरात नव्हता.काही वेळाने मी उठलो .दोन चाकानंतर जो भार मी ऊचलु शकत हेतो, तो आता मला जागेवर ऊभा करून जमणार नहवता .मी पुर्ण जोर लावून सायकल उचलण्याचा प्रयत्न करीत होतो. अर्धवट उचलून तो भार पुन्हा खाली पडायचा, अस दोन तीनदा ,माझी हि कसरत समोरून येणारे जानारे सारे बघत होते पण शुन्य नजरेने झाकलेलया झापड लावलेल्या चेहेरयाने .
  6. मी ओळखलं हा आपला भार आहे ना ,तो आपल्यालाच उचलायचा आहे .मी पुन्हा उठलो सर्व शक्ती नीशी तो भार ऊचलु लागलो, व कशीबशी सायकल दोन्ही चाकावर ऊभी करून थांबलो. अर्धा रस्ता पार केलेलाच होता, आता अर्ध अंतर राहील होत. खिशातलया पत्त्याचा कागद पाहून मी कसाबसा, गल्ली क्रमांक पंधरा पर्यत पोहोचलो. सायकल ऐका झाडांचा आधार घेऊन ऊभी केली बगंलयाच गेट ऊघडुन, आत गेलो बेल वाजवली आतुन 'साहेबान दार उघडलं. आणि अंगावरचा शाळेचा गणवेष व माझी अवस्था पाहून , मला लगेच ओळखलं काय रे गौतम चा मुलगा का तू ये आत ये मला बर वाटल त्यांन मला बसायला सांगितले नी आत निघून गेला .थोडया वेळाने चहाचा कप व बिस्कटे घेऊन माझ्या जवळ येऊन बसला .आता मात्र मी सार कांही विसरलो हेतो, आणि चहा बिस्कटावर तुटून पडलो होतो .
  7. कोणत्या इयत्तेत शिकतोस, साहेबान विचारल पाचवीत हाय मी. साहेबाने पन्नासची नोट काढली व मला दिली ,मी !माझ्याकडे दहा सुट्टे नाहित असू दे, तू शिकतोस' म्हणुन तुला दहा रुपये बक्षीस म्हणून घे. माझा आनंद गगनात मावत न्हवता . तेवढ्या वेळात साहेबांच्या नोकरान, लाकडाचा भार माझ्या सायकलीवरून वेगळा केला होता मी सायकलला टांग मारून बाहेर पडलो होतो. त्या बंगल्यावर पुन्हा जाता, जाता एक नजर टाकली आंणि साहेबांच्या आपुलकी, व बक्षीसापुढे त्या मघाच्या तीरसट नजरा मला तुच्छ वाटु लागलया .
  8. तसे हमाली घेऊन अप्पा, माझे वडील कधीच पाठवीत नसत पंरतु त्यांच्या मालकान नियम ,घातला होता की, सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंतचा, पगार ते अप्पाना देत होते. मग तेव्हडया वेळात, 'कामांच्या वेळात 'जर हमालीसाठी बाहेर गेले ,तर अर्धे पैसे मालकाला द्यायचे तेच, जर मी हमाली' "घेऊन गेलो तर पूर्ण पैसे वाचत "म्हणुन मग मला ते कधी कधी पाठवायला लागले. 
  9. मी" बी' लय हुशार !!शाळेची, 'कापड, गणवेष "बघुन साहेब पैसे जास्त देतात, म्हणुन सुट्टीच्या दिवशीही, शाळेची कापड घालूनच हमाली घेऊन जायचो.

(सदर सत्य कथन हे माझा दिवंगत भाऊ मिंलीद भालशंकर याच्य जुन्या वह्या चाळताना त्यान लिहीलेल्या अनेक कथापैकी आहे साधारण ऐकोनिसशे सत्तयानव, सालची आहे. म्हणजे त्याचे वय वर्ष अकरा असावे.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract