घरातील नाकर्ती व्यक्ती
घरातील नाकर्ती व्यक्ती
कुसूम रात्री आठ वाजता घरात येते आणि घरातली स्थती पाहून च्रक्रावूनच जाते. घरात सगळीकडे पसारा पडलेला असतो, घरातल्या ज्या थोड्याफार वस्तू होत्या त्या इतरस्त विखुरलेल्या असतात, कुठेतरी रक्ताचे थेंब पडलेले दिसत होते आणि एका कोपर्यातून विव्हळण्याचा आवाज पण येत असतो....
आवाजाच्या दिशेने पाहते तर आई एका कोपर्यात कण्हत पडली होती. आईला अशा अवस्थेत पाहून तिला घामच फुटतो. कशीबशी ती स्वत:ला सावरून आईकडे धाव घेते आईला दोन्ही हाताने आधार देऊन सावकाश काॅटवर जोपवते.......
आईची शांतता पाहून हा सगळा प्रकार आपल्या बापाचाच असणार हे तिला उमगलं.....तिने आईला हळूच ऊठवून बसवल व मागे ऊशी टेकायला दिली. थोडं पाणी पाजल. स्वत:च्या पर्समधून first aid box काढून पहिला आईच्या डोक्याला पट्टी केली. कुसूम एका हाॅस्पिटल मध्ये नर्स च काम करत होती त्यामूळे तीच्या जवळ नेहमीच तो बाॅक्स ठेवायची तिला सवय होती पण तीला काय माहित एकदिवस तीच्या आईसाठीच त्याचा ऊपयोग करावा लागेल. कुसूमच्या डोळ्यात पाणी होत. तशी कुसूम खूप धाडशी होती कदाचित घरच्या परिस्थितीने तीला धाडशी बनवल पण आउची अशी अवस्था पाहून कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही? आईच्या नजरेतून तीचे पाण्याने भरलेले डोळे सूटले नाहीत.
''कुसूम तू हे घर सोडून जा'' म्हणतच आईचेही डोळे गच्च झाले......कुसूमने आईच्या मांडीवर डोके ठेवून पडली तीला बर वाटत होत......आई कुसूमच्या केसांना कुरूवाळत "तुझा बाप तूला एका दलाला विकणार आहे, मी त्याला विरोध केला तर त्याने मला मारझोड केली आआणि भिंतीवर माझ डोक आपटल. मी तुझ्या लग्नासाठी वाचवून ठेवलेले पैसेही हूडकून काढून घेऊन गेला. खूप विचित्र वागत होता तसा बी त्यो रोजच वागत्यो पण आज तो मनाशी काहीतरी पक्की गाठ बांधून आला होता आणि एकसारखा बरळत होता 'आपली कुसूम सोन्याची कोंबडी हाय', ह्या समदं ऐकून तर मला त्याच लय भ्या वाटतंय.
आईचे हात आणि ओठ थरथर कापत होते. जणूकाही पुढं खूप मोठ संकट येऊन ठाकणार आहे. कुसूमने आईच बोलण ऐकून मोठा श्वास घेतला. कुसूम आई-वडीलांना एकटीच मुलगी होती. घरची परिस्थिती हालाखीची. आई चार-पाच घरची धुणी-भांडी करायची कारण तीचा नवरा नुसता घरोबा, दारूडा. अगोदर तो चागला कामावर जायचा, मजुरी करून स्वत: घर चालवायचा पण जसा कुसूमचा जन्म झाला तेव्हापासून कुठून दारूच व्यसन लावून घेतल आणि घराची दुरवस्था करून ठेवली. काम करायचा नाही, आयत खायचा, घरात काही असलं-नसलं तेवढ विकून दारू प्यायचा, जुगार खेळायचा......
कुसूमही लहानपणापासून आईबरोबर कामावर जायची. लोकांच पडेल ते काम करून आईला हातभार लावत असे. पकुसूम खूप जिद्दी आणि शिकायची आवड असलेली होती. कुसूम आणि आणि आई ज्या घरी कामाला जायचे त्यातल्याच एका डाॅक्टर मॅडमने कुसूमची हुशारी आणि सामंज्यसपणा पाहून तीला स्वत:च्या हाॅस्पिटलमध्ये पर्सनल ट्रेनिंग देऊन कामाला ठेवले. त्यामूळ आता त्यांच घरच जरा बर चाललं होत. पण बाप व्यसनी असल्याने दोघींनी कष्ट करूनही त्याची आर्थिक परिस्थिती काही पुढे जात नव्हती. आईच सगळ बोलण ऐकून कुसूम तीच्या पदराने डोळे पुसते आणि कसल्या तरी निर्धाराने ऊठते. तीच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. ती किचनमध्ये जावून आईसाठी नी स्वत:साठी चहा ठेवते. आईला हात-पाय धुवायला मदत करते आणि स्वत:ही फ्रेश होते. दोघीही चहा घेतात.
कुसूम मनाशी काहीतरी ठरवून आईला "आई इथूनपुढे मला बाप नाही अस समजेन मी. तू म्हटलेलीस ना मागच्या वेळी हे घर माझ्या नावावर कर मग मी ते केल आहे फक्त माझ्याऐवजी तुझ्या नावावर केल आहे पण मी हे तुला सांगितल
नव्हत कारण मला माहित होत तु हे सगळ बापाला सांगणार आणि तो तमाशा करणार कारण किती केल तरी तु भारतीय नारी पतीवरताच! पण आज ती वेळ आलीच म्हणून तुला सांगतेय.......मलाही खूप वाईट वाटल बापाच्या नकळत हे करायला पण आज त्यानेच ही वेळ आणलेय...बस्स झाल आता! आई एवढ कष्ट करूनही आपल्यावर अन्याय होणार असेल तर काय ऊपयोग अशा बापाचा? आपण कधी जगणार आपल आयुष्य? की असच बापाचा मार खाणार.....अरे मार पण खाल्ला पण आजतर याने कहरच केला, मला विकायला निघालाय. माझ चारिञ्य किती जपलय मी आणि ह्याच्या दारूपायी, पैश्याच्या हव्यासापायी अस विस्कटून टाकू? आई आत्तापर्यंत आपलच नशीब म्हणून सहन केल पण काही नाही नशीब वैगेरे काही नसत गं......अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार असतो !
कुसूमने तिचा निर्णय सुनावला पण आईच काय ती तर पहिल्यापासून नवर्याला सहन करत आलेय. तीच्या मते नवरा हाच बाईच सर्वस्व! नवरा असेल तर परपुरूषाची त्या बाईकडे बघायची हिम्मत होत नाही, भलेही मग तो व्यसनी का असेना. पण तीच्या नवर्याच्या पोटच्या पोरीला विकण्याच्या निर्णयाने माञ तीही आतून हेलावली. स्वत:ला दोषी समजू लागली. आपणच पहिल्यापासून नवर्याला माफ करत आलोय ही चूक तीला उमगली आणि तीही कुसूमची बाजू घेऊन उभा राहिली. तु म्हणशील तसच करूया म्हणून आईनेही कुसूमला पाठिंबा दिला.
तेव्हड्यात कुसूमचा बाप येतो, त्याला नीट चालताही येत नव्हत, दारूने फुल्ल झालेला. बरोबर कोणी तगडा माणूसही होता. बहूतेक तो दलालच असावा. कुसूमची घरी यायची वेळ त्याला माहित असल्याने "ए कुसूमे बाहेर ये बाहेर" असतो दाराबाहेरच ओरडत असतो. त्याच्या आवाजाने त्या दोघी बाहेर येतात. कुसूम आणि तीची आई दोघींना एकञ पाहून तर त्याला आणखीच चेव चढतो. बापाने ठरविल्याप्रमाणे तो कुसूमला आणि तिच्या आईला दलालाच सांगतो व कुसूमला हाताला धरून ओडतो आणि दलालाबर निघून जाण्यासाठी ओरडतो. कुसूम स्वत:चा हात सोडवून घेते आणि त्वेशातच बापाला बाजूला ढकलून देऊन त्याच्यावर ओरडते " अरे बाप आहेस की कसाब? पोटच्या मुलीला विकायला निघालायस. मुलगी घरात जन्मली म्हणून लोक किती खूष होतात तीला लक्ष्मीच रुप मानतात आणि तू तिचा बाजार करतोयस. बापाची माया तू कधी दिलीच नाहीस....पण शेवटी रक्ताच नात आहे तुझ्याशी म्हणून सहन करत आले आत्तापर्यंत. आईचा तर केवढा जीव आहे तुझ्यावर तीच्यामुळे नेहमीच गप्प बसले मी पण आता नाही चल चालता हो ह्या घरातून....हे घर मी आईच्या नावावर करून घेतलय महिन्यापूर्वीच कदाचित आईलाही तू पूढे जावून अस काहीतरी करशील अस वाटल असाव. जेव्हा तू दारूच्या नशेत होतास तेव्हा तू कागदपञावर सह्यासुद्धा केल्यात...आणि तुला खरच या घरात राहयच असेल तर तूला दारू सोडावी लागेल."
कुसूमचं महाकालीच रूप पाहून दलाल तर तिथून पळ काढतोच पण एव्हाना घर आपल्या नावावर नाही हे समजताच तिच्या बापाचीही सगळी उतरते कारण राहत घर एवढीच तर एक प्राॅपर्टी त्यांच्याकडे असते. तो कुसूम व तिच्या आईची माफी मागून मान खाली घालतो.
कुसूमने बाप नशेत असताना त्याच्याकडून कागदपत्रावर सह्या घेतल्या होत्या यात काहीच चूकीच नव्हत कारण त्यामागचा हेतू सात्विक होता. जेव्हा घरातली कर्ती व्यक्ती मग तो पुरूष असो वा स्त्री चांगल काय वाईट काय, कुटूंबाच कुटूंबाच कल्याण कशात आहे कशात नाही हे न समजण्याएवढी खालच्या थराला जाते तेव्हा घरातल्या अन्य सुज्ञ व्यक्तीने वेळीच घराची सर्व सूञ स्वत: च्या हातात घ्यावी. जेणेकरून संपूर्ण कुटूंब देशोधडीला लागण्यापासून वाचू शकेल. अशी कितीतरी कुटूंब आहेत त्याठिकाणी एकाच व्यक्तीचा मनमानी कारभार चालू असतो मग तो व्यसनामुळे असतो वा मीच खूप शहाणा वा अन्य भावनेमूळे असतो अशावेळी कुटूंबातील अन्य सदस्याने धाडस करून आपल्या कथेतील कुसूमप्रमाणे पाऊल ऊचलावे हीच सदिच्छा!