madhuri dipak patil

Inspirational

4  

madhuri dipak patil

Inspirational

"तुमच यश तुमच्याच हातात आहे"

"तुमच यश तुमच्याच हातात आहे"

7 mins
408


तुझ luck छान म्हणून तुला यश मिळाल. माझ तर नशीबच खराब आहे....काहीही करा अपयश हे ठरलेलच" राधा नाराजीच्या स्वरात.


"अगं अस काय म्हणतेयस? मी अभ्यास केला म्हणून मला यश मिळाल..." विभावरी.


"म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी अभ्यास केला नव्हता?" राधा रागवतच.


"calm down राधा....मी समजू शकते....सध्याची तुझी मनस्थिती. तु अभ्यास केला होतास, करतेयस पण अग नक्की काहीतरी कमी पडलं असेल ना? आपणाला ते शोधायला हवं....नशीबाला दोष देऊन काय होणार आहे....नशीब वैगेरे काही नसत."


"बररं मग नशीब वैगेरे काही नसतं तर...मी तुझ्याबरोबर अभ्यास करून....एव्हाना तुझ्यापेक्षा जास्त अभ्यास करून, तीच परीक्षा देऊनही माझ सिलेक्शन का नाही झाल?"


"yes i agree....तु खूप अभ्यास केला होता मान्य आहे पण exam हाॅलमधून बाहेर आल्यावर तु काय बोलली होतीस तुला आठवतयं? तु बोलली होतीस की मला पेपर कव्हर झाला नाही व्यवस्थित... म्हणजे पेपर दिल्यावर तु समाधानी नव्हतीस...आपण अभ्यास करतो पण त्याची खरी कसौटी तर exam हाॅलमध्येच असते. "


"हो अग मला खरंच पेपरमधील सगळ येत होत पण वेळ कमी पडला."


"exactly....तु मघाशी नशीब वैगेरे म्हटलीस ना ते सगळ तुझ्या हातात होत.....तुझा पेपर वेळेत पूर्ण झाला असता तर आज यश तुझ्या हातात असलं असतं.....काय पटतय का?"


"विभा सध्यातरी माझ्या सर्वकाही डोक्यावरून चाललं आहे सगळं.....मी खरच खूप confuse झाले आहे."


"just chill...राधा चल आपण चहा घेऊन येऊया. तुला फ्रेश वाटेल जरा....तिथेच discuss करूया काय ते."


"हो चल....माझ डोक असही खूफ जड झाल आहे."


राधा आणि विभावरी दोघी जवळच्या मैञीणी एकाच काॅलेजमधून डिग्री घेतलेल्या.....पण डिग्री घेऊन जाॅब अथवा लग्न न करता दोघीही स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या. दोघीही हूशार, अभ्यासू आणि कष्टाळूही.

सुरूवातीचे एक वर्ष महाराष्र्ट लोकसेवा आयोगाचा syllabus, exam process, practice समजून घेण्यात गेलं....पण दुसर्‍या वर्षी चांगला अभ्यास कव्हर केला दोघींनी.....दोघीही पुण्यात एका रूम मध्ये राहत होत्या. सकाळी लवकर ऊठणे आणि स्टडी रूम जाऊन गाठणे हे ठरलेलच होत. अजिबात इकडेतिकडे वेळ न घालवता अभ्यास एके अभ्यास चालू होत दोघींचही.


रोजच रूटीन चालू असायच...रूम ते लायब्ररी. अशातच महाराष्र्ट लोकसेवा आयोगाची परीक्षा (mpsc) जवळ आली होती....स्पर्धा परीक्षांमधून मिळणारं यश जरी मौठ असलं तरी स्पर्धा परीक्षांची process खूप मोठी, वेळखाऊ आणि patience ठेवावी लागणारी आहे. कारण mpsc prelim (पूर्व परीक्षा) दिल्यावरती चार महिन्यांनी mains exam (मुख्य परीक्षा) आणि त्यानंतर चार महिन्यांनी interview (मुलाखत) व त्यानंतर चार महिन्यांनी result (निकाल) अशी एकंदरीत mpsc ची एक परीक्षा साधारणत: दीड वर्ष घेते....त्यामुळे स्पर्धा परीक्षेत ऊतरल्यावरतु खूप patience ठेवावे लागतात.....त्यामूळे शक्यतो त्यात ऊतरताना पूर्ण तयारीनीशीच ऊतरायला हवं....नाहितर मग ऊगीच नशीबाला दोष देत बसण्यात वेळ वाया घालवता कामा नये.


राधा आणि विभावरीने mpsc पूर्व परीक्षा दिली होती. त्यात विभावरी clear झाली पण राधा चार मार्कसाठी मेरीट लिस्टमधून बाहेर पडली. या परीक्षांमध्ये अर्धा मार्कही खूप महत्त्वाचा असतो exam crack करण्यासाठी....आणि राधा तर चार मार्क्सने मागे राहिली होती....त्यामुळेच राधा नाराज झाली होती. कारण पुढची mpsc पूर्व परीक्षा येईपर्यंत तिला अजून वर्षभर थांबाव लागणार होत....तेवढा अभ्यास पुन्हा करावा लागणार होता....तेवढा संयम एकवटावा लागणार होता. बर फक्त पूर्व परीक्षाच नाही तर mains, interview, result म्हणजे आणखी दीड वर्ष....एकंदरीत पूर्व परीक्षेची वाट पाहून निकाल लागेपर्यंत राधाचे अडीच वर्ष invest होणार होते...त्यात डिग्री झाल्यापासूनचे अभ्यास सुरू करून झालेले दोन वर्ष...राधा जाम टेंन्शन मध्ये होती...कारण एका मुलीसाठी फक्त पोस्टच नव्हे तर तीच वयात होणार असेलेलं लग्नही तिच्या घरच्यांसाठी महत्त्वाच असतं.


विभावरी आणि राधा लयब्ररीच्याच शेजारी असलेल्या एका टपरीवर चहा घ्यायला गेल्या....राधा पुढच्या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधून एकसारखी नशीबाला कोसत होती तर विभावरी पुढच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास लवकर सुरू करायला हवा याच टाईमटेबल मनात आखत होती...विभावरी राधाला morally support करत होती. राधाचा आत्मविश्वास कायम राहावा म्हणून तिला समजावत होती....पण राधा काही ऐकायला तयार नव्हती.


कदाचित कुठेना कुठे स्पर्धा परीक्षा देत असताना राधा अजूनही नशीबाला महत्त्व देत होती आणि बरोबर त्यामूळे ठरलेल्या cut off पेक्षा तिला चार मार्क्स कमी पडले होते. कारण अस म्हणतात तुम्ही जर तुमचे शंभर टक्के देऊन एखादी गोष्ट करत असाल तर त्यात तुम्हाला यश हे मिळतेच मिळते. मग ते स्पर्धा असो, बिझनेस असो, एखाद्या दूर्दम्य रोगावर मात करणे असो वा किचनमधला एखादा नवीन पदार्थ बनवणे असो.


विभावरीने खूप समजवल्यावरती राधा शांत होते माञ तिचा तो एक दिवस अभ्यास न करता विचार करण्यात वाया जातो....या स्पर्धा परीक्षेच्या काळात एकदिवस जरी आपण वाया घालवू तर आपण एका रॅंकने मागे येऊ हे विभावरीला चांगल माहीत होत....विभावरी राधाला समजाऊन लायब्ररीत जाऊन अभ्यास करत बसते.


दोघींचही अभ्यासाच रूटीन चालूच होतं...राधाही पुन्हा तयारीला लागते....तिलाही कळून चुकत की नशीबाशा दोष देत बसून पुढच्या येणार्‍या परीक्षेवर परीणाम करून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे....दिवस भरभर निघून जातात...विभावरी mpsc मुख्यपरीक्षा देते. राधा मुख्य परीक्षेसाठी elligible नव्हती तरी विभा परीक्षा देऊन आल्यावर ती विभाचा question paper सोडवून पाहते...राधा तो चांगल्याप्रकारे सोडवते....परंतु विभाला तो व्यवस्थित गेला नव्हता....आणि आपला रिझल्ट काय असणार आहे; याचाही अंदाज विभाला येतो.....ती नाराज होते....माञ यावेळी राधा विभाला "टेन्शन घेऊ नकोस होईल तुझ सिलेक्शन" असा सपोर्ट करत असते....चार महिने असेच रोजच्या अभ्यासात जातात....आणि मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागतो...विभाला ज्या गोष्टीची भिती वाटत होती; तेच घडत. त्यावेळी ठरलेल्या cut off पेक्षा विभाला कमी मार्क्स मिळतात आणि ती परीक्षेतून बाहेर पडते...


mpsc prelium(पूर्व परीक्षा) crack न झाल्यानंतर जशी राधाची अवस्था झाली होती तशी अवस्था विभाच्या मनाची होते...फरक फक्त एवढाच होता की विभा नशीबाला दोष देत नव्हती...तिला पुढे घालवाव्या लागणार्‍या आणखी दिड वर्षाच टेंन्शन होत. ती पुन्हा नव्याने प्रयत्न करायचा अस ठरवते....रिझल्टच दुख करत बसण्यात वेळ घालवायला नको अस मनाला निक्षून सांगते.अपयश माणसाला परिस्थितीशी दोन हात कसे करायचे ते शिकवतं...हेच खरं.


विभा आणि राधा पुन्हा जोमाने येणार्‍या परीक्षेची तयारी करायला लागतात....माझी पूर्व परीक्षा का निघाली नाही यामागच्या चूका तर मुख्य परीक्षेत माझा अभ्यास कुठे कमी पडला या सगळ्या गोष्टींची कारणे दोघी शोधून काढतात. राधाची पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन करायला विभा होतीच. तर मुख्य परीक्षेसाठी विभाकडून कोणत्या चूका झाल्या याचा अनुभवही होता राधाकडे....त्यामुळे राधा तिच्या पध्दतीने तयारीला लागते...कारण दुसर्‍यांच्या अनुभवावरून शिकतो तो लवकर पुढे जातो.


हाच फंडा विभादेखील वापरते....जे लोक मुख्य परीक्षा पास झाल्यात त्यांची अभ्यासाची stratagy विचारून, स्वतची stratagy ठरवते....कारण या क्षेञात प्रत्येकाला स्वतच्या पध्दतीनेच अभ्यास करावा लागतो....इथे आपण मार्गदर्शन घेऊ शकतो माञ प्रयत्न स्वतला जमेल त्याच पध्दतीने करावे लागतात.


एकदाची पुर्व परीक्षेचा दिवस ऊजाडतो....राधा आणि विभा पुन्हा एकदा त्याच ऊंबरठ्यावर येतात. ही process असतेच अशी जरी तुम्ही मुलाखतीतून बाहेर पडलात तरी पुन्हा पुर्व परीक्षेपासून सुरूवात करावी लागते.


यावेळी दोघीनांही पेपर छान जातो....answer key चेक केल्यावर दोघींनाही confidence येतो की आपण पास होणारच...त्या अनुषंगाने मुख्य परीक्षेची तयारी करतात. पुर्व परीक्षेचा रिझल्ट लागतो....दोघीही पास होतात. मुख्य परीक्षा दिल्यावरही त्या दोघी रिझल्टच्या बाबतीत sure असतात...त्यामुळे मुलाखतीची तयारी करत असतात. मुख्य परीक्षेचा रिझल्टही पाॅझिटिव्ह येतो...आता बर्‍यापैकी दोघींचीही मनस्थिती सकारात्मक झालेली होती...आणि interview साठी आपला confidence खूप महत्त्वाचा असतो....interview is all about your personality test.


मुलाखतीचा दिवस ऊजाडतो....खरी कसोटी त्यादिवशी होती कारण written exam मध्ये तुम्ही एकटे असतात पण मुलाखतीत तुम्हाला mpsc पॅनेलबरोबर संवाद साधायचा असतो. एक अधिकारी म्हणून तुमच्यात किती qualities आहेत...अधिकारी बनल्यावरती तुम्ही कोणत्या situation ला कसे tackle कराल याच विश्लेषण मुलाखतीतुन केल जातं...तुम्ही खरंच social work करण्यासाठी capable आहात का? या गोष्टींची शहानिशा होते ती मुलाखतीतून...महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा इथे लगेच ओळखला जातो.


राधा आणि विभा खूप आतुरतेने रिझल्टची वाट पाहत होत्या कारण त्यातून त्यांच भवितव्य ठरणार होत...interview ते result मधील जो काळ होता तो त्या दोघींसाठीही खूप stress मध्ये गेला होता...कारण एकाबाजुने लग्न करण्यासाठी घरचे राधाच्या मागे लागले होते तर विभाच्या घरचे सगळ सोडून घरी ये, आम्ही तुला आणखी पैसे नाही पाठवू शकत असे म्हणत होते..विभाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. डिग्री होऊन जवळजवळ चार वर्षे झाले होते...तरीही अजून रिझल्ट हातात नव्हता हे खूप मोठ टेंन्शन होत दोघींना तर दुसरीकडे आपण प्रामाणिकपणे , hard work आणि continuity ठेऊन अभ्यास केलेला आहे मग आपल्याला यश मिळणारच असा विश्वासही होता....या पूर्ण process मध्ये सगळ्यात गरजेची असतं ते अभ्यासातील सातत्य. ते पाळल की तुम्हाला यश हे मिळणारचं.


माञ रिझल्टची वाट जरी पाहत असल्या तरी राधा आणि विभाचा अभ्यास चालूच होता. त्यादिवशी दोघी नेहमीप्रमाणे लायब्ररीत अभ्यास करत होत्या.mpsc चा रिझल्ट लागला आहे; अशी चुबबूळ लायब्ररीत चालू होते. हे ऐकून इकडे राधा आणि विभाच्या चेहर्‍यावर समाधान ऊमटते...कारण त्यांना विश्वास होता, यावेळी दोन पोस्ट आपल्या दोघींच्या फिक्स असणारच आहेत फक्त वाट पाहत होत्या ती रिझल्टची.


दोघी कोणाशीही काहिही न बोलता नुसत्या शांत बसतात...तेव्हड्यात लायब्ररीत त्यांचीच कोणीतरी एक मैञिण मधूनच ओरडते "राधा आणि विभा तुम्हा दोघींच सिलेक्शन झाल आहे. अभिनंदन ."


राधा आणि विभा यांना आनंदाने काहीही न सुचून त्या एकमेकींना घट्ट मिठी मारतात व डोळ्यांतील आनंदाश्रूंनीच एकमेकींना अभिनंदन करतात.....तोपर्यंत दोघींच्याही मोबाईलवरती बर्‍याच जणांच्या शुभेच्छांचे मेसेज, काॅल येऊन थडकले होते....दोघींनीही स्वतच्या अथक प्रयत्नाने नशीबाला मागे सारून यश मिळवल होत....एका स्ञीमध्ये एवढ सामर्थ्य असत...की मेहनतीच्या बळावर ती स्वतला पूर्णपणे सिध्द करू शकते हे दाखवून दिलं होत.


"बंदे की मेहनत को किस्मत का प्रणाम" हे वाक्य खरं करून दाखवल होत....शेवटी काय तर तुमच यश हे तुमच्या मेहनतीच्या हातात आहे.


प्रिय वाचकहो, या प्रेरणादायी कथेवरून मला हेच सांगायच आहे की बर्‍याचवेळा आपण आपल्याला मिळालेल्या संधीच सोन करण्याऐवजी नशीबाला दोष देत राहतो आणि त्यातून पळवाट काढतो....पण नशीबाला दोष देण्यापेक्षा थोडं अधिक कष्ट केल असता आपणाला यश नक्कीच मिळत.

अपयश मिळाल असता त्यातून मार्ग कसा काढायचा, आपल्या चूका शोधून त्यात सुधारणा कशी करायची हे शिकायला हवं, ना की नशीबाला दोष देत बसावे.

कथा थोडी मोठी झाली आहे पण स्पर्धा परीक्षेची पुर्ण प्रोसेस कशी असते, त्यासाठी किती संयम ठेवावा लागतो, अभ्यासात कशाप्रकारे सातत्य ठेवावे लागते, अपयशाच दु:ख पचवून पुन्हा तयारीला कस लागायच, तुमचा स्वत:वरचा विश्वास किती महत्त्वाचा आहे, तुमची अभ्यासाची पध्दत तुम्ही स्वतच कशी ठरवाल, समाजाच्याप्रती तुम्ही किती संवेदनशील आहात याबाबतीत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे....जेणेकरून स्पर्धापरीक्षेत ऊतरताना तुम्हाला त्याचा ऊपयोग व्हावा हीच आशा आहे.....धन्यवाद.


कथा आवडल्यास like करून comment करा.


अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नकात.


प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव असतील.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational