madhuri dipak patil

Inspirational

4.2  

madhuri dipak patil

Inspirational

अनपेक्षित अपेक्षा #सरळ शब्दांत

अनपेक्षित अपेक्षा #सरळ शब्दांत

9 mins
500


"चल तुझ्या पहील्या दिवसासाठी तुला बेस्ट लक..." मानस


"थॅंन्क्यू नवरोबा..." म्हणतच सानवी गाडीतून ऊतरते.


मानस आणि सानवी नवरा-बायको...लग्न होऊन सहा महीने झाले होते....


आज सानवीचा नवीन आय.टी कंपनीतील पहिला दिवस होता....मानस तिला आॅफिसला सोडून पुढे स्वतच्या आॅफिसला निघून गेला. मानसी पहिल्यापासूनच धाडसी आणि त्यात कामाचा अनुभव असल्याने तिला आॅफिसची वा कामाची वैगेरे भिती नव्हती....तिला टेन्शन होत ते बरोबर काम करणार्‍या सर्व स्टाफचं. कारण तिने जाॅब करत असताना आजवर खूप अनुभव घेतले होते.


आत एंन्र्टी करते....तसे सर्व स्टाफ मेंबर तिच्याकडेच पाहत असतात जसे की ते तिच्या येण्याची वाटच पाहत असावे. सानवी मस्त बेबी पिंक कलरचा पंजाबी ड्रेस वरती स्काय ब्लू कलरच अॅंम्र्बाॅडरी केलेल शाॅर्ट जकेट आणि मस्त वनसाईड दुपट्टा अशा सोबर आणि डिसेंन्ट पेहरावात हील च्या सॅंडेलसह आत येऊन वेटिंग चेअरवरती बाॅसच्या केबिनबाहेर बसते....तिला जाणवत असतच की सर्वांच लक्ष तिच्याकडे आहे पण तिला याच मनातून हसू येत...कारण कधीकाळी जून्या कंपनीत काम करत असताना; तिनेही येणार्‍या न्यू मेंबरची अशीच निरीक्षणं केली होती.


त्या स्टाफ मेंबरपैकी असणार्‍या रागिनीला पाहताक्षणीच सानवीचं ड्रेसिंग, तिचे हावभाव एकूणच तिची पर्सनॅलीटी आवडते कारण तिला सानवीत स्वतच तरूणपण दिसत होतं....मग रागिनी मनातून खूष होते की चला बाबा कोणीतरी भारी कलीग आलं आॅफिसमध्ये....आता जरा नवीन गप्पा मारता येतील तिच्याशी. म्हणून त्या लगेच सानवीशी बोलायला जातात व स्वतची आणि तीच्याही परीचयाची देवाणघेवाण होते. सानवीलाही बर वाटत की पहिल्यादिवशी आॅफिसमध्ये आपल्याशी स्वतहून बोलायला कोणीतरी आल आणि महत्त्वाचं म्हणजे एक स्ञी.


सानवीला अगोदरपासूनच वाटायच की एका स्ञीनेच स्ञीला समजून घेतल तर कितीतरी गोष्टी सोप्या होऊन जातात....आणि आज तेच घडत होत. त्यामुळे बरोबर काम करणार्‍या स्टाफविषयीच तिच टेन्शन कमी झाल होत...


तोपर्यंत तिला बाॅसच्या केबिनमध्ये बोलवल जात. सानवी सरांशी भेटुन कंपनी जाॅईन केल्याच्या सगळ्या फाॅरमॅलीटीझ पुर्ण करून घेते.....तिला तिची चेअर आणि काम करण्यासाठीची जागा दाखवली जाते. पहिल्यादिवशी फक्त बसून राहयच काम नव्हतच. त्यामुळे तिचं चालू झाल ओळखी करून घ्यायच्या टीम मेंबरशी...यात पुढाकार घेतला होता तो रागिनीने. रागिनी स्वत: सानवीची सर्व टीम मेंबरशी आणि टीम मेंबरची सानवीशी ओळख करून देते....सगळे टीम मेंबर ऊत्साहात सानवीच वेलकम करतात. त्यामुळे तर सानवीच पूर्णच टेन्शन गायब होत...तिला खूप आनंद होतो की काय भारी लोक आहेत सगळे. किती मदत करतायेत एकमेकांना, केवढं मिळून काम करतायेत.


पहिला दिवस तर मस्तच गेला होता सानवीसाठी...आॅफिस सूटल्यावरती मानस न्यायला येतो. घरी जात असताना सानवी मानसला सगळ सांगते सकाळपासून ते आॅफिस सुटेपर्यंतच. तेव्हा ती स्टाफ मेंबरच भरभरून कौतुक करत असते पण मानस तिला बोलतो "सानवी लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात त्यामुळे जरा जपूनच रहा."


यावर सानवी "अरे अस काही नाही होणार....मला ओळखू येतात लगेच माणसं.


मानस "बररं तस असेल तर मग चांगलच झालं..."


दुसर्‍यादिवशी सानवी मस्त तयार होऊन अगदी टेन्शन फ्री आॅफिसच्या कामाला लागते...पहिल्यापासूनच तीच अस होत की कामाच्या वेळी कामच.... मग ब्रेकमध्ये कलीग बरोबर गप्पा. ती बसत होती तिथे शेजारीच रागिनीची काम करण्याची जागा होती. मग गप्पात पुढे असणार्‍या रागिनीला कुठे राहवत होत गप्पा मारल्याशिवाय. रागिनी तशी सानवीपेक्षा वयाने मोठीच होती. दहा वर्षांचा मुलगा होता तिला आणि सानवी नुकतच लग्न झालेली. त्यामुळे सानवी रागिनीला मॅमच म्हणत होती. पण रागिनीने तिला स्वतला ताईच म्हण अस सांगितल होत....ताई म्हटलेल जवळच वाटत अस रागिनीच मत.


तस पाहिल तर सानवीच्या टीममध्ये दहा लोक होते. सानवी, रागिनी आणि इतर आठजण. त्यात निम्मे रागिनीच्या वयाचे आणि निम्मे सानवीच्या वयाचे मेंबर होते...रागिनी बोलण्यात एक्सपर्ट असल्या कारणाने तिने सर्व टीम मेंबरला आपलस केल होत...हाच फंडा सानवीलाही लागू केला. पण सानवी मुळातच स्वाभिमानी तिला कोणाच्या पुढे -पूढे करायला आवडायच नाही. त्यामुळे ती जेवढ्यास तेवढीच बोलायची...पण शेवटी त्या टीममध्ये राहून तीही मिसळली त्यांच्यांत. कारण त्यात सगळेचजण मनमिळावू होते....


एकेदिवशी कंपनीत एक compitation ठेवण्यात आले...कोडींगचे. सानवीने लगेच स्वतच कोडींग रेडी ठेवल कारण कोडिंगमध्ये ती पहिल्यापासूनच हुशार होती. पण यात participate करू की नको असा प्रश्न सानवीला पडला होता. ती रागिनीला विचारते "मी participate करू की नको?" त्यावर रागिनी "अग कर गं बिनधास्त" अस म्हणून सानवीला आग्रहही करते. सानवीला खूप भारी वाटत की तिला साथ देणारं कोणीतरी आहे.


एव्हाना सानवी चांगली रूळली होती...आॅफिसमध्ये. सगळ्या सहकार्‍यांसोबत. सानवी मनोमन देवाचे आभार मानायची की thank god माझ्यासोबत काम करणारी लोकं एवढी चांगली आहेत. सानवीने सगळ्या सहकार्‍यांच्या मनात घर केलं होत. तशी ती मुळातच हूशार असल्याने कोणाला काही doubt आला तर तिच्याकडे सोल्यूशन असायचचं. त्यामुळे सगळेजण तिच कौतुक करू लागले होते. काहीजण तर आता तिच्याजवळ स्वतचे वैयक्तिक प्राॅब्लेमदेखील शेअर करत होते कारण त्यांना खाञी होती कि सानवी तिसर्‍या कोणाशी ते शेअर करणार नाही.....पण त्यामुळे इकडे रागिनीशी जवळीक साधणारा स्टाफ रोडावला.


कुठे ना कुठे टीममधील रागिनीच स्थान थोडस कमी झाल. टीम मेंबर सानवीला फर्स्ट preferance देऊ लागले....रागिनी मुळातच माणसाळू. तिला खटकू लागलं हे सगळ की पहिला माझ्याकडे प्राॅब्लेम घेऊन येणारे लोक आता सानवीशी संवाद साधत आहेत. अशातच कोडींग compitation चा result लागला नी "and the winner is sanvi deshmukh" अशी announcement बाॅसनी केली व सानवीला trophy मिळाली. सानवी खूष...तिच्यापेक्षा तिचे टीम मेंबर खूष. कारण कितीतरी दिवसांनी त्यांच्या टीमच कौतुक केल बाॅसनी...तेही सानवीमुळेच. पण चेहरा पडला तो रागिनीचा. कारण ती थोडीशी inscure झाली होती; तिच्या टीममधील स्थानाबद्दल. तीने ते दाखवून दिल नाही पण तिला जी भिती होती, तसच झाल....आता तर टीममेंबर्सनी सानवीला डोक्यावरच घेतल.


काही झाल तरी सर्वांच्या तोंडात सानवीच. रागिनीला खूपच कसतरी वाटायला लागल....मनात अनेक विचार येऊ लागले. सानवीच्या आॅफिसमधील पहिल्याच दिवशी रागिनीला आवडलेली, आपलीशी वाटलेली सानवी आता नको वाटू लागली होती. कुठेना-कूठे मनात काहीतरी बोचत होतं..."मीच तर तिला आधार दिला होता पहिल्यादिवशी....मीच म्हटल कर participate म्हणून आज ती वीनर आहे...आणि आता केवढी मिरवतेय माझ्यामूळेच पण....हूहहहहं कानामागून आली आणि तिखट झाली." रागिनी मनाशीच बोलत होती. तिच्या मनात सानवीबद्दल, तिच्या sucess बद्दल एक वेगळीच असूया निर्माण झाली होती.


रागिनी आता सानवीशी पहिल्यासारखी मनमोकळेपणे बोलत नव्हती....सानवीलाही ते जाणवत होत पण मुळातच तिचा रागिनीवरती विश्वास असल्याने; सानवीला असूया वैगेरे असा प्रकार ध्यानी-मनीही नाही आला. ती आपली नेहमीप्रमाणेच बोलत होती रागिनीशी. पण इकडे रागिनीच मन सानवीबद्दल कलूषित होत चालल होत. रागिनीच्या मते मीच सानवीला येवढ्या पुढे घेऊन आले...


पण सानवीशी तुलना आणि असूया करत असलेल्या रागिनीला हेच समजत नव्हत की सानवी compitation जिंकली होती ती तिच्या टॅलेंन्ट मुळे. मुळातच तिने अगोदरच तयारी केली होती सर्व...फक्त टीममधल्या लोकांच किंवा जवळच्या वाटणार्‍या रागिनीच मत एकदा घ्याव या अनुशंगाने तिने विचारल होत pariticipate करू की नको...


यात सानवीने रागिनीला तीच मत विचारून रागिनीला मानच दिला होता...पण रागिनी त्याला आपण सानवीवर ऊपकार केले अस समजत होती. तस पाहिल तर त्यावेळी जरी रागिनी काही म्हटली असती तरी सानवीने participate केलचं असत....रागिनी तर फक्त माध्यम झाली होती...कारण जगात कोणाचच कोणामुळे अडत नाही. ही झाली एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे बाकी टीम मेंबर्सनी सानवीला एवढ महत्त्व देण्याच कारण म्हणजे सानवीच स्वतहून कोणाच्या कामात वा पर्सनल लाईफमध्ये न डोकावणं....स्वतहून कोणाच्या पुढे-पुढे न करणं....आणि मदत मागितलीच कोणी तर त्या व्यक्तीला मदत करणं माञ त्याचा गाजावाजा न करणं....जे की रागिनीच उलटं होत...


हे सगळ खर झालं पण रागिनीच मन सानवीबद्दल खूपच असूयेने भरल होत आणि मनाने साफ असणार्‍या सानवीला याची काहीच कल्पना नव्हती. रागिणीने आता हळुहळू स्टाफ मेंबर्समध्ये सानवीबद्दल चूकीच्या गोष्टी पसरवायला सुरूवात केली होती....म्हणतात ना माणूस हा प्रशंसेचा भूकेला तसचं काहीस झाल रागिनीच....तिला अस वाटू लागलं की सर्वांनी पहिल्यासारख तिचचं कौतुक कराव सानवीच नाही. म्हणून ती हळूहळू सगळीकडे पसरवू लागली की माझ्यामूळेच आज सानवी एवढ्या पुढे गेली आहे....मीच तिला guide केलं होत. मीच तिला टिप्स दिल्या होत्या वैगेरे.....मी एवढी मदत केली हिला आणि ती आता मला विसरली....शेवटी काय तर कानामागून आली आणि तिखट झाली हेच खरं.....


टीम मेंबर्सनाही हे माहीत होत की रागिनी खूपच मनाला लावून घेणारी आहे आणि सानवी खूप कृतज्ञ आहे....मग चूकतय कोणाच? त्यातीलच एका वयस्कर सानेमॅडमच्या लक्षात येत की हा तर हा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि याला कारणीभूत आहे अनपेक्षित अशी अपेक्षा.

साने मॅडम ठरवतात आपण फक्त हा गैरसमज दोघींच्याही लक्षात आणून द्यायचा.....प्राॅब्लेम त्यांच त्या सोडवतील कारण ज्या दोघांमध्ये गैरसमज झाला आहे त्यांनीच संवाद साधावा तिसर्‍या कोणी मधे पडलं तर ते गैरसमज आणखी वाढत जातात अस अनुभवाने डोक्याचे केस पांढरे झालेल्या साने मॅडमच मत.


सानेमॅडम रागिनी जे काही आॅफिसमध्ये सानवीविषयी बोलत होती ते सानवीला सांगतात....


सानवीला हे सगळच अनपेक्षित होत. कारण मुळातच रागिनी वयाने तिच्यापेक्षा मोठी. सानवी तर तिला ताई म्हणायची....मग ही असूया, तुलना कुठून आली दोघींमध्ये...? कारण सहसा तुलना होते ती बरोबरच्या वयामध्ये. सानवीला हे सगळच अनपेक्षित .... तिला स्वप्नातही वाटलं नव्हत की रागिनीमध्ये आणि तिच्यामध्ये अशी अनपेक्षित अशी अपेक्षा असू शकेल....


सानवी "साने मॅडम बर झाल तुम्ही मला हे सांगितलत....कारण रागिनीच्या मनात माझ्याविषयी अस काही चालू असेल....याची मला कल्पनाच नाही आली कधी...कदाचित मी तितकसा खोलवर विचारच नाही केला....मला खूप वाईट वाटत आहे आणि महत्त्वाच म्हणजे मनातील या विचारांपासून मी अनभिज्ञच राहिले....मला पहिल्या दिवशी स्वतहून आपलस करणार्‍या रागिनीच्या मनात माझ्याविषयी असे विचार लगेच तर आले नसतील...त्याची सुरूवात हळुहळू होऊन त्याची जागा असूयेने घेतली.... रागिनीच्या या भावना खरचं मला लक्षात आल्या नाहीत..."


साने मॅडम "तु जास्त विचार नको करूस ग...काय ते तुम्ही दोघी एकञ बसून-बोलून मिटवा."


"नाही मॅम...माझही चुकलचं जरा. काय बिघडल असत, मीही रागिनीला थॅंन्क्यू म्हटलं असत तर...पण खरतर माझ्या लक्षातच आलं नाही; मी समजले की फ्रेंडशिप मध्ये काय गरज आहे थॅंन्क्यू, साॅरीची...कारण तस तर टीममध्ये सगळेजण सगळ्यांना मदत करत असतात, प्रेरणाही देतात. कदाचित मी कोणाकडून कधी थॅंन्क्यूची अपेक्षा केली नाही त्यामूळे मला समजलच नाही की समोरची व्यक्ती ती अपेक्षा करू शकते...मला आज खूप मोठी गोष्ट शिकायला मिळाली आहे ती म्हणजे समोरच्याची अनपेक्षित अपेक्षा समजून घेण्याची."


सानवी तडक रागिनीला "आपण चहा घेऊयात का?" म्हणून रागिनीला आॅफिसच्या कॅंन्टीनमध्ये घेऊन जाते.....सानवीने एकदम विचारल्याने आणि रागिनीला हो नाही म्हणायला वेळच न दिल्याने रागिनीला जावच लागत.


सानवी "रागिनीताई मला माफ कर गं....खूप दिवस झाले मी तुला थॅंन्क्यू बोलायला हव होत पण माझ्या लक्षातच नाही आल ते...आय आॅम सो साॅरी..."


रागिनीला समजत की कदाचित आपण सानवीविषयी बोललेल तिच्यापर्यंत पोहचल असाव...ती मनातून खजील होते...कारण सानेमॅडम रागिनीलाही बोलल्या होत्या. रागिनीला माहीत होत की सानवी मनाने किती सालस, निरागस आहे...चूक आपलीच आहे; आपण तिच्याबद्दल वाटणार्‍या इर्ष्येमूळे तिच्याविषयी आॅफिसमध्ये अस बोलायला नको होत....


रागिनी "नाही सानवी चूकलचं माझ...तु मला थॅंन्क्यू म्हणावस अशी अपेक्षा मी करायलाच नको होती...कारण जर का मी तुझी मदत केली असेल तर ऊद्या तुही माझी मदत या ना त्या रूपाने केलीच असतीस...किंबहूना या अगोदर मलाही कित्येकजणांनी मदत केलीच आहे. मग या मदतीचे हिशोब ठेवणच चूकीच आहे...हे सगळ देवच घडवत असतो. आपण फक्त एक माध्यम असतो. इथे अपेक्षित अनपेक्षित सगळ घडत तेही त्याच्यामुळेच मग आपण हिशोब ठेवणारे कोण? खरचं ग मी तुझ्याविषयी अस बोलण्याअगोदर स्वतमध्ये पाहयला हव होत.


कारण असही कोणाच कोणावाचून अडत नाही...आपण मदत नाही केली तरी दुसरा कोणी तरी करतोच...आणि आपण आपल्या लक्षापर्यंच पोहचतोच...खरतरं माझी ही अपेक्षा मी तुला बोलुन दाखवली असती तर कदाचित ती तुझ्यापासून अनपेक्षित राहिली नसती आणि आपल्यामध्ये गैरसमज झालाच नसता...."


सानवी " बरोबर बोललीस रागिनीताई....मीही तुझ्या बदलेल्या वागण्याविषयी, माझ्यापासुन दुर राहण्याविषयी तुला एकदा विचारून क्लिअर करायला हव होत...मीही दूर्लक्षच केल आणि त्यामुळे तुझे माझ्याविषयीचे तिखट विचार आणखीच प्रबल होत गेले....बोलायला हव होत. असो अंत भला तो सब भला."


"...कानामागून आली आणि खूप काही शिकवून गेली तेही अनपेक्षितपणे" अस म्हणून रागिनी हसते आणि तिच्या वाक्याला दुजोरा देत सानवीही मस्त स्माईल करते.


बर्‍याचवेळा अस होत की समोरची व्यक्ती आपणाला मदत करते आणि आपण थॅंन्क्यू म्हणायच विसरून जातो...मग मदत करणार्‍याला वाटतं की काय साध 'थॅंन्क्स' सूद्धा म्हटल नाही. मग मदत करणार्‍या व्यक्तीच्या मनात तिसर्‍या कोणाला मदत करताना मदत करावी की नको असा विचार येतो....आणि हे सहजरित्या घडत. आपण म्हणतो दोस्ती मैं no thanks, no sorry पण अनासाये म्हणा अथवा अनपेक्षित पणे ती अपेक्षा राहते मनात...याला काही अपवाद असतीलही....त्यामुळे thanks म्हणा..जेणेकरून ती व्यक्ती तिसर्‍या व्यक्तीला मदत करेल...खुप छोटीच तर असते ही अपेक्षा.


तर दुसरीकडे असाही विचार करायला हवा की आपण समोरच्या व्यक्तीला मदत करताना त्याने धन्यवाद म्हणाव अशी अपेक्षा न करताच ती मदत करावी. म्हणजे मग अनपेक्षीत अपेक्षांच ओझ आपल्या मनावर राहून ऊगीचच आपणाला ञास होणार नाही....आपण एकदा मदत केली तर त्याच फळ आपल्याला दुप्पट मदतीने मिळणार आहे...असा विचार ठेऊन मदत केली तर नक्कीच तुम्ही स्वतला खूष ठेऊ शकाल बरोबर ना.....

बर्‍याचवेळा अशा अनपेक्षित अपेक्षांमूळे अनपेक्षित घटना घडत असतात. मग ते आॅफिसमध्ये असो वा फॅमिलीमध्ये(सासु-सून,नवरा-बायको,दीर-जाऊ)...एकमेकांकडून अशा अपेक्षा ठेवल्या जातात....मग गरज आहे ती अशा अपेक्षा नसलेल्या म्हणजेच अनपेक्षित अपेक्षा ओळखण्याची कारण त्या वेळीच ओळखल्या तर गैरसमज दुर होतात आणि नात्यात येणारी कटूता टाळली जाऊन नाती जपली जातात.


प्रिय वाचकहो, तुमच्या प्रतिसादामुळे लिहायला ऊत्साह येतो....त्यामुळे असाच प्रतिसाद देत रहा...आणि तुम्हालाही कधी असे अनुभव आले असल्यास नक्की शेअर करा...तुमचं मन हलक होईल...धन्यवााद...!!



प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. शेअर करत असताना लेखिकेच्या नावात अथवा लेखणात फेरफार केलेला आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational