"सुनबाई तु बरोबर होतीस..."
"सुनबाई तु बरोबर होतीस..."


"सुनबाई राघव कुठे गेलाय अजून आला नाही." अण्णा दबक्या आवाजात.
"मिञाकडे गेल्यात कोणाचातरी वाढदिवस आहे...." मानसी
"पण आत्तापर्यंत यायला हवा होता....राञीचे अकरा वाजून गेले...." अण्णा
"बघा ना हो अण्णा मला न सांगताच गेल्यात...मी फोन करून विचारल्यावर सांगितल मला...आणि माघारी किती वाजेपर्यंत याल अस विचारेपर्यंत फोन कट केला."
"हो राञीचे अकरा वाजून गेले म्हणे....तो एकदिवस मिञांबरोबर बाहेर काय गेला की तुम्ही दोघांनी सुरू केलत का? राहूद्या ना त्याला जरा निवांत...." तणतणच सासुबाई.
यावर अण्णा(मानसीचे सासरे) काहीच बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या बायकोचा स्वभाव माहित होता, त्यामुळे ते तिच्या तोंडाला लागत नसत.
"हो पण आई , त्यांनी निदान सांगुन तरी जायच होत...ईशा देखील पप्पांची वाट पाहून झोपी गेली." ईशा राघव आणि मानसीची पाच वर्षांची मुलगी.
"तो काही तुझा नोकर नाही....प्रत्येक गोष्ट तुला सांगायला....त्याला हव तेव्हा जाईल व हव तेव्हा येईल...आम्ही लहानपणापासून किती लाड केला आहे त्याचा, कधीही त्याला कोणती गोष्ट करण्यापासून रोखल नाही...." सासूबाई
मानसी यावर काहीच बोलत नाही कारण तिलाही माहित होत सासुबाई त्यांचच खर करणार आणि आपल्याला चूकीच ठरवणार....मानसी किचनमधल आवरून बेडरूममध्ये झोपण्यासाठी निघून जाते....पण मानसीला झोपच लागत नसते, ती या अंगावरून त्या अंगावर होत असते आणि राघव विषयी विचार करत असते ; अजून कसा आला नाही राघव, त्यादिवशीपण असाच न सांगता गेलेला...तेव्हापण आईंनी त्याची बाजू घेऊन मला गप्प बसवल पण आज नाही....आज बोलेनच मी त्याला...अस सारख-सारख एवढ्यावेळ बाहेर राहण मला तरी पटत नाहीये....तो कोणत्या मिञांबरोबर जातोय हेदेखील माहीत हवय. शेवटी संगत खुप महत्त्वाची आहे...आणी संगत चांगली आहे तर तो न सांगता का जातोय....
मानसीच्या मनात चांगले-वाईट विचार चालूच होते, तेव्हड्यात राघव रूमचा दरवाजा आपटतो आणि घरात येतो.....मानसी दचकून जागी होते. पाहते तर राघव...ती ऊठून त्याला काही विचारणार ईतक्यात त्याचा थोडा तोल जातो....म्हणून मानसी त्याला आधार द्यायला जाते तर तिला राघवच्या तोंडाचा दारूचा वास येतो.....मानसी वासाने थोडी भांबावतेच आणि पुन्हा जवळ जावून पाहते तर तोच वास ज्याची तिला कायम चीड होती...दारूचा वास !
मानसी काही बोलणार तोच राघव "its OK ना आज पहिल्यांदाच घेतली...तेही बाॅसचा बर्थडे होता आणि मिञांनी पैज लावलेली की तु पिऊनच दाखव...मी जिंकलो....पिऊन दाखवली.."
मानसीला रडाव की त्याला ओरडाव काहीच कळत नव्हत....तिला ज्या चूकीच्या संगतीची भिती होती, ती भिती खरी ठरलेली......
मानसी "अरे पण राघव तु हे सर्व करताना माझा नाही पण निदान या पोरीचा ईशाचा तरी विचार करायचास...ती बिचारी 'पप्पा-पप्पा' करून झोपी गेली.."
राघवलाही माहित होत त्याची चूक झालेय....आपण चूकीची गोष्ट केलेय. एवढी सोन्यासारखी बायको आणि पोरगी असताना या विषारी दारूला जवळ केल....तो मानसीची माफी मागतो...
"राघव मला सांग हे कधी पासून सुरू केलयस तु....सांग प्लीज...."
"मानसी रागावू नकोस, पण मागच्यावेळी एकदा आणि आज दुसर्यांदा....." म्हणून राघव मान खाली घालतो.
मानसी स्वभावाने खुप प्रेमळ होती पण चूकीच्या गोष्टीला ती कधीच पाठी घालणारी नव्हती. चूक ते चूकच अस तीच कायमच मत....त्यामुळे ती राघवला बेडरूम मधून जायला सांगते.....आणि त्याची ऊशी व ब्लॅंन्केट हाॅलमध्ये ठेवून देते. राघव बोलण्याचा प्रयत्न करतो पण "अगोदर पूर्णपणे शुद्धीवर ये आणि मग माझ्याशी बोल" म्हणून मानसी राघवला बाहेर काढून बेडरूमचा दरवाजा बंद करून घेते.....
दुसर्या दिवशी सकाळी आईसाहेब राघवला हाॅलमध्ये पाहतात व आरडाओरडा करायला सुरूवात करतात व किचनमध्ये नाश्ता बनवत असलेल्या मानसीकडे पाहून......."माझ्या मुलावर आज ही वेळ आलेय का की त्याने हाॅलमध्ये झोपाव. बाहेर मिञांबरोबरच तर गेला होता ना....काही चोरीबिरी तरी नाही केली त्याने...."
सासुबाईंच्या आवाजाने अण्णा हाॅलमध्ये येतात व राघवही ऊठतो....."आई जावूदे ना, तु कशाला ओरडतेस....माझ मीच झोपलेलो हाॅलमध्ये......बेडरूममध्ये जरा गरम होत म्हणून..." राघव आईने पुढे प्रश्न विचारू नये आणि मानसीने आपल भांड फोडू नये म्हणून विषय बदलण्यासाठी बोलतो.
अण्णा शांतपणे सगळ पाहत आणि ऐकत असतात. त्यांनाही माहित होत मानसी शिस्तप्रिय आहे आणि नक्कीच राघवने अस काहीतरी केल असणार ज्यामुळे त्याची रवानगी हाॅलमध्ये करण्यात आलेय.
पण राघव म्हणजे सासुबाईंचा लाडका बबड्या.....त्यांचा ञागा होत होता.....मानसी गप्प आहे बघून त्या मानसीलाच विचारतात काय ग मानसी तुच तर नाही........ना ?
तोच राघव "नाही ग आई तु ऊगीच मानसीला कशाला ओढतेस मध्ये......." म्हणून आईला शांत करतो......व सोफ्यावर बसवून आईसाठी चहा आणतो.
"थॅंन्क्यू बबड्या......किती काम करतो माझा मुलगा तरी सगळ्यांना त्याच फिरलेलंच दिसत.....हूहहहह......"
मानसी मनातच आई तुम्ही त्याला पाठी घालत आहात पण याचा तुम्हाला लवकरच पश्चात्ताप होईल..
रविवारी सुट्टीच्या दिवशी परत राघव घरी न सांगताच दिवसभर गायब होतो.....घरी पुन्हा तोच विषय आणि सासूबाईंच राघवची बाजू घेण ठरलेल.....त्यादिवशी राञी नऊ वाजता पोलिसस्टेशनमधून फोन येतो की राघव परांजपे यांना ड्रिंक करून ड्राईव्ह केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली आहे.....सासूबाई विश्वास ठेवायला तयारच होत नाहीत. त्यांच आताही असच म्हणन असत की ऊगीच मिञांनी त्याला अडकवल असेल......
अण्णा आणि मानसी पोलिस स्टेशनमध्ये जावून राघवला घरी आणतात.....घरी आल्यावर राघव स्वत:च मानसीची आणि आई-अण्णांची माफी मागतो.....त्यावेळी कुठे सासुबाई विश्वास ठेवतात....व खरच आपण आईच्या ममतेपुढे किती आंधळे झालेलो व सुनबाई तु बरोबर होतीस अस म्हणून मानसीची माफी मागतात...मानसी तर राघव बरोबर एक महिना अबोला धरते.....व राघव बाहेर जाणे, लेटनाईट पार्ट्या करणे, ड्रिंक करणे बंद करेल याच बोलीवर त्याच्याशी बोलते....व यावेळी सासुबाईही तिला साथ देतात.
समाजात अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात....जिथे व्यसन करणारा तर असतोच विघातक पण त्याला पाठी घालण्यामुळे अनेक अनर्थ घडतात....संसारच्या संसार ऊद्ध्वस्त होतात......केवळ आपल्या सुनबाईला चुकीच ठरवण्यासाठी आपल्या मुलाला तुम्ही पाठी घालत असाल तर तो तुमचाच घात ठरतो......तसेच आपण कुटूंबात राहतोय म्हटल्यावरती, प्रत्येकाच कुटूंबातील सदस्य योग्य मार्गावर चालतोय का याकडे लक्ष हव.....तरच त्याला योग्य वेळी आळा घालता येईल अन्यथा वेळ निघून जाईल आणि तुमच्या जवळचाच व्यक्ती तुमच्या पासून दुरावेल.